Skip to main content

मायक्रोसॉफ्ट ऑफिस ला पर्याय...

लेखक इरसाल कार्टं यांनी गुरुवार, 24/11/2016 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो ! कृपया मला कुणी मायक्रोसॉफ्ट ऑफिसला साजेसा पर्याय सांगेल का? अवतीभवती अशी बरीचशी माणसे आहेत ज्यांना ते विकत घेणे परवडत नाही आणि पायरेटेड वापरणे योग्य वाटत नाही. अशांसाठी काही पर्याय माहित असल्यास सुचवावे. धन्यवाद.

नोटबंदी गैरव्यवस्थापन माजी पंतप्रधानांची जबाबदारी ?

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 24/11/2016 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
माननीय मनमोहनसिंगजी, मोदी सरकारने रु ५०० आणि रु १००० या नोटांचे निर्मुल्यन केल्या संबंधाने आपण आपले राज्यसभेतील टिकात्मक भाषण वाचनाचा योग आला. रु ५०० आणि रु १००० या नोटांचे निर्मुल्यनाच्या उद्दीष्टांबद्दल आपणास शंका नसल्याचे आपण म्हटले आहे. प्रश्न केवळ इंप्लीमेटॅशन (अमलबजावणी) मधील त्रुटींचा आहे या त्रुटी म्हणजे भलेमोठे गैरव्यवस्थापन आहे असे आपण आपल्या भाषणातून म्हटले आहे.

निलगिरी हिल्स ट्रेकिंग एक्सपीडीशन - भाग १

लेखक पाटीलभाऊ यांनी गुरुवार, 24/11/2016 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
युथ हॉस्टेलवर ट्रेकिंगचे पर्याय शोधता शोधता 'निलगिरी हिल्स ट्रेकिंग एक्सपीडीशन' हा पर्याय चांगला वाटला. मग काय कट्ट्यावर भेटून सगळं प्लॅन केलं. ऑक्टोबरमधली ट्रेकिंगची तारीख नक्की केली आणि पुढच्या कामाला लागलो. लगेहाथ रेल्वेचं आरक्षण केलं. युथ होस्टेलच्या साईटवर नंतर नोंदवणार होतो, कारण अजून कोणाच्याच सुट्टीचा काही पत्ता नव्हता. जसजशी ट्रेकिंगची तारीख जवळ येऊ लागली सुट्टीसाठी मिळवण्यासाठी धडपड सुरु झाली. हो धडपडच...IT मध्ये सुट्टी मिळवणं हि पण एक कलाच आहे. महत्प्रयत्नानंतर चक्क ५ दिवसांची रजा मिळवून आमच्या ध्येयाकडे आगेकूच केली.

कुण्या गावचा कोण?

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 24/11/2016 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
ते गाव मला माहित नाही, म्हणून बरं आहे. तिथल्या सावल्या, चांदणे, उन्ह .. सारं काही माझ्याकडे सहज येतं. कुठल्याही प्रकारच्या नात्याचा अडसर लागत नाही त्यात! मी ही त्याच्याच सारखा 'सहज' .., म्हणून त्याला सहजपणे सामावून घेतो माझ्यात. एकदा त्या गावाने मला विचारले, "अरे मुला.. , येत का नाहिस इकडे आत.. वेस ऒलांडून!? " मी म्हटले, "नको रे , कशाला उगाच गावकरी होऊ मी? त्यापेक्षा हेच चांगलं आहे." गाव म्हणते, " जे तुझ्याकडे न मागता सहज येतय, त्याच्याकडे तू नाही येणारं.. सहज... एकदातरी? " मग म्हटलं सांगावच याला सर्व, "अरे गावा... " तू ज्या गोष्टिंना 'तुझ्या गावातल्याच' समजतो आहेस..

एक फसलेली वूफी (woofi)

लेखक अनुप देशमुख यांनी बुधवार, 23/11/2016 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारा वेळ: २५ मिनिटे लागणारे जिन्नस: साधारण सामग्री अशी - उत्तम प्रकारची व्हिस्की - प्रमाण मापात क्रमवार पाककृती: एका शनिवारच्या निवांत दुपारी अस्मादिकांना Beer Country हा कार्यक्रम बघून एका नवीन मद्यकृती चा शोध लागला. लागलीच शनिवार असल्याने आणि संध्याकाळ चढत असल्याने हि नवीन पाककृती बघण्याची करून खुमखुमी सुरु झाली. त्यात सौ ने दुजोरा भरला आणि एका थंडीच्या संध्याकाळी सामग्री गोळा करण्याची लगबग सुरु झाली. वुफी विषयी थोडक्यात सांगायच म्हणजे व्हिस्की घातलेली कॉफी. सर्वात प्रथम व्हिस्की च्या शोधात निघालो.

मला व्यवहार ज्ञान नाही,माझे डोके कुठेच चालत नाही,मी काय करावे???????

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी बुधवार, 23/11/2016 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो मी थोडक्यात माझा प्रॉब्लेम मांडणार आहे. मी आहे ३१ वर्षाचा तरुण( केस पांढरे व्हायला लागले आहेत) .तसा मी बक्कळ शिकलो आहे.अगदी बी एस्सी विथ फर्स्टक्लास.पण मी कधीही नोकरी केलेली नाही.घरची शेती आहे पाच एकर ,त्यात मी कॉलेज झाल्यानंतर लक्ष घातले.लहानपणापासून शेतात जात असल्याने मला शेतीची थोडीफार माहीती आहे ,त्यावरच माझा चरितार्थ चालतो.आईवडील दोघेही शासकीय नोकरी करत होते ,ते दोघेही सध्या माझ्यावर अवलंबुन नाहीत. माझा प्रश्न असा आहे की माझे व्यवहारात व इतर ठीकाणी कुठेच डोके चालत नाही.मित्रांमध्ये गप्पा मारताना ,घरात,ईतर ठीकाणी काही इंटेलेक्च्युल चर्चा चालत असेल तर मला त्यातले ओ की ठो

ऐक ना साजणे

लेखक सोहम कामत यांनी बुधवार, 23/11/2016 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
('नाही कळले कधी' गाण्याच्या चालीवर आधारित) प्रित ही.. अंतरी.. उमलली साजिरी.. मोहरली गोजिरी.. पाहता ती परी.. तुच ती सुंदरी.. तुच ती सुंदरी.. ऐक ना साजणे हाक ती साजिरी तुच माझी सखी तुच ती सुंदरी.. प्रित ही.. अंतरी.. उमलली साजिरी.. मोहरली गोजिरी.. पाहता ती परी.. मंद ते हासणे.. धुंद ते बोलणे.. उतरले अंतरी.. लाजरे चांदणे.. संगतीने तुझ्या.. जडली प्रिती उरी.. तुच माझी सखी.. तुच ती सुंदरी.. तुच माझी प्रिया.. तु असे तारिका.. गर्द तार्यांतली.. तु असे चंद्रिका.. पाहता सुर्यही.. लाजला अंबरी.. तुच माझी सखी.. तुच ती सुंदरी.. ऐक ना साजणे.. प्रित ही.. अंतरी.. उमलली साजिरी.. मोहरली गोजिरी..