चालु घडामोडी- आॅक्टोबर. २०२१ भाग १

शुर's picture
शुर in राजकारण
5 Oct 2021 - 3:33 pm

मागचा धागा सुपर हिट आणी हाऊसफूल झाल्याने हा नवा धागा.

प्रतिक्रिया

प्रदीप's picture

7 Oct 2021 - 5:01 pm | प्रदीप

संपूर्ण समुहा विरोधी मत अथवा आपल्याला व्यानीमी कावा करायला साथ देणाऱ्या व्यक्तीच्या मता विरोधी मत मांडणे म्हणजे ट्रोलिंग ही व्याख्या असेल तर विषयच संपतो...

माझ्या प्रतिसादावरून तुम्हाला असा अर्थबोध होत असेल, तर तुम्हीच काय, मीहि तुमच्यापुरता हा विषय येथेच संपवतो.

गॉडजिला's picture

7 Oct 2021 - 5:04 pm | गॉडजिला

मला स्वतःला राजेश यांचे प्रतिसाद अतिशय आवेशपूर्ण जरी वाटत असले तरी ते ट्रोल फार क्वचित वाटतात.

कॉमी's picture

7 Oct 2021 - 10:25 pm | कॉमी

तसं नाही. माझा रोख तुमच्यावर, (किंवा, इतर कोणत्याही पर्टीक्युलर टिकाकारावर) नाही. किंवा प्रत्येक वाईट प्रतिसादावर कोणी प्रतिसाद द्यावा असेही मला वाटत नाही.

पण विनाधार/किंवा अर्धवट माहितीवर प्रतिसाद येणे हे काही चर्चेचा स्तर खालावणारे एकमेव गोष्ट नाही. विनाकारण द्वेषपूर्ण प्रतिसाद मिपावर सर्रास दिसतात. 'शांततापूर्ण' 'जमातीचे' अमूकतमुक वैगेरे वैगेरे.

(दुपारीच एक प्रतिसाद होता. तो आणि त्याला माझा उपप्रतिसाद दोन्ही उडवले आहे. तसे असले तरी हे असले प्रतिसाद अगदी कॉमन गोष्ट आहे मिपावर. )

hrkorde's picture

6 Oct 2021 - 3:47 pm | hrkorde

मुंबई: मुंबईच्या समुद्रात क्रुझवरील पार्टीवर एनसीबीने टाकलेला छापा पूर्णपणे बनावट आणि एका योजनेद्वारे करण्यात आला असून आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांच्यासारख्या हायप्रोफाइल आरोपींना भाजपचे पदाधिकारी पकडून ओढत नेत होते, असे सांगतानाच क्रूझवर कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ सापडले नसल्याचा स्फोटक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. (the ncb raid on the drug party on the cruise is fake the bjp is behind this an explosive claim made by minister nawab malik)

हा स्फोटक दावा करताना नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत काही व्हिडिओ आणि फोटो दाखवले. या फोटो आणि व्हिडिओमध्ये काही लोक आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना अटक करून ओढत नेत होते. हे पकडून नेणाऱ्या लोकांमध्ये जे. पी. गोसावी आणि मनीष भानुशाली यांचा समावेश आहे. मनीष भानुशाली हे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असून त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, आशीष शेलार अशा नेत्यांसोबत फोटो आहेत. जे. पी. गोसावी हे देखील भाजपचे पदाधिकारी आहेत. असे असताना हे लोक एनसीबीच्या छापेमारीत कसे?, गोसावी आणि भानुशाली यांचा एनसीबीशी संबंध काय, असे सवाल उपस्थित करत याचा खुलासा एनसीबीने करावा असे आवाहन नवाब मलिक यांनी केला आहे.

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/the-ncb-raid-on-the...

hrkorde's picture

6 Oct 2021 - 3:56 pm | hrkorde

https://mobile.twitter.com/ANI/status/1444650592337424390?ref_src=twsrc%...

