Skip to main content

हम है मताअ-ए-कुचा

लेखक शरद यांनी मंगळवार, 31/05/2011 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
हम है मताअ-ए-कूचा-ओ बाजारकी तरह उठती है हर निगाह खरीदार की तरह ...१ इस-कू-ए-तश्नगी मीं बहुत है कि एक जाम हात आ गया है दौलते-नादार की तरह ...२ वो तो कहीं है और, मगर दिल के आसपास फ़िरती है कोई शै, निगहे यार की तरह ...३ सीधी है राहे-शौक, पे यूं ही कहीं कहीं खम हो गयी है गेसू-ए-दिलदार की तरह ...४ अब जा के कुछ खुला ., हुनरे-नाखुने-जुनूं जख्मे-जिगर हुए लबो-रुख्सार की तरह ...५ "मजरूह", लिख रहे है वो, अहले-वफा का नाम हम भी खडे हुए है गुनहगार की तरह ...६ महरूह् मताअ ..मालमत्ता, माल, वस्तू. . कूचा--गल्ली. निगाह ... नजर. तश्नगी ... तहान. नादार ... निर्धन, कंगाल, गरीब. शै ...

इतकेच मला भरताना...

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 31/05/2011 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या कंपनीत सगळीकडे अपरेझलच्या चर्चा आणि काथ्याकुट चालू आहे, त्यातच काल कविवर्य सुरेश भटांची अप्रतिम गझल आकाश उजळले होते वाचनात आली आणि आमच्या लेखणीला बर्‍याच दिवसांनी प्रेरणा मिळाली.. इतकेच मला भरताना अपरेझल कळले होते सगळ्यांचे रेटिंग 'त्यांनी' आधीच ठरवले होते ही सिस्टिम अपरेझलची बोलून बदलली नाही मी ऍप्रिशिएशन लेटर नुसतेच जमवले होते मी ऐकवली साहेबाला माझी 'कर्म' कहाणी 'यादी'तून त्यांने माझे पण नाव वगळले होते झालेल्या अपरेझलचा उपहास चला विसरू या (रेटिंग कधी दिधलेले माघारी वळले होते?

आशीर्वाद..?

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी रविवार, 29/05/2011 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
झ-यांनी आजकाल दगडातून फुटणं सोडून दिलय पक्षांनिही आजकाल किलबिलणं बंद केलय फुलांनी आजकाल फुलणं’ सोडून दिलय पावसाने तर आपलं कोसळणच बंद केलय त्यांना म्हणे माणसां कडून उत्तर हवय .. की ही हिरवीगार जंगलं तुम्ही का तोडलीत...? " माहितीच्या अधिकाराच्या कायद्यात तुम्ही बसत नाही" असं माणूस त्यांना म्हणाल्याचं ऐकतोय..! " हो पण झाडे तोडणे हा गुन्हा आहे.. असं तुमचा कायदाच सांगतो..ना.." असे असित्वाने त्याला विचारले असंही ऐकतोय..! "हो गुन्हा आहे म्हणून आम्ही त्याचा दंड ही भरतो.की." असं माणूस त्यांना म्हणाला, आणि गुन्हा आहे पाप तर नाही ना..?

हत्या करायला शीक

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 29/05/2011 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
हत्या करायला शीक विद्येविना मती गेली, मतीविना निती गेली, नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, असे महात्मा जोतीबा फुले म्हणायचे. शेतकर्‍यांची मुलं शाळा-कॉलेजात शिकायला गेली की शिकून-सवरून शहाणी होतील आणि मग शिकून-सवरून शहाणी झालेली शेतकर्‍यांची मुले आपल्या घरातल्या, गावातल्या म्हणजे पर्यायाने शेतकरी समाजातल्या दारिद्र्याचा समूळ नायनाट करतील, असे महात्मा जोतीबा फ़ुलेंना वाटायचे.

डॉ. जी. जॉन सॅम्युएल - द्राविड भाषाभ्यासक पंडित यांची भेट .

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 29/05/2011 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. जी. जॉन सॅम्युएल - द्राविड भाषाभ्यासक पंडित यांची भेट ....
"सध्या सर तमिळभाषेला जागतिक पातळीवर अभिजात भाषेचा मान मिळवून देण्यासाठी संशोधन कार्य करतायत, त्यात अत्यंत व्यस्त आहेत. तुमची अपॉईंटमेंट आहे का? काहीही झाले तरी १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ काही मिळणार नाहीए." आम्हाला रिसेप्शनवरच कडकडत्या तमिळमिश्रीत इंग्रजी उच्चारांमधून समज दिली जाते.

कच्चे मुर्ग की बिर्याणी

लेखक सानिकास्वप्निल यांनी शनिवार, 28/05/2011 04:51 या दिवशी प्रकाशित केले.
मास्टरशेफ संजीव कपूर ह्यांच्या खाना खजाना मध्ये ही पा़कृ पाहीली होती , तीच करुन बघीतली आणी इथे देत आहे :) साहित्य चिकन मुरवण्यासाठी: १/२ किलो साफ करून तुकडे केलेले चिकन २-३ टेस्पून आले+लसुण पेस्ट २ कप दही १ कप तळलेला कुरकुरीत कांदा १/२ कप बारीक चिरलेला पुदीना १/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर १ टीस्पून वेलचीपूड २ टीस्पून लाल तिखट १ १/२ टीस्पून गरम मसाला १ टेस्पून लिंबाचा रस १ हिरवी मिर्ची चिरून मीठ चवीनुसार १-२ टेस्पून तुप .