लोकसंख्या वाढीचा बागुलबुवा

साहना's picture
साहना in काथ्याकूट
7 Feb 2021 - 1:32 pm
गाभा: 

खालील ध्याग्यावर दिलेली प्रतिक्रिया थोडी खूपच लांब झाली म्हणून इथे वेगळा लेख म्हणून पाडत आहे.
https://misalpav.com/node/48280

पाश्चात्य देशांत २-३ दशकांनी एक नवीन पोपट निर्माण होतो. मग हा विषय घेऊन तेथीतील हस्तदंती मनोऱ्यातील लोक येथेच्छ प्रोपागंडा करून लोकांची प्रचंड प्रमाणात दिशाभूल करतात.

महायुद्धानंतर निर्माण झाला तो बागुलबुवा लोकसंख्या वाढीचा आणि हा बागुलबुवा बऱ्याच काळ चालला. भारतासारख्ग रीब देश ह्या विदेशी प्रोपागंडाला जास्त डोके न चालविता बळी पडतात. (सध्या बागुलबुवा वातावरण बदलाचा आहे आणि तो सुद्धा तितकाच दांभिक पणाचा आहे).

लोकसंख्या वाढीचे परिणाम समजण्यासाठी भौतिक शास्त्र किंवा जीवशास्त्र पूर्णपणे निरर्थक आहे. त्यासाठी अर्थशास्त्र समाजणे जरुरीचे आहे. ह्या संदर्भांत अमेरिकेतील १९८० मधील सायमन-एहरलीच हि पैज वाचणे मनोरंजक ठरेल. तर अर्थतज्द्न्य जुलिअन सायमन आणि जीवशास्त्री पॉल एहरलीच ह्यांच्यात एक मोठी जाहीर पैज लागली. १९६८ साली पॉल ह्यांनी पॉप्युलेशन एक्सप्लोजन नावाचे एक भयंकर प्रसिद्ध पुस्तक लिहिले. त्यांच्या मते लोकसंख्या वाढ तात्काळ थाम्बवली नाही तर जगांत प्रचंड अन्न कमतरता होऊन कोट्यवधी लोक मरणार होते. ह्या पुस्तकाने खळबळ माचवली आणि ह्यांच्या नादाला लागून गोऱ्या लोकांनी मुले निर्माण करणे कमी केले (ज्याची फळे ते आज भोगत आहेत). भारत, चीन आणि अनेक देशांनी जास्त विचार न करता विविध योजना राबवून लोकसंख्या वाढ म्हणजे जणू काही भस्मासुर आहे असा प्रोपागंडा निर्माण केला.

ज्युलियन सायमन ह्यांनी त्यांची हि भविष्यवाणी साफ खोटी ठरणार आहे असे जाहीर रित्या प्रकाशित केले आणि १० हजार डॉलर्स ची जाहीर पैज लावली. पैजेच्या नुसार ज्युलियन ह्यांचे म्हणणे होते कि बहुतेक संसाधनाचा तुटवडा तर असणार नाहीच पण वर तीच संसाधने स्वस्त सुद्धा असणार आहे. १९९० साली जुलिअन सायमन हे पैज सहज, म्हणजे अगदी मोठ्या फरकाने जिंकले. त्या दहा वर्षांत जगाची लोकसंख्या सुमारे ८०० दशलक्ष वाढली पण जे ५ धातू त्यांनी निवडले होते त्यांची किंमत बऱ्यापैकी कमी झाली होती.

लोकसंख्या वाढीचे काहीच वाईट परिणाम आहेत असे नाही. लोकसंख्या वाढीचे अनेक वाईट परिणाम आहेत. पण जगांत नक्की किती लोक असायला पाहिजेत हे सुद्धा कोणीही निर्धारित करू शकत नाही. बहुतेकांना लोकसंख्यावाढीचे वाईट परिणाम दिसतात पण त्याचे असंख्य चांगले फायदे दिसत नाहीत. लोकसंख्या कमी झाली तर हे अनेक फायदे गायब होतीलच पण त्या फायद्यांना आम्ही मुकलो आहोत हे सुद्धा समजणार नाही.

