ताज्या घडामोडी - ऑगस्ट २०२२ (भाग ४)

मदनबाण's picture
मदनबाण in काथ्याकूट
21 Aug 2022 - 9:01 pm
गाभा: 

आधीच्या धाग्याचे २००+ प्रतिसाद झाल्याने हा धागा उघडला आहे.
कॉपीवुड ची लोकांनी व्यवस्थित ठासणे सुरु केले आहे, चड्डी सिंग सुपर डुपर फ्लॉप झाल्याचा मला विशेष आनंद झाला आहे. :) जे जे माज करतात त्यांची ठासणे हे सध्या पाहण्यात येत आहे.एक महाफ्लॉप व्यक्तीने [ त्याला अभिनेता म्हणणे इतपत देखील त्याची पत नाही ] लोकांना चक्क धमकावायचा प्रयत्न केला. याच बरोबर दोबारा ला पहिल्या बारीतच घरी पाठवले. या पुढे बॉयकॉट कसे होईल ? तसे करण्यास यश मिळेल का ? याची उत्तरे येत्या काळातच मिळेलच.

जाता जाता :- मैने कहा था न, एक दिन मैं हसूंगा तुम रोओगे. :- इति चतुर रामलिंगम :)))

मदनबाण.....

प्रतिक्रिया

चौकस२१२'s picture

30 Aug 2022 - 6:09 am | चौकस२१२

अंदाज
१) शिवसेना पूर्ण अशी नेस्तनाबूत होणार नाही कारण काहीतरी जनाधार आहे
आणि ठाकरे ( उद्धव ) असे सहजा सहजी पक्ष देऊन टाकणार नाहीत
असा "कुटुंबाची मालकि असलेला पक्ष कोणी देऊन टाकलेला आत्तापर्यंत घडलाय का ?

२) २.५ वर्षाने शिंदे गटाला वेगळा पक्ष तरी काढावा लागेल किंवा भाजपात शिरावे लागेल
त्या निवडणुकीत वेगळा पक्ष काढला तर संमिश्र यश मिळेल सर्व ४० निवडून येणे कठीण वाटत्ते
म्हणजे सेनेचे २ भाग होतील पण उद्धव ( मूळ सेने ) जास्त जग मिळतील
भाजपात शिरले तर ४० तिकिटे मिळतील का? काही गळतील

३) राज ठाकरे यांनीही खरे तर शिंदे गटाला सामावून घ्यायला पाहिजे होते आणि बाळासाहेबांसाऱखे रिमोट ने चालवले असते ... तर !
पण खमक्या फडणवीस आणि त्यापमागचे पक्ष बळ/ यंत्र असल्यामुळे राज ची डाळ शिजली नसावी किंवा जेवहा शिंदेंना गरज होती तेव्हा राज् फारसे काही करू शकले नसावेत ( ते स्वतःपण तेवहा आजारी होते बहुतेक?)

४) याचा फायदा जास्त करून पवारांनांच होणार हे दिसतंय ( दुर्दैवाने )

शाम भागवत's picture

30 Aug 2022 - 8:42 am | शाम भागवत

४) याचा फायदा जास्त करून पवारांनांच होणार हे दिसतंय ( दुर्दैवाने )

