Ingmar Bergman चे चित्रपट भाग-१
तर झालेले असे आहे की, एलिजाबेथ व्होगलर ही एक नाटकात काम करणारी अभिनेत्री आहे. एका प्रयोगादरम्यान ती अचानकच संवाद थांबवुन गप्प झालेली आहे. काही मिनिटात पुन्हा भानावर येते, नाटक पुर्ण करते. त्या दिवसानंतर मात्र तीने पुर्णपणे मौन धरलेले आहे. तिच्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्यांतुन याचे काहीही निदान झालेले नाही, ती पुर्णपणे नॉर्मल आहे पण एकदम गप्प ती गप्पच.( चाफ़ा बोलेना चाफ़ा चालेना सारखी अवस्था ) तिची डॉक्टर सल्ला देते की चेंज म्हणून तु काही दिवस माझ्या समुद्रकिनारी असलेल्या कॉटेज वर जाऊन राहुन ये. तिला सोबत म्हणून एका तरुण नर्स सिस्टर "अल्मा" ला तिच्या बरोबर पाठवते.
मिसळपाव