Skip to main content

आठवणी दाटतात: किस्से क्रिकेटचे

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 23/12/2016 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
.inwrap { background: url(https://lh3.googleusercontent.com/Lp_d4i7_2MsOm0urqKpCOtvWkKCpcWUtKx9R26oyRLUdsXVNFLWI9fchPBYuB1tDK0x-MqG1Ew=w320-h331-no); background-size: 100%; background-repeat: repeat; } हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छच्या रणापासून ते अरुणाचलच्या जंगलापर्यंत पसरलेल्या भारतासारख्या विशाल देशाला एकत्रं आणणार्‍या ज्या काही मोजक्या गोष्टी आहेत त्या म्हणजे भारतीय सैन्य, राजकारण आणि क्रिकेट!

जॅागिंग पार्कातले / बागेतले प्राणी

लेखक कंजूस यांनी शुक्रवार, 23/12/2016 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
जॅागिंग पार्कातले /बागेतले प्राणी प्रेरणा //मैफिलितले प्राणी (२०१३)/लेखक आदूबाळ. १) पहिला हास्यक्लब सुरू होतो सकाळी सहाला. बहुतेक ज्येष्ठ नागरिक. घरी बहुतेक चारलाच उठून तयारीत राहात असतील. क्यानवास शूज,टी शर्ट,पंजाबी ड्रेस कोड. खाली सोसायटीचा जिन्याचा दरवाजा वेळेत उघडला नसेल तर संतापत असावेत. शंभरेक जणाचा व्यायाम ग्रुप लिडर सांगेल तसा सहाच्या ठोक्याला सुरू. श्वास घेणे सोडणे फासफुस आणि आवाज. साडेसहाला संपण्या अगोदर पाच मिनिटे अगोदर अत्यंत आवडता प्रकार हाहाहोहो नंतर दोन्ही हातांनी मांजर ओजकारते तो अभिनय दात ओठ खावून. सर्व राग तेव्हा काढत असावेत॥ मग सुट्टी.

आठवणी दाटतातः आठवणीतले पदार्थ

लेखक पूर्वाविवेक यांनी शुक्रवार, 23/12/2016 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
.inwrap { background: url(https://lh3.googleusercontent.com/Lp_d4i7_2MsOm0urqKpCOtvWkKCpcWUtKx9R26oyRLUdsXVNFLWI9fchPBYuB1tDK0x-MqG1Ew=w320-h331-no); background-size: 100%; background-repeat: repeat; } आठवणीतील पदार्थ लिहायचे झाले तर मला कुठल्या हॉटेलात काय खाल्लं यापेक्षा लहांपणीच्याच आठवणी जास्त येतात. बालपणीच्या आठवणी जितक्या निर्मळ, सुखद, चिंतेचा लवलेशही नसलेल्या असतात तितक्या कुठल्याही नसाव्यात. आणि या आठवणी खास असतात त्या आजी-आजोबा, गाव, खेळताना केलेली मजा आणि अर्थातच खादाडी. आयुष्यातली पहिली दहा वर्ष मुरुड सारख्या छोट्या गावात गेली.

एक विनंती...

लेखक इरसाल कार्टं यांनी शुक्रवार, 23/12/2016 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळपासून मिपा बंद होते, तसेच मागील काही दिवसांपासून असे मधेमधे होत होते हे मी व इतरांनीदेखील अनुभवलेत.

अमिट लक्ष्मणरेखा

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 14/12/2016 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
वासनामयी डोळ्यांनी पाहिले तिच्याकडे मी. नवयौवना कोमलांगी नोट नवी कोरी दोन हजाराची. विरहाच्या अग्नीत तडफडू लागलो तरीही विवश होतो मी अलंघनीय होती सुट्ट्या पैश्यांची ती अमिट लक्ष्मणरेखा.

सद्गुरू आणि स्मोकिंग!

लेखक आदित्य कोरडे यांनी बुधवार, 14/12/2016 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
(Disclaimer- खालील लेख वाचण्यापूर्वी जे लोक शंकर महाराजांचे किंवा अन्य कोणत्याही महाराजांचे निस्सीम वगैरे उपासक आहेत त्यांनी तो वाचू नये किंवा आपल्या जबाबदारीवर वाचवा. भावना वगैरे दुखावल्यास अस्मादिक जबाबदार नाहीत.) हे फेसबुक, whats app, वगैरे सोशल नेट्वर्किंग च्या चलती मुळे आमची आणि आमच्या सारख्या सश्रद्ध लोकांची पुण्यार्जनाची भलतीच सोय होऊन राहिली आहे.

