Skip to main content

प्रीत भेटेल का गं...

लेखक सुर्यान्श यांनी शनिवार, 07/01/2017 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
हरवलेले गीत भेटेल का गं प्रथम नेत्रीची प्रीत भेटेल का गं बघ भावनांचा कल्लोळ झाला आज तरी वेळ भेटेल का गं ।। व्यवहारी विचारी पेलून सारी ह्रद्याशी ह्रद्य खेटेल का गं ।। तु ग्रृहलक्ष्मी मी अन्नदाता तु मायाममता मी इःकर्तव्यता मेळ दोघांचा होईल का गं ।। गलित तन झाले मन न झाले आज तरी चांद उगवेल का गं ।। -सुर्यांश
काव्यरस

भक्ष (भयकविता)

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शनिवार, 07/01/2017 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारात चालले, चार तरुण मित्र रस्त्यावर नव्हतं, कुणी काळं कुत्रं. त्यांना नाही दिसलं, एकजण फसलं अंधारात चालले, तिन तरुण मित्र चालले होते मस्तीत,आपल्याच बेफिकर एकजण नव्हता, त्यांना नव्हती खबर दोनजण उरले, दोघेही घाबरले "कोण आहे तिकडे?" भेदरून ओरडले अंधारात कोलमडला, एक तरुण मित्र उरलं नाही भान पुटपुटायचं स्तोत्र काय होणार आता,त्याने लगेच ताडलं, चावलं फाडलं अंधारात चालले, चार तरुण मित्र, शोधत होते भक्ष, आठ लाल नेत्र --------------------

काही ठिकाणे काही आठवणी-३ (पुणे विशेष भाग)

लेखक औरंगजेब यांनी शनिवार, 07/01/2017 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
सन २०१२-१३ मध्ये मी राज्यसेवा परीक्षेसाठी क्लास लावल्यामुळे पुण्यात राहायला होतो. त्यावेळच्या काही आठवणी. माझा क्लास म्हणजे नव्यापेठेतील चाणक्य मंडळ परिवार.आणी मी रहायचो ते पेरुगेटाजवळ. पेरुगेटचवळचे पुना बोर्डिंग म्हणजे माझी जेवणावळ. रोज तेथुन जेवण आणणे आणी खाणे यामुळे तेथील लोकांची छान(च) ओळख झाली. पेरुगेटवरुन मागे ज्ञानप्रबोधीनीकडे गेलं की त्या कॉर्नरला आनारसेवाला समोसे वाला आहे.त्याचे समोसे अख्या जगात ( पुणेकरांच्यामते)फेमस आहेत. बाजुलाच A1 का काय ते नाव आसलेला ज्युसवाला आहे. त्याचाकडे ज्युस/मिल्कशेक फार छान मिळतात. बाकी बादशाहीथाळी बद्दल मी बोलणे योग्य नव्हे.

गोरखधंदा

लेखक जव्हेरगंज यांनी शनिवार, 07/01/2017 01:47 या दिवशी प्रकाशित केले.
"शूक.. शूक.." गल्लीतून आवाज आला. आपण तशी डेरींग कधी केली नाय. पण या झ्याट जिंदगीत बाकी ठेवलंय तरी काय. आपण या घोळक्याला उभा कोलतो. पोरसवदा उभारलेली एकटी दिसली. मग तिच्यासमोर जाऊन खिशात हात घालून उभारलो. सालं आपलं काळीजसुद्धा किती बेभरवसा धडाकतं. "बैठना है?" असं तिनं विचारलं. सरळसोट. मनानं ती किती नागडी आहे हे एका झटक्यात समजलं. "कितना?" सौदा हा असाच होत असावा. आता जरा धीर आला होता. "सौ रुपय.." तू मागितलं आणि मी दिलं. एवढं सोप्प वाटलं का हे? "पचास दूंगा.." "चलेगा.." पापणीही न लवता तिनं धडक उत्तर दिलं. "फुल ओपन चाहीये.." तिला नक्की मी काय म्हणतोय ते समजलं नसावं.

श्रद्धांजली - ओम पुरी : एक ओरिजिनल कलाकार

लेखक साहना यांनी शनिवार, 07/01/2017 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
NFDC द्वारे बनवला गेलेला चित्रपट "जाने भी दो यारो" १९८३ मध्ये आला आणि तेंव्हा पासून अजरामर झाला. अतिशय लो बजेट वर बनवला गेलेला चित्रपट आज सुद्धा लोकांच्या मनात एक घर करून आहे. मीडिया, बिल्डर, सरकार ह्यांच्यातील घाणेरडा भ्र्ष्टाचार आणि त्यांत शेवटी विनाकारण फाशीवर जाणारे दोन तरुण आदर्शवादी अश्या कथानकावर आधारलेली हि एक डार्क कॉमेडी होती. पंकज कपूर, नसिरुद्दीन शाह, रवी वासवानी, भक्ती बर्वे, सतीश शाह आणि ओम पुरी ह्यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ह्या चित्रपटात अभिनयाची मेजवानी आम्हा प्रेक्षकांना मिळाली.

घर

लेखक चाणक्य यांनी शुक्रवार, 06/01/2017 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
मी ज्या घरात सध्या असतो त्या घरात आधी रहायचो माहित होती मला भिंत न् भिंत कोपरा अन् कोपरा त्या घराचा आणि सहज जाऊ शकत होतो मी एका खोलीतून दुस-या खोलीत . . . पण आजकाल, कुठल्याही खोलीत गेलो तरी हसते ती खोली माझ्याकडे बघून अनोळखी माणसाकडे बघून आपण हसतो तसं काही काही कोपरे तर दिसतच नाहीत मला भिंती दिसतात....पण त्यांना आता वेगळा रंग आहे दारंही वाढलीयेत घरात तशी दिसत नाहीत....पण आहेत...कळतं मला कधी कधी तर वाटतं बरीच घरं आहेत या एकाच घरात मग मी ये जा करतो या घरातून त्या घरात अगदी बेमालूम पणे...कुणालाही कळू न देता . . . याच घरात मी आशिर्वादही घेतले आणि शापही ईथे कधी पालवी फुटलेला मी अाताशा पाचोळा बनून
काव्यरस

नाती

लेखक रोहित जाधव यांनी शुक्रवार, 06/01/2017 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
नाती म्हंटल की आठवतात ती रक्ताची नाती. पण काही नाती ही रक्ताचा नात्यानं पेक्षा थोडी वेगळी असतात. काही प्रसंगी तर ती रक्ताचा नात्यानं पेक्षा जास्त घट्ट वाटतात. आपण आपल्या मित्राला खूप वर्षा नंतर भेटतो. बराच वेळ गप्पा केल्या नंतर आपण जायला निघतो त्याला आपले प्रॉब्लेम न सांगताच आणि मित्र बोलतो अरे जे बोलायला आला होतास ते तर बोललाचस नाहीस. इथे आपल्याला जाणीव होते की आपण न बोलताच आपल्या भावना त्याचा पर्यंत पोहोचलेल्या असतात. घरी टिव्ही वर कधी तरी एखादी क्रिकेट मैच एकदम रंगात आलेली असते.

एक दिवस............

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 06/01/2017 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
एक ग॑ध हलकासा सारा दिवस दरवळला एक उडती नजरानजर सारा दिवस गुणगुणला एक स्पर्श ओझरता दिवस सगळा झिणझिणला दिवस सरता सरता का जीव असा हुरहुरला ?