महेश्वरची मंतरलेली पहाट!
२००९ मधे नारेश्वर, गरुडेश्वर दौरा झाला आणि झपाटल्यासारखी नर्मदा परिक्रमेवर असलेली मिळतील ती पुस्तके वाचून काढली. त्यात प्रतिभा चितळे यांची सीडी, मिपावर खुषीताईंनी लिहिलेली लेखमाला,हे भर घालतच होते.
'महेश्वर' या नावाचं भूत मानगुटीवर बसलं ते जगन्नाथ कुंटे यांच 'नर्मदे हर' वाचल्यावर.. मग सुरु झाल, इंटरनेट वरून महेश्वर च्या नर्मदामाईचे फोटो बघत तासन तास त्यात हरवून जाणं ! ध्यासच घेतला महेश्वर ला जायचा. एक जबरदस्त गारुड होत या नावाच!
... आणि मागच्या वर्षी २०१५ डिसेंबर मध्ये हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. नविन वर्षाची सुरुवात नर्मदा किनारी करायची हे ठरवलच.
मिसळपाव
२.