सोपे उदाहरण घेऊया. पोलिओ ची लस हि आमच्या साठी वरदान ठरली आहे ह्यांत काहीच दुमत नाही. अक्षरशः कोट्यवधी मुलांचा जीव ह्या लसीने वाचवला आहे. पण फक्त लसच नाही तर अनेक औषधे निर्माण झाली आहेत त्यामुळे आम्हा सर्वांचेच जीवन जास्त सुखकर झाले आहे. तर हि औषधे कशी निर्माण होता ? अक्षरशः हजारो लोकांचे परिश्रम ह्यांत गुंतले असतात. जगाच्या पाठीवर जितके जास्त डॉक्टर, संशोधक आहेत तितकी जास्त औषधांचा शोध लागतो. आज देशाची लोकसंख्या ७ अब्ज ऐवजी ४ अब्ज असती तर मार्केट मधील अनेक औषधें गायब झाली असती. पण मी फक्त औषधांचे उदाहरण दिले आहे. सॉफ्टवेर पासून, टीव्ही वरील विविध चॅनेल पर्यंत अनेक गोष्टी गायब झाल्या असत्या आणि आम्हा सर्वांचा जीवनमानाचा स्तर खूपच खाली गेला असता.

तुमहाला आवडत असलेली कुठलीही गोष्ट घ्या. समजा तुम्हाला तुमचा फोन आवडतो. ह्या फोनच्या निर्मितीसाठी हजारो पेटंटन्स लागली आहेत आणि अक्षरशः लक्षावधी विविध छोटे छोटे शोध अनेक लोकांनी निर्माण केले आहेत. आणि ह्यांत जो एकूण मानवी वेळ गेला आहे त्याची जर बेरीज केली तर कदाचित कोट्यवधी मनुष्य-तास त्या फोन चा शोध लावण्यासाठी खर्च झाले आहेत. समजा देशाची लोकसंख्या अर्धी असती तर तितके मनुष्यतास खर्च होण्यासाठी दुप्पट वेळ लागला असता आणि फोन आपल्या हाती येण्यासाठी २०२० ऐवजी कदाचित २०४० वर्ष लागले असते.

अर्थानं त्याच तर्काने आम्ही असे म्हणू शकतो कि जगाची लोकसंख्या फक्त ७ अब्ज असल्याने आज आमच्या हातात अश्या अनेक गोष्टी नाहीत ज्या कदाचित २०५० मध्ये आमच्या हाती असतील. आज जगाची लोकसंख्या १४ अब्ज असती तर कदाचित आणखीन अजब साधने आणि तंत्रज्ञान आमच्या हाती असते.

> अहो पण लोकसंख्या अशीच वाढत राहिल्यास पर्यावरणाचे काय ?

हा मुद्दा अनेक लोक वर काढतात आणि काही प्रमाणात तो रास्त सुद्धा आहे. पहिली गोष्ट म्हणजे जसे जीवनमान उंचावते आणि लोक जास्त काळ जगू लागतात त्याच वेळी लोकांना मुलें नकोशी होतात. आमच्या आजोबांच्या काळी खाण्यापिण्याचे वांधे होते त्यामुळे लोक दिवसभर काबाडकष्ट करायचे आणि रात्रभर प्रजनन करायचे. महिलांची अवस्था फक्त चूल आणि मूल अशी होती. पण त्यांची चूक नव्हती. रात्री आणखी करणार काय ? मग ४०-५० वर्षांत हृदयविकाराचा झटका वगैरे येऊन मृत्यू.

