कोरीव कलेचा करिष्मा - खजुराहो
दोन आठवड्यापूर्वीच कोल्हापूर जवळच्या खिद्रापूर गावातील कोपेश्वर नावाचे शिवमंदिर पाहण्याचा योग्य आला.कलात्मक कोरीव काम,पौराणिक कथा,असंख्य कोरलेली शिल्पे आणि खांबांवर उभारलेले प्राचीन शिवमंदिर.त्या अचंब्यातून बाहेर पडेपर्यंत पुढच्या स्थापत्य आविष्काराने साद घातली.
उत्तर मध्यप्रदेशात स्थित सतना या शहरापासून सुमारे दोन अडीच तासावर पसरलेल्या पन्ना या व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्याची संधी मिळाली.जंगलसोबतच तिथून वीस किलोमीटर वर असलेल्या छत्रपूर जिल्ह्यातील 'खजुराहो' मंदिराला भेट दिली.
मिसळपाव
धनुष्कोडीचा नयनमनोहर समुद्रसंंगम आणि रामसेतूचंं दर्शन फार प्रसिद्ध. ते अनुभवण्यासाठी दोघेजण उत्साहात रामेश्वरला बसमध्ये बसले. बस थांंबली. समोर समुद्र आणि अफाट वाळू. त्या वाळूतून शेवटपर्यंंत नेण्यासाठी खास गाड्या उभ्या होत्या. अवाजवी भाव व अडवणूक खटकल्यानं त्या गाड्यांंनी जायला अजिबात मन होईना. दुसर्या बाजूला इथेपर्यंंत येऊनही धनुष्कोडी पहाण्याचंं नीलसुंंदर स्वप्न अपुरंं रहाणंं पण रुचेना.!!
तिच्या बोलक्या चेहेर्यावर सगळंंसगळंं लिहिलेलंं होतंं.
घरात तीन हजाराच्या आसपास कॅश असेल,खरेदीसाठी राजेश, तेजसकडे उधारी करता येईल. माझ्याकडे आणि हिच्याकडे कार्डस तर आहेतच, त्यावरचे पॉईंटस बघून घ्यायला हवेत.
माझ्या मनातली आर्थिक गणिते अव्याहतपणे चालूच होती.
"डॅडा"
माझ्या छकूलीच्या आवाजाने मी एकदम भानावर आलो.
"या नोटा कॅन्सल झाल्याने किती छान झालयं ना ? "
नोटबंदीचा या छोट्याश्या मुलीवर कसा काय परिणाम झाला असेल?