ताज्या घडामोडी मे २०२२(भाग २)

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in राजकारण
16 May 2022 - 9:49 am

आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.

काल (१५ मे २०२२ रोजी) त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते माणिक साहा यांनी शपथ घेतली.

मार्च २०१८ मध्ये झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने राज्यात २५ वर्षे सलग सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीचा पराभव केला आणि बिप्लब देब यांना मुख्यमंत्री केले गेले. सुरवातीचा महिना-दीड महिना मुख्यमंत्री झाल्याचं वारं या गृहस्थांच्या अंगात इतकं शिरलं होतं की ते विनाकारण बाष्कळ आणि अनावश्यक बडबड करत सुटले. महाभारत काळात इंटरनेट होतं ही त्या मानाने बरीच निरूपद्रवी बडबड होती. सगळ्यात आक्षेपार्ह बडबड होती १९९७ मधील विश्वसुंदरी डायना हेडन विषयी. बिप्लब देब यांनी म्हटले होते- डायना हेडनचे सौंदर्य ऐश्वर्या रायप्रमाणे 'भारतीय सौंदर्य' नाही. त्यानंतर मोदी-शहांनी दम भरला आणि त्यांनी आपली बडबड बंद केली आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले हे बरे झाले.

एकंदरीत भाजपने विधानसभा निवडणुकांमध्ये प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसू नये म्हणून विधानसभा निवडणुकांना एक महिना राहिलेला असताना मुख्यमंत्री बदलायचे धोरण अवलंबलेले दिसते आहे. त्या अंतर्गतच गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल या त्यामानाने अपरिचित चेहर्‍याला मुख्यमंत्री केले. विजय रूपाणींकडून राजीनामा घेतल्यावर नवा नेता निवडायला झालेल्या आमदारांच्या बैठकीत हे भूपेंद्र पटेल शेवटच्या रांगेत बसायला चालले होते तेव्हा त्यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आणले गेले असे बातम्यांमध्ये आले होते. कर्नाटक आणि उत्तराखंडमध्येही पक्षाने नवे मुख्यमंत्री नेमले.

आता १० महिन्यांनी होणार्‍या विधानसभा निवडणुकांमध्ये काय होते ते बघायचे.

प्रतिक्रिया

sunil kachure's picture

24 May 2022 - 2:22 pm | sunil kachure

फक्त पुण्यातील लोकांनी सोडवावा.
घरात बसण्या पेक्षा रस्त्यावर यावें

काड्यासारू आगलावे's picture

25 May 2022 - 12:04 am | काड्यासारू आगलावे

ह्यावर एकही प्रतिक्रिया नाही. काय ते समजून घ्या. :)

sunil kachure's picture

24 May 2022 - 2:43 pm | sunil kachure

BJP हिंदू हीत वादी आहे असे दावा करते .
म्हणजे काय..

हिंदू साठी सौम्य शिक्षा असणारे कायदे करणार आहेत का?
Ipc हिंदू न साठी वेगळे असणार आहे का?
विविध जाती,अल्प संख्यांखं ह्या मध्ये मुस्लिम पण आहेत.
ह्यांचे हीत जपण्यासाठी विशेष कायदे आहेत ते bjp रध्द करणार आहे का?
हिंदी साठी विशेष संरक्षण देणारे कायदे निर्माण करणार आहे का?
सरकारी नोकऱ्या,खासगी नोकऱ्या फक्त हिंदू नच मिळतील असा कायदा करणार आहे का?
सर्व आर्थिक स्तरातील हिंदू चे आर्थिक शोषण होवू नये म्हणून विशेष कायदे करणार आहे का?
ह्या मधील काही करणार नाही.
इथे मंदिर पाडून मशीद बांधली आहे सर्व काम धंदा सोडून हिंसा करा.
त्या जोरावर आम्हाला मत ध्या आम्ही निवडून येतो आणि आम्ही आणि आमचे मित्र जगात कसे श्रीमंत होईल असेच सरकारी धोरण ठरवतो.
म्हणजे हिंदू हीत का?

पेट्रोल, डिझेलच्या दराचा गोंधळ; राज्याच्या कपातीचा लाभ न झाल्याने ग्राहक संभ्रमात

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/uddhav-thackeray-go...

---------

केंद्र सरकारने ४ नोव्हेंबर २०२१ आणि २२ मे २०२२ या दोन दिवशी उत्पादन शुल्कात मोठी कपात केली. परंतु राज्य सरकारकडून व्हॅटमध्ये कपात करण्यात आलेली नाही. तसेच व्हॅटबरोबरच उपकरही राज्य सरकार आकारत आहे. हा उपकरही कायम ठेवण्यात आला आहे. यामुळे राज्य सरकारकडून थेट दरकपात करण्यात आलेली नाही. व्हॅटची टक्केवारी जैसे थे असल्याचे इंधनदर तज्ज्ञ व पेट्रोल व्यावसायिक डॉ. केदार चांडक यांनी 'मटा'ला सांगितले. ते म्हणाले, 'शनिवारी रात्री केंद्राकडून उत्पादन शुल्कात कपात केल्यावर या कमी झालेल्या शुल्कावरील व्हॅट कमी होणे अपरिहार्यच होते. परंतु राज्य सरकारने प्रसिद्धीपत्रक काढून जनतेला दिलासा दिल्याचे भासवले आहे.

