चलत्चित्रणाची तोंडओळख
'लाइट्स, साउंड, कॅमेरा, अॅक्शन!'
'लाइट्स, साउंड, कॅमेरा, अॅक्शन!'
आपल्या पैकी बरेचजण एखाद आठवड्यासाठी का होईना थायलंड देशात नक्कीच येऊन गेला असाल. एक बजेट फॉरेन टूर म्हणून पूर्वेकडील या निसर्गरम्य छोट्याश्या देशाला थोडे थोडके नव्हे तब्बल ६० लाख पर्यटक दरवर्षी भेट देतात. पटायातला एक बीच आयलँड, एक कॅबरे शो, रेड लाइट एरियाची व्हिजिट, झालंच तर एक जंगल सफारी आणि बँकॉकच्या मॉल्समधे शॉपिंग, हि मुख्यत्वे भारतीय पर्यटन कंपन्यांची स्टॅंडर्ड आयटीनरी.
झुकलेली नजर, ओठांवर मंद स्मित आणि एक लाजरा कटाक्ष…अगदी क्षणभरच.. पण त्या क्षणभरच्या नजरभेटीतूनही जी कुठल्याही पुरुषाला वेड लावू शकते, ओढ लावू शकते ती खरी गेइशा!! स्पर्श नाही, अंगप्रदर्शन नाही किंवा सवंग हावभाव नाहीत...फक्त एक कटाक्ष. 'गेइशा'- जपानच्या इतिहासातले, त्याच्या संस्कृतिक जडणघडणीतले महत्त्वाचे अंग. सामाजिक जीवनाचा अभिमानास्पद नसला तरी एक अविभाज्य भाग. आता गेइशा म्हणजे कोण आणि काय?
अर्चना जोगळेकर! मराठी चित्रपट सृष्टीतलं आणि कथ्थकच्या जगतातलं एक वलयांकित नाव. त्या गेले अनेक वर्ष न्यू जर्सी मध्ये राहत असून, "अर्चना नृत्यालय" चालवत आहेत. त्या हो म्हणतील असं खरं तर वाटलंच नव्हतं. एवढी मोठी व्यक्ती आपल्या लहानशा उपक्रमाला कशाला वेळ देईल असंही वाटलं. पण प्रत्यक्षात मात्र त्या अत्यंत गोड आहेत! अर्थात आम्ही मुलाखत घेताना प्रचंड घाबरलेलो होतोच! पण त्या अगदी भरभरून बोलल्या.