असहमत.
१) मला वाटते २०१४ सालानंतर भाजपा हा ३५% मतदान टक्केवारी ओलांडण्याचा प्रयत्न करतोय. इतर पक्षांतून नेत फोडणे एवढेच त्यावेळेस भाजपा करू शकत होता व ते भाजपाने जेवढे जमेल तेवढे केलेलेही आहे. त्याबद्दल भरपूर शिव्याही खाऊन झाल्या आहेत. पण आहे ते टिकवणे व जमल्यास मोठे होणे यासाठी भाजपा तेवढेच करू शकत होता. पाच पक्षातील राठा यांनी हिदूत्वविरोधी लोकांकडे जाऊन स्वतःला संपवून घेतले होते. उरलेल्या चार पक्षातील एक पक्ष संपवून मोठे होणे हा एक पर्याय होता. त्यासाठी २०१९ साली राष्ट्रवादीची माणसे फोडून राष्ट्रवादी संपविण्याचा प्रयत्न केला गेलेला होता. पण शिवसेनाच राष्ट्रवादीबरोबर साटेलोटे करत असल्याने तो प्रयत्न फसला.
२) मतदान टक्केवारीनुसार, हिंदूत्वाच्या चढता आलेखाकडे लक्ष न देता, शिवसेनेने केलेली आत्महत्या ही भाजपाला ३५% मतदानाच्या पुढे नेऊन बसवणार आहे. चार पैकी एक पक्ष संपवायचे भाजपाचे मनसुबे आयते सफल झालेले आहेत. प्रथम राष्ट्रवादी की शिवसेना संपवायची हे निश्चीत करता येत नसल्यामुळे, भाजपा हा नेहमी शिवसेना व राष्ट्रवादी यांचेशी फारसे वाकड्यात शिरत नसे. वेळेस पड घेत असे. आता ती परिस्थिती राहिलेली नाही.
३) शिवसेनेशी साम व दाम हे दोन प्रयोग करून झाले होते. "साम" हा प्रयोग बाळासाहेब असे पर्यंत यशस्वी होत होता. पण नंतर शिवसेनेची वाढती भूक शमविण्यासाठी "दाम" याचा उपयोग केला. त्यासाठी ८२ नगरसेवक असूनही मुंबई महानगरपालिका शिवसेनेला आंदण दिली गेली. मात्र मविआ स्थापने नंतर नाईलाजाने इडी मार्फत "दंड" व शिंदेगटामार्फत "भेद" यांचा उपयोग सुरू झाला.
३) शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे फडणवीस यांचेकडे सत्ता राहील, पण ते मुख्यमंत्री नसल्याने त्यांना ब्राह्मण असल्याचा त्रास होणार नाही. तसेच अंतर्गत विरोधाचा त्रास होणार नाही. मराठा लॉबी सुध्दा थेट हल्ला करू शकणार नाही. मनातले मुख्यमंत्री मनातली नाराजी व्यक्त कशी करायची याच्या विवंचनेत असतील. त्यामुळे या अडीच वर्षात फडणवीस त्यांच्या कार्यक्षमतेची कमाल मर्यादा गाठू शकतील असे वाटते.
४) राष्टवादीवर आता फारसे अवलंबून रहावयाची गरज नसल्याने यापुढच्या अडीच वर्षात राष्ट्रवादी संपविण्याच्या दृष्टीने मोदी शहांनी जोरकस प्रयत्न केले तर आश्चर्य वाटू नये. आत्तापर्यंत राष्ट्रवादीवर टीका करूनही प्रत्यक्ष त्यांचेवर कोणतीच कारवाई केली गेलेली नाही. तसेच त्यांची लोकं भाजपात आणण्यामुळे पक्षाची प्रतीमा मलीनच झालेली आहे असे अनेक भाजपा प्रेमींना वाटते. मला वाटते २०१४ ते २०१९ पर्यंत हे जे काही केले गेले. त्यावर पडदा टाकण्यासाठी किंवा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राष्ट्रवादीने केलेला भ्रष्टाचार खणून काढणे एवढेच भाजपाच्या हातात आहे. असे केल्यास भाजपापासून दुरावलेली मते परत भाजपाकडे येऊ शकतील. यासाठी आवश्यक तो अभ्यास शहा यांनी सहकार मंत्री म्हणून गेल्या अडीच वर्षात केलेला असावा. तसेच पुढे मागे पीडीपीशी केलेले सख्य व राष्ट्रवादीशी केलेले सख्य हे कसे एकाच साच्यातील आहे हे ही सांगता येऊ शकेल.
५) फक्त यासाठी अनुकूल काळ आला आहे की नाही याची निश्चीती करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या निवडणूकांपर्यंत भाजपा थांबेल असे वाटते. त्या निवडणुकांत यश मिळाल्यास, शिल्लक शिवसेना अस्तंगत होत जाणार याची खात्री पटून, राष्ट्रवादीच्या मागे सहकाराच्या माध्यमातून ससेमीरा सुरू होईल. राष्ट्रवादी संपवून जनाधार आणखी वाढवत नेणे हा यापुढचा टप्पा आखलेला असणार.