---------

लादलेले राज्य सरकार आणि हतबल जनता ....

काड्यासारू आगलावे's picture

24 May 2022 - 11:47 pm | काड्यासारू आगलावे

राज्यहीतासाठी दरवाढ सहन करा.

sunil kachure's picture

25 May 2022 - 12:06 am | sunil kachure

"Shameless Hypocrisy": Tamil Nadu Minister Challenges Nirmala Sitharaman

तमिळ nadu च्या अर्थ मंत्र्यांनी मोदी सरकार आणि केंद्रीय अर्थ मंत्री सीतारामन ह्यांची पूर्ण इज्जत काढली आहे.
राज्या नी पेट्रोल डिझेल वर च कर कमी करा जे केंद्र सरकार चे विधान किती मूर्ख पणाचे आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे.
वाचा एकदा.

वाचा

सोलापूरच्या शेतकऱ्याला ४० गोणी कांद्याची पट्टी आली वजा ७ रूपये

https://www.saamtv.com/agrowon/solapur-young-farmer-facing-bad-experienc...

---------

लादलेले राज्य सरकार आणि हतबल जनता....

https://www.lokmat.com/national/communal-violence-at-ratlam-district-in-...

ध्वनी प्रदूषण टाळायलाच हवे ...

रस्त्यावरील नमाज पठणाबाबत योगी आदित्यनाथ यांचं विधान; म्हणाले “ईदच्या दिवशी रस्त्यावर…”

https://www.loksatta.com/desh-videsh/namaz-on-roads-stopped-since-bjp-ca...

“उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात रामनवमी साजरी करण्यात आली. राज्यात कुठेही हिंसाचार झाला नाही. उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच रस्त्यावर ईदच्या दिवशी नमाज पठण आणि अलविदा जुमा (रमझानचा शेवटचा दिवस) झाला नाही,” असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

-----------

समाजकंटकांना, लाठीचीच भाषा समजते....

मुक्त विहारि's picture

24 May 2022 - 6:21 pm | मुक्त विहारि

https://www.lokmat.com/crime/rajgarh-bulldozer-crushed-riots-houses-who-...

-----

काही लोकांना, लाठीचीच भाषा समजते.....

डँबिस००७'s picture

24 May 2022 - 8:05 pm | डँबिस००७

राहुल गांधी भारता बाहेर गेल्यावर काही तरी करुन गोत्यात येण्याच काम करत असतात.
जाहीर रीत्या भारताविरुद्ध पाकीस्तानची बाजु घेणार्या जेरेमी कॉर्बिन या ब्रिटीश एम पी शी भेट रा गां ने घेतली. त्यांच्या बरोबर सॅम पित्रोडा होते. ईंग्लंडला जाऊन जेरेमी सारख्या भारताच्या कट्टर विरोधकाची भेट घेण ह्यामुळे राहुल गांधीवर संशयाचे वातावरण तयार झालेले आहे. तत्पुर्वी रा गां ने एका मुलाखतीत देशा विरुद्ध बोलुन नविन वादाला आमंत्रण दिलेले होते.

मुक्त विहारि's picture

24 May 2022 - 8:35 pm | मुक्त विहारि

कॉंग्रेस हा, गांधी घराण्याचा दावणीला बांधलेला पक्ष आहे...

दुर्दैवाने, हिंदू जनतेला व्यक्तीपुजा आवडत असल्याने, अशा लोकांनाच देव मानणारी जनता, ह्या देशांत आढळणारच .....

ढाई हजार पाच सौ क्विंटल ....

काड्यासारू आगलावे's picture

24 May 2022 - 11:59 pm | काड्यासारू आगलावे

हो ना. मनमोहनसिंग, सास बहादूर शास्त्री वगैरे लोक गांधी घराण्यातूनच होते.

अत्यंत अयोग्य नियोजनामुळे, आज केरळ राज्याची दिवाळखोरीच्या दिशेने वाटचाल चालु आहे.
आग्रही साम्यवादामुळे राज्यात एकही प्रायव्हेट सेक्टर मध्ये उद्योगधंदा उभारला गेलेला नाही. केरळात नाही म्हणायला काही सरकारी उद्योग धंदे तग धरुन आहेत. साम्यवादा मुळे परिस्थिती ईतकी बिकट झालेली आहे की लोक काम करतच नाहीत. उदा ए खा द्या ट्रक मधुन सामान काढण्या साठी ३ लोकांची गरज असेल तर तिथली कामगार युनियन १० लोकांंना उभे करतात , त्यातले २-३ लोक काम करतात बाकिचे पैसे घेतात. विचारल तर म्हणतात बघण्याचे पैसे.

