Skip to main content

कातरवेळी

लेखक चांदणशेला यांनी सोमवार, 27/02/2017 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
कातरवेऴी दिसे तुझा गाव जागला पुन्हा सांज केशरी भाव डोंगराआड मालवून गेला सूर्य हऴूवार करीतो त्यास एकांत अर्ध्य नजर तुडवीत काळोख फुटला अवकाशी लाल शुक्रतारा पेटला भय असे गात्रातूनी उठले अवेऴी दैवाने पाश जखडले
काव्यरस

आज मला समजलं

लेखक अभिषेक पांचाळ यांनी सोमवार, 27/02/2017 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
आई , ओढ म्हणजे काय असत , ते आज मला समजलं आठवणीच्या डोहामध्ये , मन पुरं भिजलं तहान भूक झोप सारं , क्षणात परकं होतं अनोळखी ते मोठं घर , गिळून मला खातं मनात माझ्या उत्तरांचं , काहुर एक माजलं आई, ओढ म्हणजे काय असत , ते आज मला समजलं गर्दी असते बाजूला , पण हाकेला तो ओ नसतो दूर जाऊन उमगलं , एकटेपणा काय असतो दूर जाऊन सहवासाच्या , किंमतीचं ते बीज रुजलं आई, ओढ म्हणजे काय असत , ते आज मला समजलं आवाजाची किमया न्यारी , ओढीची ती तहान सारी शब्द ऐकता तुझे ते सारे , होते जणू जादू प्यारी आवाजातही ओढ असते , हे तुझ्याशी बोलून समजलं आई, ओढ म्हणजे काय असत , ते आज मला समजलं - अभिषेक पांचाळ , पुणे
काव्यरस

:( ?

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी सोमवार, 27/02/2017 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या रूपाने मिळाला, अस्तित्व घडवणारा एक वटवृक्ष. माझ्या पावलांना प्रकाश पुरवणारी तुझी सावली, पानापानांना जीवनरसाने ओथंबून टाकणारी मुळंही तुझीच. माझी सगळी शस्त्र इथेच परजलेली, संकटसमयी तुझ्याच ढोलीत लपवलेली. हरवलो जरी कधी तरी, स्वतःला शोधायला आलो, तुझ्याच गार सावलीत सापडत गेलो स्वतःला, दरवेळी नव्याने. पण आपल्या छोट्याशा विश्वाचा आधार असलेली तुझी मु़ळं, खोलवर जाऊ लागलीत, अनोळखी विश्वाच्या दिशेनं. माझ्यावरचा ऊनपाऊस अलगद झेलणाऱ्या तुझ्या फांद्या, आधार शोधू लागल्यात अनंताचा. जाळी होत चाललेल्या तुझ्या पानांमधुन, अंधार झिरपू लागलाय अताशा. मुक्त होत चाललीस तू, कणाकणाने, क्षणाक्षणाने. पण... तु

पुस्तकांविषयी सर्वकाही...

लेखक मोदक यांनी सोमवार, 27/02/2017 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर्स.. सर्वप्रथम जागतीक मराठी दिनाच्या भरपूर शुभेच्छा..!! आपल्यापैकी बहुतांश लोक पुस्तकप्रेमी आहेत आणि सतत कांहीना कांही वाचत असतात. आपल्यापैकी अनेक दिग्गजांना पुस्तकांविषयी भरपूर गोष्टी माहिती असतात आणि अनेक वैविध्यपूर्ण माहिती / अनुभवही असतात.

अंजलीची गोष्ट - तिघी (कथा)

लेखक aanandinee यांनी सोमवार, 27/02/2017 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
"आई, मोहना आणि शालिनी बरेच दिवस म्हणतायत भेटूया म्हणून. या शनिवारी जाऊन येऊ? तू रियाला बघशील?" अंजलीने आईला विचारलं. आई होच म्हणणार आहे हे माहीत असलं तरीही रियाची जबाबदारी आजीवर टाकण्याआधी अंजली नेहेमी आजीची परवानगी घेत असे. आजीची आणि रियाचीसुद्धा! शनिवारी लंचला त्या तिघींच्या ठरलेल्या सीफेस रेस्टाॅरंटमधे भेटायचा प्लॅन ठरला. हे रेस्टाॅरंट तसं थोडं लांबच पडायचं पण शांत, निवांत माहौल आणि खिडकीतून दिसणारा समुद्र ..... त्यामुळे तिघीनांही तिथे भेटायला आवडायचं. ड्राईव्ह करताना अंजली आठवू लागली. मेडिकल कॉलेज मधे सुरु झालेल्या या मैत्रीला आता तब्बल पंधरा वर्ष झाली होती.