एन सी बी म्हणते तो आमचा माणूस नव्हे

Rajesh188's picture

6 Oct 2021 - 3:52 pm | Rajesh188

देश स्वतंत्र झाल्या नंतर ह्या काही वर्षातच लोकांनी मोठी चूक केली आणि आतापर्यंत पहिल्या जुन्या जाणत्या लोकांनी ज्यांना सत्ता दिली नाही त्या bjp ला सत्ता दिली.
आता त्याची किंमत देश भोगत आहे.
ही लोक सत्तेवर राहिले तर भारताचे भविष्य अंधारमय आहे
असे खेदाने बोलावे लागत आहे .ह्यांचे कारनामे बघून.

नावातकायआहे's picture

6 Oct 2021 - 4:17 pm | नावातकायआहे

क्रांति करा क्रांति!
भट शेटजीचे सरकार २०२४ ला किंवा त्याच्याआधिच, आजच उलथवुन टाका. (जमल्यास). तो पर्यंत कुढत रहा! :-)

hrkorde's picture

6 Oct 2021 - 4:51 pm | hrkorde

भटास प्रसाद आवडे
शेठास धनावडे

नावात काय आहे ?

धनावडे's picture

6 Oct 2021 - 6:39 pm | धनावडे

तुम्हाला पावती आली का ते सांगा, कि तुम्ही पैसे भरून कोरडे राहिलात.

तुम्ही एवढे रिकामे असता का हो काहीही प्रतिसाद देत असता.

प्रसाद_१९८२'s picture

6 Oct 2021 - 4:40 pm | प्रसाद_१९८२

एकुणच तुमचे, इथले बिंडोक प्रतिसाद बघून, तुम्ही आणखी काही दिवस मिपावर राहिलात तर मिपावरिल चर्चात्मक धाग्यांचे भविष्य अंधारमय आहे असे खेदाने बोलावे लागत आहे.

श्रीगुरुजी's picture

6 Oct 2021 - 5:16 pm | श्रीगुरुजी

+ १८८

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

6 Oct 2021 - 5:07 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

नबाब मलिक विचारतात "हा मनिष भानुशाली त्या ठिकाणी कसा?"
माझ्यामते हे दुय्यम आहे. राजकीय नेत्यांचे खबरे सगळीकडे असतात. भानुशाली भाजपाचे आहेत की कुठल्या पक्षाचे, त्याने काय फरक पडतो?
ड्रग्ज सापडलीच नसती तर एव्हाना शहारूख् खान व ईतर उद्योगपती, ज्यांच्या मुलाना अटक झाली, त्या सर्वानी पत्र्कार परिषद घेऊन खुलासा केला असता.

hrkorde's picture

6 Oct 2021 - 5:28 pm | hrkorde

मुंबई अतिरेकी हल्ला प्रकरणात सरकारी मंत्र्याबरोबर रामगोपाल वर्मा दिसला होता, तर मंत्र्याने राजीनामा दिला होता ना ?

एन सी बी चे कार्यक्रम भाजपनेत्यास आगाऊ समजत असतील , तर मग कारवाई गुप्त कशी झाली म्हणे ?

https://www.loksatta.com/photos/news/2618688/aryan-khan-drugs-case-ncp-a...

श्रीगुरुजी's picture

6 Oct 2021 - 5:35 pm | श्रीगुरुजी

त्या जहाजावरील छाप्यात कणभरही अंमली पदार्थ सापडले नाही, हे अमली पदार्थ विकणाऱ्याच्या या सासऱ्याला कसं समजलं? त्या छाप्यात याचीही माणसे होती का?

hrkorde's picture

6 Oct 2021 - 5:46 pm | hrkorde

माणसं ह्याची की त्याची हा मुद्दा दुय्यम आहे.

विश्वगुरु मोदी सरकारमध्ये एन सी बी अभेद्य नाही , असे म्हणावे का ?

