Skip to main content

ब्रम्हचार्‍याचा संसार. भाग १

लेखक मार्मिक गोडसे यांनी गुरुवार, 12/01/2017 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारचे जेवण करून पुस्तक वाचायला घेतले. वाचता वाचता डोळा लागला ,इतक्यात लँडलाईनचा फोन खणाणला. घरातील सगळे गाढ झोपले होते, मी फोन उचलला.मीXXX कंपनीकडून मनाली बोलतेय, आमच्या कंपनीने एक सर्वे केला त्यात तुमच्या फोनचा लकी ड्रॉमध्ये नंबर लागलाय. मी श्री. XXXX गोडसेंशी बोलू शकते का? समोरून बोलणार्‍या मुलीचा आवाज इतका मंजूळ होता , की क्षणभर वाटलं खोटं बोलून संभाषण तसंच चालू ठेवावं , परंतु मी तसं करू शकलो नाही. आजोबा झोपले आहेत, थोड्या वेळाने फोन कराल का ? असं मी म्हटल्यावर घाईघाईने तिने, तसं काही नाही तुमाच्याशी बोलू शकते, असं म्हणून तिने विचारले तुम्ही सध्या काय करता?

लकुंडी-हंपी-ताडपत्री-बेलमच्या गुहा-यागंती-गंडीकोट-ऐहोळे-पट्टडकालू-बदामी ....भाग - ३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 12/01/2017 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज या भागात आपण भारवाहकांबद्दल वाचणार आहोत. देवळांचा सर्वात खालच्या थरांनंतर भितींच्या टोकावर यांची शिल्पे सर्व देवळांवर आढळतात. ज्याठिकाणी तुळया येतात किंवा खांबावर छताचा भाग येतो त्यावर हे शिल्प आढळतेच. नुसता सांधा ठेवण्यापेक्षा हे वजन कोणीतरी उचलते आहे ही कल्पना करुन हे शिल्प तेथे लावणे ही कल्पनाच मला मोठी रम्य वाटते. सगळ्यात दुर्लक्षित अशी ही मूर्ती. सगळ्यात अभ्यासावेत तर त्यांच्या चेहर्‍यावरील हावभाव. सगळ्यात खाली असतात त्यांच्या चेहर्‍यावर जरा त्रासिक भाव मला आढळतो तर जसे जसे वर जात जाऊ तसे वजन हलके झाल्यामुळे त्यांच्या चेहर्‍यावरील भाव सौम्य व प्रसन्न होत जातात.

(डोलकरांचे मनोगत)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी गुरुवार, 12/01/2017 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
(डोलकरांचे मनोगत) पेरणा अर्थातच शतदा भरला एक प्याला शेवटचा मी तृप्त पाहुनी खंबा हा टिचर्सचा रिचवले हजारो पेग मी उदरात सदैव राहो, दरवळ हा गोल्ड फ्लेकचा चखण्याची देउन आहुती पोटाला मी किंचित पिळले अलगद त्या लिंबाला नसता जेवण व्यर्थ मानले असते मज आहे कारण आज घरी जाण्याला धडपडत लटपटत रिक्षात पाय ठेवियले कुठे जायचे ते अडखळत सांगितले जरी घरी आल्यावर पडली उपेक्षा पदरी निळकंठा सम ते अमृत मानूनी प्राशीयले !! हे विजय मल्या थोर तुझे उपकार तू दिली आम्हाला रम व्हिस्की बीयर गायबला जरी तू बँकांना देउन तुरी सदैव राहिल तुझी