वाट - एक पाहणे !

लेखक चिनार यांनी बुधवार, 14/12/2016 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
वाट पाहणे हा योग माझ्या कुंडलीतच असावा बहुधा. मी कुठेही, कधीही, काहीही करायला गेलो की सर्वात आधी माझ्या वाटेवर येते ते म्हणजे वाट पाहणं. बऱ्याच ठिकाणी वाट पाहणं अपरिहार्य असते आणि ते सगळ्यांच्याच "वाट्याला" येते. उदा.बाहेर जाताना बायकोची तयारी होईपर्यंत वाट पाहणं या वैश्विक समस्येवर अजूनतरी तोडगा निघाला नाही. पण माझ्या वाट्याला वाट पाहण्याचे आणखी कितीतरी योग येत असतात. इतके की आताशा वाट पाहणं मी एन्जॉय करायला लागलो आहे. अतार्किक ,स्वैर,रँडम विचार करायचे असतील तर त्यासाठी मी वाट पाहण्याचा वेळ उपयोगात आणतो.

अपरान्त (कोकण) - प्रकाशचित्रे

लेखक अमित M यांनी बुधवार, 14/12/2016 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण ३ महिन्यांपूर्वी केदार ने अधिकृत रित्या पुणे-गोवा सायकल सफर जाहीर केली. नेहमेचे अधिक ओळखीतले मिळून ८ जण तयार झाले. केदार ने लगेच प्रॅक्टिस rides च एक वेळापत्रक सगळ्यांना पाठवलं आणि जमेल तास सगळ्यांनी ह्या rides ना हजार राहून तयारी सुरु केली. यथावकाश सुट्ट्या, आमच्यासाठी परत यायचं ट्रेन च तिकीट आणि सायकल साठी टेम्पो तसच राहण्याची सोय ह्या सगळ्याची चोख व्ययवस्था झाली. सफारीला १-२ आठवडे राहिले होते आणि अचानक आमच्यातले २ लोक ऐनवेळी उपटलेल्या महत्वाच्या कामामुळे कटाप झाले. इजा बीजा नंतर माझा तीजा झाला, तब्बेत बिघडली आणि मीपण आऊट झालो. पण कोकण साद घालत होत !

नग्नता आणि मुक्ती

लेखक संजय क्षीरसागर यांनी बुधवार, 14/12/2016 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
इथल्या जैनीजमवर आलेल्या एका तद्दन पोस्टवर बरीच सांगोपांग चर्चा झाली. त्यात अनेक सदस्यांनी नग्नता आणि मुक्तीच्या संबंधाविषयी कुतुहल प्रकट केलं होतं. त्या निमित्तानं ही पोस्ट. प्रथम महावीराचा अध्यात्मिक विचार समजून घेऊ. महावीराच्या दृष्टीनं आपलं शरीराशी झालेलं तादात्म्य हा स्वरुपोलब्धितला एकमेव अडसर आहे. त्यामुळे त्याची सर्व साधना, शरीराशी झालेलं तादात्म्य संपवण्यावर केंद्रित आहे. तदनुसार, केश विमोचनादी अत्यंत क्लेशदायी साधना दिगंबर पंथात आल्या आहेत.

प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पाणी - अर्थात Virtual Water & Water Footprints

लेखक डिस्कोपोन्या यांनी बुधवार, 14/12/2016 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो , या वर्षी (किंवा सलग गेले 3 वर्ष) १९७२ च्या दुष्काळा पेक्षाही भयानक असा दुष्काळ उभ्या महाराष्ट्राने अनुभवलेला आहे. उपलब्ध असलेल्या पाण्यासाठी प्रादेशिक पातळीवर राजकारण चालू आहे. दुष्काळ निवारणासाठी वेगवेगेळे packages जाहीर केले गेले.. काही ठिकाणी अक्षरशः अशी परिस्थिती होती कि घरी आलेल्या पाहुण्यांना खायला जे पाहिजे ते देतो मात्र पाणी मागू नका अशी विनंती करावी लागल्याच्या बातम्या वृत्तपत्रात येऊन गेल्या. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात तर महिन्याकाठी रु.३०००/- पेक्षा जास्त फक्त पाण्यासाठी खर्च करावे लागत होते.