बजेट ब्लुटूथ हेडफोन्स खरेदी २०२१

कंजूस's picture
कंजूस in तंत्रजगत
7 Aug 2021 - 3:23 pm

बजेट ब्लुटूथ हेडफोन्स खरेदी २०२१

खरडफळ्यावर याबद्दल चर्चा झाली .
तिथले प्रतिसाद इकडे कॅापी करता येत नाहीत कारण ते मिपाधोरणाविरुद्ध आहे. त्यामुळे मुख्य मुद्दे लिहीत आहे.

या अगोदरचे मिसळपाव साइटवरचे मदनबाण यांचे हेडफोन्सचे धागे -

अनबॉक्सिंग ऑडियो टेक्निका ATH-M20X
https://www.misalpav.com/node/39198

अनबॉक्सिंग सेनहायजर सी एक्स ३.० -
https://www.misalpav.com/node/35455
------------------

अमेझोनवर फ्रीडम सेल आहे त्यातुन काल Zeb Thunder हेडफोन घेतला ७०० रुपयांना.

कनेक्टिविटी आणि इतर फीचर्स

१) यामध्ये ब्लुटूथ कनेक्टिविटी आहेच शिवाय वायरही जोडता येते ती दिलेली आहे. Battery down झाल्यास वायर्ड हेडफोन्स म्हणून वापरता येईल.
एका खोलीत फोन ठेवून घरात दुसऱ्या खोलीत हेडफोन्सने ऐकण्यात अडचण आली नाही. ब्लुटूथ रेंज चांगली आहे.
फोनला 'Zeb Thunder' या नावाने लगेच हुकप/ लॅाक होतो.

२) battery ६-९ तास अर्ध्या वॅाल्युम सेटिंगवर पुरेल लिहिलं आहे. हे तपासायचं आहे. चार्जिंग टाइम दीड तास आहे. एक amp 5 वोल्टस - 5 watts charger ने चार्ज करून पाहिलं.

३) आवाज 110 dB
पुरेसा मोठा आहे.

४) एफएम रेडियो सुविधा आतच आहे. टेस्ट केलं पण कोणतंही स्टेशन पकडलं नाही.

मोबाइल फोनमधले ओनलाईन रेडियो ऐकून पाहिले आवाज उत्तम आहे. एखादी प्लेलिस्ट ऐकत असल्यास हेडफोन्सवरच्या बटणाने गाणी बदलता येतात.

५) मेमरी कार्ड स्लॅाट आहे. कार्डावरची गाणी ऐकता येतील.

६) रचना
वजन १५० ग्राम. हलका. नाजुक.
लंबगोल padding च्या आत ४ सेंमिचे स्पीकरस/ ड्राइवरस आहेत. पट्टा कपाळाकडे किंवा मागे सरकत / सरकवता येत नाही. padding रेक्झीन गरम होते. त्यास सुती कापड लावायला हवे. तीन बटण्स आवाज कमी अधिक करायला किंवा गाणी बदलण्यासाठी, ब्लुटूथ/एफेम बदलण्यासाठी आहेत. एक ओनओफसाठी.
माइक्रोफोन चांगला चालतोय कॅाल्ससाठी किंवा गूगल असिस्टंट वॅाइस सुचनांसाठी. चांगला आहे.

७) साउंड क्वालटी. चांगली. स्पष्ट. Bass चांगला. बुस्टर नाही. बेस हाइ लो करायचे बटण नाही. ते फोनमधूनच करावं लागेल.

-------
" याचा bass कसा आहे?"
- यातले ड्राइवर्स ४० एमएमचे आहेत म्हणजे संगीत ऐकण्यासाठी ओके."

---------
"तीन प्रकारचे हेडफोन्स असतात.
१)इनइअर - कानात खुपसायचे. बाहेरील आवाज घुसत नाही. झोपून / कुशीवर
लोळून ऐकू शकतो. २)ओन इअर - कानावर बसतात. झोपून ऐकताना नेहमी छत बघावे लागते. बाहेरील गोंगाट ऐकू येतो. ३) ओवर द इअर - कानापेक्षा मोठे पण बाहेरचा गोंगाट कमी करतात. "
----
" पण हा zeb thunder कसा आवाज देईल? ट्रिबल , बेस ऐकता येईल का? आणि इंग्रजी चित्रपटातले संवाद ऐकायला उपयोग होईल का? Boat कंपनीचे हेडफोन्स कसे आहेत?"

------
" boat मध्ये दमदार bass आहे."