आता जीवनमानाचा स्तर उंचावलाय. गर्भनिरोधक आल्याने शरीरसुख घेता येते आणि प्रजनन रोखता येते. रोमान्स ची व्याख्या रुंदावलीय. आता जोडपी चित्रपट पाहतात, दिनार करतात, कुठे फिरायला वगैरे जातात. पुस्तके वाचतात आणि नेटफ्लिकस पाहतात. त्याशिवाय प्रत्येक वेळी फिरायला वगैरे जाताना लक्षांत येते कि जास्त मुले म्हणजे खूपच जास्त खर्च त्यामुले फार तर एक दोन मुले खूप होतात. ह्यामुळे आपसूकच जन्मदर खालावत जातो. ह्या दृष्टिकोनातून कर्वे हे खूपच दूरदर्शी आणि विद्वान होते.

मुले जास्त जन्माला घालण्याचे एक कारण म्हणजे मुले मारण्याचे प्रमाण सुद्धा खूप होते. आता ते कमी झाल्याने वंशाला एक दिवा असला तरी पुरतो मोठी माळ लावायची गरज नाही. परंपरागत घरे आता बंद पडत आहेत. बापाने बांधलेल्या घरांत मुलें राहू इच्छित नाहीत म्हणून "वंशाचा दिवा" हि सुद्धा जास्त डिमांड नसलेली गोष्ट झालीय.

मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च आणि लोकसंख्या वाढीचा दर हि दोन महत्वाची व्हेरिएबल्स अर्थतज्ञ पाहतात आणि दोन्ही मध्ये खूपच जास्त संबंध आहे. आणि ह्या संबंधाने मानवी लोकसंख्या चादर पाहून हात पसरेल ह्यांत मला तरी अजिबात शंका वाटत नाही.

मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च :

मार्जिनल खर्च ह्याचा अर्थ प्रत्येक ऍडिशनल मुलाच्या संगोपनासाठी खर्च किती येतो. एका मुलाचा खर्च प्रचंड असतो. कारण मूल नाही तर माता काम करू शकते. एक मूल झाले आणि तिने नोकरी सोडली तर ते पैसे येणे बंद होतात आणि त्यामुळे तो मुलाच्या संगोपनाचा खर्च ठरतो. पण एकदा नोकरी सोडल्यानंतर तिला २ मुले झाली तर त्या दुसऱ्या मुलाचा मार्जिनल खर्च खूपच कमी असतो. (एका मुलासाठी ३ लक्ष वर्षाला खर्च येतो तर दोन मुलांसाठी ३.५ लक्ष खर्च येतो इत्यादी).

जुन्या खाली हा मार्जिनल खर्च खूपच कमी असायचा कारण बहुतेक खर्च हा फक्त अन्नाचा असायचा. आता तुम्ही दुबईला किंवा किमान खंडाळ्याला जाता तर सुद्धा तिकिटाचा खर्च प्रत्येक मुलांमागे होतो तो फार असतो. ४ मुले झाली तर मग तुम्हाला ५ सीटर गाडी सुद्धा चालत नाही.

जसे जसे जीवन मान उंचावते तसे तसे मार्जिनल खर्च हा खूपच वेगाने वाढतो. मुलाला विदेशांत शिकायला पाठवायचे तर ५० लक्ष रुपये पाहिजेत. दोन मुले झाली तर मग १ कोटी. पण गरीबाच्या घरांत हे प्रश्न नसतात.

पण खर्च वाढतो म्हणजे नक्की काय होते ? माणसाला जगांत फक्त दोनच खर्च असतात. एक खर्च असतो ऊर्जेचा दुसरा खर्च असतो दुसऱ्या माणसाच्या वेळेचा. (आयफोन पासून कांदे बटाटे पर्यंत तुम्ही काहीही विकत घेतले तर तुम्ही फक्त ऊर्जा आणि दुसऱ्या लोकांचा वेळ ह्या दोनच गोष्टींचा मोबदला देत असता. समजा ह्या दोन गोष्टी अपरंपार आणि फुकट असत्या तर आयफोन आणि कांदे बटाटे ह्यांची किंमत सुद्धा शून्य असती.). खर्च वाढतो ह्याचा अर्थ तुम्ही जास्त ऊर्जा आणि मानवी वेळ खर्च करत आहात असा होतो. आपण पर्यावरणाच्या नावाने बोंब मारतो तेंव्हा पर्यावरणाला होणारी हानी हि १००% ऊर्जा ह्या एका संसाधना द्वारे तुंबलेली जाऊ शकते. पण ऊर्जा महाग असल्याने आम्ही ती हानी अन-डू करू शकत नाही. जर पर्यावरणाची हानी वाढत गेली तर ऊर्जेचा दर सुद्धा वाढत जातो आणि आणि त्यामुळे मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च.

