ताज्या घडामोडी मे २०२२(भाग २)

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in राजकारण
16 May 2022 - 9:49 am

आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.

काल (१५ मे २०२२ रोजी) त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते माणिक साहा यांनी शपथ घेतली.

मार्च २०१८ मध्ये झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने राज्यात २५ वर्षे सलग सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीचा पराभव केला आणि बिप्लब देब यांना मुख्यमंत्री केले गेले. सुरवातीचा महिना-दीड महिना मुख्यमंत्री झाल्याचं वारं या गृहस्थांच्या अंगात इतकं शिरलं होतं की ते विनाकारण बाष्कळ आणि अनावश्यक बडबड करत सुटले. महाभारत काळात इंटरनेट होतं ही त्या मानाने बरीच निरूपद्रवी बडबड होती. सगळ्यात आक्षेपार्ह बडबड होती १९९७ मधील विश्वसुंदरी डायना हेडन विषयी. बिप्लब देब यांनी म्हटले होते- डायना हेडनचे सौंदर्य ऐश्वर्या रायप्रमाणे 'भारतीय सौंदर्य' नाही. त्यानंतर मोदी-शहांनी दम भरला आणि त्यांनी आपली बडबड बंद केली आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले हे बरे झाले.

एकंदरीत भाजपने विधानसभा निवडणुकांमध्ये प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसू नये म्हणून विधानसभा निवडणुकांना एक महिना राहिलेला असताना मुख्यमंत्री बदलायचे धोरण अवलंबलेले दिसते आहे. त्या अंतर्गतच गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल या त्यामानाने अपरिचित चेहर्‍याला मुख्यमंत्री केले. विजय रूपाणींकडून राजीनामा घेतल्यावर नवा नेता निवडायला झालेल्या आमदारांच्या बैठकीत हे भूपेंद्र पटेल शेवटच्या रांगेत बसायला चालले होते तेव्हा त्यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आणले गेले असे बातम्यांमध्ये आले होते. कर्नाटक आणि उत्तराखंडमध्येही पक्षाने नवे मुख्यमंत्री नेमले.

आता १० महिन्यांनी होणार्‍या विधानसभा निवडणुकांमध्ये काय होते ते बघायचे.

प्रतिक्रिया

चंद्रसूर्यकुमार's picture

1 Jun 2022 - 12:36 pm | चंद्रसूर्यकुमार

अशा आंतरधर्मीय प्रेमसंबंध करून फसणार्‍या तरूणी एकतर खूप भाबड्या असतात (म्हणजे आपल्या आजूबाजूला नक्की काय चालू आहे याचा थांगपत्ता त्यांना नसतो) किंवा सर्वधर्मसमभाव वाल्या लिब्बू असतात. दुसर्‍या धर्मातील तरूणाच्या प्रेमात पडून आपण धर्माच्या पलीकडे कसे गेलो आहोत याची उदारमतवादी सर्टिफिकिटे त्यांना नाचवायची असतात. त्यापैकी पहिल्या प्रकारच्या तरूणींना योग्य ती माहिती देऊन त्या संकटापासून वाचवायला हवे हे नक्कीच. पण दुसर्‍या प्रकारच्या तरूणींविषयी मला व्यक्तिशः अजिबात सहानुभूती नाही.

काड्यासारू आगलावे's picture

30 May 2022 - 10:25 pm | काड्यासारू आगलावे

मोदींवर टिका केली म्हणून दिपाली सैय्यदांना घरात घुसून मारू - कुणीतरी भाजपच्या बाई.
केतकी चितळे प्रकरणात गळे काढनारे ईथले श्रिगुरूजी, सुबोध खरे,चंसुकू व ईतर प्रतिगामी मंडळी ह्या भाजपच्या गुंडगीरीवर मात्र शांत बसून आहेत.