आता पर्यंत केरळ सरकारला देशाबाहेर (खास करुन गल्फ मध्ये ) रहाणार्या केरळाईट्स ने पाठवलेला परकिय चलनामुळे केरळ राज्य तग धरुन होते. पण आताच्या जनरेशनमध्ये गल्फ मधल्या कामगारांच्या नोकरीत वाढणार्या स्पर्धेमुळे गल्फला जाण्यासाठी केरळातले लोकही आता उत्साही दिसत नाहीत. तर तिथे असलेले लोक वाढत्या खर्चामुळे बचत करु शकत नाहीत मग घरी काय पाठवणार ?

अत्यंत अयोग्य नियोजन
केरळ सरकारने आता शहरात तयार झालेल्या आयटी पार्क मध्ये सुद्धा दारु विकायला परवाने वाटायला सुरुवात केलेली आहे. एकंदरीत केरळात दारुचे व्यसन खुपच वाढलेले आहे व त्याला सामाजाची मान्यता सुद्धा आहे. पण व्यसानाचे वाईट परीणाम दिसायला वेळ लागत नाही.

केरळच्या मुख्य मंत्र्याला औषधोपचारासाठी अमेरीकेत जावे लागले. आयुष्यभर भांडवलशाही अमेरीकेला नाव ठेवणारे भारतातले कम्युनिस्ट विचारवंत औषधोपचारासाठी चीन, रशिया किंवा क्युबाला न जाता अमेरिकेतच का जातात ?

साम्यवादाने कोणत्याही देशाचे भले केलेले नाही. पण हे पंच मक्कार लोक भारतात मात्र साम्यवाद आणायची स्व प्ने रंगवत असतात

काड्यासारू आगलावे's picture

25 May 2022 - 12:03 am | काड्यासारू आगलावे

युपी ला पहा आधी मग केरळ ची चिंता वहा.

आग्रही साम्यवादामुळे राज्याचे नुकसान तर होतेच पण लोकांच्या सवयीवर पण त्याचा किती वाईट परीणाम होते हे बंगाल मधे असताना अगदी जवळुन पाहिले आहे. बंगाल सारख्या कम्युनिस्ट राज्यात तर "ऑफिस यायचा जायचा पगार मिळतो, काम करायचे असेल तर अजुन पगार द्या" अशी म्हण आहे. केरळ मधे तर जॉब नाहीतच. केवळ पर्यट्न हा एक उद्योग सोडला तर बहुतांश केरळ हे परदेशातुन येणार्‍या रेमीटंस वर अवलंबुन आहे.

सगळ्या सुशिक्षित राज्य अशी मेखि मिरवायचे दिवस आता संपल्यात जमा आहेत.

सुबोध खरे's picture

25 May 2022 - 11:40 am | सुबोध खरे

कोव्हीड मध्ये केरळची काय वाताहत झाली आहे हे प्रत्यक्ष पाहून आल्यावरच समजेल.

ह्या सर्व पद्धती आहेत.ह्यांना नियंत्रित केले नाही तर खूप धोकादायक ठरतात समाजासाठी देश साठी.
फक्त साम्यवाद जसा आहे तसा कुठेच राबवला जात नाही.
किंवा फक्त भांडवल शाही जशी आहे तशी कधीच राबवली जात नाही.
त्यांच्या वर सरकार नियंत्रण ठेवते आणि नियम बनवून नियमन केले जाते.
भांडवल शही असलेले देश पण साम्यवादी निर्णय घेते तसे घेणे खूप गरजेचे असते.
आणि साम्यवादी सरकार पण भांडवशाहीच्या मार्गाने जाते .
1),किमान पगार किती दिला पाहिजे हा निर्णय साम्यवादी नाही तर पिळवणूक होवू नये म्हणून
घेतलेला निर्णय असतो.
२) जेव्हा टीव्ही केबल होती तेव्हा केबल कनेक्शन देणाऱ्या कंपनी मध्ये स्पर्धा होवून भाव कमी झाले होते.
पण ह्या कंपन्यांनी एकी करून भाग वाटून घेतले आणि स्पर्धा संपवली.
ह्या कंपन्यांचे हे वागणे फ्री trade विरुद्ध होते.
३) मोबाईल नेटवर्क पुरवणाऱ्या दोन चार च कंपन्या आहेत .
त्यांना ट्राय द्वारे नियंत्रणात नाही ठेवले तर t वाट्टेल ते दर लावतील.
आणि लोकांकडे तो देण्या शिवाय काहीच पर्याय नसेल.
चीन चे सामान वापरू नका स्वस्त मिळत असेल तरी .
हे भांडवल शशी विरुद्ध तत्व आहे .फ्री ट्रेड विरुद्ध आहे.
परदेशी car वर १२० टक्के पर्यंत कर लावणे हे पण फ्री ट्रेड विरुद्ध आहे.
मिक्स अर्थ व्यवस्था च सर्व ठिकाणी असते.

