मराठी भाषा दिन २०१७: आमुशा (हुबळी, शिकारपूर, मैसूर बोलीभाषा)
.
‘ना नीन्न बिडलारे’ फिलम बगासाटी तना सुरेश टाकीजमंदी जारलता. सैतानचे फिलम बगुवा मसून लई रोजने तचे मनात होते. जारले टायमात गरचे “भिशील बे” मसून मसून धांदला करून सोडले व्हते. बगिटले तर तना सा वाजताचेनाच टाकीजला जाऊन सोडनार ओता. गरचे तला मस्कीरीमदी “रात्रीचे १२ वाजताचे बरूबर ओते शो” मसून मटलेसनीच तंना हायकी मनाला लागून घून सोडून १२ ला निगाला ओता.
रात्री ते रस्त्याला गाड्या-घोडे कायबी नवते तसटी तंना चालून घेत जाताय. बगिटले तरं रस्त्यावर कोनीबी नईसारके होते. तंना घाबरून घेतंच जारलाय.
मिसळपाव