Skip to main content

घर गळतंय माझं.....

लेखक अबोली२१५ यांनी शनिवार, 24/12/2016 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
घर गळतंय माझं तस ते नेहमीच गळत पण पाऊस आला कि उडतात छतावरच्या दोन चार काड्या अन पाऊस येतो आत येतो जोराचा घर गळतंय माझं थेंबाच शहर झालाय पाण्याने तुंबलंय वाट पाहतेय निचरा होण्याची छताला भोक आहेच पण जमिनीला करतेय निचरेल ...
काव्यरस

महाराष्ट्रातील प्राचीन जलव्यवस्था

लेखक Parag Purandare यांनी शनिवार, 24/12/2016 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
अपरांत सादर करीत आहे महाराष्ट्रातील प्राचीन जलव्यवस्था व बारव (पुष्करणी) स्थापत्यावरील डॉ. अरुणचंद्र पाठक (माजी संचालक, महाराष्ट्र राज्य, दार्शनिका विभाग) लिखित एक सर्वोत्क्रुष्ठ पुस्तक. या पुस्तकात महाराष्ट्रातील यादव काळापर्यंतच्या (१३वे शतक) अनेक बारवांची माहिती, आराखडे व फोटो असणार आहेत. तसेच बारवस्थापत्याचे विविध प्रकार आणि त्यांचे तत्कालिन उपयोग यासंबंधीची माहितीही विस्ताराने येणार आहे. पुस्तक लवकरच उपलब्ध होईल.

शेकोटी...

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 24/12/2016 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire शेकोटी... ...दिवस उजाडलाच तो गोठलेला. आकाशात मळभ दाटलेला. थंडी मी म्हणत होती आणि आकाशाचा उदासपणा छातीत धडकी भरवीत होता. युकॉनच्या मुख्य रस्त्यापासून तो आत वळला. पायवाटेने चढ चढल्यावर त्याला एक पूर्वेकडे जाणारी आडवाट लागणार होती. दमछाक कराणारा तो चढ चढून गेल्यावर त्याने घड्याळात बघण्याच्या निमित्ताने थोडा दम घेतला. सकाळचे नऊ वाजले. आकाशात सूर्य नव्हता.

आठवणी दाटतातः रस्ता तेथे एस टी

लेखक स्वीट टॉकर यांनी शनिवार, 24/12/2016 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
.inwrap { background: url(https://lh3.googleusercontent.com/Lp_d4i7_2MsOm0urqKpCOtvWkKCpcWUtKx9R26oyRLUdsXVNFLWI9fchPBYuB1tDK0x-MqG1Ew=w320-h331-no); background-size: 100%; background-repeat: repeat; } रस्ता तेथे एस् टी मी पांचगणीच्या बोर्डिंग स्कूलमध्ये शिकलो. घर मुंबईला. वर्षात दोन सुट्ट्या. त्यामुळे चार मुंबई-पांचगणी चकरा एस्टीने व्हायच्या. तेव्हां एशियाड देखील नव्हत्या त्यामुळे वोल्वो वगैरे कौतुकांचा प्रश्नच नाही. लाल बसनी बॉम्बे सेन्ट्रल डेपो ते (महाड मार्गे) पाचगणी सात तासांचा प्रवास. रस्त्यांची अवस्था बिकट. त्या रस्त्यांवर धावून धावून गाड्याही खिळखिळ्या.

दिल जलता है तो जलने दे

लेखक शरद यांनी शनिवार, 24/12/2016 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
दिल जलता है तो जलने दे दिल जलता है तो जलने दे आँसू ना बहा फ़रियाद ना कर तू परदानशीं का आशिक़ है यूँ नाम-ए-वफ़ा बरबाद ना कर मासूम नजर के तीर चला बिस्मिल को बिस्मिल और बना अब शर्म-ओ-हया के परदे में यूँ छुप छुप के बे-दाद ना कर हम आस लगाये बैठे है तुम वादा करके भूल गये या सूरत आ के दिखा जाओ या कह दो हमको याद ना कर मुकेश परदानशि--पडद्यातील स्त्री, शालीन, आशिक-- प्रियकर, वफा ---प्रेम, भक्ती, एकनिष्ठा मासुम ---निष्पाप, बिस्मिल ---घायाळ, प्रियकर, हया --- शरम, लाज बेदाद --- अत्याचार, जुलूम, ऑंस ---दर्द, संवेदना

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग १२ )