ज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच मशिदही जुनी आहे, मागील ३००-४०० वर्षांमध्ये…”

https://www.loksatta.com/desh-videsh/gyanvapi-row-sharad-pawar-says-mosq...

--------

तर, दुसरे एक जण म्हणत आहेत की ..... ज्ञानवापी केस: इतिहासकार इरफान हबीब बोले- हां औरंगजेब ने ही तुड़वाए थे काशी और मथुरा के मंदिर (https://www.jansatta.com/national/gyanvapi-case-historian-irfan-habib-sa...)

--------

कॉंग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष हिंदू हितवादी नाहीत आणि जनतेच्या भल्यासाठी पण नाहीत ... हे माझे वैयक्तिक मत आहे ....

-------

डँबिस००७'s picture

25 May 2022 - 7:18 pm | डँबिस००७

ईरफान हबिब व रोमीला थापर सारख्यांना ईतिहासकार मानण हे खर्या ईतिहासकारांचा अपमान आहे.
काही सन्मानीय ईतिहास तज्ञांनी, पुरातत्व तज्ञांनी (के के महम्मद ) वेळोवेळी ह्या दोघांचे पितळ उघडे पाडलेले आहे.

ईरफान हबिब व रोमीला थापर ह्यांचे ज्ञान पुर्वाग्रह दुषित असुनही त्यांना NCERT अभ्यासक्रमाच्या कमिटी मध्ये ठेवण्यात आलेले होते. ह्या दोघांनी खर्या ईतीहासाला गायब करत खोटा ईतिहास विद्यार्थ्यांच्या माथी मारला. मुघलांचे महीमा मंडन हे त्याचेच परीणाम !!
ह्या सारखे अजुनही काही खोटे तज्ञ आहेत जे बीबी लाल सारख्या अनुभवी पुरातत्व भीतज्ञांला खोटे पाडण्याचे काम केलेले आहे.
रोमिला थापर सारख्या तज्ञन टुकार खोट्या ईतीहासकाराला "आजिवन प्रोफेसर" घोषीत केलेल आहे.
केंद्र सरकारला आता जाग येत आहे. लवकरच खोटा ईतिहास जाउन खरा ईतिहास शिकवला जाईल !!

डँबिस००७'s picture

25 May 2022 - 6:49 pm | डँबिस००७

"क्वॉड सम्मिट" ची काल सांगता झाली.
क्वॉड सारख्या महत्वाच्या ग्रुप मध्ये भारताची भागीदारी हे भारताचे जगातले वाढते महत्व अधोरेखीत करत आहे.
ह्या निम्मित्याने भारत, अमेरीका, जापान , अॉस्ट्रेलीया सारख्या दिग्गज देशांच्या पंगतीतच जाउन बसलेला नसुन भारत ह्या देशांच्या बरोबरीने काम करत आहे. भारताच्या म्हणण्याला जगाचा पाठिंबा मिळत आहे. ह्या समारंभात मोदीजींच्या ऊत्तुंग प्रतिमेला अजुनच निखार आलेला जगाने पाहीला. वायरल झालेल्या काही फोटो मधुन क्वॉड मधल्या नेत्यांनीही
मोदीजींचे नेतृत्व मान्य केलेले दिसले.

जपानच्या ४० तासाच्या दौर्यात २७ बैठका मोदीजींनी घेतल्या. ह्या मिटींग मध्ये जपानच्या आघाडीच्या औद्योगीक समुहांच्या प्रमुखांशी, जपान सरकारच्या अधिकार्यांशी, चर्चा महत्वाच्या होत्या. जपान मध्ये मोदीजींना भेटण्या साठी अप्रवासी भारतीय जितके उत्साही होते तितकेच उत्साही पाकिस्तान व बांग्ला देशाचे नागरीकही होते.

जपानला जाताना विमानातच काही सरकारी अधिकारीची मोदीजींशी मिटींग प्लॅन होती. मोदीजी जपानला पोहोचले व सरकारी अधिकारी भारतात परतले.

ह्या केंद्र सरकार कडे, उत्तम दूरदृष्टी आहे...

मोदीजींच्या अथक प्रयत्नामुळे भारता साठी स्वर्णयुग लवकरच येईल अशी आशा आहे.

मुक्त विहारि's picture

25 May 2022 - 7:06 pm | मुक्त विहारि

हे केंद्र सरकार, देशाच्या भल्यासाठी विचार करत आहे ...

मोदी नंतर कोण? हा प्रश्र्नच येत नाही

मोदी नंतर शहा, नंतर योगी, नंतर तेजस्वी सुर्या, इतपत फळी तयार आहे...

