Skip to main content

झेंगट कॉपीराईटचं, शैक्षणिक झेरॉक्सींगच ! - भाग २

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 27/01/2017 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
मागील लेखावरुन पुढे एखादा कायदा कसा असावा हे कायदेमंडळांच्या अखत्यारीत येते, न्यायालये कायदा सध्या कसा आहे (आणि फारतर कायदा तयार करताना कायदेमंडळाला काय अभिप्रेत होते) एवढेच पहातात असे सांगून; शैक्षणिक क्षेत्रासाठी कॉपीराईट पॉलीसी कशा प्रकारची असावी या बद्दल वादी - प्रतिवादींनी मांडलेल्या बाजूंचे कवित्व रामेश्वरी फोटोकॉपी सर्व्हिस प्रताधिकार खटल्यामध्ये ९ डिसेंबरला दिलेल्या निकालात खंडपीठाने बाजूस ठेऊन दिले. एवढे कवित्व होण्याचे पडद्या मागचे कारण काय असावे ?

(मी सध्या काय करते?)

लेखक रुपी यांनी शुक्रवार, 27/01/2017 06:39 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा अर्थातच. आमचा एक क्षीण प्रयत्न! म्हटलं तर विडंबन, म्हटलं तर दुसरी बाजू... मी सध्या काय करते? नुकत्याच आलेल्या "ती सध्या काय करते?" या चित्रपटामुळे अश्या अनेक "तीं"वरचे जोक आंतरजालावर धुमाकूळ घालत आहेत. 'तेव्हाच अमके केले असते तर आज हा प्रश्न पडलाच नसता' अशा आशयाचे कित्येक फॉरवर्ड्स कित्येकांना 'ती'च्या आठवणी व्याकूळ करुन सोडत असतील! एवढ्या सगळ्या आठवणींत माझी आठवण आमच्या गल्लीतही कुणालाच येणार नाही, हे मी आधीच कळून चुकले. कारण खरं तर आमचं घर कुठल्या गल्लीत नव्हतंच.

भिजू दे निशा

लेखक अनिल इन्गले यांनी शुक्रवार, 27/01/2017 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
अंगणातील जाई हरवली सुगंधात लोटूनी भय ये तू क्षणात पांघरली कुसूमांनी रात्र काजळी शहारतो गारवा राहूनी वल्लरीत कोवळे चांदणे पानापानांत उतरले लहरतो चांदवा पाहूनी जलात चोरपाऊलांच्या मार्गातील धुंद झाली रेती लाजिरे गुलाब हसले मोरपिसात नजरेचे म्रूग लागले दौडू सजे माणिक हिरव्या त्रूणात ये सामोरी कर दूर चलबिचल पायघड्या ठेवूनी उभा मी परसात अधीर डोळ्यांत डुले काजवा भिजू दे निशा दिव्य तुझ्या सहवासात
काव्यरस

भिजू दे निशा

लेखक अनिल इन्गले यांनी शुक्रवार, 27/01/2017 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
अंगणातील जाई हरवली सुगंधात लोटूनी भय ये तू क्षणात पांघरली कुसूमांनी रात्र काजळी शहारतो गारवा राहूनी वल्लरीत कोवळे चांदणे पानापानांत उतरले लहरतो चांदवा पाहूनी जलात चोरपाऊलांच्या मार्गातील धुंद झाली रेती लाजिरे गुलाब हसले मोरपिसात नजरेचे म्रूग लागले दौडू सजे माणिक हिरव्या त्रूणात ये सामोरी कर दूर चलबिचल पासघड्या ठेवूनी उभा मी परसात अधीर डोळ्यांत डुले काजवा भिजू दे निशा दिव्य तुझ्या सहवासात
काव्यरस

वर्ल्डकप क्लासिक्स - १९७५ - सेमीफायनल - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 27/01/2017 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
१८ जून १९७५ हेडींग्ली, लीड्स यॉर्कशायरमधल्या हेडींग्लीच्या ग्राऊंडवर पहिल्यावहिल्या वर्ल्डकपमधली पहिली सेमी फायनलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले होते ते पारंपारीक प्रतिस्पर्धी असलेले ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड! वर्ल्डकपपूर्वी १९७४-७५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या अ‍ॅशेस सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ४-१ असा फडशा पाडला होता. इंग्लंडची अशी वाताहात होण्यास कारणीभूत होते ते म्हणजे ऑस्ट्रेलियाचे ते दोघे खतरनाक बॉलर्स - डेनिस कीथ लिली आणि जेफ्री रॉबर्ट थॉमसन! पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये लिली वन डे मध्ये ५ विकेट्स घेणारा पहिलाच बॉलर ठरला होता.