शेवटी हे सगळे एका सामान्य माणसाचे अंदाज आहेत.
🤣
फडणवीस हा शब्द आलेला असल्याने एक तरी प्रतिसाद नक्कीच येणार. पण आता ती संख्या दोन झालेली असावी.
🤣🤣

फडणवीस हा शब्द आलेला असल्याने एक तरी प्रतिसाद नक्कीच येणार. पण आता ती संख्या दोन झालेली असावी.

.. मान्य

:) :) खासकरून 'श्रीगुरुजी' .. मला तर कधीतरी वाटत.. 'श्रीगुरुजी' म्हणजे भाजपातले फडणवीस विरोधक असावेत , एकही सन्धी सोडत नाहित त्यान्च्या विरुद्ध लिहिण्याची :)

सुरिया's picture

30 Aug 2022 - 11:22 am | सुरिया

शेवटी हे सगळे एका सामान्य माणसाचे अंदाज आहेत.

अंहं..
हे सगळे एका सामान्य कोथरुडी पेन्शनराचे बाल्कनीतल्या बाल्कनीत केलेले स्वप्नरंजन आहे. बघा जरा तीन चार एफड्या मॅच्यर झाल्या असतील. सोसायटीतला गणपती आणण्ण्याची घाई असेल. संस्कृतीरक्षणाची संघी...सॉरी, संधी सोडू नका.

शाम भागवत's picture

30 Aug 2022 - 11:54 am | शाम भागवत

😀
बघा जरा तीन चार एफड्या मॅच्यर झाल्या असतील.
नाही हो. माझी एकही एफडी नाही.

सोसायटीतला गणपती आणण्ण्याची घाई असेल.
नाही हो. गेली कित्येक दशके सोसायटीतल्या गणपतीचे दर्शन घेतलेले नाही.

संस्कृतीरक्षणाची संघी...
हे काय असते?
जरा तपशीलात लिहा ना.
😀

नाही हो. गेली कित्येक दशके सोसायटीतल्या गणपतीचे दर्शन घेतलेले नाही.

वर्गणी देता का? वर्गणी देत असाल तर दर्शन घ्यावेच असे नाही. वर्गणी देणे जास्त महत्वाचे आहे?

शाम भागवत's picture

30 Aug 2022 - 12:09 pm | शाम भागवत

मागायला कोणी आलं तर देतो?

संपादक मंडळ,
ही प्रश्नोत्तरे वैयक्तिक होत असतील तर त्यांचे संपादन केल्यास माझी हरकत नाही.
प्रश्न शुध्द हेतूने विचारले आहेत असे गृहित धरून मी उत्तरे देत आहे.
असो.
:)

सुरिया's picture

30 Aug 2022 - 12:06 pm | सुरिया

काका गोड बोलतात
काका गोड वागतात
काका गोड चुकांचे तपशील पण सॉरी लिहिलेले न वाचता गोडपणे मागतात.
.
.

देऊ हं संधींचे तपशील. हे मंडळाचे ऑडीट संपले की. ;)

शाम भागवत's picture

30 Aug 2022 - 12:07 pm | शाम भागवत

फारसं कळलं नाही.
:)

श्रीगुरुजी's picture

30 Aug 2022 - 12:50 pm | श्रीगुरुजी

सविस्तर लिहिता येईल. परंतु दोनच शब्दात सारांश सांगतो.