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 24/12/2016 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
वाचता न आलेला post (गेल्या आठवड्याचा) सुम्याने लिहिलेल्या तिच्या डायरीतल्या आठवणी. सुम्याच्या मुलीने दिलेली डायरी गुरूनाथने आपल्या जवळ ठेवली.सुम्या अलीकडेच गेल्याने तिच्या त्या जाण्याने लागलेल्या धक्क्यात त्याला ती डायरी वाचून तिच्या होणार्‍या आठवणीने आणखी बेजार होऊन जाण्याऐवजी कधी तरी नंतर ती डायरी उघडून वाचायचं त्याने ठरवलं. सुम्याच्या मुलीने गुरूकाकाला एकदा त्या डायरीतल्या मजकूराबद्दल थोडक्यात कल्पना दिली.गुरूनाथने ती डायरी अजून वाचली नाही ह्याबद्दल तिला विशेष काही वाटलं नाही.त्याच्या जागी आपण असते तर तेच केलं असतं असा पॉझीटीव्ह विचार तिने केला. आपल्या आईला कविता लिहायला आवडायचं आणि काही

एका प्रेमाची दूसरी गोष्ट

लेखक एक एकटा एकटाच यांनी शुक्रवार, 23/12/2016 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
तो धावत धावत CCD मध्ये शिरला. अचानक आलेल्या पावसामुळे त्याची पंचाईत झाली होती. बाईक पार्क करून पळतच तो जवळच्या त्या CCD पोहचला होता, तरी तिथे पोहचेपर्यंत तो अर्ध्याच्या वर भिजलाच. आत शिरल्या शिरल्या A.C ची एक थंड हवेची लहर, हलकेच त्याच्या पुर्ण शरीरावरुन फिरली. आधीच पावसामुळे तो ओला झाला होता. त्यात त्या थंड हवेच्या त्या अलवार स्पर्शाने तो अलगद शहारला. त्याने आत आल्या आल्या आपली भिरभिरती नजर त्या संपुर्ण केफेमधुन फिरवली. दुपारची वेळ, त्यात तो आठवड्याचा पहिलाच दिवस, वर अचानक आलेला पाउस त्यामुळे केफेमध्येही मोजकीच माणसे होती. समोरच एक टेबल रिकामी होतं.

एयर फ्राईड इटली

लेखक लीना कनाटा यांनी शुक्रवार, 23/12/2016 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : केडीभाऊ, स्वादि आणि सास्व तैं व इतर उपकरण : टफ्फल एयर फ्रायर कृती : १) प्रथम नेहेमी प्रमाणे इटल्या कराव्यात. इटली पात्रातून काढून थोड्या गार झाल्यावर इटल्या अर्ध्या कापाव्यात. त्या अर्ध्या भागाचे पुन्हा दोन उभे भाग करावेत. अशा रीतीने एका इटलीचे चार उभे भाग होतील. २) १० इटल्यांचे ४० उभे काप एयर फ्रायर मध्ये टाकावेत. इटल्यांच्या तुकड्यांवर १ चमचा तेल टाकावे. ऑइल स्प्रे असेल तर अत्युत्तम. ३) एयर फ्रायर १५ मिनिटांसाठी चालू करावा. १५ मिनिटांनंतर रागरंग बघून, खरं म्हणजे इटल्यांचा रंग बघून आणखी १० किंवा १५ मिनिटे फ्रायर चालू करावा.

चीज कडक (दगडच) झालय ते मऊ होण्यासाठी काय करता येईल??

लेखक कैवल्यसिंह यांनी शुक्रवार, 23/12/2016 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या घरी आम्ही आमूल कंपनीचे मोज्जारेला चीज आणलयं पन ते खुपच कडक झालयं... कोनीतरी मला सांगीतले की मिक्सरवर बारीक करा... पन मला शंका आहे की मिक्सरवर जर टाकुन फिरवले तर मिक्सरची पाती रहातील का?.. आणि हो... ते चीज इतकं कडक झालय कि ते कापताही येत नाहीये व किसताही येत नाहीये.... दगडच होऊन बसलाय त्याचा... कोणावर फेकला तर दुखापत होईल ईतपत कडक झालय ते... बहुतेक थंडीमुळे ते चीज कडक झाले आसावे का? कडक झालेले चीज आजुन कोणत्या मार्गाने मऊ करता येईल जेणेकरुन ते आम्हाला पदार्थांमधे वापरता येईल? कृपया यावर ऊपाय सांगावेत/मार्ग सुचवावा... - KaivalyaDj