दुसरी कडे मात्र, गांधी, पवार, अशी आडनावे असलेलेच पक्ष आहेत... नावालाच फक्त, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस .....

श्रीगुरुजी's picture

25 May 2022 - 6:53 pm | श्रीगुरुजी

https://www.lokmat.com/national/yasin-malik-sentenced-to-life-imprisonme...

यासीन मलिकला जन्मठेपेची शिक्षा

फाशीने एका फटक्यात सुटला असता.
जन्मठेपेत सडू देत आता. त्याला कैदेत सुध्दा एकांतवास, मानसिक, शारीरिक त्रास सतत दिला पाहिजे

नवी मुंबईतील ३६३ कोटींचा उड्डाणपूल, ४०० झाडांची कत्तल आणि शिंदे-आव्हाड यांच्यात बिघाडी

https://www.loksatta.com/politics/in-thane-conflicts-between-eaknath-shi...

आरे मधल्या वृक्ष तोडी संदर्भात, ह्याच शिवसेनेने रान उठवले होते..... आता मात्र मूग गिळून गप्प बसली आहे .... मी तेंव्हा देखील म्हटले होते की, खांडववन जाळल्या शिवाय, इंद्रप्रस्थ होत नाही... मेट्रोसाठी एक न्याय आणि उड्डाणपुलासाठी मात्र वेगळा नियम ...

-------

https://www.loksatta.com/krida/pragyananda-second-victory-world-champion...

------

प्रज्ञानंदचे, हार्दिक अभिनंदन....

sunil kachure's picture

25 May 2022 - 8:09 pm | sunil kachure

काय जबरदस्त दुर दृष्टी आहे केंद्र सरकार कडे .सत्तेत आहे तो पर्यंत भारत कसा कमजोर होईल.ह्याची जबरदस्त दूर दृष्टी आहे.
१) देशावरील कर्जात जबरदस्त वाढ.कर्ज विक्रमी पातळीवर.
२) देशात बेरोजगारी विक्रमी पातळीवर.
३) महागाई चे सर्व विक्रम ह्या सरकार च्या काळात मोडले गेले..

४)
Epf वर सर्वात कमी व्याज ह्या सरकार च्या काळात.
५) make इन v India च फक्त बोलबाला.
निर्यात बिलकुल वाढली नाही.
६)एक पण स्मार्ट सिटी उभी राहिली नाही.
७) शिक्षण क्षेत्रात फक्त गोंधळ .किती शिक्षण संस्था बंद झाल्या.

दूर दृष्टी ची अजून खूप उदाहरणे आहे.
सध्या इतकीच बस.

sunil kachure's picture

25 May 2022 - 8:10 pm | sunil kachure

काय जबरदस्त दुर दृष्टी आहे केंद्र सरकार कडे .सत्तेत आहे तो पर्यंत भारत कसा कमजोर होईल.ह्याची जबरदस्त दूर दृष्टी आहे.
१) देशावरील कर्जात जबरदस्त वाढ.कर्ज विक्रमी पातळीवर.
२) देशात बेरोजगारी विक्रमी पातळीवर.
३) महागाई चे सर्व विक्रम ह्या सरकार च्या काळात मोडले गेले..

४)
Epf वर सर्वात कमी व्याज ह्या सरकार च्या काळात.
५) make इन v India च फक्त बोलबाला.
निर्यात बिलकुल वाढली नाही.
६)एक पण स्मार्ट सिटी उभी राहिली नाही.
७) शिक्षण क्षेत्रात फक्त गोंधळ .किती तरी शिक्षण संस्था बंद झाल्या.

दूर दृष्टी ची अजून खूप उदाहरणे आहे.
सध्या इतकीच बस.

केंद्र सरकारच जाऊद्या राजे तुम्हाला कधी दृष्टी येणार?

डँबिस००७'s picture

25 May 2022 - 8:59 pm | डँबिस००७


निर्यात बिलकुल वाढली नाही.

India exports rise to record high of USD 418 bn in FY22

In 2020-21, India's goods exports were $291.8 billion and in FY20, they were $313.36 billion.

https://www.google.ae/amp/s/m.economictimes.com/news/economy/foreign-tra...

सुबोध खरे's picture

26 May 2022 - 7:03 pm | सुबोध खरे

@डँबिस००७

कुठे त्या कचरे बुवांच्या नादाला लागत आहात.

टंकन करण्यासाठी भरपूर वेळ आहे आणि बॅण्डविड्थ आणि नेट स्वस्त आहे म्हणून काही तरी टंकत असतात ते.

दिसामाजी काहीतरी टंकित जावे

प्रसंगी अखंडित टंकित जावे एवढेच त्यांचे ब्रीद

डँबिस००७'s picture

25 May 2022 - 9:27 pm | डँबिस००७

किती तो अंध विरोध !!

श्रीगुरुजी's picture

26 May 2022 - 8:19 am | श्रीगुरुजी

सुनील जाखड, हार्दिक पटेल पाठोपाठ कपिल सिब्बल सुद्धा कॉंग्रेस बाहेर पडले.

