Skip to main content

कौनो ठगवा नगरीया लूटल हो

लेखक मिडास यांनी शुक्रवार, 06/01/2017 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा चाललेल्या वाटे वरून पुन्हा चालता येत नाही असं म्हणतात. वाट तीच असते पण आपण मात्र बदलले असतो. तारुण्याचे वयच असतं नविन वाटा तुडवायचं. पण परत त्याच वाटेवरून चालता येईलच असं नाही. आज मागे वळून बघताना हसायला येतं. कालच्या भाबडेपणावर हसावं कि आजच्या निगरगट्ट पणाची कीव करावी कळत नाही. हळवे असतात काही क्षण. भोळे निरागस आणि तितकेच मूर्ख सुध्दा. अशाच एका हळव्या क्षणी मी माझ्या मैत्रिणीला विचारलं होतं "तुझा शेवटचा क्षण कसा असावा असं तुला वाटतं ?" त्या वेळेला का हा प्रश्न विचारला माहित नाही. पण कुठली तरी कविता वाचून शेवटच्या क्षणाबद्दल काहीतरी काव्यात्मक सुचलं होतं हे खरं.

हरिश्चंद्रगड भाग ३

लेखक इरसाल कार्टं यांनी शुक्रवार, 06/01/2017 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
हरिश्चंद्रगड भाग १ हरिश्चंद्रगड भाग २ सात नंतर एकेकाचे डोळे उघडायला लागले. आणि पुन्हा रात्रीच्या त्या दोन अनाहूत पाहुण्यांचा विषय सुरु झाला, तरी बरे ते पाहुणचार घेण्यासाठी थांबले नव्हते. मग पुन्हा शेकोटीभोवती जमा झाले सगळे. लगबग हा शब्द आमच्या ग्रुपला माहित नाही, स्थळ काळाचे भान विसरून त्यांची मस्ती चालू असते.

RIP पंडित

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 06/01/2017 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
पंडित आताच तू गेल्याची बातमी वाचली आणी जाणवलं पुण्याशी आपुलकीने नातं असलेला अजून एका कलाकार गेला. कित्येक चित्रपटातून तू भेटत होतास अगदी विविध रोल्स मध्ये पण तुझं खास असं अस्तिव जाणवलं ते 'माचीस' मध्ये त्यातला 'सनातन' तू ज्या दहकतेने रंगवला आहेस त्याला तोड नाही. 'जंगल बुक' मधला 'बघिरा' कोण विसरू शकेल, त्या आवाजातच एवढी जरब होती कि बस्स..... अगदी कालपरवा तुझा 'मकबूल' पाहिला, त्यात नासिर बरोबरची तुझी जोडी झकासच होती. तुम्ही दोघही FTII च्या एकाच बॅच मधले असल्याने दोघांमधल जे को-ऑर्डिनेशन होतं, ते लाजबाब होतं.

हरिश्चंद्रगड भाग २

लेखक इरसाल कार्टं यांनी शुक्रवार, 06/01/2017 12:38 या दिवशी प्रकाशित केले.

हरिश्चंद्रगड भाग १.

लेखक इरसाल कार्टं यांनी शुक्रवार, 06/01/2017 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
दोन महिन्यांपासून तारखा ठरवत होतो, पण सुवर्णमध्य काही मिळत नव्हता… सगळ्यांनाच ट्रेकला जायचे होते, तेही दोन दिवसांसाठी. म्हणजे एक रात्र वस्तीला. पण तारखा जुळत नव्हत्या. अख्या ग्रुप मधल्या सगळ्यांच्या सुट्या वेगवेगळ्या दिवशी. त्यात आमचे कनिष्ठ बंधू रत्नागिरीतील लांज्यात आय डी बी आय बँकेत कार्यरत असल्यामुळे त्यांचे येण्या जाण्याचे वेळापत्रक जुळणे सगळ्यात कठीण. त्यात कोणाच्या चुलत भवाचं लग्न तर कोणाच्या मित्राचं. स्पष्ट काही ठरत नव्हतं. मधेच अमरावतीकर सागरचं गावाला जाणंही होतंच. शेवटी एकदाचे ते दोन सोनियाचे दिवस ठरले, ११ आणि १२ डिसेंबर.

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग १५ समाप्ती)

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 06/01/2017 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
गुरूनाथच्या अंतीम आठवणी. सोनचाफ्याच्या फुलाचं झाड पडलेलं पाहिल्यानंतर त्या दिवसापासून गुरूनाथ फारच विक्षीप्त वागू लागला. सकाळी सोनचाफ्याची फुलं सुम्याच्या फोटो समोर ठेवता येत नाहीत म्हणून खट्टू व्हायचा.कधी कधी तो दिवसातून दोन तीन वेळा आंघोळ करायचा.सकाळी जेवला असताना जेवलोच नाही म्हणून मदतनीसाकडून परत जेवणाचं ताट मागवायचा.त्याने जेवल्याची आठवण करून दिली तर त्याच्याशी वाद घालायचा.फार्मसीत कामावर जाण्यासाठी म्हणून सकाळीच जाण्याची तयारी करायचा.

बन्दे की मेहनत को किस्मतका सादर परनाम है प्यारे.. दंगल दंगल!

लेखक पिलीयन रायडर यांनी गुरुवार, 05/01/2017 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
Dangal दंगल पाहिला. आवडलाच.. अगदी शतकोत्तर कलाकृती नसली तरी पिक्चर उत्तमच आहे. आणि मला आमीर खान देशद्रोही वाटत नाही, म्हणुन मला त्याचं कौतुक करायलाही काही त्रास नाही. दंगल मध्ये आमिर, फातिमा, सान्या, सांक्षी तंवर आणि अपारशक्ति खुराणा म्हणजेच ओंकार.. सगळ्यांचेच काम उत्तम आहे. त्यांनी त्यांच्या लुक्सवर घेतलेली मेहनत, त्यासाठी केलेला व्यायाम.. हे तर महत्वाचं आहेच. पण खास करुन आमीरने वजन वाढवुन, ते पुन्हा कमी केलंय.

देशाचा अपमान

लेखक संदीप डांगे यांनी गुरुवार, 05/01/2017 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
"बाबा, जन-गण-मन केव्हाही म्हटलं की देशाचा अपमान होतो ना?" तन्मय, आमची थोरली पाती. "इकडे ये, मला नीट ऐकू नाही आलं." अस्मादिक. . . "बाबा, जन-गण-मन केव्हाही म्हटलं की देशाचा अपमान होतो ना?" अ‍ॅक्शन रिप्ले. "तुला कोणी सांगितलं? कुठे ऐकलं" (प्रश्नाचे सरळ उत्तर देतील तर पालक म्हणवून घेण्यावर बट्टा लागेल नै?) "असंच, मला माहिती आहे." थोरली पाती. "अरे, म्हणजे कुठं ऐकलं, कोणी सांगितलं, कोणी बोलत होतं का असं?" "गौरव म्हणाला. केव्हापण जन-गण-मन म्हटलं तर देशाचा अपमान होतो." . . वय वर्षे सहा, वर्ग पहिला. शाळेतल्या गप्पांमधे झालेला विषय घरी चर्चिला जाणे रोजचंच.