दोघी ( कथा ) ( काल्पनीक )
दोघी ( कथा ) ( काल्पनीक )
चिनु आज खुप खुशीत होती . बरेच दिवसांनंतर ती आपल्या आईबरोबर समुद्र किनारी फिरायला आली होती . संध्याकाळच्या गार हवेत समोरुन येणा-या लाटांचे थेंब अंगावर झेलण्यात दोघींनाही मजा येत होती . समुद्र किनारी फारशी गर्दी नव्हती . त्यामुळे मधेच लहर आली म्हणुन चिनु एखाद्या स्वच्छंद हरणासारखी काठावरच्या वाळुत इकडुन तिकडे धावु लागली . तिच्या मागे पळताना , तिला आवरताना आईची मात्र दमछाक होउ लागली .
"चिनु ...थांब .. किती पळतेस?.. जरा हळु... पडशील कुठे तरी .. " आई काळजीने म्हणाली . तेव्हा कुठे चिनु थांबली .
मिसळपाव