कपिलमुनी's picture

6 Oct 2021 - 5:57 pm | कपिलमुनी

r

उद्या एखाद्याला पोलिसां ऐवजी भाजप कार्यकर्त्याने अटक केलेली चालेल का माई?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

7 Oct 2021 - 11:55 am | माईसाहेब कुरसूंदीकर

ट्रेनमध्ये/बसमध्ये कधी पाकीटमार पकडला जातो. तेव्हा आजुबाजुचे लोकच त्याला पकडुन पोलिसाच्या हवाली करतात ना ? की "तुम्ही मला पकडणारे कोण?" असे चोर लोकांना विचारतो? अनेक ठिकाणी तर चोप बसतो.

ट्रेनमध्ये चोर पकडणे , इन्कम टॅक्सची रेड , एनसीबी रेड , सर्जिकल स्ट्राईक सगळेच एकच काय गं ?

श्रीगुरुजी's picture

7 Oct 2021 - 12:42 pm | श्रीगुरुजी

माईंच्या तार्किक युक्तिवादाला तोड नाही.

सरकार आणि पक्ष यांच्यातील सीमारेषा पुसट होत चालली आहे.

हिटलर च्या एस एस ची आठवण व्हावी अशा घटना आहेत.

श्रीगुरुजी's picture

6 Oct 2021 - 6:20 pm | श्रीगुरुजी

मनीष भानुशाली व इतर ४-५ जण पंचनाम्याचे साक्षीदार होते.

छाप्यात कोण होते याला फारसे महत्त्व नाही. अंमली पदार्थ पुरविणारे, बाळगणारे व अंमली पदार्थांचे सेवन करणारे पकडले गेले फक्त यालाच महत्त्व आहे.

hrkorde's picture

6 Oct 2021 - 6:45 pm | hrkorde

साक्षीदारही होता आणि त्यानेच ह्याची पूर्वसूचना एन सी बीला दिली होती म्हणे.

hrkorde's picture

6 Oct 2021 - 10:28 pm | hrkorde

के पी गोसावी म्हणजे किरण गोसावी की काय ?

नोकरी देतो असे सांगून 3 लाख लुबाडले म्हणून केस सुरू आहे , तो हाच का ?

https://punemirror.indiatimes.com/pune/crime/man-duped-of-rs-3l-against-...

https://www.thelallantop.com/jhamajham/who-is-kiran-gosavi-whose-selfie-...

अब आते हैं उस फोटो पर जो इस खबर में सबसे पहले लगी. इस फोटो में आर्यन के साथ नज़र आ रहे व्यक्ति का नाम किरण गोसावी बताया जा रहा है. NCP नेताओं के मुताबिक ये एक प्राइवेट डिटेक्टिव है. 2018 में गोसावी के खिलाफ पुणे में एक धोखाधड़ी का मामला भी दर्ज हो रखा है. ये भाई सा’ब KPG Dreamz Solutions नाम की एक कंपनी चलाते थे. कहा जा रहा है कि इनकी कंपनी लोगों की विदेश में नौकरी लगाने के नाम पर चूना लगाती थी.

Rajesh188's picture

6 Oct 2021 - 6:35 pm | Rajesh188

कुठे गायब झाला आहे त्याला पण bjp कार्यकर्त्यांना शोधायला सांगा.त्यांना नक्की माहीत असेल.

श्रीगुरुजी's picture

6 Oct 2021 - 7:13 pm | श्रीगुरुजी

अनिल देशमुख सापडला की परमवीर पण सापडेल. नवाब मलिकला शोधायला सांगा.

रात्रीचे चांदणे's picture

6 Oct 2021 - 6:40 pm | रात्रीचे चांदणे

केवळ केंद्रीय यंत्रणांनी कारवाई केल्यामुळे काही पक्ष कारवाईला आणि भाजपाला विरोध करत आहेत.

