Skip to main content

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: आवाहन.

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 26/01/2017 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, सालाबादप्रमाणे यंदाही आपण शतशब्दकथा स्पर्धा आयोजित करतोय. दरवर्षी आपण शतशब्दकथांना विषय देत असतो आणि त्यावर कथा मागवत असतो. यंदा उपक्रमामधे थोडासा बदल करणार आहोत. ह्या वर्षीच्या स्पर्धेचा विषय आहे "A picture speaks in 100 words" अर्थातचं "छायाचित्राची गोष्ट १०० शब्दांमध्ये". आवाहनाच्या धाग्यामधे तुम्हाला काही छायाचित्रं दिली जातील त्यापैकी एकावर तुम्हाला १०० शब्दांमधे एक कथा लिहायची आहे. स्पर्धा म्हटली की नियम आणि अटी आलेच. तर ह्या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे आहेत. १. स्पर्धा २६ जानेवारी २०१७ ००:०० भाप्रवेला सुरू होईल आणि २० फेब्रुवारी २०१७ २३:५९ भाप्रवेला संपेल. २.

एक निर्णय (भाग 6) शेवटचा

लेखक ज्योति अळवणी यांनी गुरुवार, 26/01/2017 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
एक निर्णय भाग 1 एक निर्णय भाग 2 एक निर्णय भाग 3 एक निर्णय भाग 4 एक निर्णय भाग 5 भाग ६ एकदिवस ती नेहमीप्रमाणे घरी आली, पण घर बंद होते. डायनिंग टेबलावर परत एकदा चिठ्ठी होती... 'उशीर होईल.

वर्ल्ड कप क्लासिक्स - १९७५ - वेस्ट इंडीज विरुद्ध पाकिस्तान

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 26/01/2017 06:04 या दिवशी प्रकाशित केले.
१९७५ च्या पहिल्यावहिल्या वर्ल्डकपपासून २०१५ मधल्या वर्ल्डकपपर्यंत प्रत्येक वर्ल्डकपमध्ये अनेक थरारक आणि रोमांचक मॅचेस झाल्या. अशाच काही निवडक मॅचेसविषयी... ************************************************************************************* ११ जून १९७५ एजबॅस्टन, बर्मिंगहॅम वॉरीकशायरमधल्या एजबॅस्टन मैदानात वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान यांच्यात ग्रूप बी मधली मॅच होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये पदरी पराभव पडल्यामुळे सेमीफायनल गाठण्यासाठी ही मॅच जिंकणं पाकिस्तानसाठी अत्यावश्यक होतं. परंतु मॅचच्या दिवशी सकाळीच पाकिस्तानचा कॅप्टन आसिफ इक्बाल दुखापतीमुळे मॅचमध्ये खेळण्यास असमर्थ ठरला.

मी सध्या काय करतो?

लेखक चिनार यांनी बुधवार, 25/01/2017 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
मी सध्या काय करतो ? नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार ह्या विश्वात म्हणे दोन हजार अब्ज आकाशगंगा आहेत. तर या अब्जावधी आकाशगंगांमधल्या अब्जावधी ग्रहांपैकी एका ग्रहावरच्या अब्जावधी लोकांपैकी मी एक ! एवढ्या प्रचंड विस्तारलेल्या विश्वात माझी ओळख ही आमच्या गल्लीतल्या तिसऱ्या घराच्या पलीकडे जाणार नाही हे मी आधीच ओळखलं होतं. ते ही त्या घरात गोडलिंब आणायला आई मला वारंवार पाठवायची म्हणून! असं असताना, मी सध्या काय करतो हा प्रश्न एखाद्या मुलीलाचं काय अगदी कोणालाही पडण्याची काहीही शक्यता नाही. एवढंच काय!

