आई गं! काय ती जळजळ!
जळ-जळणे, आम्लपित्त, घश्याशी येणे, अॅसीडीटी मुळे पोटात/छातीत दुखणे- काही वर्षांपूर्वी ही लक्षणं फक्त पन्नाशीच्या पुढच्या व्यक्तींमध्ये आढळून येत होती. पण गेल्या काही वर्षात दिवसंदिवस तरुण वयोगटात पण अॅसीडीटी चा विकार वाढत चाललाय. असं अचानक कसं झालं? हे अचानक झालेलं नसून बऱ्याच वर्षांपासूनच्या खाण्या पिण्याच्या सवयी पूर्णपणे बदलून टाकल्यामुळे झालंय. शाळेत असे पर्यंत रोज दिवस भरात ६ वेळा खाणारी मुलं, कॉलेजला गेल्यावर फक्त चहा/कॉफी, पफ/पॅटीस व इतर जंक फूड आणि वरचेवर बाहेरचं अन्न खायला लागली. स्लिम फिगर च्या नादात तरुण मुलींनी 'ताटभर जेवण म्हणजे विष' असल्यासारखे त्याचा बहिष्कार केला.
मिसळपाव