युरोपच्या डोंगरवाटा २: प्लीट्विच्का जेझेरा (Plitvice Lakes) उर्वरित भाग
युरोपच्या डोंगरवाटा १: प्लीट्विच्का जेझेरा (Plitvice Lakes) भाग १
अप्पर लेक्सचा निरोप घ्यावासा वाटत नव्हता, पण जाणं भाग होतं. Lower Lakes were calling...
बोटीच्या धक्क्याशी आलो तर पुढची बोट निघणारच होती. पार्कमध्ये प्रवेश करून साडेतीन तास होत आले होते. एकदाच पाच मिनिटं बसून विश्रांती घेतली होती आणि झाग्रेबच्या बाजारात घेतलेले सुके अंजीर खाल्ले होते. आता पाय थकले होते आणि भूकही लागली होती. पोटपूजेची सोय 'उस पार'च होणार होती. तोपर्यंत निवांत बसलो.