त्यामुळे हि दोन्ही व्हेरिएबल्स एकमेकांना बॅलेन्स करतात. पण ऊर्जा हि काळाचा ओघांत स्वस्त होत गेली तर लोकसंख्या सुद्धा वाढत जाते आणि पर्यावरणाला हानी सुद्धा होत नाही. ह्या दोन्ही व्हेरिएबल्स मधील गणिती संबंध तसा स्पष्ट पणे अभ्यासाने कठीण आहे कारण लोकसंख्या वाढली कि हे लोक नवीन शोध लावून ऊर्जेचा दर आणखीन कमी करतात.

टीप : युनायटेड नेशन्स किंवा विविध तद्न्य मंडळी जगाची लोकसंख्या सुमारे २०५० मध्ये स्टेबल होईल असे भाकीत करत आहेत. मला त्यांत शंका वाटते. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या मते ऊर्जेचा खर्च येत्या २० वर्षांत १०० पटीने कमी होणार आहे. बहुतेक ऊर्जा फ्युजन सेल द्वारे किंवा इतर कुठल्या नवीन शोधांतून निर्माण होईल आणि त्यानंतर सर्वच जीवनावश्यक वस्तूंचा भाव कमालीचा पडणार आहे. ऊर्जा स्वस्त आणि मुबलक होताच, शेती, पिण्याचे पाणी वगैरे गोष्टींचा काहीही तुटवडा असणार नाही त्याशिवाय कार्बन एमिसशन वगैरे उलट करणे सहज शक्य होणार आहे. कदाचित IVF वगैरे प्रक्रिया खूपच सोप्या होऊन गरोदर न राहता सुद्धा मुले निर्माण करणे शक्य होईल आणि त्यामुळे कुठल्याही वयांत मुले निर्माण करणे शक्य होईल आणि कदाचित मंडळी जास्त मुले निर्माण करतील. अर्थांत मी हे भाकीत एखाद्या ज्योतिष्या प्रमाणे वर्तवत आहे.

टीप २ : जगांतील सर्व नैसर्गिक संसाधने हि अक्षय म्हणजे अनलिमिटेड आहेत. एकच असे संसाधन आहे जे अक्षय नाही आणि ते म्हणजे मानवी वेळ. हि संकल्पना बहुतेक इकॉनॉमिक्स च्या पुस्तकांत मंडळी गेलेली असते पण राजकीय कारणासाठी पाश्चात्य राष्ट्रांनी "लिमिटेड रिसोर्सिस" आणि "अनलिमिटेड रिसोर्सेस" किंवा "रिन्यूएबल ऊर्जा" आणि "नॉन रिन्यूएबल ऊर्जा" असल्या श्रेणी शाळांतून आम्हा मुलांच्या डोक्यांत घातल्या. हि विचारसरणी डाव्या लोकांची असून पाश्चात्य देशांतून आपल्या देशांत आली आहेत आणि त्यांत काहीही तथ्य नाही. हि गोष्ट बहुतेक लोकांना पचणार नाही किंवा पटणार नाही कारण ह्या प्रकारच्या प्रोपागंडावर आमच्या देशांत कुणीही प्रश्न विचारला नाही. कुणाला इंटरेस्ट असेल तर वेगळ्या लेखांत विस्ताराने लिहीन. प्रतिक्रिया किंवा खरडवहीवर लिहून कळवा.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

9 Feb 2021 - 9:36 pm | मुक्त विहारि

आता हे एक नविन माहिती झाले ...

बऱ्याच दिवसांनी आठवण निघाली लुनावाल्यांची!!

