Skip to main content

राप्चिक र्राप्चिक कूल कूल

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 16/10/2010 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न झालेली टंच बाई जणू दुधात ग्गच्च मलाई माझ्या मनात घालमेल होई राप्चिक रप्चिक कूल कूल... असं कसं माझं वय झालं इतक्या लवकर म्हातारपण आलं सालं नुसतं बघणंच नशिबी आलं राप्चिक राप्चिक कूल कूल.. डोळे विस्फारून पहात होतो भान हरवउन गेलो होतो जणू डोळ्याने आग ओकत होतो राप्चिक राप्चिक कूल कूल.... इतक्यात मुलाच लक्ष गेले माझ्या डोळ्यातलं अचूक ओळखले " बाबा उन कडक आहे तो गॉगल लावा" पोर बोलले माझ तोंड शरमेनं खाली गेले काही श्लोक म्हणायचे नाटक केले गीतेचे श्लोक उलटे म्हटले
काव्यरस

तो आणि त्याची स्वप्नं

लेखक पुष्कर यांनी शनिवार, 16/10/2010 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
अरे ऊठ ऊठ, जरा डोळे बंद कर हो हो, जरा डोळे बंद कर डोळे उघडलेस की तू तुझ्या त्या नेहमीच्या जगात जातोस तिकडे सगळ्या प्रकारची दुखणी आहेत, त्रास आहेत भरीत भर म्हणून झुरळं-ढेकूण-पिसवा-डास आहेत त्यापेक्षा तुझे डोळे असे मिटलेलेच राहू देत बाहेरच्या जगाशी सगळे बंध तुटलेलेच राहू देत चल आमच्या बरोबर, सगळं विसरशील मग तू चल ना रे स्वप्नांच्या गावाला, सगळं विसरशील बघ तू इथलं जग आहे कुठल्या तरी वेगळ्याच रंगांनी रंगवलेलं तुझ्या मनाच्या आतल्या कोपर्‍यात तूच कधीतरी गोंदवलेलं त्या रंगांची उधळण तू तुला हवी तशी कर इकडची वस्तू तिकडे तुला हवी तशी कर चल आमच्या बरोबर, सगळं विसरशील मग तू चल ना रे स्वप्नांच्या गावाल

सध्याचे वाचन: पुरंदरचा तह ~~ पराभव की विजय??

लेखक बट्ट्याबोळ यांनी शनिवार, 16/10/2010 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
शिवाजी महाराज आणि जयसिंग यांच्यातील "पुरंदरचा तह" ही घटना मी आजपर्यंत महाराजांच्या आयुष्यातील एक पराभव समजत होतो. किंबहुना इतिहासाच्या पुस्तकामधे आणि इतर अवांतर वाचनामधे या घटनेचे हेच स्वरूप लिहिलेले आहे. परंतु नुकतेच सारंग माडगुळकर यांनी लिहिलेले "किंग शिवाजी - अ स्पिरिच्युल क्वेस्ट" हे ई-बुक वाचनात आले. लेखकाने या घटनेचे एका वेगळ्याच द्रुष्टिकोनातून विश्लेषण केले आहे.

पांढरीशुभ्र माणुसकी !!

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 16/10/2010 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
भर दुपारची, रणरणत्या उन्हाची वेळ! हायवेवर गाड्यांची तुरळक ये-जा सुरू होती. एक आलिशान मोटार भरधाव वेगात रस्त्यावरून पुढे आली आणि क्षणभरासाठी तिची गती मंदावली. रस्त्याकडेला थांबली. मागचा दरवाजा किलकिला उघडला. काहीतरी पांढरंशुभ्र बाजूच्या खड्ड्यात भिरकावलं गेलं. गाडीनं पुन्हा वेग घेतला आणि पुढच्या क्षणाला ती दिसेनाशीही झाली. ... रस्त्याकडेच्या त्या खड्ड्यातून वेदनांनी कळवळणारे आवाज येत होते. खूप मागून, एक जुनाट मोटार जिवाच्या करारावर रस्ता कापत चालत होती. खड्ड्याजवळ येताच, ती मोटार थांबली. मागच्या सीटवरून एक मध्यमवयीन स्त्री बाहेर आली. कळवळण्याचा आवाज आता मंद झाला होता.

ग्राम ते सेवाग्राम

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 16/10/2010 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच कॉंग्रेसने ग्राम ते सेवाग्राम नावाचा कार्यक्रम केला. राजमाता सोनियाने आपल्या उपस्थितीने ह्या कार्यक्रमाला "चार चांद" लगावले. http://72.78.249.107/esakal/20101015/5539132099363826945.htm त्याआधी माणिकराव व अन्य कुणीतरी तसेच तेजस्वी रत्न यांच्या प्रांजळ चर्चेत अशी बाब उघडकीस आली की राजमातेच्या सभेकरता आणि अन्य कार्यक्रमाकरता कोट्यावधी रुपये मंत्र्यांकडून वसूल करण्यात आले. ( अर्थात सगळे मंत्री हे सेवेचे व्रत घेऊनच राजकारणात उतरले आहेत. त्यामुळे ते आपल्याच खिशात हात घालून तो सगळा खर्च करतील ह्याची खात्री आहे.

क्षण..

लेखक अथांग यांनी शनिवार, 16/10/2010 05:14 या दिवशी प्रकाशित केले.
क्षण मन फुलवा क्षण मन झुलवा.. क्षण क्षणातच बंद क्षणाचा हा धुंद ठेवा! सुख साखर-पेरणी क्षण-क्षणाची करणी.. नसे दुःखाचा संग तुझे आकाश-धरणी! आता भरार-भरार व्हावे क्षणात फरार.. जरी क्षणाचा आनंद त्याही क्षणाचे आभार!!

फिलाडेल्फीया

लेखक प्रभो यांनी शुक्रवार, 15/10/2010 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
दोन तीन विकांतापुर्वी फिलाडेल्फीया ला गेलो होतो...