Skip to main content

बायका बायकांची बरोबरी का करतात

लेखक अप्पा जोगळेकर यांनी सोमवार, 21/11/2016 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
बायका बायकांची बरोबरी का करतात हा मला पडलेला एक प्रश्न आहे.जेव्हापासून मला समजायला लागले आहे तेव्हापासून मी आजुबाजुला बघतो की आकर्षक,टंच,अधिकार पदावर असलेल्या बायका ज्या गोष्टी करतात त्या केल्या की अन्य सामान्य बायकांना आपले मेटल सिद्ध् केल्याचा फील येतो. १. कतरिना कैफ छोटे कपडे घालते, करा अनुकरण. प्रियांका चोप्रा बिकिनी घालते, करा अनुकरण. मग बेफिकीरीत आपल्या बेढब देहावर तंग कपडे घालून स्वतःला माधुरी दीक्षितच्या बरोबरीत आणून ठेवल्याचा ' लूक ' देत असतात २. शेजारची टंच मुलगी जिन्स ,टी शर्ट वापरते. मग इतर बायकाही तिचे अनुकरण करतात.

योगशिबीरातले दिवस २: योगाभ्यास- A man is as old as his spine is flexible

लेखक आर्या१२३ यांनी सोमवार, 21/11/2016 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या लेखात शिबीराची ओळख, दिनचर्या सांगितली . या लेखात शिबीरात काय काय शिकलो हे थोडक्यात सांगत आहे. अर्थात शेवटी, केंद्रातले व्यासंगी, प्रगल्भ वक्ते हे सगळे अतिशय प्रभावीपणे अगदी सहजगत्या उलगडुन सांगतात. तिथले प्रदुषणमुक्त वातावरण, आहार-विहार आणी मुख्यतः सामुहिक साधनेचा खुप फरक पडतो. सकारात्मक स्पंदने मिळतात. अष्टांग योगात यम नियम वगैरे असतात हे आपण वाचले/ऐकले आहे. पण यम नियम म्हणजे तरी काय, याबद्दल जे आम्हाला सांगितले ते इथे मुद्द्यानिशी मांडतेय .

योगशिबीरातले दिवस १- ओळख, दिनचर्या

लेखक आर्या१२३ यांनी सोमवार, 21/11/2016 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
विवेकानन्द केन्द्र, योग शिबिर तसे कॉलेजात असताना रोटरॅक्टचा युथ कॅम्प अटेन्ड केला होता. पण तो अगदीच ४ दिवसाचा. ४ दिवस भुर्र्कन उडुन गेले होते. त्या त्या वयातले अनुभव वेगळेच असतात. तेव्हा शरीर, मन दोन्हीही तरल असते. इतरांसोबत कुठल्याही सवयीचे अ‍ॅब्सॉर्बीन्ग चटकन होत असते.

काळरात्र (भाग ५) आयझँक असीमोव्ह

लेखक विचित्रा यांनी सोमवार, 21/11/2016 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
शीरीनने आपलं बोलणं सुरु ठेवलं. " जेव्हा आपले अवकाशसंशोधक लगाशग्रहाच्या भ्रमणकक्षेचा अभ्यास करत होते, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, कि या कक्षेवर दुसर्या अवकाशवस्तूचा प्रभाव पडतोय. पण हा अवकाशगोल लगाशसारखाच प्रकाशरहित असल्यामुळे, नुसत्या डोळ्यांनी आपल्याला दिसू शकत नाही." " लगाशभोवती फिरणार्या त्या गोलाला चंद्र म्हणतात, हे माहित आहे सगळ्यांना." " बरोबर. तर, हा चंद्र एका विशिष्ट वेळी, बरोबर बीटा सुर्याच्या रेषेत येतो.त्याच्या सावलीमुळे बीटा तारा पूर्णपणे झाकला जातो. याचवेळी इतर सूर्य विरुद्ध गोलार्द्धात असल्यामुळे लगाशवरच्या विशिष्ट भागात संपूर्ण अंधार पसरतो." " ग्रहण म्हणतात त्याला.

डिमॉनेटायझेशन / Demonetisation (भाग ५)

लेखक Anand More यांनी सोमवार, 21/11/2016 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
---------- भाग १ | भाग २भाग ३भाग ४ |भाग ५ ----------

काळा पैसा संपेल काय?

सरकारने हा निर्णय घेऊन स्वतःचा ताळेबंद साफ करायला सुरवात केली आहे. मागे नमूद केल्याप्रमाणे ही रक्त बदलाची प्रक्रिया आहे आणि ती देखील रुग्णाला भूल न देता केली गेलेली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला दणके बसणे स्वाभाविक आहे.

