Skip to main content

माझं केप टाऊन

लेखक पिशी अबोली यांनी बुधवार, 23/11/2016 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी अनपेक्षितपणे काही संधी मिळून जातात आणि नंतर ते सगळंच स्वप्नवत् असल्याचं वाटू लागतं. केप टाऊनला जाऊन येऊन साधारण दीड महिना लोटल्यावर त्याच्या आठवणी स्वप्नासारख्या पुसट होऊ नयेत असं वाटतं म्हणून त्यांना शब्दांत बांधून ठेवायचा हा प्रयत्न. तर केप टाऊनच्या भारतीय लोकांच्या भाषेवर काम करण्यासाठीच्या प्रॉजेक्टवर काम करायला मला जाता येईल, असं कळल्यावर फार द्विधा मन:स्थिती झाली होती. एकीकडे ही संधी फार छान आहे हे कळत होतं. माझ्या सुपरवाईजर आणि तिथले प्रचंड अनुभवी प्राध्यापक यांच्यासोबत काम करता येणार म्हणजे दुधात साखर. पण पहिला-वहिला परदेश प्रवास, आणि तो चक्क दक्षिण आफ्रिकेला?

antibiotic resistance ,मानवासमोर उभा ठाकलेला सर्वात मोठा धोका.

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी बुधवार, 23/11/2016 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
ॲन्टीबायोटीक्स अर्थात प्रतिजैविकाचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला हे अनेकांना ज्ञात असेलच.पेनिसिलीनचा शोध लागल्यानंतर बॅक्टेरीअल इन्फेक्शन ट्रिट करणे सोपे झाले .त्यानंतर अनेक प्रकारची प्रतिजैविके शोधली गेली.यातून बॅक्टेरीयल एन्फेक्शनने होणारे मृत्यु वा इतर कॉम्प्लीकेशन टाळता येऊ लागली.साहजिकच जगाचे आयुर्मान त्यामुळे वाढले. पण मानवाने लावलेल्या या शोधाला लवकरच ग्रहण लागले ते म्हणजे ॲन्टीबायोटीक रेझिस्टंटचे.एखादे ॲन्टीबायोटीक ठराविक काळ वापरले गेल्यानंतर बॅक्टेरीया त्याच्या विरोधात प्रतिरोध तयार करतात.बॅक्टेरीया स्वतःच्या genetic makeup मधे बदल घडवतात,इतर बॅक्टेरीयाकडून ठराविक जनुकं मिळ

(लिहितो विडंबन स्वतःच साठी)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 23/11/2016 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
लिहितो विडंबन स्वतःच साठी समोर दिसता कच्चा माल शब्द कल्पना यमके सारी आपसुक धरती त्यावर ताल विषय निवडीचा नसे विकल्प चारोळी, गजल की पोवाडा, जो कविने विषय मांडला त्यावरी केवळ तुटून पडा वाचून किंवा दुर्लक्षूनही डोळ्यांपुढती नाचत राही मग डोक्याची होते मंडई लेखणी खुपसून फाडून खाई लिहा लिहा तुम्ही लिहा कविता धीर जराही मनी न धरा! जोरात चालूदे गिरणी तुमची पिठही पाडा भराभरा विषय सत्वरी ना मिळतो जर तर उघडा गालीब किंवा ग्रेस उडवा धुरळा यमकांचा की वाचन करता यावा फेस पुन्हा अवेळी आली कळ जर पोट दाबुनी ठेउ नका पाडून टाका मळमळ सारी विचार कधिही करु नका पैजारबुवा,

जग घूमेया थारे जैसा ना कोई |

लेखक संजय क्षीरसागर यांनी बुधवार, 23/11/2016 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
रोजच्या रुटीन आणि आपाधापीच्या या जागालगतच एक दुसरं जग आहे, इष्काचं जग. ते जग तर्काच्या पलिकडे आहे. ती का आवडते, सांगता येत नाही. तिच्या सहवासाची जादू शब्दांच्या पलिकडे आहे. आणि तो एक न संपणारा सिलसिला आहे. कधीकधी तर दोघात इतकी खोल दरी येते की आता सगळं संपलं असं वाटतं. पण तो किंवा ती कधी आस सोडत नाहीत. हा एकतर्फी जोश तसाच कायम राहातो. दुसर्‍याचा प्रश्नच नाही ! तुमची लगनच तुमचं सर्वस्व असतं.

खादाडी

लेखक vcdatrange यांनी बुधवार, 23/11/2016 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या रविवारी गुळपीठ अन् मी दोघेच घरी होतो. आमच्या मुदपाकखान्यातील कौशल्याची मजल झक्कास म्यागी, उकडलेली अंडी, चहा या सीमांमध्ये मर्यादित आहे. दिवसभर याच सिद्धहस्त पाककृती आलटून पालटून सादर केल्यावर संध्याकाळी आम्ही भेळ खायला गेलो. गावाकडं म्हणजे संगमनेरला बराच फेमस असलेलं घुले भेळ सेंटर इकडं आंबेडकर नगर ला सुरु झालय....... घुले साहेबांशी गप्पा मारताना लहानपणी संगमनेरात मिळणारी रामदास नढे कडची ओली भेळ आठवली. शनिवारी नढे काका ओली भेळ द्यायचा नाही, कारण त्याच्या चवीची ओली भेळ बनवायला वेळ लागायचा अन बाजारच्या दिवशी हे चोचले त्याला परवडत नसत.

