Skip to main content

भिल्ल भारत

लेखक मिडास यांनी सोमवार, 27/02/2017 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
काळाच्या कसोटीला पुरून उरणारी कलाकृती म्हणून आज महाभारताचा उल्लेख करू शकतो. मानवी स्वभावाचे अनेक ज्ञात अज्ञात कंगोरे आपल्याला महाभारतात आढळून येतात. प्रत्येक संस्कृतीने महाभारताकडे स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहिले आहे. या कॅलिडोस्कोप ने प्रत्येकाला वेगळे आकार वेगळे रंग दाखवले. असाच एक वेगळा रंग मला दिसला तो भिल्ल भारतामध्ये. हे महाभारत ज्याला रूढार्थाने आदिवासी म्हणता येईल अश्या आदिम संस्कृतीमध्ये स्वतःचा वेगळा बाज धरून उभे राहिले आहे. मुळात आदिवासी समाज हा कैक पटीने आपल्या सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या समाज पेक्षाही सुसंस्कृत आहे.

मराठी भाषा दिन २०१७: ते का करुन रायली असन बा : फुकटच दुखण (वर्‍हाडी)

लेखक मित्रहो यांनी सोमवार, 27/02/2017 06:51 या दिवशी प्रकाशित केले.
1 . ते का करुन रायली असन बा : फुकटच दुखण माया एक सोबती हाय, पवन्या. हाय आमच्या गावचंच पोरगं, पण आता पुण्याले रायते तर सोताले साहेब समजते. दहावीत पहल्यांदी नापास झालता. ते इंग्रजी गाववाल्यायले रडवतेच न जी. मंग सप्लीमेंटरीच्या टायमाले म्याच माया काकाले घेउन त्याले पेपर तपासनाऱ्या मास्तरकड घेउन गेलतो. तसं पोरगं हुशार होतं, फक्त इंग्रजीच तरास देत होती. तसबी इंग्रजी शिकून कोठ कालेजात प्रोफेसर व्हाचं होतं? आमी त्या मास्तरले बंद बराबर समजावून सांगतलं, मास्तरले बी पटलं आन झालं पोरगं पास.

मराठी भाषा दिन २०१७: सौदा (कोल्हापुरी)

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 27/02/2017 06:49 या दिवशी प्रकाशित केले.
1 वडगाव (बुद्रुक), कारखानावालं, आसलं जंक्शन नाव वडगावला कुणी दिलं, कुणाला ठावं. यष्टीच्या बोर्डावर काय ते मावत नव्हतं. तालुक्याला जाणाऱ्या शेवटच्या यष्टीनं गावकुसाबाहेर पडताना झाम्मदिशी यू टरन घेतल्याबरुबर यष्टीच्या लायटीचा उजेड नदीकडच्या उतारावरच्या देशी बारच्या दरवाजातून आत शिरला आन भिताडापशी वळीनं मांडल्याल्या बाटल्या हिरकणीसारक्या झागमाग करून गेल्या.

मराठी भाषा दिन २०१७: मगेल्या मोगाचो गांव (कारवारी कोंकणी)

लेखक यशोधरा यांनी सोमवार, 27/02/2017 06:44 या दिवशी प्रकाशित केले.
1 . मगेल्या मोगाचो गांव आमी लहान भुरगी आशिल्ली, तेंन्नाच्यान गोयंच्यो गजाली ऐकतालीं. घरात गजाली सुरु जाल्यार कित्येंय एक निमतांन गोयांबद्दल उलवणी जातालीच. गोयां याद आयली ना, अशे जाले नां! तशे कारणानं गोयां वचूचेपैलीच मगेल्या मनां(त) गोयंचे अशे एक सुंsssदर अशे चित्र उभें राविल्ले. गोयंचो निसर्ग, गोयंची मनशा, तांगेले मायेस्तपण, समुद्र, माड, फुलां, फडफडीत नुस्तें हे तर जालेंच, पुणि ह्या सगळ्या गजालींत शांतादुर्गेली याद काडली ना, अशी गजालीसुद्धा माका याद ना!

डान्सबार !!!!

लेखक वरुण मोहिते यांनी रविवार, 26/02/2017 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
बीप बीप ..पाटील आज फुल्ल करते बीप बीप ..आज आनेवाले हो ना ? "आकाश अपडेट देना में निकाल राहा हू " गाडी नंतर काढू च्यायला तो पर्यंत नेहमीच्या ठिकाणी बसू. रोजचं झालंय ह्या ऑफिस च्या ड्रायवर ला काही कळत नाही ."ठीक है चलो. पार्क करो और निकलो. "दोस्त आ राहा मै उसकी गाडी से जाऊंगा पता है ना आपको ." आप" ऋषी के गाडी से आओगे मै थोडी रुक पाऊंगा. " "हाहाहा " नेहमीसारखी लेट कारणं मंत्रालयाची ..आम्ही काय पागल बसलोय का ऋषी . १ व्हॅट ६९ और ४ माईल्ड बोलना. चला ऑर्डर दिली . ऋषी यायला १०-१५ मिनिट आहेत. आकाश ला काय काम करायचं सांगून आलोय .