बाय द वे, यनावाला काय करतात सध्या?

मुक्त विहारि's picture

9 Feb 2021 - 10:04 pm | मुक्त विहारि

बरेच दिवसांत भेट झाली नाही...

सुक्या's picture

9 Feb 2021 - 11:44 pm | सुक्या

मोकलाया . . जसा मिपा चा मैलाचा दगड आहे ...
तसा श्री ब्रम्हे यांचा हा लेख .. सकाळ च्या इतिहासातला मैलाचा दगड आहे ...

डॉ. सुलभा ब्रह्मे = ज्येष्ठ मार्क्सवादी विचारवंत

त्यामुळे "या बाजूचा म्हणणं काय आहे " हे कळण्यासाठी जरूर वाचावे परंतु याचा अर्थ असा नाही कि हे प्रकाशन काही "स्वतंत्र अभ्यासक " म्हणून लिहिलेले आहे
जसा पत्रकार स्वतंत्र असावं लागतो तसे संशोधनात्मक लेखन हि

डॉक्टर अतनू डे (अर्थतज्ञ्) ह्यांनी ह्या विषयावर इंग्रजीत एक विशेष लेखमाला सुरु केली आहे.

https://atanu.wordpress.com/2021/02/08/more-people-better-earth-part-1/
https://atanu.wordpress.com/2021/02/08/more-people-better-earth-part-2/
https://atanu.wordpress.com/2021/02/09/more-people-better-earth-part-3/
https://atanu.wordpress.com/2021/02/09/more-people-better-earth-part-4/

माझ्या मते ज्यांना इंग्रजी भाषा समजते त्यांनी जरूर वाचावी. अतनू ह्यांचे शिक्षण अर्थशास्त्रांत असल्याने त्यांना ह्या विषयाची सखोल माहिती आहे.

लोकसंख्या वाढवली पाहिजे एका स्त्री नी शक्य नसेल तर चार स्त्रिया शी लग्न करा पण संख्या वाढवा .
मुल ही देवाची देणं आहेत त्यांचा थांबवू नका.
गर्भ पात करू नका,गर्भ निरोधक वापरू नका
ह्या मुस्लिम धर्माच्या शिकवणी शी येथील कट्टर मोदी भक्त आणि आणि कट्टर मुस्लिम द्वेष करणारी लोक पाठिंबा देत आहेत हे बघून खूप आनंद झाला .
असाच पाठिंबा बाकी विषयात पण द्यावा आणि हिंदू मुस्लिम ऐक्य ल पाठिंबा द्यावा..
फक्त संधी साधू पना करू नये.

चौकस२१२'s picture

10 Feb 2021 - 5:07 am | चौकस२१२

राजेश
मोदी भक्त हे तुम्ही चिकटवले आहेत अनेकांना... या वरील गोष्टी चुकीच्या आहेत म्हणायला मोदी किंवा भाजपभक्त असावे लागत नाही ...सद्सद्विवेकबुद्धी वापरणारा कोण्ही हेच म्हणेल
उलट तुम्ही पण "मोदी द्वेषाचे" पडदे जरा दूर करून गोष्टींकडे बघत चला ...विनंती

रिन्यूएबल ऊर्जा" आणि "नॉन रिन्यूएबल ऊर्जा" असल्या श्रेणी शाळांतून आम्हा मुलांच्या डोक्यांत घातल्या. हि विचारसरणी डाव्या लोकांची असून पाश्चात्य देशांतून आपल्या देशांत आली आहेत आणि त्यांत काहीही तथ्य नाही.