द शो मस्ट गो ऑन... - विशेषांक

लेखक गोष्ट तशी छोटी... यांनी बुधवार, 25/01/2017 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
*/

नमस्कार मंडळी! गेले काही दिवस तुमच्या समोर मांडलेल्या गोष्टीच्या ह्या खेळाला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात.. प्रेम दिलंत..! गोष्टची संपूर्ण टीम ह्या कौतुकाने भरवून गेलेली आहे. "गोष्ट.." करायची ठरली तेव्हा हा प्रयोग इतका रंगेल असं आम्हालाही वाटलं नव्हतं. सुरवात झाली तेव्हा ह्या उपक्रमाचे स्वरूप लेखमालेचे, पण आवाका एका अंकाचा असावा असा आमचा विचार होता.

एक वादळी जीवन: ओशो!

लेखक मार्गी यांनी बुधवार, 25/01/2017 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
एक वादळी जीवन: ओशो! सर्व मान्यवरांना नमस्कार! हा लेख उघडल्याबद्दल धन्यवाद. नुकतीच ओशोंची पुण्यतिथी झाली, त्या निमित्ताने लिहिलेला लेख आपल्यासोबत शेअर करत आहे. मी ओशोंवर पूर्वी लिहिलेला लेख इथे वाचता येईल. विसाव्या शतकात भारतामध्येच नाही तर जागतिक पातळीवरील क्रांतीकारी व्यक्तींमध्ये ओशोंचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल. १९३१ ते १९९० ह्या ५९ वर्षांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे वादळ निर्माण केलं ते अजूनही सुरू आहे. १९ जानेवारी १९९० रोजी त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला.

एक निर्णय (भाग 5)

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 25/01/2017 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
एक निर्णय भाग 1 एक निर्णय भाग 2 एक निर्णय भाग 3 एक निर्णय भाग 4 भाग ५ त्या संध्याकाळनंतर मीनाक्षी खूप डिस्टर्ब झाली. आपल्या करियरमुळे आपण आपल्या संसाराला फारसा वेळ देत नाही आहोत हे तिला समजत होत... पण हे सत्य तिला स्विकारता येत नव्हतं.

विंगेत गलबला - कास्टिंग काउचचे रिंगमास्टर सारंग साठे येत आहेत हो! खट्ट्याक!

लेखक पिलीयन रायडर यांनी बुधवार, 25/01/2017 07:39 या दिवशी प्रकाशित केले.
*/

नमस्कार! 'गोष्ट तशी छोटी'चा आज समारोपाचा दिवस. विंगेत गलबलामध्ये लागलेला हा शेवटचा खेळ! आजची मुलाखत ही अनेक गोष्टींसाठी खास आहे. हा उपक्रम करायचं ठरवलं, तेव्हा अगदी चित्रकथीसारख्या पारंपरिक सुरुवातीपासून ते वेबसिरीजसारख्या आधुनिक कथाकथनापर्यंत सगळं काही ह्यात यायला हवं, हा आम्हा दोघींचाही आग्रह होता. मराठीत वेबसिरीज म्हटलं की एकच नाव ठळकपणे समोर येतं..

बेख्डेल चाचणी

लेखक यशोधरा यांनी मंगळवार, 24/01/2017 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
*/

तुमच्या-आमच्यापैकी अनेक जण सिनेमाप्रेमी आहेत. आपल्यापैकी अनेक जण पहिल्या दिवशीचा पहिला शो न चुकवणारेही असतील. हल्ली तर पहिला शो बघून आल्यावर अनेक जण आपले फेसबुक स्टेटसही तसे अपडेट करतात! फॅशनच आहे ना तशी! किती तरी जण तर अगदी दावा करू शकतील की 'दे कॅन टॉक सिनेमा, दे कॅन वॉक सिनेमा, दे कॅन लाफ सिनेमा..' मान्य, अगदी मान्य. पण बेख्डेल चाचणीत उत्तीर्ण होणार्‍या सिनेमांची नावे सांगू शकतील का ते? आँ?