Rajesh188's picture

6 Oct 2021 - 7:01 pm | Rajesh188

शेतकऱ्यांना कोणी चिरडले हे अजुन शक्तिशाली bjp सरकार,कार्यकर्ते ह्यांना अजुन शोधता आले नाही.
अजुन गुन्हा दाखल नाही,अटक नाही.उलट विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक होते.
हा कुठला कायदा सुव्यवस्था राखण्याच प्रकार आहे.
काही समजत नाही.

hrkorde's picture

6 Oct 2021 - 7:10 pm | hrkorde

त्याला योगीजींनी एस आय टी नेमली आहे

युपी इलेक्शन होईस्तोवर आरोपी बहुतेक मिळणार नाही

hrkorde's picture

6 Oct 2021 - 7:19 pm | hrkorde

बाकी आर्यन खानने कोकेन घेणे , तळीरामने दारू पिणे , गल्लीतल्या बाळ्याने बिडी ओढणे आणि कॉलेजला गेल्यावर चिन्मयने सिगरेट ओढणे .

पैसा हा मुद्दा सोडला तर नैतिक अधःपतन सर्वात सारखेच आहे की भिन्न आहे ?

नैतिक अधःपतन कुठून आले ह्यात ? शाहरुख खानचा पोर्टा सोडला तर इतरांचे कृत्य बेकायदेशीर सुद्धा नाहीये.

कॉमी's picture

6 Oct 2021 - 7:31 pm | कॉमी

पण हो,

तुमचा मुद्दा योग्यच. सगळ्यांचे नैतिक अधःपतन हे सारखेच आहे- being - कोणतेच नैतिक अधःपतन नाही.

सुबोध खरे's picture

6 Oct 2021 - 7:46 pm | सुबोध खरे

कोकेन आणि दारु /सिगारेट/ विडी हे एकाच तराजू तोलताय?

ते हि डॉक्टर असून?

श्रीगुरुजी's picture

6 Oct 2021 - 8:25 pm | श्रीगुरुजी

कोण डॉक्टर आहे?

रात्रीचे चांदणे's picture

6 Oct 2021 - 8:31 pm | रात्रीचे चांदणे

BLACKCAT उर्फ hrkorde

श्रीगुरुजी's picture

6 Oct 2021 - 8:31 pm | श्रीगुरुजी

गैरसमज आहे

Rajesh188's picture

6 Oct 2021 - 8:58 pm | Rajesh188

ह्या विषयावर त्यांनी मत व्यक्त केले आहे.
बाकी व्यसन आणि ड्रग चे ह्या मध्ये नैतिकतेचे adhipatan एक सारखेच आहे.. .
ह्या सर्व गोष्टी अनैतिक आहेत त्या मुळे समाजाला ,आरोग्याला धोका निर्माण होतो.
ह्या सर्वांचे व्यसन लागते.
दारू आणि ड्रग एकसारखेच परिणाम करतात असे ते म्हणाले नाही.
त्या मुळे ते डॉक्टर आहेत की कोण आहेत हा प्रश्न च नाही.
असे पण एक महान डॉक्टर नी सल्ला दिला होता उष्ण प्रदेशात corona पसरणार नाही कारण तो विषाणू त्या तापमानात जिवंत राहू शकत नाही.
पुढे काय झाले उष्ण प्रदेशात ते जग जाहीर आहे

hrkorde's picture

6 Oct 2021 - 10:03 pm | hrkorde

मी तुलना व्यसनांची केली नाही.

तुलना व्यसनी लोकांची केली आहे.

राजेश साहेबांना समजले , डॉकटरना मात्र समजले नाही.

सुबोध खरे's picture

8 Oct 2021 - 10:27 am | सुबोध खरे

तंबाखूचे व्यसन आणि कोकेनचे व्यसन एकाच पातळीवर धरत असला तर धन्य आहे तुमची आणि तुमच्या शिक्षणाची.

तंबाखू आपल्याला कोपर्या कोपऱ्यावर अधिकृतपणे मिळतो.

कोकेन स्वतःच्या सेवनासाठी बाळगणे हा सुद्धा गुन्हा आहे

एवढा साधा फरक समजत नसेल तर धन्य आहे.

राजेश १८८

आपल्या अफाट बुद्धिमत्ते बद्दल आणि मानसिक पातळीबद्दल मला काहीच म्हणायचे नाही.

