Skip to main content

कर्वेनगरात

लेखक दाह यांनी सोमवार, 02/01/2017 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
जून २०१० मध्ये कॉलेज संपल्यावर नोकरीसाठी (डोळ्यांत ऐटदार (किंवा आयटीदार) स्वप्नं वगैरे घेऊन इतरांसारखा) पुण्यात दाखल झालो. यापूर्वी पुणे एकदोनदाच पाहिलेलं आणि पुण्यात कोणी पाहुणे नसल्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे तिथे राहायचा योग कधीच आला नव्हता. हरखलेलो एकदम. बस आता १२-१३ मजल्याची एक काचेची इमारत आणि संपूर्ण वातानुकुलीत असलेल्या एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत ५.३, ३.७ किंवा अगदीच नाही तर २.८ वगैरे पॅकेजचा जॉब मिळवून मस्त सेटल व्हायचे मांडे खात होतोच मनात. स्वागत म्हणून की काय कोण जाणे , स्वारगेटवर उतरताच जो बदाबदा पाउस कोसळायला लागला थांबायचं नावंच घेईना.

तुम्ही

लेखक वृंदा१ यांनी सोमवार, 02/01/2017 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
हात कामात असतात मन तुमच्याशी बोलत बसतं सगळंच खोटं असेल तर खरं तरी काय असतं ?

मी आज केलेला व्यायाम - जानेवारी २०१७

लेखक गवि यांनी सोमवार, 02/01/2017 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
. नमस्कार मंडळी. "मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे. व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन. आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे - नोव्हेंबर २०१६ - सायकलिंग - ८०१० किमी आणि रनिंग / वॉकिंग - २४८ किमी. डिसेंबर २०१६ - सायकलिंग - ९६१३ किमी आणि रनिंग / वॉकिंग - २९१ क

Naate

लेखक Savnil यांनी सोमवार, 02/01/2017 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
लहरिच आणि किनाऱ्याच नात जगावेगळ असत जवळ असले तरीही मिलन नाशिबि नसत लहरिवर लहर सतत त्याला असते भेदत तरीही प्रेम करतो किनारा बिन प्रश्न विचारत किनाऱ्याच्या नशिबी फ़क्त वाळूच लेण असत लहरिला वेध मात्र त्याला स्वतःत सामावून घेण असत आलिंगन देऊन लहरिला परत फिरायच असत दुःख विरहाच मात्र किनाऱ्यान सोसायच असत जेव्हाहि जातो किनारयाजवळ तेव्हा हेच विचारावस वाटत प्रेम म्हणजे हे असत तर आम्हा माणसात अस का नसत ????

पन्नास पावसाळ्या नंतरचा जमाखर्च

लेखक मिडास यांनी सोमवार, 02/01/2017 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
आईचं बोट धरून जेव्हा पहिल्यांदा बाहेरच्या जगात पाऊल पडतं ते कदाचित निवृत्तीनंतर घरात परत येतं. नियती नावाची गोष्ट दरक्षणी एक नवा फासा टाकते. साप शिडीवरून चढत-उतरत सोंगटी एका जागी स्थिर होते. डाव पूर्ण होत नाही. आता फक्त शेवटच्या दानाची वाट बघत बाकी सोंगट्याना घरंगळत उठत आपापला मार्ग चालताना पाहावं लागतं . पटावरून खाली बघितलं कि तेव्हाचे अजस्त्र साप आज फक्त एक साधारण दोरी वाटू लागतात. चढलेली शिडी एखाद्या शिखरापेक्षा उत्तुंग वाटू लागते. ज्याला highlights म्हणावे असे आयुष्यातले अनुभव एक survey फॉर्म घेऊन समोर येतात. १) शिक्षण पूर्ण ?

वडील

लेखक वृंदा१ यांनी रविवार, 01/01/2017 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
मातीचं मडकं किंवा सोन्याचा हार घडवणारा कधीच दिसत नाही पण घडवणाराचं अस्तित्व आणि अभिरुची काळसुद्धा कधी पुसत नाही
काव्यरस

रॅन्समवेअर – व्हायरस आणि सायबर गुन्ह्यांच्या विश्वातलं एक नवीन नाव

लेखक आशुतोष-म्हैसेकर यांनी रविवार, 01/01/2017 21:09 या दिवशी प्रकाशित केले.

रॅन्समवेअर – व्हायरस आणि सायबर गुन्ह्यांच्या विश्वातलं एक नवीन नाव

व्हायरस…! अगदी सामान्य कामांसाठी संगणक आणि मोबाईल वापरणाऱ्या कुणालाही ज्याची सर्वात जास्त भीती असते अशी एक गोष्ट म्हणजे व्हायरस.कारण व्हायरस आला म्हणजे संगणक खराब होणार आणि संगणक खराब होण्या मागे बहुतेकतरी एखाद्या व्हायरसचाच हात असणार अशी सामान्य धारणा झालेली आहे.

गांझोल्यांचा पोळा

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 01/01/2017 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे मागच्या दारातून पुढच्या दारी येण्यासाठी एक बोळ होता. ओसरीत पाव्हणे रावळे असले तर मागच्या दाराने निघून पुढच्या दारी येता येत असे. ओसरीत आण्णा असले तर खेळायला जाण्यासाठी मागच्या दाराने मी हळूच निघून जात असे. ह्या बोळातून तसे खूप लोक वापरायचे. विशेषत: स्त्रिया. बोळाच्या दोन्ही बाजूच्या भिंती मातीच्या रद्दयाच्या म्हणून त्या भिंतीना मोठमोठे नळे आणि भगदाड पडलेले होते. अशाच एका नळ्यात गाझोंल्यांचा (गांधील माश्यांचा) पोळा तयार झाला होता. हा नळा मोठ्या माणसांच्या डोक्याइतक्या उंचीवर होता. होता होता या गांझोल्यांचा पोळा खूपच वाढला.

शेजाऱ्याचा डामाडुमा - भारताचे सख्खे शेजारी-एक होते हिंदू राष्ट्र - भारत आणि'सख्खा' शेजारी नेपाळ-१

लेखक अनिंद्य यांनी रविवार, 01/01/2017 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
=========================================================================== शेजाऱ्याचा डामाडुमा - भारताचे सख्खे शेजारी : प्रस्तावना... नेपाळ-०१... नेपाळ-०२... नेपाळ-०३... नेपाळ-०४... नेपाळ-०५... नेपाळ-०६...

मिपाच्या नव्या थीमची ओळख

लेखक नीलकांत यांनी रविवार, 01/01/2017 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज नव्या वर्षाच्या सुरूवातीला मिपाला नवीन थीम लावली आहे. या थीम मध्ये रंगसंगतीसह अनेक बदल केलेले आहेत. त्या नव्या बदलांची सवय होई पर्यंत नेमके काय बदल आहेत आणि नवी ठेवण कशी आहे हे आपण येथे बघुया. सध्याची मिपाची थीम ही मोबाईल व अन्य लहान स्क्रिनसाईज असलेल्या डीव्हाईससाठी सहज अनुरूप होईल अशी थीम आहे. त्यामुळे संगणक, लॅपटॉप सोबतच यापुढे मोबाईल, टॅब आदीवर मिपावाचन आणि प्रतिक्रिया देणे सहज सोपे होईल अशी अपेक्षा आहे. १) तुर्तास मिपाचा लोगो नाहीये. - ही तात्पुरती सोय आहे. मिपाचा लोगो लवकरच वरच्या भागात असेल. २) मेन्यु - सध्या वरच्या मेन्युमध्ये साहित्य प्रकार नावाचा मेन्यु आहे.