उडदामाजी "काळे"-गोरे

लेखक गुलाम यांनी मंगळवार, 22/11/2016 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
'प्रधानसेवकांची मोठी घोषणा. काळ्यांविरुध्द सर्जिकल स्ट्राईक.' (आता सगळे काळे हद्दपार होणार.. आपले तर १००% पांढरे.) गुलाम बेहद खुष झाला. "अगं ऐकलंस का? १०० चे किती आहेत तुझ्याकडे?" "४ फक्त. तुमच्याकडे?" "२. आणि पेपरचं बिल पण द्यायचं आहे अजुन. सकाळीच येउन गेला तो." "अहो मग त्याला ५०० ची नोट देउन टाका ना. आत्ताच आलीय बातमी. त्याला अजुन कळलं सुध्दा नसेल." "अगं पण तो बिचारा..." "लवकर जा. एकदा कळलं की घेणार नाही तो." . . . "हे काय बिनकांद्याचे पोहे?" "अहो तिकडे आपले सैनिक रोज शत्रुच्या गोळ्या खातात.

संभ्रम-ध्वनी (कथा)

लेखक चॅट्सवूड यांनी मंगळवार, 22/11/2016 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
मला आज ही हे माहीत नाही की कार्तिकचा तो मेसेज वाचून तारा का अस्वस्थ झाली होती. कार्तिक आणि तारा टिंडर वर भेटले. दोन दिवस फक्त फोन वरच बोलणे झाले, पण तिसऱ्याच दिवशी कार्तिक ने ताराला कॉफीसाठी विचारले, तारा ही लगेच नाही म्हणाली. तारा फक्त एकवीस वर्षांची होती, तिची ग्रॅजुयेशन झाल्यावरची पहिलीच नोकरी होती, नवीन शहर होते, नातेवाईक कोणही नव्हते. जेमतेम चार महिने झाले होते, नोकरी वरुन आल्या वर तिला कंटाळा येत असे, म्हणून ती मग टिंडर वर आली आणि कार्तिक ला भेटली. कार्तिक त्याच शहरातला, आई वडीलांन बरोबर राहणारा.

मिश्र डाळींची भजी

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 22/11/2016 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
मुसळधार पावसात किवा बाहेर स्नो फॉल होत असताना गरम गरम भजी म्हणजे क्या कहने? तर पेश आहेत ही मिश्र डाळींची भजी.. मूग डाळ, हरबरा डाळ आणि उडीद डाळ एकेक वाटी असे समप्रमाणात घ्या. त्या एकत्रच भिजत घाला. ७ ते ८ तास भिजवा. म्हणजेच संध्याकाळी भजी हवी असतील तर सकाळी डाळी भिजवा. दुपारच्या जेवणात किवा ब्रंचला हवी असली तर रात्री डाळी भिजत घाला. वाटताना त्यात दोन तीन मिरच्या, लसणीच्या २-३ पाकळ्या आणि आल्याचा लहानसा तुकडा घाला. मिरच्यांचे प्रमाण आपापल्या तिखट पणाच्या आणि मिरच्यांच्या आवडीनुसार ठरवा. मी दोन मिरच्या घेतल्या. कमीत कमी पाणी घालून वाटा. ह्या वाटणात एक लहान कांदा बारीक चिरून घाला.

लिहितो कविता तुमच्यासाठी...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 22/11/2016 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
नाखु Tue, 22/11/2016 - 15:26 नवीन कवीता कधी ? लोक खोळंबून राहिलेत तुम्ची नवकविता वाचायला. लवकर टाकणे नवकविता. अखिल मिपा नवकवितांची हिवाळी भुईमूग लागवड व नवकाव्याची रब्बी पेरणी संघाची संयुक्त मागणी
-------------------------------------- (खुला सा :- नाखु(न) ;) अंकल आणी त्यांचे मंडळाचे विनंतीस मान देऊन , आंम्हाला त्यांनी टाकलेल्या (वरील) ताज्या खरडीवरून हे काव्य शीघ्र प्रसविले आहे! धीराने घ्यावे! ) लिहितो कविता तुमच्यासाठी जमवून सारी सामग्री शब्द, कल्पना, यमके सारी करूनी त्यांची "ही" जंत्री! विषय कोणता घेऊ सांगा? प्रेमं?, निसर्ग?

अवजार

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 22/11/2016 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
याआधी : मैथिली , माकडीचा माळ , शिट्टी ________________________________________ संध्याकाळ होत आली तसं हरी गाढाव जोंधळ्यात शिरलं. आत शिरल्यावर बऱ्याच वेळानं दोनदा खिकाळलं. मग बाहेर आलं. इकडं तिकडं बघितलं. जाग्यावरंच दोन उड्या हाणल्या. आन पुन्हा एकदा जोंधळ्यात शिरलं. यावेळेस मात्र जरा बेतानं खिकाळलं. समोरच्या झुडपात बसलेलं भानूकुत्रं भेदरुन गेलं. त्यानं थोडं बाहेर येऊन मान खाली घालत त्या जोंधळ्यावर बारीक नजर ठेवली.