तत्वा, तुझी किंमत बघ!

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 21/11/2016 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
तत्वा, तुझी किंमत बघ शून्य झालीय आता जनता तुला टाकूनच धन्य झालीय आता चोरी, लबाडी यांच्या वाटा गजबजल्यात सार्‍या सत्याची तर वर्गवारी 'अन्य' झालीय आता आपली झोळी भरत जावं अगदी मनोभावे जावो बाकी खड्ड्यामधे आपण सुखी रहावे कर्माची ही नवी व्याख्या मान्य झालीय आता आदर बिदर लाड झाले, विचारणंही खूप आपलं अडल्यास बोंबाबोंब बाकी चिडीचूप वागण्याची ही तर्‍हाच 'सौजन्य' झालीय आता कोण तो लाकूडतोड्या सांग त्याचे काय झाले आज इतिहासातले आदर्शही ते चूक ठरले माणसांची ती प्रजाती 'वन्य' झालीय आता तत्वा, तुझी किंमत बघ शून्य झालीय आता जनता तुला टाकूनच धन्य झालीय आता - अपूर्व ओक
काव्यरस

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग ७)

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 21/11/2016 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
सुम्याच्या उतारवयातल्या आठवणी. खासगी नोकरीला निवृत्तीचं वय नसतं.गुरूनाथ सारखे, वेळ जावा म्हणून किंवा कार्यक्षम रहाण्यासाठी काम करत असतात.शरीर थकत असतं हे अशावेळी जाणवत नाही.बाहेरचे अवयव उदा.डोळे, कान, हातपाय,जोपर्यंत कुठलीच कुरकुर न करता कामात येतात तोपर्यंत सगळे काही आलबेल आहे असं वाटत असतं.पण शरीरातल्या आतल्या अवयवांचं काय?

डिमॉनेटायझेशन / Demonetisation (भाग ४)

लेखक Anand More यांनी रविवार, 20/11/2016 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
---------- भाग १ | भाग २भाग ३ । भाग ४ |भाग ५ ----------

डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड

डिमॉनेटायझेशनबाबत काही जणांना असे वाटते की जुने चलन रद्दबातल केल्यामुळे देशाचे नुकसान होते किंवा देश गरीब होतो. जे लोक आपल्याकडील जुने चलन कुठल्याही कारणामुळे सरकारकडे जमा करणार नाहीत त्यांना तो पैसा नवीन चलनाच्या रूपात परत मिळणार नाही. आणि आता जुने चलन रद्दबातल केले असल्यामुळे त्यांच्याकडील जुन्या नोटा कुचकामी ठरतील.

देवगिरीचे यादव

लेखक आशुतोष-म्हैसेकर यांनी रविवार, 20/11/2016 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
देवगिरीचे यादव संभाजीनगर(औरंगाबाद) म्हणजे दख्खनप्रदेशाची ‘खिडकी’ आणि इतिहासातल्या गोष्टी सांगतात त्याप्रमाणे उत्तरेतल्या शक्तींना दक्षिणेकडे विशेषतः सातपुडा डोंगरांच्या पलीकडे सह्याद्रीला लागून असलेल्या ह्या सुपीक प्रदेशात उतरण्याच्या एक प्रमुख मार्ग म्हणजे आजचे संभाजीनगर आणि आसपासचा प्रदेश. त्यात सर्व प्रदेशावर नियंत्रण ठेऊ शकेल असा एकमेव,अभेद्य किल्ला देवगिरी.

इंदिराजी

लेखक जॉनी यांनी शनिवार, 19/11/2016 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
'गत हजार सालोंका युद्ध हमने जित लिया है.' माजी पंतप्रधान इंदिराजी यांचा आज जन्मदिवस. यानिमित्तानं त्यांच्या कारकीर्दीबद्दल थोडंसं... कित्येक वर्षं नेहरूंची मुलगी यापेक्षा वेगळं स्थान नव्हतंच इंदिराजींचं. गुंगी गुडीया वगैरे म्हणायचे त्यांना. आणि बरंच तथ्य पण होतं त्यात. केरळ सरकार खाली खेचणं सोडलं तर अत्यंत साधारण असाच कार्यकाळ राहिला होता त्यांचा. झंझावाती कारकिर्दीला सुरवात झाली 70-71 साली. जानेवारी 1971 मध्ये आपलं जम्मू ते श्रीनगर विमान हायजॅक करून लाहोर ला उतरवण्यात आलं आणि अतिरेक्यांनी काही मागण्या केल्या. इंदिराजींनी ठाम भूमिका घेऊन दहशतवादासमोर झुकण्यास ठाम नकार दिला.