हरीभाऊंच कोडं

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 26/01/2017 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
"लका तुला सांगती, हीतं झिट यीती काम करायला. आन ही म्हातारं कदी शेतावर सोड घरीबी येत न्हाई. आता ह्या येवढ्या उनात येकल्या बायनं किती करायचं?" सुमात्त्यानं चिरकुटात भाकऱ्या बांधल्या. कांद्याची हिरवीगार पात पिशवीत टाकत म्हणाली. "आन ही आवदसा बघावं तवा उंबऱ्यात बसल्याली आसती." हरीभाऊनं जरा घाबऱ्यानं भाईर बघितलं. राधाक्काला काही ऐकू गेलं तर उगाच पराचा कावळा नको. "मी काय भीती काय तिला. वाटुळं केलंय भवानीनं माझं" "आसं, आसं म्हणू नगा सुमात्त्या. संसार मनलं की चालायचंच. हितं कुणाला सुख म्हनून लागून राहिलंय सांगा बरं?" "तिला लागलंय बग. दारात बसून नुसती नटती आयघाली.

चीझी ग्रिल्ड पोटॅटो

लेखक आनंदी गोपाळ यांनी गुरुवार, 26/01/2017 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
विनाकटकटीचा झटपट ब्रेकफास्ट. साहित्य मध्यम आकाराचा बटाटा : १ स्वच्छ धुवून सालासकट. अर्धी चीज स्लाईस, किंवा तुमच्या आवडीचे चीज. मिरपूड, मीठ, थोडे तेल. क्रमवार कृती बटाट्याला सुमारे अर्धा पाऊण सेमी जाडीचे काप द्यावेत. चकत्या वेगळ्या करायच्या नाहीत.

अमर फोटो स्टुडिओ - युवा कलाकारांची अफलातून फँटसी

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 26/01/2017 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
अपूर्व (सुव्रत जोशी) आणि तनू (सखी गोखले) रिलेशनशिपमध्ये आहेत. तो पीएचडी साठी अमेरिकेला निघाला आहे. तनू इथेच राहणार आहे. लाँग डिस्टन्स रिलेशनशिप वर्क होत नाहीत असा तिचा विश्वास आहे. त्यामुळे अपूर्व अमेरिकेला गेल्यावर आपली रिलेशनशिप संपुष्टात येईल अशी तिची खात्री आहे. तो अमेरिकेला जाण्यापूर्वीच आपली रिलेशनशिप संपवून टाकावी असे तिने ठरविले आहे. रिलेशनशिप संपविणे त्याला मान्य नाही. त्यामुळे दोघांमध्ये किरकोळ स्वरूपाचे खटके उडत राहतात. अपूर्व अमेरिकेला जायचे या उद्देशाने उत्तेजित होण्याऐवजी नर्व्हस झालेला आहे.

मेरी दुनिया मे तुम आई, क्या क्या अपने साथ लिए

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 26/01/2017 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
एखादं गाणं मनाचा ठाव घेतं कारण त्याची शायरी, संगीत संयोजन आणि गायकांनी केलेली कमाल सगळं वातावरण भारुन टाकतं.

ती सध्या काय करते....

लेखक एक एकटा एकटाच यांनी गुरुवार, 26/01/2017 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
ती सध्या काय करते माहिती नाही पण भेटते अधून मधून.... कधी शहारते चिंब पावसात कधी वेढते रेशमी धुक्यात कधी लुकलुकते चांदणरातीत तर कधी भेटते मला.... मदहोश धुंद निशिगंधात........... ती सध्या काय करते माहिती नाही पण भेटते अधून मधून.... कधी त्याच जुन्या वळणांवर कधी तिच्या ओळखीच्या खुणांवर कधी गुलाबी सांजवेळी तर कधी भेटते मला.... दूर एकएकट्या क्षितिजावर ............ ती सध्या काय करते माहिती नाही पण भेटते अधून मधून.... कधी कुणाच्या चुकार बटांत कधी कुणाच्या खोट्या रुसव्यात कधी कुणाच्या गालावरल्या खळीत तर कधी भेटते मला....