महाराष्ट्र दिन २०१७ : चारोळी स्पर्धा

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in गटसाहित्य
25 Apr 2017 - 7:36 pm

जुन्या चावडीत चर्चा केल्याप्रमाणे धाग्याचा Final Draft इथे देतोय. धागा कधी टाकावा याविषयी आपले मत कळवा.

आगमन, निर्गमन पुनरागमन (भाग ४)

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
25 Apr 2017 - 6:54 pm

माझ्या आयुष्यात कन्नड साहित्य उशीरा आले. तोपर्यंत मराठी साहित्याने माझ्या मनावर गरूड केले होते. (इथे साहित्य हा शब्द मी कथा आणि कादंबरी इतक्या मर्यादित अर्थानेच वापरला आहे. त्यात वैचारिक लेखन गृहीत धरलेले नाही.) पण उशीरा येऊनसुद्धा एक मात्र स्पष्ट जाणवले की मी वाचलेले कन्नड साहित्य मी वाचलेल्या मराठी साहित्यापेक्षा खूप वेगळे आहे. बहुतांश मराठी कादंबऱ्या मला व्यक्ती आणि निसर्ग किंवा व्यक्ती आणि व्यक्ती किंवा व्यक्ती आणि त्याचा समाज यांच्यापैकी कुठल्यातरी एकाच नातेसंबंधांवर भाष्य करणाऱ्या वाटल्या.

संस्कृतीआस्वाद

सुगंध

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
25 Apr 2017 - 5:00 pm

या ओंजळीतून
त्या ओंजळीत
फुले सहज
निघून जातात...

उरल्या सुगंधाचे
अत्तर
फुलांच्या आठवणीत
दरवळत राहते!

-शिवकन्या

कविता माझीकविता

पान

Anonymous's picture
Anonymous in जनातलं, मनातलं
25 Apr 2017 - 4:07 pm

पान म्हणालं की कलकत्ता सादा आठवतं, मग मसाला मग मगई... त्यापलीकडे कधी मजल गेली नाही! पण ह्या पाना आधी एक महत्वाचं पान म्हणजे आपलं... केळीचं पान!

आठवतं का केळीचं पान, आता त्यावर जेवण मिळवणे म्हणजे जरा "नशीब वान आहेस लेका!" वगैरे म्हणावं लागतं! पारंपरिक गोष्टींचा रितिरिवाजांचा जसा ऱ्हास होत चाललाय, तसाच ह्या पानांवर जेवण केरण्याचा ही, बरोबर आहे म्हणा! आता जागा नसते ना, जिथे जागा असते तिथे भलत्याच गोष्टींनी जागा घेतलेली आहे आज काल! असो...

मांडणीप्रकटन

चुकणारी आई

aanandinee's picture
aanandinee in जनातलं, मनातलं
25 Apr 2017 - 1:30 pm

"तुम्ही दोघांनी जर पटपट खाल्लं तरच पार्कमधे जायचंय, नाहीतर नाही" तिने नेहेमीप्रमाणे मुलांनी लवकर खावं म्हणून सांगितलं. आर्यन आणि विहान वय वर्ष पाच आणि तीन, दोघांनी आईची धमकी कितपत गंभीर आहे याचा अंदाज घेतला. आर्यनने पहिला घास तोंडात टाकला आणि "आय डोन्ट लाईक डोसा" म्हणून तोंड वाकडं केलं. विहानने तर भरवलेला घास तोंडातून फू फू करून बाहेर काढला. "त्यांना नकोय तर जाऊदे ना कॉर्नफ्लेक्स खाऊ दे त्यांना" नवर्याचा एक्स्पर्ट ओपिनियन! तोही मुलांसमोरच! तिला सुचेना की आता आधी मुलांना ओरडावं की नवर्यावर चिडावं ! "आपल्या पोटातल्या गुड बॅक्टरीयासाठी आंबवलेले पदार्थ चांगले असतात.

वाङ्मयकथालेखविरंगुळा

साहित्य संपादक चावडीत स्वागत आहे

नीलकांत's picture
नीलकांत in गटसाहित्य
24 Apr 2017 - 11:55 pm

नमस्कार,

साहित्य संपादकांच्या नवीन चावडीत आपले सर्वांचे स्वागत आहे. या नवीन जागेवर आपल्याला साहित्य संपादनाविषयी सर्व विषयांवर चर्चा करता येईल. तसेच हे बंदिस्त दालन असल्यामुळे येथे चर्चा करू शकता.

