शतशब्दकथा स्पर्धा २०१७: साथ
ती आमच्यातली नव्हती पण अल्पावधीतच मी तिचा झालो होतो.आमच्यातील नाते तिच्या पोटी नवा आकार घेत होते.
मायभूमीहून तीला निरोप आला कि तिची माय आजारी आहे. माईला नि मायभूमीतील अनेक सैनिकांना तिच्या कुशल हातांची गरज होती.
३० जानेवारी - विमानतळावर भरलेल्या मनाने सोडलेला हात;काहीतरी चुकतंय असे सतत सांगत होता.
ती नि मी हेच माझे विश्व होते, पण जग बदलत होते ! एका अध्यादेशाने तिचे परतीचे दोर कापले गेले होते. साथ सुटली होती.
मिसळपाव
'आज महीना होऊन गेला आमच्या भेटीला'. तिचा फोनही बंद आहे. तिच्या मर्जी शिवाय तिच्या घरी जायचे नाही अशी ताकीद आहे.
काय करावे कळत नाहीये ? मी मात्र रोज ठरल्यावेळी ईथे येतो, समुद्रकिनारी तासन तास तिची वाट बघतो.
आज अचानक ती आली! बराच वेळ काहीच बोलत न्हवती. मी फक्त तिच्याकडे बघत होतो.
मन एकदम गत आठवणीत गेल.