काड्यासारू आगलावे's picture

30 May 2022 - 10:46 pm | काड्यासारू आगलावे

पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे म्हणून सुप्रिया सुळेंनी नवस केलाय. पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होनार ह्याबाबत मला तरी शंका नाही कारण.
१) सेनेशी केलेल्या गद्दारी मुळे सेनेची मते भाजपला मिळनार नाही.
२)२०१४ साली भाजपसाठी प्राणपणाने लढनारे खडसे, तावडे, बावनकूळे, मुंढे ह्या लोकांचे २०१९ ऊजाडेपर्यंत गेम झाले होते. त्यामुळे हे लोक आता फक्त आपली जागा निवडून येतील ईतपतच मेहनत घेतील. कारण भाजपची सत्ता आली तरी आपल्याला काही मिळनार नाही हे त्यांना माहीतीय. एकटे फडणवीस काही करू शकनार नाहीत कारण ते लोकनेते नाहीत. तंद्रकांत पाटलांबद्दल तर बोलायलाच नको त्यांना कोल्हापुरात पडायची भिती वाटली म्हणून ते कोथरूड ला आले. जो स्वत निवडूण येऊ शकत नाही तो ईतरांना काय जिंकवनार??
३) भाजपात ईडी किंवा “भाजपात येता की जेलात जाता?“ ह्या
तत्वावर भरती झालेले पुन्हा आपल्या सेवगृही परततील. कितामी झालेली राष्ट्रवादी ५४ आमदार जिंकवू शकते तर घरवापसी झालेले पुन्हा आले तर ८०-९० पार सहज जाईल.
४) मुंबई-ठाणे भागात ३० ना ऊर्वरीत महाराष्ट्रात २० असे पन्नास आमदार सहज जिंकवनारी सेना पवारांची साथ असेल तर ७० पार जाईल नसली तरी ५० ते ६० दरम्यान आमदार सहज जिंकवेल.
५) काॅंग्रेस पुर्णत: राष्ट्रवादीवर अवलंबून असेल. नसली तरी ४० आमदार निवडूण आणण्याची ताकद त्यांच्यात आहेच.
६) २०१९ ला वाईट काळात पवारांनी ९८ आमदार एकहाती पिरचार करून जिंकवले होते. २०२४ ला अजून ताकद लावून कदाचीत १२० पार जातीलच. ह्यात भाजपच्या ५० किंवा जास्तीत जास्त ६० जागा जिंकून येतील.
पुढील मुख्यमंत्री सुप्रिया सुळे, अजित पवार किंवा जयंत पाटील ह्या तिघांमधूनच होनार. स्क्रीनशाॅट घेऊन ठेवा.

जेम्स वांड's picture

31 May 2022 - 1:52 pm | जेम्स वांड

पाटीदार आरक्षण आंदोलनवाले हार्दिक पटेल २ जूनला भाजप जॉईन करणार अशी घोषणा भारतीय जनता पक्षाचे गुजरात राज्य प्रवक्ते यज्ञेश दवे ह्यांनी केली आहे. या बाबतीत यज्ञेश दवे पुढे म्हणालेत की गुजरात राज्य भाजप अध्यक्ष श्री सी आर पाटील ह्यांच्या उपस्थितीत हार्दिक पटेल ह्यांचा भाजप प्रवेश सोहळा पार पडेल.

श्रीगुरुजी's picture

31 May 2022 - 2:12 pm | श्रीगुरुजी

रस्त्यावर पडलेली प्रत्येक घाण उचलून पक्षात आणण्याचे भाजपला व्यसन लागलंय. महाराष्ट्रात तर याचा अतिरेक झालाय. पद्मसिंह पाटील व मुलगा, विखे पाटील व मुलगा, राणे व मुले, दरेकर, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील, विजयकुमार गावित, मधुकर पिचड व मुलगा, गणेश नाईक व मुलगा, प्रसाद लाड . . . अशी असंख्य उदाहरणे आहेत.

काड्यासारू आगलावे's picture

31 May 2022 - 2:25 pm | काड्यासारू आगलावे

आपण काहीही केले तरी ते जनता राष्ट्रहीताच्या नावाखाली खपवून घेईल असा दुर्विश्वास भाजपला असावा.
भाजपची गत मोघल साम्राज्या सारखी आहे, औरंगजेब संपला की मोगल साम्राज्य जसं पटकन संपलं तसं मोदी गेले की भाजपची अवस्था होनारे.