आपल्या या नवीन जागेवर पहिल्या पानावर हिरव्या रंगाच्या बटनाद्वारे लेख जोडू शकता. मेंबर्स नावाच्या बटनावर या दालनातील सदस्यं दिसतील. आणि सर्वात शेवटी या दालनातील लेखन दिसेल.

मिपा पुढच्या टप्प्यावर जाण्याची सुरूवात करण्यासाठी चावडीचे स्वरूप बदलणे आवश्यक होते. तुम्हाला या नवीन सोयीबाबत काय मत आहे ते कळवा.

- नीलकांत

ये, दिग्बन्ध तोडून ये,

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
24 Apr 2017 - 9:57 pm

ये, दिग्बन्ध तोडून ये, आजच्या कविते
ओसन्डत, फुफा॑डत, अनावर ये
भारून टाक अवघ्या अस्तित्वाचे अवकाश
कडाड कोसळ या अस्थिमज्जेच्या पि॑जर्यावर
एक एक अणू व्यापून टाक जाणिवेचा-तुझे देणे चुकेपर्य्॑त
घे आधार तोकड्या अक्षरा॑चा - या कागदावर उमटण्याआधी

एकच क्षण था॑ब,
कालच्या
कवितेच्या
कलेवरावर
कफन घालून येतो

मुक्त कविताकविता

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ३)

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
24 Apr 2017 - 7:15 pm

भारतीपूरच्या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी असते मंजुनाथाचे मंदिर. हा मंजुनाथ भारतीपूरच्या पंचक्रोशीत आपली सत्ता गाजवत असतो. त्यासाठी त्याचा सहाय्यक असतो भूतराया नावाचा देव. तो अंगात येतो आणि लोकांवर वचक ठेवतो. मंजुनाथ सर्वशक्तिमान पण निष्क्रिय असतो तर भूतराया सेवक पण क्रियाशील असतो. या भूतरायाची कीर्ती इतकी मोठी की प्रत्यक्ष राष्ट्रपती त्याच्या दर्शनाला येऊन जातात आणि प्रसाद म्हणून कपाळभर कुंकू माखून घेतात. भूतरायाचा प्रभाव एव्हढा मोठा की भारतीपूरमध्ये कोणीही आपले वाद विवाद कोर्टात घेऊन जात नाही. सगळे वादविवाद भूतरायच्या मर्जीने सुटतात.

संस्कृतीआस्वाद

प्रिय सचिन

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
24 Apr 2017 - 2:07 pm

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रे सचिन...!!

आजकाल तुझ्याविषयी बोलणं..लिहिणं...इतकंच काय तुला टीव्हीवर बघणंही सोडून दिलंय मी..
का म्हणजे काय??
त्रास होतो रे..खरंच खूप त्रास होतो...

आज तुझा वाढदिवस आहे...म्हटलं बघूया, जमतंय का काही लिहायला..
लिहायला लागतंच काय रे?? तुझ्या एकेका फटक्यावर लेख लिहिता येतील..अजूनही लिहितात ना लोकं..सुरेख लिहितात...
पण कसंय..तुझ्यावर लिहायचं म्हणजे परत भूतकाळात जायचं..त्या आठवणीत रमायचं..आणि आत्ता तू मैदानावर नाहीस हे लक्षात आलं की भर्रकन वर्तमानात यायचं..
त्रास होतो रे..खरंच खूप त्रास होतो...

मुक्तकप्रकटन

अता ही भेट टळणे शक्य आहे ..

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
24 Apr 2017 - 12:32 pm

अता ही भेट टळणे शक्य आहे
(तुझे मजला वगळणे शक्य आहे)

जरासा जोर लावावास अजुनी
पहा माझे निखळणे शक्य आहे

नको इतकी मुजोरी आरशावर
तुझेही रुप ढळणे शक्य आहे

असे येऊ नये वेळीअवेळी
(कुणी काही बरळणे शक्य आहे)

जरा जपूनीच ये ग्रीष्मात इथल्या
तुझी काया वितळणे शक्य आहे

तुला पाहून येथे एकटीला
फुलांचे बावचळणे शक्य आहे

डॉ. सुनील अहिरराव

gajhalgazalहे ठिकाणकवितागझल