लॉलीपॉप - १

लेखक रातराणी यांनी गुरुवार, 12/01/2017 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी थोडी लवकरच क्लिनिकमध्ये पोचले होते. कर्णिक सरांनी नेहमीप्रमाणे सर्वात आधी येऊन क्लिनिक उघडले होते. बाहेर पावसाची संततधार सुरु होती. सगळ्या वातावरणात एक वेगळीच मरगळ होती. माझ्या कन्सल्टिंग रूममध्ये जाऊन मी उगीच सर्व वस्तू जिथल्या तिथे आहेत की नाही ते पाहून घेतलं. एकवेळ खुर्चीत बसून बघायचीही इच्छा झाली पण मी तिला आवर घातला. एक काऊन्सलर म्हणून खुर्चीत बसायची, समुपदेशन करायची ही काही माझी पहिली वेळ नाही असं स्वतःला बजावलं. पण एकटीनं कुठलीही केस ऐकायची ही नक्कीच पहिलीच वेळ होती. याआधी प्रत्येक केसमध्ये कर्णिकसर किंवा देसाईसर असायचे सोबत. तसं विशेष कधी बोलावंच लागलं नव्हतं मला स्वतःला.

भोजनानुभव (१) मुघल्स होटैल-ठाणे

लेखक औरंगजेब यांनी गुरुवार, 12/01/2017 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
काल सायंकाळी मुघल मध्ये जाणे झाले. त्याचा हा आनुभव आमचा ग्रुप ६ जणांचा ३ वेज ३नॉनव्हेज. सुरवात पायासुप ने आणी क्रिम अॉफ टौमॕटौ सुपने. व्हेज मधे फक्त टोमॕटोचाच पर्याय उपलब्ध होता. मेनुतले बाकीचे व्हेजसुपचे आयटम्स तसेच फ्रेश लाईम सोडा/शितपेयेही आजिबात उपलब्ध नव्हती. स्टारटर्स मध्ये पनीर टिक्का आणी चिकन टिक्का.! दोन्ही स्टारटर्स उत्तम. जेवणाचे वेळी मात्र याची त्यांनी पुरेपुर भरपाई केली. थंडगार बटर रौटी चामट नान आणी जेवण वाढल्यानंतर २०मिनिटांनी परत परत आठवण कैल्यावर आलेला पायनॕपल रायता.

Mise en scene - सिनेमाची भाषा!

लेखक अकिरा यांनी गुरुवार, 12/01/2017 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
*/

मास कम्युनिकेशनची दोन वर्षे माझ्यासाठी मंतरलेली वर्षे होती. इथल्या प्रत्येक लेक्चरमुळे सिनेमा हा ऐकू येणाऱ्या आणि दिसणाऱ्या चित्रपेक्षा कितीतरी अधिक संवाद साधत असतो याची जाणीव व्हायला लागली होती. वर्गात असणारे tv म्हणजे आमची प्रयोगशाळा होती, ज्यात आधी झालेल्या प्रयोगांचा अभ्यास करणे आणि आपण स्वतः नवीन प्रयोग करणे दोन्ही गोष्टी व्हायच्या.

पर्दाफाश

लेखक धनंजय यांनी गुरुवार, 12/01/2017 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
*/

मिसळपाव यूट्यूब चॅनलवर ‘पर्दाफाश’ ही माझी चित्रफीत आहे. त्यासोबतची माझी ही वैयक्तिक अनुभवांची काही टिपणे आहेत. इंग्लिश व्यावसायिक रंगभूमीवर स्टेजसमोरचा पडदा आजकाल क्वचितच उघडतो, पडतो.

दक्षिण घळ भाग ३

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 11/01/2017 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण घळ भाग १ दक्षिण घळ भाग २ दक्षिण घळ भाग ३ आता उगवतीकडे आकाशाचा रंग बदलायला लागला होता. आप्पाला उशीर होत होता. पण विजयाला एकटे टाकून जाणे शक्य नव्हते. मग मात्र त्याने निर्णय घेतला आणि तो तिच्याजवळच थांबला. बाहेर उजाडत असताना विजया थोडीशी कण्हली आणि तिच्या त्या क्षीणशा कण्हण्याने देखील आप्पाच्या जीवात जीव आला. त्याने तिला बसती केली आणि हळू हळू करून थोड पाणी पाजल. तिने डोळे उघडले आणि आप्पाकडे बघितल. "मी आज मऊ भात आणला होता. पण तो आता गार झाला असेल.