भोळसट स्वप्नरंजन !

शाम भागवत's picture

30 Aug 2022 - 12:52 pm | शाम भागवत

:)

नाही झाला पवारांना फायदा तर चांगलेच आहे पण मनात भीतीची पाल चुकचुकते ती अशी म्हणून म्हणले
जातीयवादी पक्षाचे आणि घराणेशाही चा ऱ्हास व्हायला उपयोग होईल

असो सध्या पण काँग्रेस मधील लुटुपुटुची "अध्यक्ष्य कोण होणार" या खेळाकडे कान आणि डोळे लावून बसलो आहे

शाम भागवत's picture

30 Aug 2022 - 12:07 pm | शाम भागवत

संपादक मंडळ,
माझी एफडी, आमच्या सोसायटीतील गणपती, माझे संस्कृतीरक्षण वगैरे गोष्टी या वैयक्तिक होत असतील व धाग्याशी अजिबात संबंधीत नसतील, तर दोन्ही प्रतिसाद उडवल्यास माझी हरकत नाही.
मी मात्र मला केलेली सुचवणी शुध्द हेतूने केलेली आहे असे समजून, प्रामाणिकपणे व खराखुरा प्रतिसाद दिलेला आहे हे नमूद करत आहे.
असो.
:)

तरी त्यांनी ज्येष्ठांसाठी मुदत ठेवीवर अधिक व्याज दर असतो याचा उल्लेख केलेला नाही ;)

सुरिया's picture

30 Aug 2022 - 12:33 pm | सुरिया

अशामुळेच कुट्ठं कुठ्ठं म्हणून न्यायच्या लायकीचे नाहीत असे रामदासकाकांना की काका कुणालातरी , कोणतरी म्हणतं म्हणे ब्वा.
अशाच गोष्टीमुळे उगी बाल्कनीचा अंदाज हो... बाकी काही नाही.

सतिश गावडे's picture

30 Aug 2022 - 12:38 pm | सतिश गावडे

हो, तुमच्याकडून राहून गेलं ते :)

शरद पवारांपश्चात राष्ट्रवादीचे भवितव्य काय असेल ? महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा काय असेल ? या विषयावर श्रीगुरुजी आणि इतर अभ्यासू मिपाकरांचे मत /भाकित वाचायला आवडेल.. या विषयावर पुर्वी कधी चर्चा झाली आहे का ?

सर टोबी's picture

30 Aug 2022 - 5:09 pm | सर टोबी

राष्ट्रवादीचे भवितव्य महाराष्ट्रापुरते तरी चांगले असेल असे वाटते. जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे नेते स्थानिक पातळीवर खूपच बलदंड आहेत. काँग्रेसच्या नेत्यांना, खासकरून बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण मंडळींनी काँग्रेस सोडायची असे भविष्यात ठरवले तर त्यांच्यासाठी राष्ट्रवादी हा चांगला पर्याय आहे.

तर्कवादी's picture

30 Aug 2022 - 5:47 pm | तर्कवादी

राष्ट्रवादीचे भवितव्य महाराष्ट्रापुरते तरी चांगले असेल असे वाटते. जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे नेते स्थानिक पातळीवर खूपच बलदंड आहेत.

राष्ट्रवादीकडे बलदंड नेते आहेत हे मान्य आणि राष्ट्रवादीतून सहस कुणी बंडही केले नसावे.
पण शरद पवारांपश्चात पक्षाची दिशा काय असावी, कुणाशी युती करावी ई प्रश्नावर गटतट पडू शकतात. शरद पवारांचा उत्तराधिकारी नेमका कोण - अजित पवार की सुप्रिया सुळे ? पक्षाचे सर्व निर्णय कोण घेणार ?