-----
"ओवर द इअर टाइपमध्ये दुकानात ब्लुटूथ वरायटीत २५००- ३००० किंमत आहे. त्यामुळे ७०० रु म्हटल्यावर घेतला."

--------
" ७०० रु ? चार्जिंग टिकायला हवे. वायर्ड बरे.

-----
"यात वायरची सोयही दिली आहे. "

--------
"आणखी काही हाइ एंड महागडे प्रकार आहेत त्यांचा realtime रिव्यु युट्युबवर geekyranjeet channel वर पाहा. यात active / dynamic noise cancellation असते. "
-----------

तर हा धागा बजेट हेडफोन्स माहिती करता समजु शकता.

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

8 Sep 2021 - 11:28 pm | गॉडजिला

मग ?

कंजूस's picture

9 Sep 2021 - 6:40 am | कंजूस

ड्रायव्हिंग करताना समजदार लोक वापरत असतात ??
कसली समज?
नियमाने ड्रायव्हिंग करताना मोबाईल,फोन,कानाची उपकरणे वापरणे धोकादायक आणि बंदी आहे.

मला वायरलेस हेडफोन्सची जरा भिती वाटते, कारण त्याची बॅटरी जर चांगल्या दर्जाची नसेल तर ब्लास्ट होऊ शकतो. मागच्या महिन्यात अशी घटना जयपुर मधे घडलेली आहे.
संदर्भ :- Bluetooth earphones explode, kills 15-year-old boy in Jaipur

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Ganpati Bappa Lavkar Ya | New Ganpati Song 2021| Pranjal Mandlik

कोकीळ's picture

11 Sep 2021 - 3:23 pm | कोकीळ

You tube चॅनेल बाळ अवस्थेत आहे, त्यासाठी ट्रायपॉड, रिंग लाईट, माइक कुठला घ्यावा?
इंटरेस्ट सम्पला थोड्या महिन्यांनी तर फार पैसे वाया जायला नको

प्रश्नाची जागा चुकली तर क्षमस्व
कृपया हा प्रश्न विचारण्यास योग्य ठिकाण सुचवावे

कोकीळ's picture

11 Sep 2021 - 3:23 pm | कोकीळ

You tube चॅनेल बाळ अवस्थेत आहे, त्यासाठी ट्रायपॉड, रिंग लाईट, माइक कुठला घ्यावा?
इंटरेस्ट सम्पला थोड्या महिन्यांनी तर फार पैसे वाया जायला नको

प्रश्नाची जागा चुकली तर क्षमस्व
कृपया हा प्रश्न विचारण्यास योग्य ठिकाण सुचवावे

कंजूस's picture

11 Sep 2021 - 7:11 pm | कंजूस

प्रथम microphone घ्या.

वायर्ड / ब्लुटूथ ? ( रु २५० ते पुढे)

मोबाईलला वायर जोडायचे स्वस्त असतात पण jack कोणता ते
TRS TRRS CABLE for microphone.
https://youtu.be/rWTOXD9lVr4
इथे दिलंय.

मग अगदी सेल्फी स्टिक ते गिंबल( १५०रु ते १५ह)

मग स्टँड वजनाप्रमाणे. कारण औटडोरसला वारा असतोच.

मोबाईलसाठी camera app उदाहरणार्थ
professional hd camera

यातून विडिओ सुरू आणि बंद करायचा टाइमर मिळतो. कुठे एकटे असताना ब्लॉगिंगसाठी उपयोगी.

विडिओ एडिटिंग app. यात फ्री वर्शनात थोड्या गोष्टी करता येतात. पीसी, सॉफ्टवेर महागात जाते पण इफेक्टस टाकता येतात.

थोडक्यात दिलंय.

कोकीळ's picture

11 Sep 2021 - 9:26 pm | कोकीळ

खूप खूप धन्यवाद

गणेशा's picture

12 Sep 2021 - 4:38 pm | गणेशा

मी jbl चे earphone ३ वर्षांपासून वापरतो..
खालील दोन्ही earphone आहेत माझ्याकडे..

१.
Wired - jbl endurance run by harman जबरदस्त आहेत, गाणी भारी वाजतात.. बास क्या कहना... अप्रतिम निव्वळ अप्रतिम..
Running किंवा इतर work ला भारी वाटतात.. Sweat proof असल्याने

२.
True wireless
-
Jbl t३०० tws
Easy for communication, battry संपलेली तर मला आठवत पण नाही.

ते डोक्याच्या /कानाच्या मागे wire असणारे मला कधी आवडत नाहीत..
एक तर पुर्ण wire असलेले हवेत, किंवा पुर्ण wireless...