बाकी चालू द्या

दोन्ही व्यसने एकसमान असे कुणी म्हटले नाही

कोकेन वापरणे गुन्हा नाही असेही कुणी म्हटले नाही

रामदास२९'s picture

6 Oct 2021 - 10:21 pm | रामदास२९

व्यसन कोणीही केल तरी ते चूकच.. पण ज्यान्चे करोडोन्नी पाठीराखे आहेत त्यान्नी तर करणे, कळत नकळत व्यसन्नाना प्रोत्साहन देणे हा तर अक्षम्य अपराध आहे.. आणि हिन्दी चित्रपटस्रुष्टी ताब्यात घेऊन ( १९८० नन्तर) आपले शत्रूदेश ते करण्याचा प्रयत्न करत आहेत.. कारण खेडेगावातल्या, शहरातल्या लोकान्ना चित्रपटान्च अतीव आकर्षण असत...

hrkorde's picture

6 Oct 2021 - 8:27 pm | hrkorde

ह्या निमित्ताने एक जुनी दंतकथा जीवित करणे सुरू झाले आहे. 2001 मध्ये राहुलजी गांधीजी कुठेतरी ड्रगसह सापडले म्हणे , मग सोनियाजी गांधीजी गदगदून रडल्या म्हणे आणि मग तत्कालीन पंतप्रधान व शायनिंग इंडियाचे फादर श्री अटलजी बाजपेयीजी ह्यांनी त्यांना वाचवले होते म्हणे.

हे त्याचे फॅक्ट चेक

https://www.thehindu.com/news/national/fact-check-was-rahul-gandhi-arres...

hrkorde's picture

6 Oct 2021 - 10:09 pm | hrkorde

आज मार्केट पडले , झुनझुनवाल्याला पनवती भेटली की काय ?

रामदास२९'s picture

6 Oct 2021 - 10:13 pm | रामदास२९

एका तथाकथित बादशहाचे पोरग .. रन्गेहात पकडल गेल्याने .. महा-गाडी सरकार मधील पिल्लावळ (खानावळ) कशी सैरभैर झाली आहे.. जर काही सापडल नसत तर आत्तापर्यन्त बोम्बाबोम्ब केली असती.. बादशहा त्याचे दुबई , पाकिस्तान मधले हस्तक वरमले हे नक्कि ..

hrkorde's picture

6 Oct 2021 - 10:17 pm | hrkorde

उद्या बादशहा आणि दिल्लीश्वर ह्यांनी एकत्र पतंग उडवला तर तुम्ही सैरभैर होऊ नका

रामदास२९'s picture

6 Oct 2021 - 11:01 pm | रामदास२९

दिल्लीश्वर = राऊल मायनो आणि बियान्का ना.. ते तर फार पूर्वीपासून जवळ आहेत .. बादशहाला २०१४ मध्ये कोन्ग्रेस लोकसभा उमेदवारी देणार होत.. पुढे पण देऊ शकत..

hrkorde's picture

6 Oct 2021 - 10:18 pm | hrkorde

रावणाची भूमिका करणारे श्री अरविंद त्रिवेदी ह्यांचे 82 व्या वर्षी निधन. श्रद्धांजली

रावसाहेब चिंगभूतकर's picture

6 Oct 2021 - 11:35 pm | रावसाहेब चिंगभूतकर

अतिशय मनोरंजक धागा आहे

रावसाहेब चिंगभूतकर's picture

7 Oct 2021 - 10:28 am | रावसाहेब चिंगभूतकर

सोमवारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी यूपी मधल्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात बंद पाळण्याचे जाहीर केले आहे. हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, पण तो सरकारतर्फे न घेता पक्षांतर्फे घेण्याचे जाहीर करण्यात आले. हसावं की रडावं

Rajesh188's picture

7 Oct 2021 - 10:59 am | Rajesh188

भविष्य तसेच दिसत आहे lakhimpur च्या घटनेचा परिणाम येत्या निवडणुकीत दिसेल.
जनमत bjp विरोधी होण्याला lakhimpur ची घटना कारणीभूत ठरेल.
एकदा यूपी पडले की बाकी काय शिल्लक राहणार.