वर्ल्डकप क्लासिक्स - १९९९ - भारत विरुद्ध झिंबाब्वे
१९९९ चा वर्ल्डकप हा १९७५, १९७९ आणि १९८३ या पहिल्या तीन वर्ल्डकपनंतर १६ वर्षांनी इंग्लंडमध्ये झालेला चौथा वर्ल्डकप. या वर्ल्डकपचं एक वैशिष्ट्यं म्हणजे या वर्ल्डकपमधल्या काही मॅचेस इंग्लंडबरोबरच स्कॉटलंडमध्ये एडींबर्ग, वेल्समध्ये कार्डीफ, आयर्लंडमध्ये डब्लिन आणि हॉलंडमध्ये अॅम्स्टलव्हीन इथे खेळवण्यात आल्या होत्या. टेस्ट क्रिकेटचा दर्जा नसताना वर्ल्डकपमध्ये यजमानपदाची संधी मिळालेला स्कॉटलंड हा पहिला देश!
या वर्ल्डकपचं एक वैशिष्ट्यं म्हणजे या वर्ल्डकपमध्ये ग्रूप मॅचेसनंतर १९९६ च्या वर्ल्डकपप्रमाणे क्वार्टरफायनलच्या ऐवजी सुपर सिक्स ही पुढची पायरी ठरवण्यात आली होती.
मिसळपाव