मराठी भाषा दिन २०१७: चव नै न ढंव नै सोंगाडी (अहिराणी भाषा)

लेखक आर्या१२३ यांनी सोमवार, 27/02/2017 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
1 . चव नै न ढंव नै सोंगाडी . शहादा ना जोडे डांबरखेडा गाव शे! गावना पोरे शिकीसन शेरगावमा नोकरीले लागी ग्यात आणि आठे गाव सुधरनं! तापीनं पानी येयेल व्हतं. पह्यले ऱ्हायेत तशी मातीनी घरे, कुडाना भिंती जाईसन पक्की घरे, धुयमिट्टीनी वाट जाईसन पक्की डांबरी सडक व्हयेल व्हती. मोबाईल, एल सी डी टीव्ही, लेप्टाप का काय म्हंतस ते बी पोचेल व्हतं. एक दोन मोबाईल कंपन्यासनी टावर बी बांधेल व्हते गावना भायेर वावरमां. पन तरीबी चौधरीन धल्लीना वट होता गावमां! बठ्ठा लोके वचकीसन ऱ्हायेत.म्हतारी धिप्पाड.

वर्ल्डकप क्लासिक्स - २००3 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 27/02/2017 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
२ मार्च २००३ सेंट जॉर्जेस पार्क, पोर्ट एलिझाबेथ ईस्टर्न केप प्रांतातल्या पोर्ट एलिझाबेथच्या सेंट जॉर्जेस पार्कच्या मैदानावर पारंपारिक अ‍ॅशेस प्रतिस्पर्धी असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पूल ए मधली मॅच खेळली जाणार होती. ग्रूपमधल्या पहिल्या पाचही मॅचेस जिंकून ऑस्ट्रेलिया आधीच सुपर सिक्समध्ये धडकली होती त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने या मॅचला फारसं महत्वं नव्हतं, पण We want to win everything या वृत्तीने वर्ल्डकपमध्ये उतरलेल्या स्टीव्ह वॉला एकही मॅच गमावणं आणि ते देखिल इंग्लंडसारख्या कट्टर प्रतिस्पर्ध्याविरुद्ध हे कधीही मंजूर होणं शक्यं नव्हतं.

मराठी भाषा दिन २०१७: इचारं (हुबळी, शिकारपूर, मैसूर बोलीभाषा)

लेखक सचिन७३८ यांनी सोमवार, 27/02/2017 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
1 . ‘अप्पण्णम्मा, टप्पण्णम्मा’ धाकटा इशालं तंचे आतीसोबत खेळरलते. आतीबी इशालबरूबर खेळतानी धाकटी व्हलरती. बाजूकडे थोरला दर्शनं भोरा-दोरी घिउनं फिरूवाचेले कोसिस करलेयताय. जरागडी कोसिसं करूनं तंला हायकी भोरा फिरवालाचं ईनसारके हून बसले. मागूटने तंना की मोट्याने हाका माराला सुरू करूनगून सोडला. ‘ए आती, भोरा फिरचना गा’ मसून. आती तला मटली, ‘खेळाला आले नई तर ठून येजा, जरागडी उगीच बसा आता’. दर्शनं बोलला, ‘नम्मे, तू फिरवाचे सांग मन्ना, अनि कसी फिरतेते भोरा’. आती बोलली, ‘नई बा, तुमी लोके सकाळे सात घंटेचेने खेळरालात.

मराठी भाषा दिन २०१७: सुतंत्रम् (तंजावर मराठी)

लेखक दक्षिणी मराठी यांनी सोमवार, 27/02/2017 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
1 . काल चिम्मी कोंतकी एक पुस्तक वांचत बसलोती. मध्ये मजंकडे, “बाप्पा, ब्रिटीश लोकं अत्तापणीं हायेंत का ?” मणूँ विचारली. “ऑफ़कोर्स, हायेंत की. अस्का विचारलीस?” “नाई, 1947 मध्ये अमाला सुतंत्रम् मिळ्लं तम्माच अमी तेनास अग्गिदनांसींइनं मारूँटाकलं असंल की मणूँ मला वाटलं...” तिज ते निरागस प्रश्न योच्ना करूँ मला हांसू आलं. “गाँधी जन्म देल्ते अहिंसाचं देशांत असंपणीं एक गडबड का ?” असं विचार केलों. तजनंतरं मला सुचलं, असल्ते प्रश्न विचाराला चिम्मी येऊँ एक ल्हाँ पोरी नहो म्हणून...