Skip to main content

रेडइंडियन मुलांच्या कथा...

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 28/12/2016 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire अमेरिका व कॅनडाच्या सरहद्दीवरील एखादी रेड इंडियन वस्ती. रात्रीची वेळ, काठ्यांच्या तंबूंची कापडे मंद हवेत हलताएत... शेकोटीसमोर मुले व त्यांचे मिशोमिस (आजोबा) बसले आहेत. मुलांना गोष्ट सांगेन हे आधीच कबूल केले आहे. आकाशात तारे, चांदण्या चमचम करत आहेत व खाली शेकोटीवर ज्वाळांचा खेळ... मिशोमिस सुरु करतो... ऐका रे मुलांनोऽऽऽ चार शिकारी भाऊ होते.

...लहान दिवा लवकर विझतो!

लेखक इरसाल कार्टं यांनी बुधवार, 28/12/2016 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दिवसांपासून लिहायचे होतेया विषयावर, पण राहून जात होते. कालच्या प्रसंगाने मात्र मला लिहायची इच्छा आवरता आली नाही. झालं असं कि काल कामानिमित्त मुंबईत जाणे झाले. एकट्याने जायला कंटाळा आला आणि येताना समानहि होते आणायचे म्हणून जोडीला विकास नावाच्या मित्राला घेऊन गेलो. विरार ला पोचल्यावर त्याने एक आठवण सांगितली, विकासची एक वर्षाची पुतणी 3-4 महिन्यांपूर्वी आजारी पडली होती. न्युमोनिया झाला होतं तिला आणि त्यांनी तिला विरारमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. छोटीला उपचारांनी बरे तर वाटत होते पण रुग्णाच्या तब्बेतीतील प्रगती विचारल्यावर डॉक्टरांची उत्तरे कायमच घाबरवणारी असायची असे तो म्हणाला.

आंबेडकर, मर्ढेकर, किर्लोस्कर, आपटे, जोशी, कारखानीस, जानोरकर (गाडगे महाराज)

लेखक माहितगार यांनी बुधवार, 28/12/2016 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी विकिपीडियावरील येथील नोंदीनुसार खालील साहित्यिकांचे मृत्यू सुमारे ६० वर्षां पुर्वी इ.स. १९५६ या वर्षात झाले होते म्हणून भारतीय कॉपीराईट कायद्यानुसार त्यांचे लेखन १ जानेवारी २०१७ पासून कॉपीराईट मुक्त होणे अभिप्रेत आहे. *भीमराव रामजी आंबेडकर वेगळी ओळख लिहिण्याची आवश्यकता नाही * पांडुरंग श्रीधर आपटे (६ एप्रिल, इ.स.

(नाक गळतंय माझं..)

लेखक खेडूत यांनी बुधवार, 28/12/2016 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा (मूळ कविता, त्यातल्या कल्पना सुरेख आहेत. उगाच टैमपास म्हणून हे विडम्बन. अजून बरे होऊ शकले असते..) नाक गळतंय माझं तसं ते नेहमीच गळतं पण पाऊस आला की येतात जोराच्या दोन चार शिंका अन नाक येते कफही होतो जरासा नाक गळतंय माझं रुमाल ओलागिच्च झालाय केंव्हाचं तुंबलंय वाट पाहतेय निचरा होण्याची हाताशी व्हिक्स आहेच पण विकोरील मिळेना.. जौदे ,निचरेल ...

फॉलोऑन आणि नंतर..

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 28/12/2016 02:27 या दिवशी प्रकाशित केले.
टेस्ट मॅच आणि तसं पाहयला गेलं तर फर्स्ट क्लासची कोणतीही मॅच जिंकण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या गोष्टी कोणत्या? या प्रश्नाचं उत्तर खरंतर अगदी साधं आहे ते म्हणजे भरपूर रन्स करणारे बॅट्समन, २० विकेट्स घेऊ शकणारे बॉलर्स, बर्‍यापैकी विकेटकीपर आणि फिल्डर्स... आणि महत्वाचं म्हणजे नशिब! कोणत्याही टेस्ट मॅचमध्ये बहुतकरुन महत्वाची ठरते ती पहिली इनिंग्ज. पहिल्या इनिंग्जमध्ये बॅटींग करणारा संघ किती रन्स करतो किंवा बॉलिंग करणारा संघ त्यांना किती रन्समध्ये रोखण्यात यशस्वी होतो यावर अनेकदा मॅचचं पारडं झुकतं.

वडील

लेखक वृंदा१ यांनी मंगळवार, 27/12/2016 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या वाचनाचं कौतुक तुमच्या डोळ्यांत दिसायचं आता अक्षरंच तरंगतात अश्रूंवर आता कसं वाचायचं?

आईवडिलांबद्दल पुस्तके लिहिणे

लेखक वृंदा१ यांनी मंगळवार, 27/12/2016 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सगळेच जाणतो की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या आईवडिलांची भूमिका फार फार महत्वाची असते. आयुष्य चालत राहतं,काळ वाहत राहतो आणि एक दिवस आपल्याला आई किंवा वडिलांचा कायमचा वियोग सहन करावा लागतो.

सिर्फ पचास कमेंट्स चाहिये!!

लेखक बाजीप्रभू यांनी मंगळवार, 27/12/2016 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
NRI वेल्फेअर कमेटी, आहार आणि आरोग्य विभाग, ब्रँच पटाया (थायलंड). बैठक ठिकाण :- हॉटेल दुसितथानी, नॉर्थ पटाया, चोनबुरी प्रोव्हिन्स. दिनांक :- ०४ सप्टेंबर २०१६ (रविवार) वेळ :- सायंकाळी ७ वाजता. अटेंडी :- १) मिस्टर वेंकटेश गोपालन (VP, मेसर्स. पॅक्सीस ग्लोबल) २) मिस्टर नंदकुमार एम. (रिजनल हेड, मेसर्स क्लार्क्स शूज कंपनी) ३) मिस्टर बाजीप्रभू (IT मॅनेजर, मेसर्स. पॅक्सीस ग्लोबल) ४) मिस्टर देवादास रामाकृष्णन (मॅनेजर कस्टमर सर्व्हिस, मेसर्स.

मदुराई, रामेश्वर ट्रीपबद्दल माहिती हवी आहे.

लेखक आर्या१२३ यांनी मंगळवार, 27/12/2016 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, फेब्रुवारीमधे कन्याकुमारी येथे जाणार आहोत. तर सोबत मदुराई, रामेश्वरम ही करावे असा मानस आहे. बरोबर ज्येष्ठ नागरिक आहेत. लेडीज फक्त. तीर्थाटनाचाच उद्देश आहे. ट्रेन व बसनेच प्रवास करणार आहोत. शक्य झाले तर एका बाजुने विमानप्रवास होउ शकतो. कुणाला या स्थळांचा म्हणजे मदुराई, रामेश्वरचा काही अनुभव, तसेच राहण्या/खाण्यापिण्याची व्यवस्था, जवळपासची मन्दिरे, कुठ्ला रुट सोपा पडेल इ माहिती असल्यास मार्गदर्शन करावे. धन्यवाद!