श्रीगुरुजी's picture

30 Aug 2022 - 6:52 pm | श्रीगुरुजी

आगामी काळात कॉंग्रेस व शिवसेना यांना स्वबळावर शून्य भवितव्य आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष राष्ट्रवादीला धरून ठेवणार. पवार असेपर्यंत राष्ट्रवादी या दोनपैकी एकाशी ( बहुतेक कॉंग्रेसशीच) युती करेल.

पवारांच्या पश्चात अजित पवार व सुळे असे दोन गट पडतील. यापैकी अजित पवार गटात कॉंग्रेसचे बरेच नेते जातील. सुळेंबरोबर आव्हाडसारखे काही एकनिष्ठ राहतील. अनेकवेळा उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत व पवारांच्या हयातीत आपण मुख्यमंत्री होणार नाही हे त्यांना माहिती आहे.

एकंदरीत परिस्थिती ओळखून राज ठाकरे भाजपबरोबर जाण्यास अत्यंत उत्सुक आहेत आहेत. परंतु मनसेबरोबर युती करण्याचा अश्वप्रमाद भाजपने केल्यास भाजप पुन्हा जोरात तोंडावर आपटेल. सदाभाऊ खोतांची शेतकरी संघटना, रासप, रिपब्लिकन आठवले गट, कै. विनायक मेटेंचा छोटा पक्ष यांच्याबरोबर भाजपची युती आहे. यातील कोणत्याही पक्षाचा मताधार १ टक्यापेक्षा कमी आहे व भाजप त्यांना एकत्रित १८ जागा देतो. मनसेचाही मताधार १ टक्क्यापेक्षा कमी आहे. परंतु राज ठाकरे ५०-६० पेक्षा कमी जागांवर ऐकणार नाहीत. मनसेला जास्तीत जास्त ७-८ जागा द्याव्या. शिंदे गटाला ६०पेक्षा जास्त जागा देऊ नये. इतर पक्षांना जास्तीत जास्त १८ जागा द्याव्या. उर्वरीत २०० जागा भाजपने लढाव्या. अन्यथा पुन्हा एकदा वाढपी ताटापाशी आल्यावर ताटातील पुरणपोळ्या व भांड्यातील साजूक तूप संपलेले आढळेल. .

तर्कवादी's picture

30 Aug 2022 - 10:33 pm | तर्कवादी

धन्यवाद श्रीगुरुजी

अनेकवेळा उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत व पवारांच्या हयातीत आपण मुख्यमंत्री होणार नाही हे त्यांना माहिती आहे

खरंच हे मला कळत नाही.. शरद पवारांना अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असे का वाटत नसावे. बरं राष्ट्रवादीचाच दुसर्‍या कोणत्या नेत्याचं नाव ते मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करतात असंही नाही. मग राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपदच नको असं शरद पवारांना का वाटत असावं ?

एक शक्यता
शरद पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी फुटून एक गट शिवसेनेसोबत तर एक गट भाजपसोबत असेही होवू शकेल कदाचित

अवांतर :

अश्वप्रमाद

हा हा ..मिपाला नवीन शब्द मिळाला.. छान !!

असं वाटत नाही. एकूणच काँगेसची संस्कृती हा मिपावर हेटाळणीचा विषय असल्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही. परंतु जर अजित पवारांना वैयक्तिक महत्वाकांक्षा असती आणि त्यांनी ठरवलं असतं तर २०२० मध्येच आत्तासारखा कठीण कायदेशीर पेचप्रसंग ते निर्माण करू शकले असते. केवळ सरकार स्थापण्याची प्रक्रिया गतिमान करा हा संदेश त्यांना द्यायचा होता आणि तो त्यांनी बरोबर पोहोचविला.

त्या त्या पक्षांनी आपापला पाठबळ गट जोपासलेला आहे तो अचानक नाहीसा होत/होणार नाही.
पण गुहेमध्ये सिंहांची भरती करून काय होणार?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tim Tim Timbali - Ravindra Sathe & Anupama Deshpande (Paravtichya Bala)