(मराठी) चलतचित्रांची चलती!!?

लेखक मधुका यांनी रविवार, 26/02/2017 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
संभाषण क्र. १ "अरे, मराठी सिनेमा आलाय "हरिश्चंद्राची फॅक्टरी", येणार का?" "मराठी ... चांगला आहे ना? तिकीट किती आहे? कुठे जायचेय?" "आले असते रे, पण मला एक अमुक तमुक काम आहे .... " "मागच्या वेळी तू चांगला आहे म्हणालीस आणि अगदी रडका/आर्ट फिल्म निघाला सिनेमा!!" "अरे १२० रुपयेच आहे रे तिकीट...मराठीच तिकीट महाराष्ट्रात तरी कमीच असतं !" संभाषण क्र. २ "अरे काल २७० रुपयांचा खुर्दा रे !!! आणि साला ३ तास गेले ते अजूनच!!!" "का काय झाल?" "अरे काय सांगू यार! तो "एक था टायगर" बघितला ना.

पुणे भटकंती..............दि.21.01.2017

लेखक मॅक यांनी रविवार, 26/02/2017 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
खर तर ही भटकंती करून बरेच दिवस झाले पण वेळ मिळत नसल्यामुळे लिहायला जमल नाही. ऑफीस मधूले आमचे एक साहेब आहेत त्यांचे नाव आहे श्री.मोरे, खर पाहीले तर ते साहेबांच्यापेक्षा मित्रच जास्त वाटतात, एकदम मनमिळावू , शांत व्यक्तिमहत्व त्यांनी त्यांच्या स्व:खर्चाने आम्हाला सर्व कर्मचारी वर्गाला ही भटकंती घडवली. त्याबद्दल त्यांचे प्रथम आभार!!!!!! खर पाहीलं तर मी या भटकंतीमध्ये सहभागी होणे, अपेक्षित नव्हते कारण मी सध्या मोरे साहेबांच्या विभागामध्ये काम करत नाही, माझा विभाग वेगळा आहे.

...त्या वेळी कळले नाही

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 26/02/2017 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
त्या एक स्वराची बिजली स्पर्शून निसटती गेली..... ती मैफल मग जमलेली ती बंदिश मज सुचलेली ....मग माझी उरली नाही उघडता दार अज्ञात होऊन अनावर आत कोसळतो कुठुन प्रपात हे काय भिने रक्तात ...त्या वेळी कळले नाही ओथ॑बुन चिद्घन आला निष्पर्ण वृक्ष सळसळला डवरून फुलांनी गेला अवचित मग कळले मजला ..... मी देही असुन विदेही!!!
काव्यरस

तुझ्या ऊन्हाचं कौतुक..

लेखक प्राची अश्विनी यांनी रविवार, 26/02/2017 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या ऊन्हाचं कौतुक किती करावं करावं माप पदरी सुखाचं किती भरावं भरावं बघ तुळशीला आल्या मखमालीच्या मंजिर्या चिऊताईच्या दातांनी किती खुडावं खुडावं खिडकीच्या गजावर झुले डांगराचा वेल बोटभर आधारानं वर चढावं चढावं नंदी बसलेला दारी गळी लेणं घुंगराचं येताजाता भक्तीभावे तिथं नमावं नमावं झुल्यावर लेकरांची किलबिल चारीठाव सांज सरता सयेने पाय वळावं वळावं पुण्य कुठल्या जन्माचं आज फळुनिया आलं भरलेल्या गोकुळात दिस सरावं सरावं
काव्यरस

मराठी; समस्येची पाळंमुळं

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 26/02/2017 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
जुना, बराच चर्चिलेला विषय आहे, त्यामुळे संपादकांना वाटल्यास धागा अप्रकाशित करू शकता. मराठीदिनानिमित्त टाकावा वाटलं, म्हणून. सदर लेख लोकमत वृत्तपत्राच्या हॅलो ठाणे पुरवणीत २५-०२-२०१७ रोजी प्रकाशित झाला असून त्याची विस्तारित आवृत्ती या ब्लॉग पोस्ट मधे देत आहे. प्रकाशनाबद्दल #लोकमत चे आभार. लोकमत मधील लेख चेहरा, नाव यानंतर एखाद्या व्यक्तीची ओळख म्हणून जर कुठली तिसरी गोष्ट गणली जाऊ शकत असेल तर ती त्या व्यक्तीची भाषा असते.