अश्मवैभव... जयपूर , ओर्छा , ग्वालियर लेखांक ३.......
आज खूद्द जयपूर मध्गे फेरफटका मारावा व उद्या शहराच्या जरा बाहेरील ठिकाणे पहावीत असा बेत सर्वानुमते ठरला. साधारण पावणेनउ चे सुमारास बाहेर पडलो. प्रत्येक हॉटेल समोर दोन चार रिक्षावाले दिवसभराचे पूर्ण गिर्हाईक मिळेल या आशेने उभे असतात. आम्ही बाहेर पडतो आहोत हे पहाताच एक़जण आला . आम्हाला अल्बर्ट हॉल संग्रहलयाच्या जवळ सोडणार का असे बोलल्यावर तो तयार झाला. दहा एक मिनिटात आम्ही अल्बर्ट हॉल परिसरात येऊन पोहोचलो.
मिसळपाव