Skip to main content

कुठे शोधिशी रामेश्वर अन् कुठे शोधिशी काशी . . . .

लेखक स्वीट टॉकर यांनी मंगळवार, 06/12/2016 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
एकोणनव्वद सालची गोष्ट. स्वीट टॉकरीणबाई आणि आठ महिन्याच्या पुनवला घेऊन मी बोटीवर रुजू होण्यासाठी कलकत्त्याला गेलो. (हल्ली मूल दोन वर्षाचं झाल्याशिवाय बोटीवर नेता येत नाही. तेव्हां नियम वेगळे होते. आम्हीही young and stupid होतो.) मात्र खराब हवामानामुळे बोट काही दिवस बंदरात येवू शकणार नव्हती. मी ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनीमध्ये नोकरी करीत होतो. कलकत्त्याला आमच्या कंपनीचं गेस्ट हाऊस होतं. तिथे आमची राहाण्याची सोय केली गेली. उन्हाळ्याचे दिवस होते. बाहेर फिरणं अवघड होतं. गेस्ट हाऊसचा मॅनेजर बोलका होता. अन् धार्मिक देखील. त्यानी तिथल्या काली मंदिराचं खूप छान वर्णन केलं. मी देवळात जाणारा नव्हे.

चोरले जाणार नाही 'ते'

लेखक भारी समर्थ यांनी सोमवार, 05/12/2016 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
टागोरांचे नोबल आणि बिस्मिल्लांची चंदेरी सनई साहित्य, सुर नी अनुभुतीची सुरेख सुंदर उबदार दुलई ही दोन्ही प्रतिकं चोरली गेली! दोन दिवसांतच विसरतात सगळे वर्षानुवर्षांची मेहनत, श्रम, अन् झिजवलेले कैक उन्हाळ-पावसाळे चोराकडून ही चिन्हं विकत घेणारे, असणारच पूज्य संस्कृती त्यांना पण त्या चिजांमधून निर्मितीचा आत्मा गवसणारच नाही कधी त्यांना
काव्यरस

राज की समाज....... कारण?(कथा भाग 2)

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 05/12/2016 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
"आठ दिवस झाले तुझी आई देवळात गेली नसेल इतक्या भक्तिभावाने त्या संस्थेत जाते आहे. उदय... हे काही खर नाही पोरा. त्या भवानीला आट्यात घ्यायलाच हवी. पण यावेळी थोड़ वेगळा गेम करावा लागेल. तयारीची दिसती आहे टवळी." दुपारच्या जेवणानंतर आण्णा उदयशी बोलत होते. "उचलु का तिला? ब-याच दिवसात नविन काही नाही पाहिल." उदयने नेहेमीप्रमाणे मुक्ताफळ उधळली. "भाड्या मी काय विचार करतोय आणि तू काय बोलतो आहेस. उदय अरे जरा काम-धंद्याला लाग. पालिकेच्या निवडणुका आठ महिन्यावर आल्यात. गावाच राजकारण आता तू बघायच. मी पंचक्रोशीच बघतो आहे गेली तीन वर्ष. गावसुद्धा मीच सांभाळायच का?

सालगिराह मुबारक हो 'गुलाम अली साहब'.

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 05/12/2016 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
 'चुपके चुपके रात दिन' आयुष्यात पहिल्यांदा ऐकलेली गझल, ती पण तुमच्या आवाजात आणि पाहता पाहता अशी रुतत गेली की बस्स्स.... आता तर ती जगण्याचा अविभाज्य घटक झालीय. हे सर्व झालं ते तुमच्या मुळे. जशी समज वाढायला लागली तसं तसं गुलाम अली काय चिज आहे हे एकेका गझले मधून उलगड़ायला लागलं. कोजागिरी च्या रात्री तिच्या सोबत ऐकलेल्या 'कल चौदहवी की रात थी' ने ती पुन्हा एकदा उलगडली.

आव्हान जम्मू काश्मीरमधील छुप्या युद्धाचे पुस्तकाला पारितोषिक

लेखक नरेंद्र गोळे यांनी सोमवार, 05/12/2016 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या अनुवादाला,
"आव्हान जम्मू काश्मीरमधील छुप्या युद्धाचे" ह्या
ब्रिगेडिअर हेमंत महाजन लिखित पुस्तकाला,
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे,
’लोकहितवादी रा.ब.गोपाळ हरी देशमुख’ पारितोषिक देण्याचे ठरले आहे.

इष्ट जनांस आमंत्रण आहेच.