काड्यासारू आगलावे's picture

31 May 2022 - 2:29 pm | काड्यासारू आगलावे

चंसुकू ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे काॅंग्रेस मध्ये असलेले लोक वाईट असतात. मग आता हे लोक भाजपात आले की चांगले होतात का? ह्यावर चंसुकूंनी सोयीस्कर मौन साधलंय.

sunil kachure's picture

31 May 2022 - 2:41 pm | sunil kachure

ज्ञान व्यापी प्रकरण आणि राम मंदिर प्रकरण वेगळे आहे...
Bjp नेता.
हे प्रकरण कोर्टात च सुटेल.
आता जनता अगदी हिंदू पण.
बेरोजगारी,प्रचंड महागाई,सप्रदयिक द्वेष निर्माण करणारे वातावरण ह्याला वैतागली आहे.हिंदू मुस्लिम ह्या वादात हिंदू पण पडण्याच्या मुड मध्ये नाहीत.
ह्याची जाणीव bjp लं झाली आहे.
2024साठी हिंदू,मुस्लिम,पाकिस्तान हा मुद्धा bjp ल नुकसान पोचवेल.
हे समजले आहे.
महागाई,बेरोजगारी, हे महत्वाचे आणि जिव्हाळ्याचे विषय आहे
गॅस सिलिंडर नी 1000 रुपये पार केले आहे.
भारताच्या इतिहासात प्रथम च इतकी महागाई आहे .
पेट्रोलियम पदार्थाची निर्मिती मित्र करत आहे
हे लोकांना उत्तम रीत्या माहीत आहे.
मित्र कोण हे bjp लपवेल पण लोकांना माहीत आहे

श्रीगुरुजी's picture

31 May 2022 - 6:57 pm | श्रीगुरुजी

२०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न ८.७% ने वाढले आहे. परंतु ६.१% आर्थिक तूट चिंताजनक आहे.

https://www.indiatoday.in/business/story/gdp-of-india-fiscal-deficit-195...

किती तरी मोठी आव्हान देशासमोर आहेत.वाढणारी लोकसंख्या आणि ऑटोमेशन मुळे कमी होणाऱ्या नोकऱ्या.शहरांचे बकालीकरण ,ग्रामीण अर्थ व्यवस्था,वाढती महागाई,महाग होत असलेले उच्च शिक्षण,atangvad,चीन ची विस्तार वादी निती,
महागाई तर आहेच.
खुप गंभीर प्रश्न आहेत...
आणि देशात सत्ताधारी कशात गुंतले आहेत.भारतीय मीडिया काय दाखवत आहे रोज.
..राजकीय पक्ष पण bjp नी जरुर भावनिक मुद्दे घ्यावेत.
पण सरकार म्हणून सरकार नी गंभीर होणे गरजेचे आहे.
पण आपले पंतप्रधान च सारखे भावना विवेष होत आहेत.

सुबोध खरे's picture

31 May 2022 - 8:15 pm | सुबोध खरे

कचरे बुवा

भावना विवेष

म्हणजे नक्की काय हो?

काँग्रेसच्या नेत्यांना यंग इंडिया प्रकरणी ईडी चे समन्स आले आहे.
ही बहुतेक काँग्रेसच्या पाठीवरची शेवटची काडी ठरणार

श्रीगुरुजी's picture

2 Jun 2022 - 2:43 pm | श्रीगुरुजी

समन्स टाळण्याची तयारी पण सुरू झाली. सोनिया गांधींना कोरोना झालाय म्हणे.

श्रीगुरुजी's picture

2 Jun 2022 - 2:43 pm | श्रीगुरुजी

समन्स टाळण्याची तयारी पण सुरू झाली. सोनिया गांधींना कोरोना झालाय म्हणे.

sunil kachure's picture

2 Jun 2022 - 3:29 pm | sunil kachure

भारतीय सरकारी यंत्रणा मोदी सरकार चे घरगडी म्हणून काम करत आहेत आणि ह्यांना पोसत मात्र जनता आहे tax रुपी पैसा देवून.
ह्या सरकारी घरगड्या ना bjp नी स्वतःच्या पक्षाच्या फंडातून पगार द्यावा.
देश काही अशा घरगड्याना पोसायला मोकळा नाही.