मुंबई
असं म्हणतात मुंबई हि स्वप्नांची नगरी आहे ..... एअरपोर्ट ते CST च अंतर कापत टॅक्सी पहाटेच मुंबई दर्शन घडवत होती . रस्त्याच्या दोन्ही बाजूनी उंच उंच इमारती काही नवीन तर काही टॅक्सिच्या आवाजांनी पडतील कि काय अश्या अवस्थेत; चिक्कार धुळीने माखलेली, काळवंडलेली दारं खिडक्या आणि त्यात बाहेर वळत टाकलेले कपडे ; ते कपडे धुतलेले होते कि धुवायचे याचाच प्रश्न होता.
नेहमी बातम्यांमध्ये, सिनेमानं मध्ये बघ्यायला मिळणारी मुंबई प्रत्येक्षात वेगळीच आहे. पहाटेचे ४ वाजले आहेत पण दिवस उजाडल्या गत गर्दी करत लोक आपापल्या कामाला लागली होती .
मिसळपाव