अर्थात शून्यातून शून्य वजा केल्याने जितका फरक पडतो तितकाच फरक या नेत्यांनी कॉंग्रेस सोडल्याने पडेल.

विवेकपटाईत's picture

26 May 2022 - 10:57 am | विवेकपटाईत

मला एकाने प्रश्न विचारलं टाईम्स मध्ये प्रसिद्ध भारतीय म्हणून नाव आले पाहिजे यासाठी कायं करणे गरजेचे. मी म्हणलो तुम्हाला न ओळखून गल्लीचे कुत्रे तुमच्यावर भुंकत असतील म्हणजे तुम्ही प्रसिद्ध . दुसरे सरकार विरोधी कृती करणे ही गरजेचे. गौतम अडाणी सोडून बाकी दोघानेचे नाव कधीच ऐकले नव्हते.

१) काँग्रेस काळात महागाई वर हंगाम करणारे bjp वाले महागाई विषयी चुकून पण बोलत नाहीत.
२)केंद्रीय संस्थांचा कसा काँग्रेस गैर वापर करते ह्या वर शिमगा करणारे bjp wakey
Ed किंवा बाकी केंद्रीय यंत्रणा फक्त बंगाल,आणि महारष्ट्र मध्ये च bjp सोडुन बाकी सर्व विरोधी पक्षातील नेत्यांवर चुकीची कारवाई करत आहेत त्या वर bjp वाले एक शब्द पण बोलत नाहीत.
३(अडाणी ह्यांच्या बंदरावर गुजरात मध्ये खूप मोठा ड्रग साठा सापडतो पण bjp वाले एक शब्द पण बोलत नाहीत.
४)एक पण स्मार्ट सिटी देशात बनली नाही.
गुजरात मध्ये dholariya की असेच काही तरी नाव आहे .
मोदी चे त्या dholariya ल मॉडर्न सिटी बनवणार होते..व्हिडिओ आहेत त्यांच्या भाषणाचे..शांगाई आणि Delhi पेक्षा हायटेक.
तसे काही घडलेच नाही.
पण त्या वर bjp वाले काहीच बोलणार नाहित.
आज
आजपण ब्रिटिश कालीन.मुंबई , दिल्ली,कलकत्ता मद्रास हीच शहर देशाची पॉवर इंजिन आहेत .एक पण नवीन शहर bjp निर्माण करू शकली नाही.
स्मार्ट सिटी खूप लांबची गोष्ट.
पूर्वज लोकांनी उभे केलेले चौसोपी वाड्या चे maintance च करणे ह्या सरकार लं कठीण जात आहे..नवीन महाल उभारणे ही खूप लांब ची गोष्ट आहे.

डँबिस००७'s picture

26 May 2022 - 6:24 pm | डँबिस००७

अजब तुझे सरकार

स्वातंत्र्या नंतर ७५ वर्षांत काँग्रेस एकही नविन शहर सोडा साधे रेल्वेचे नविन मार्ग बांधु शकली नाही. ब्रिटीशांनी देश सोडायच्या पुर्वी जवळ जवळ ९०,००० किमी चे रेल्वे जाळे निर्माण केलेले होते. स्वातंत्र्या नंतर ७५ वर्षांत काँग्रेसने देशात १०,००० किमी पेक्षा कमी रेल्वे चे जाळे निर्माण केले म्हणजे ज्या ब्रिटीशांना भारताच शोषण करणारे सरकार म्हणुन बहिक्रूत केल त्यांनी देशाची चांगली सेवा निर्माण केली होती.

स्वातंत्र्या पुर्वी ब्रिटीशांनी अखंड भारत देशात १६ ऑर्डेनान्स आयुध निर्माण करणार्या फॅक्टर्या उभारल्या होत्या. ह्याच कारखान्यात निर्माण झालेल्या आयुधांनी ब्रिटिश सरकारच्या व मित्र राष्ट्राच्या सैन्याने शत्रु सैन्यावर विजय मिळवलेला होता. पण त्याच भारत देशाला १९६२ च्या युद्धात चीनशी हार पत्करावी लागली कारण स्वातंत्र्या नंतर भारतात राहीलेल्या ११ आयुध निर्माण करणार्या फॅक्टर्या पैकी बर्याच फॅक्टर्या पं नेहरुनी बंद करुन टाकल्या त्यामुळे भारतीय सैन्याला बंदुकाच उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.

ह्या ७५ वर्षांच्या काळात नेहरु, ईंदिरा गांधी व राजीव गांधीनी गरीबी हटावच्या पोकळ घोषणाच दिल्या. ७५ वर्षांत गरीबी दुर झाली नाहीच पण नेहरु, ईंदिरा गांधी व राजीव गांधीनी हे तिघेही "भारत रत्न" मात्र झाले.

