Skip to main content

बाहेर करायच्या उठाठेवी

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 05/12/2016 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर्स आणि पाककृतीतले मान्यवर लेखक/लेखिका! __/\__ घरात किचनमध्ये करायच्या लुडबुडी सोडून जेव्हा बाहेर कॅम्पिंग वगैरे ठिकाणी जेवण बनवायची वेळ येते तेव्हा खूपच लिमिटेड पर्याय उपलब्ध असतात किंवा मांसाहारी पदार्थ सोडल्यास पर्याय सामान्य असतात असे माझे मत आहे.

कॅशलेस

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 05/12/2016 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
‘देशभक्‍ताची व्याख्या’ या ब्लॉगचा ताजा कलम: - डॉ. सुधीर रा. देवरे 1975-77 च्या आसपासचा काळ. तेव्हाही माझ्या लहानपणी आमचं गाव बर्‍यापैकी कॅशलेस होतं. दुकानात कोणाला काही घ्यायला जायचं असलं की घरातलं धान्य- बाजरी, गहू, नागली, हरभरा, मका असं दुकानात घेऊन जायचं. दुकानदार तो त्याच्या मापाने मोजायचा. माप भरून भरपूर धान्य खाली पडू द्यायचा. आणि त्याच्या हिशोबाने सांगायचा, ‘इतके इतके पैसे झाले. काय देऊ?’ मग रोज लागणार्‍या जिनसा गुळ, दाळ, चहा, साखर, तेल असं थोडं थोडं खरेदी करायचं.

माणुसकी

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 05/12/2016 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा आज एका अंध माणसाचा हात धरून त्याला बस स्टॉपपर्यंत जायला मदत केली, बसमधे बसवून दिलं. हे सांगणं खरंच आवडलं नाही पण सांगितल्याशिवाय राहवलं नाही तोच तो प्रवाह तोच तो जमाव आयुष्य नावाचा धावता बनाव त्यात एक काठी माझ्या बाजूने वाट शोधत चालत होती वाटेवरची अवघी गर्दी काठीला त्या टाळत होती 'टक टक' काठीच्या त्या आवाजाची राखण होती 'काय मंदासारखे चालतात लोक' ही अनेकांची अडचण होती 'कुठे जायचंय काका?' आपसुक प्रश्न केला मी 'प्लाझा' म्हणाले आणि त्यांचा लगेच हात धरला मी गेलेही असते आपले आपण, त्यांना नव्हती भीड त्याची
काव्यरस

अंतरे

लेखक परिधी यांनी सोमवार, 05/12/2016 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
कधी उमलत्या फुलांची उडून गेली अत्तरे, सोबतीच्या क्षणांची कशी झाली एवढी अंतरे? प्रश्न करून पोरके का निघून गेली उत्तरे, घेतला निरोप ज्या ठिकाणी, का सुन्न तिथले सारे? तू जाता सांग का आठवणींचे मृगजळ पाझरे वेचले जिथे मोती, का उद्विग्न आज ते किनारे? तुझ्या येण्याने कधीकाळी बहरली जी शहरे, परतून तू जाता घरी,का अनोळखी वाटते मला सारे?
काव्यरस

भूनंदनवन काश्मीर – भाग २ (दूधपथरी)

लेखक के.के. यांनी सोमवार, 05/12/2016 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
==================================================== भूनंदनवन काश्मीर - भाग-१ भाग-२ भाग-३ भाग-४ ==================================================== भूनंदनवन काश्मीर – भाग २ (दूधपथरी) काश्मीरमधे आम्ही सर्वप्रथम भेट दिली ती ‘दूधपथरी’ला. खरेतर दूधपथरीबद्दल आम्हाला काहीच माहीत नव्हते. Tripadvisor Forumsवर वाचता वाचता ह्या ठिकाणाबद्दल कळाले होते.

शेतकरी चळवळीचे भवितव्य आणि आव्हाने

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 04/12/2016 22:27 या दिवशी प्रकाशित केले.

शेतकरी चळवळीचे भवितव्य आणि आव्हाने

                 शरद जोशींच्या पश्चात शेतकरी चळवळीचे भवितव्य काय, असा प्रश्न माझ्यासहित अनेकांना सतावत आहे. शेतकरी चळवळ शरद जोशींनी एवढ्या उंचीवर नेऊन ठेवली की ती उंची पार करण्याचा विचार राहू द्या; त्या उंचीच्या आसपास पोचण्याचीही नेतृत्वक्षमता कुणात नाही, ही वास्तविकता नजरेआड करता येत नाही.

घर

लेखक नकुल पाठक यांनी रविवार, 04/12/2016 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
एक घर असतं. अगदी नेहमीच्या घरांसारखं. खिडक्या, भिंती, कुंपण असणारं. बाहेरून जरी बाकीच्या घरांसारखं दिसत असलं तरी आतून मात्र अगदी वेगळं. कोणतीही वस्तु नाही किंवा सामान नाही. आणि घरात कोणी माणसंही नाहीत. फक्त खूप खोल्या. काहींमध्ये भीती निर्माण करणारा अंधार तर काहींमध्ये डोळे दिपवणारा उजेड आणि काहींमध्ये आल्हाददायक मिणमिणता प्रकाश. घराच्या खिडकीतून फुलांचे काटे दिसतात तर कधी घनदाट झाडांमध्ये अदृश्य होणारी वहिवाट. ह्याला समजुतीची बाजू घेणारा गार वारा आणि घणाघाती घाव घालणाऱ्या कटू विजांची साथ. घरातलं वातावरणही काहीसं तसंच. प्रत्येक खोली मधून एक विशिष्ठ सूर असलेलं.

मिपा फिटनेस विकांत

लेखक प्रशांत यांनी रविवार, 04/12/2016 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, एसरावांनी सुचवल्याप्रमाणे १० आणि ११ डिसेंबर हा मिपा फिटनेस वीकांत म्हणून जाहीर करत आहोत. यासाठी एकच करायचे. आपण आपल्याला शक्य असलेले सायकलिंग, रनिंग, वॉकिंग, सूर्यनमस्कार अशा कोणत्याही व्यायामप्रकारापैकी कोणत्याही व्यायामप्रकाराचे एक लक्ष्य ठरवायचे आणि १० व ११ डिसेंबरला ते पार करण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग..