Skip to main content

काश्मीर धोरणलकवा, शोकांतिका कि आणखी काही भाग २

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 01/01/2017 07:50 या दिवशी प्रकाशित केले.
काश्मीर धोरणलकवा, शोकांतिका कि आणखी काही भारत सरकारच्या वतीने दस्तुरखुद्द गवर्नर जनरल लॉर्ड माउंटबटन महाराजांना समजवण्यासाठी १८ जुन१९४७ला काश्मीरला गेले. तेथे ते २३ जून पर्यंत थांबले आणि रोज महाराजांना भेटून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. काय समजावण्याचा प्रयत्न केला ?तर हे कि महाराज जरी कायद्याने स्वतंत्र राहू शकत असले तरी तसे राहणे शहाणपणाचे असणार नाही. भारत सरकार तर नाही पण पाकिस्तान ते सहन करणार नाही, ते लष्करी कारवाई करतील आणि भारत तुम्हाला काहीही मदत करणार नाही.

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग १४ )

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 01/01/2017 07:32 या दिवशी प्रकाशित केले.
त्या चक्रीवादळाच्या आठवणी ते पावसाळ्याचे दिवस होते.कोकणातला पाऊस म्हणजे त्याबद्दल न विचारलेलं बरं.एकदा कोसळायला लागला मग एक दोन दिवसात उतार यायचं नाव नाही.ह्यावेळीही असंच झालं.त्यात चक्री वादळाचा संभव आहे असा हवामान खात्याने अंदाज दिला होता.काळ्या कुट्ट ढगानी आकाश पूर्णपणे झाकलं गेलं होतं.दुपारी बारा वाजता रात्रीचे बारा वाजले की काय असं भासत होतं.पाऊस धरून होत्ता पण कोसळत नव्हता.म्हणतात ना वादळापूर्वीची शांतता तसं अगदी शब्दश: वाटत होतं. गुरूनाथचं मन चलबीचल होत होतं.कोकणातली वादळं त्याने अनुभवली होती.सर्व साधरणपणे बांधलेल्या घरांची छप्परंच उडून जातात.गुरूनाथच्या आळीतली घरं मंगळोरी कौलाची होती

स्मरणातल्या बाप्पा

लेखक वृंदा१ यांनी शनिवार, 31/12/2016 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
बाप्पाला आणायचात तुम्ही भक्तीनं अन् हौसेनं तुम्ही देखणे आणि बाप्पाही आम्ही पळायचो मस्तीनं आताच्यासारखी तेंव्हा सजावट नसायची खूप जुन्याच मोत्याच्या माळेने बाप्पांचं खुलायचं रूप एक रंगीत लाईटचा दिवा तुम्ही सांभाळून लावलेला बाप्पांपुरताच कोनाडा डिस्टेम्परने सजलेला मोठमोठ्यानं म्हणायची तुमच्यासोबत आरती शब्द विसरायचा एखादा नजर जायची खालती भूलवायचा आम्हाला मोदकांचा ढीग घरोघरच्या प्रसादाची लावायची रीघ जुनाच कागदाचा पंखा आणि टिकल्यांचे तोरण त्या रत्नांच्या क्षणांचे सतत होते स्मरण दहा दिवस जायचे कसे भुर्रकन उडून विसर्जनाच्या दिवशी घ्यायचे गुपचूप रडून बाप्पांचा निरोप घ्यायला मुद्दाम लावायचा वेळ कळायचा न
काव्यरस

एक लडका और एक लडकी कभी दोस्त नाही हो सकते!

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 31/12/2016 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्री-पुरुष मैत्री हा विषय अनेकदा अनेक स्तरांवार चर्चेत आला आहे. वाद-विवाद, चर्चा, मत-मतांतर अनेकदा वाचनात आली आहेत. त्यातलाच एक लेख नुकताच वाचनात आला. विषय काहीसा स्त्री-पुरुष मैत्री आणि पुरुषांना समाजाने मान्य केलेली मोकळीक आणि स्त्रियांना दिली जाणारी म्हणा किंवा स्त्रियांनी घेतलेली 'मोकळीक' याविषयी स्त्रियांबद्दलचा समाजाचा दृष्टीकोन. असा काहीसा होता. त्यात अस म्हंटल होत की स्त्रियांनी पुस्तकांवर लिहावं, समाजातल्या, धर्मातल्या, राजकारणातल्या समस्यांना हात घालावा पण यात जिथे जिथे सेक्स आहे तिथे बाईने हात घालू नये.

स्ट्रारबॉय

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 31/12/2016 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या ज्या गाण्याने मला वेड लावलं आहे ते म्हणजे स्ट्रारबॉय चे द वि़केंड... या चार्ट बस्टर गाण्याचे संगीत मनात पार घर करुन बसले आहे, तर जगात या गाण्याने अक्षरः धुमा़कुळ घातला आहे ! तु-नळीवर अनेक गाणी ऐकताना,शोधताना एका गाण्याच्या खाली असलेल्या एक प्रतिक्रियेत या गाण्याचा उल्लेख मला दिसला आणि हे गाणे मी शोधले आणि ऐकले. कॅनडा / फ्रान्स / न्यूझिलंड / नॉर्वे / डेन्मार्क / स्विडन / मॅक्सिको / अमेरिका / ऑस्ट्रेलिया इथे या गाण्याने अर्थातच चार्ट बस्ट केले. या गाण्याचे अनेक व्होकल आणि अकुस्टिक कव्हर्स आत्ता पर्यंत केले गेले आहेत / केले जात आहेत...

सचिननामा-४: दुखापत व बॅड पॅच

लेखक फारएन्ड यांनी शनिवार, 31/12/2016 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
ही पाक विरूद्धची टेस्ट आणि वन डे सिरीज जिंकल्यावर तो सीझन संपला तेव्हा भारताने बरेच काही साध्य केलेले होते. त्या आधी २-३ वर्षे सगळा संघ व सचिनही जबरदस्त क्रिकेट खेळले होते. परदेशात मॅचेस जिंकणे हे तोपर्यंत अत्यंत दुर्मिळ होते (१९३२ ते २००० या काळात फक्त १३ विजय). या २-३ वर्षांत भारताने वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, आणि पाकिस्तान मधे विजय मिळवले. त्यातही पाक मधे सिरीज जिंकल्याने त्याचे महत्त्व जास्त होते, कारण त्याआधी आपण कधीही तेथे कसोटी सामनाही जिंकला नव्हता, आणि कधी जिंकू असेही वाटले नव्हते.

सचिननामा-३: पुन्हा फॉर्मात

लेखक फारएन्ड यांनी शनिवार, 31/12/2016 07:40 या दिवशी प्रकाशित केले.
६. जुलै १९९९ ते मार्च २००० सचिनचा दुसर्‍यांदा कप्तानपदाचा काळ. १९९९च्या वर्ल्ड कपच्या शेवटी अझरचे कप्तानपद पुन्हा जाणार हे दिसू लागले होते. सचिन कप्तान नको असे अनेकांना वाटत होते. पण दुसरा कोणीही तयार दिसत नव्हता. त्यात अझर संघातूनही बाहेर जाईल अशीच चिन्हे होती. शेवटी नाइलाजाने परत दीड वर्षांनंतर सचिनकडे ती जबाबदारी दिली गेली असावी. आणि पुन्हा फॅन्स या दृष्टीने एक बोअर कालावधी सुरू झाला. तसे सचिनने या काळात भरपूर रन्स केल्या. पहिल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सिरीजमध्ये एक शतक व एक द्विशतकही मारले. पण खरे सांगायचे तर ते लाइव्ह बघताना भयंकर बोअर झाले.

तुलपा - हादरवून टाकणारा योगिक अनुभव

लेखक साहना यांनी शनिवार, 31/12/2016 05:33 या दिवशी प्रकाशित केले.
मागील काही महिन्या पासून आमच्या नास्तिक ग्रुप चा अभ्यास योगी, ध्यान इत्यादी विषयावर सुरु आहे. मला विशेष रस नसला तरी स्लेन्डरमन मर्डर्स ह्या विषयावर अभ्यास करणाऱ्या एका महिलेशी ओळख झाली आणि त्यानंतर काही दिवसांनी एक तिबेटियन लामाशी भेट झाली. तिबेटियन लामाने मला तुलपा विषयी माहिती दिली आणि तुलपा ह्याचा सीलेंडरमॅन शी काही संबंध असावा असे समजून मी तुलपा चा अभ्यास सुरु केला. स्लेन्डरमन मर्डरस : जास्त खोलांत जात नाही. अमेरिकेत विविध ठिकाणी आणि विविध काळांत पौंगडावस्थेतील मुली अचानक आपल्या मैत्रिणींचा खून करू लागतात.

पांढरे हत्ती

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 31/12/2016 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
पांढरे हत्ती आमच्या देशात शेतीच्या क्षेत्रात अनेक पांढरे हत्ती उभे राहीलेले आहेत. त्यांचा नेमका उपयोग काय हा प्रश्न सामान्य शेतकर्‍याला नेहमी पडतो. या संस्थांना सरकारची आर्थिक मदत मिळते. चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यापासून अति उच्च पी. एचडी झालेले अधिकारी मिळतात. त्यांना सरकारकडून भरपूर पगार मिळतो. नोकरीनंतर पेन्शन मिळते. गाड्या बंगले याचाही खर्च सरकार करते. निरनिराळ्या परिसंवादांमधे देश विदेशात हे लोक भाग घेतात.

भारतातल्या दोन क्रांतीकारक आर्थिक कारवाया : एक विश्लेषण

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 30/12/2016 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
स्वतःचा व पक्षाचा स्वार्थ बाजूला सारून देशाला पुढे नेणारा खंबीरपणा दाखविणे जगभरच्या भल्या भल्या नेत्यांना जमलेले नाही. मात्र, स्वतंत्र भारताच्या सात दशकांच्या इतिहासात हे दोनदा घडले आहे. सन १९९१ मध्ये उदार वित्तव्यवस्थेची पायाभरणी केली गेली तेव्हा आणि सद्य निश्चलनीकरणाच्या कारवाईच्या वेळी. मात्र, या दोन्ही कारवायांत "स्वतःचा व पक्षाचा स्वार्थ बाजूला सारून देशाला पुढे नेणारा खंबीरपणा दाखविणे" हा मूळ मुद्दा असला तरी या दोन कारवायांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे, या दोन वेळांच्या परिस्थितीचे तुलनात्मक विश्लेषण करण्याचा मोह झाला आहे.