आजपण ब्रिटिश कालीन.मुंबई , दिल्ली,कलकत्ता मद्रास हीच शहर देशाची पॉवर इंजिन आहेत. स्वातंत्र्या नंतर ७५ वर्षांत काँग्रेसला एक ही नवीन शहर निर्माण करता आलेल नव्हत पण ह्यांना मात्र जेमतेम ८वर्षे सरकारपदी आलेल्या भाजाप कडुन मात्र फारच मोठ्या अपेक्षा आहेत. निवडणुकीत मत काँग्रेसला द्यायची पण कामाची अपेक्षा मात्र भाजपा कडुन ?

जर तुम्ही तुमच मत काँग्रेसला दिलेल होत मग काँग्रेस सत्येत येईपर्यंत थांबायला काय हरकत आहे ?

सुबोध खरे's picture

26 May 2022 - 7:06 pm | सुबोध खरे

@डँबिस००७

कुठे त्या कचरे बुवांच्या नादाला लागत आहात.

टंकन करण्यासाठी भरपूर वेळ आहे आणि बॅण्डविड्थ आणि नेट स्वस्त आहे म्हणून काही तरी टंकत असतात ते.

दिसामाजी काहीतरी टंकित जावे

प्रसंगी अखंडित टंकित जावे एवढेच त्यांचे ब्रीद

२०१४ आणि ३०१९ मध्ये प्रचंड बहु मतने bjp चे सरकार का निवडून दिले गेले.
Bjp च्या कार्यकर्त्यांनी च फक्त bjp ल मतदान केले होते का?
काँग्रेस समर्थक लोकांनी पण bjp ल मत दिले.
लोक वैतागली होतो.
भ्रष्ट कारभार ला.
म्हणून .
Bjp ल सत्तेत आणले ना.
लोकांच्या अपेक्षा होत्या हे काही तरी बदल करतील .
पण काँग्रेस पेक्षा पण जास्त bjp नी अपेक्षा भंग केला .
त्या मुळे मत देणारी लोकच आता टीका करत आहेत.

डँबिस००७'s picture

26 May 2022 - 9:14 pm | डँबिस००७

आयला,

म्हणजे आता २०२४ सरकार बदलणार म्हणा की !! मग कोणाला निवडुन आणताय ?

डँबिस००७'s picture

26 May 2022 - 7:56 pm | डँबिस००७

खरय !

sunil kachure's picture

27 May 2022 - 12:31 pm | sunil kachure

Ed ही केंद्रीय यंत्रणा फक्त सत्ताधारी राजकीय पक्ष.
त्या मध्ये फक्त सेना आणि राष्ट्रवादी चे.
ह्यांच्या वर च कारवाई करत आहे.
ह्याचा परिणाम जन मनावर काय होईल?
Bjp च एक पण नेता भ्रष्ट नसेल ह्या वर कोणीच विचार विश्वास ठेवणार नाही.
पण एका पण bjp नेत्यांवर कारवाई ed नी का नाही केली.
Ed जे करत आहे ते राजकीय हेतू नी प्रेरीत होवून करत आहे हे लोकांना समजत नसेल जा?
पूर्ण देशात किती bjp नेते आणि त्यांचे समर्थक उद्योग पती ह्यांच्या वर ed किंवा cbi नी कारवाई केली.
मी तर एक पण अशी घटना ऐकली नाही.
Bjp चे सर्व च येते शुध्द चरित्र असलेले आहेत.
म्हणून त्यांच्या वर कारवाई नाही.

हे किती लोकांना पटेल.?

प्रसाद_१९८२'s picture

27 May 2022 - 4:02 pm | प्रसाद_१९८२

Bjp चे सर्व च येते शुध्द चरित्र असलेले आहेत. म्हणून त्यांच्या वर कारवाई नाही.
--
कचरा शेठ,
इडी काय किंव्हा सिबिआय काय ते स्वत:हून कोणतीच कारवाई करत नाही. त्यांच्याकडे कोणीतरी तक्रार केल्यास अथवा न्यायालयाचा आदेश असेल तर मग ते कारवाई करतात.

आता किरीट सोमय्यांनी ज्याप्रकारे सर्व साक्षीपुरावे गोळा करुन, वसुली सरकार मधील भ्रष्ट मंत्र्याची तक्रार इडीकडे केली, तशीच तक्रार भाजपामधील कोणी भ्रष्टाचार केला असेल तर वसुली सरकार मधील कोणी तरी साक्षीपुरावे गोळा करुन करावी. त्या तक्रारी नंतर ही जर इडीने कारवाई केली नाही तरच तुम्ही म्हणताय त्या गोष्टीला दुजोरा मिळेल. मात्र वसुली सरकार मधील नेते न्यायालयात न जाता फक्त टिव्हीवर किंव्हा ट्विटरवरुन आरोप करतात मग त्या आरोपांची दखल कोण घेणार ?

sunil kachure's picture

27 May 2022 - 6:24 pm | sunil kachure

केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आहेत.
केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकार च्या गुलाम असतात हे इंदिरा जी च्या काळापासून भारत बघत आहे.
प्रसाद आणि भक्त तुम्ही इतके पण आंधळे होवू नका.
सर्वांना माहीत आहे महाराष्ट्र,पंजाब,बंगाल,केरळ मध्ये केंद्र सरकार च्या इशाऱ्यावर कारवाया केल्या जात आहेत.
भक्त नी इतके स्वतल गुलाम बनवू नका ,की कशाचे ही समर्थन काही ही फालतू लॉजिक लावून करावे
झुकावे पण किती?
गुलाम असावे पण किती?
आंधळे असावे पण किती?
ह्याला काही तरी मर्यादा आहेत.
पण काही आयडी नी सर्व गुलामी वृत्ती च्या मर्यादा तोडल्या आहेत.

श्रीगुरुजी's picture

27 May 2022 - 5:38 pm | श्रीगुरुजी

आर्यनला पकडल्यानंतर नवाब मलिकने चवताळून समीर वानखेडे व एनसीबी विरूद्ध अनेक बिनबुडाच्या आरोपांचा भडीमार केला होता. वानखेडेंच्या पहिल्या पत्नीपासून या प्रकरणाशी कोणताही संबंध नसलेली वानखेडेंची अत्यंत खाजगी माहिती चव्हाट्यावर आणून असभ्यतेच्या सर्व मर्यादा मोडल्या गेल्या. यामागील मुख्य कारण होते समीर वानखेडेंनी मलिकच्या जावयाला अंमली पदार्थांच्या मुद्देमालासहीत पकडल्याने तो ८ महिने तुरूंगात होता. त्यामुळे मलिकचा तिळपापड झाला होता. मी वानखेडेंची नोकरी घालवून त्यांना तुरूंगात पाठविणार अशी भीष्मप्रतिज्ञा मलिकने केली होती. पण त्यामुळे मलिकविरूद्धची अत्यंत गंभीर प्रकरणे बाहेर येऊन आता मागील ३ महिन्यांपासून मलिकच तुरूंगात आहे.

दुसरीकडे शाहरूखने या प्रकरणात अजिबात तोंड उघडले नाही. कोणावरही दोषारोप केले नाहीत. आपण नवाब मलिकने केलेल्या आरोपांशी सहमत नाही एवढेच आर्यनच्या वकीलांनी न्यायालयात सांगितले. त्या काळात शाहरुख दिल्लीला जाऊन गुपचूप मोदी-शहांना भेटल्याचेही वाचले होते. कोणावरही जाहीर दोषारोप न करता लवकरात लवकर मुलाला सोडविण्याचा त्याने पुरेपूर प्रयत्न केला.

आता बहुतेक त्याचीच फलश्रुती म्हणून आरोपपत्रातून आर्यनचे नाव वगळण्यात आले आहे.

जेम्स वांड's picture

27 May 2022 - 5:50 pm | जेम्स वांड

नवाब मलिक हा विषयच पूर्णतः वेगळा आहे, तुम्ही म्हणाले तसे त्याचे समीर वानखेडेंशी वाकडे आहे हे तर आता जवळपास फिक्स आहे, त्यात काहीच दुमत नाही.

आता बहुतेक त्याचीच फलश्रुती म्हणून आरोपपत्रातून आर्यनचे नाव वगळण्यात आले आहे.

शाहरुख मोदी शहांना भेटला असेल/ नसेल, त्यानं दोषारोप न करता काही केलं असेल/ नसेल, मुळात एनसीबीनंच केस डुप्लीकेट केली असेल/ नसेल, त्यांना ती केस ढिली करायला लावली असेल/नसेल

जे काही असेल/ नसेल पण कोर्टापुढे आम्ही चार्जेस मागे घेतोय म्हणून एनसीबीनं सांगितलं आहे, कागदावर, त्यामुळे आता बहुतेक, बहुदा, कदाचित, किंतु परंतु, शक्यता, अशक्यता इत्यादींना काही किंमत उरत नाही

श्रीगुरुजी's picture

27 May 2022 - 6:10 pm | श्रीगुरुजी

१२ पैकी ६ आरोपींचे नाव आरोपपत्रातून काढलेले नाही. त्यामुळे मूळ प्रकरण पूर्ण खोटे होते असे म्हणता येत नाही. अनेक खटल्यात आरोपपत्रात नाव असलेले काही आरोपी निर्दोष सुटतात तर काहींना शिक्षा होते. अगदी जोशी-अभ्यंकर खून खटल्यातही सहावा आरोपी सतीश गोरे निर्दोष सुटला होता. त्यामुळे समीर वानखेडे पूर्ण खोटे होते,आकसाने पकडले, लाच खाण्यासाठी पकडले असा अर्थ निघत नाही व त्यांच्यावर काही कारवाई होईल असे वाटत नाही.