पटत नाही
आपण सदोहरान (सोप्पे ) सांगाल का?
एखाद्या भागातील कोळसा संपेल पण सौर ऊर्जा चालू राहील...
अर्थात आपण हे म्हणाल कि कोळसा अजून खूप आहे अजून खोल खणावे लागेल आणि ते तंत्रण्याना अजून नाही म्हणून तांत्रिक दृष्ट्या कोळसा संपलेलआ नाही! हे विधान जरी बरोबर असले तरी तो जपून वापरावा हे जास्त बरोबर नाही का ?
हे सगळे "दाव्याचे थोतांड आहे" असे म्हणणे म्हणजे "पारपम्पारिक टोकाची उजवी विचारसरणी झाली" ( पाश्चिमात्य संदर्भातील दावे उजवे म्हणतोय )
परिवारणातील बदलामुळे पाऊस एखाद्या भागात कमी झाला तर थेतील हैड्रो प्लांट चालणार नाही हे हि खरे नाही का
तसेच आपण मध्ये समुद्रचं पाण्यातून सोने यावर बोलला होतात त्याचे काही उदाहरण?
तांत्रिक दृष्ट्या असलं शक्य ते, तसे लाटेतील ऊर्जेतून वीज निर्मिती पण वर खूप वर्षे प्रयत्न चालूच आहेत कि म्हणून आपण असे म्हणतो का कि "आहे कि भरपूर ऊर्जा उपलब्ध लाटेत.. मग काय उडवा जीपा जाला पेट्रोल ( शंकर पाटलांच्या शब्दात ) नुसता दंगा झाला पाहिजे !
जबाबदारीने नैसर्गिक संपत्ती वापरा असा संदेह्स पोचवणे जास्त जरुरीचे नाही का? कि "वापर हवे तसे संपतंय कुठलं " अश्या प्रकरचाच प्रसार करणे?

> रिन्यूएबल ऊर्जा" आणि "नॉन रिन्यूएबल ऊर्जा" असल्या श्रेणी शाळांतून आम्हा मुलांच्या डोक्यांत घातल्या. हि विचारसरणी डाव्या लोकांची असून पाश्चात्य देशांतून आपल्या देशांत आली आहेत आणि त्यांत काहीही तथ्य नाही.

अमेरिकेत ऊर्जा क्षेत्र म्हणजे खनिज तेल आणि कोळसा क्षेत्र हे बहुतांशी रिपब्लिकन आहे. त्यांच्या पक्षासाठी पैसे आणि लोक इत्यादी ह्या क्षेत्रातून येतात. ह्याचे एक कारण म्हणजे हे व्यवसाय टेक्सस सारख्या रिपब्लिकन प्रदेशांत आहेत. मग एकदा ऊर्जा ह्या क्षेत्रावर पकड आली कि मग प्लास्टिक, वाहतूक इत्यादी व्यवसाय सुद्धा त्याच प्रदेशांत विकसित होऊ लागतात. राजकीय पक्ष मग आपल्या प्रतिद्वंदीच्या समर्थकांवर हल्ला करतात. म्हणून बायडेन किंवा हिलरी किंवा ओबामा इत्यादींनी अनेक वेळा खनिज तेल इंडस्ट्रीवर प्रचंड हल्ले केले आहेत. अर्थांत ते भासवतात जणू काही आपल्याला पर्यावरणाचे प्रेम आहे वगैरे पण प्रत्यक्षात हे त्यांचे प्रेम ग्रेटाच्या शेतकरी प्रेमाइतकेच संधीसाधू आणि बेगडी आहे. बायडेन ह्यांनी कीस्टोन ह्या महत्वाकांक्षी पाईपलाईन ला बंद पडले. खरे तर हि पाईपलाईन (ज्यातून खनिज तेल जाणार होते) पर्यावरणासाठी वरदान होत कारण हजारो ट्रक्स त्यामुळे बंद झाले असते.

रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट लोकांच्या भांडणात पब्लिक स्कुल आणि युनिव्हर्सिटी नेहमीच डेमोक्रॅट च्या खाली असते. त्यांनी प्रचंड प्रमाणात प्रोपागंडा सुरु केला आणि शालेय शिक्षणात खनिज तेल कसे वाईट आहे, कोळसा कसा वाईट आहे इत्यादी शिकवले. मग त्यातूनच ऊर्जेचे प्रकार म्हणून "रिन्यूवेब्ल आणि नॉन रिन्यूवेब्ल" असे प्रकार शिकवले जाऊ लागले आणि नॉन रिन्यूएबल खूप चांगले आणि नॉन रिन्यूएबल खूप वाईट असे लहान मुलांना शाळेतून शिकवले जाऊ लागले. लहान मुलांच्या चित्रकलेच्या स्पर्धेंत मग फॅक्टरी, त्यांच्या चिमणीतून येणारा धूर वगैरे चित्रे काढायला सांगितली गेली. हा सर्व मॉडेल आपल्या CBSE वगैरेंनी भारतांत जश्याचा तसा इम्पोर्ट केला. बहुतेक शिक्षण संस्था सरकार आणि त्यातल्या त्यांत डाव्या मंडळींच्या लोकांच्या हाती असल्याने त्यांनी जशाचा तसा तो मुलांच्या डोक्यांत घातला. प्रदूषण वगैरे विषय महत्वाचे आहेत आणि मुलांना त्याची इत्यंभूत माहिती असणे सुद्धा आवश्यक आहे पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून, सोशल सायन्स म्हणून नव्हे.

----

> तसेच आपण मध्ये समुद्रचं पाण्यातून सोने यावर बोलला होतात त्याचे काही उदाहरण?

https://www.nationalgeographic.com/news/2016/07/deep-sea-mining-five-facts/

> जबाबदारीने नैसर्गिक संपत्ती वापरा असा संदेह्स पोचवणे जास्त जरुरीचे नाही का? कि "वापर हवे तसे संपतंय कुठलं " अश्या प्रकरचाच प्रसार करणे?

निव्वळ वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रत्येक ऊर्जास्रोत हा वेगळा आहे आणि प्रत्येकाचे आपले फायदे तोटे आहेत. मी आपल्याशी सहमत आहे. प्रत्येक गोष्ट (नैसर्गिक संपत्तीच असे नाही) हि तारतम्य आणि जबाबदारीने लोकांनी वापरली पाहिजे पण विनाकारण आपल्या राजकारणा पटेल अश्या पद्धतीने ऊर्जास्रोतांचे वर्गीकरण बरोबर नाही.

सोलर पॅनेल्स किंवा बॅटरी जिथे जिथे वापरली जाते तिथे इथे अनेक दुर्मिळ प्रकारचे धातू वापरले जातात, खाणकाम केले जाते त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा पर्यावरणास अनेक पद्धतीने अपाय करतात. सोलर पॅनेल्स महाग आहेत किंवा पवनचक्की महाग आहेत ह्याचाच अर्थ ह्या गोष्टी शेवटी खूपच रिसोर्सेस वापरतात असा होतो. काही वेळा हे रिसोर्स नैसर्गिक असतात (उदाहरणार्थ लिथियम) तर काही वेळा मानवीय (सॉफ्टवेर बनवण्यासाठी खर्च केलेला वेळ).

< हा सर्व मॉडेल आपल्या CBSE वगैरेंनी भारतांत जश्याचा तसा इम्पोर्ट केला. बहुतेक शिक्षण संस्था सरकार आणि त्यातल्या त्यांत डाव्या मंडळींच्या लोकांच्या हाती असल्याने त्यांनी जशाचा तसा तो मुलांच्या डोक्यांत घातला. >
नक्की काय म्हाणायचंय? भारतातल्या डाव्यांनी अमेरीकेतला (म्हणजे भांडवलवादी) अभ्यासक्रम भारतात आयात केला...? तर्कात त्रुटी वाटत नाही..?

चंद्रसूर्यकुमार's picture

10 Feb 2021 - 2:08 pm | चंद्रसूर्यकुमार

भारतातल्या डाव्यांनी अमेरीकेतला (म्हणजे भांडवलवादी) अभ्यासक्रम भारतात आयात केला...? तर्कात त्रुटी वाटत नाही..?

गेल्या काही वर्षात अमेरिकेतील महत्वाची विद्यापीठे डावीकडे झुकली आहेत. त्यात हार्वर्ड, बर्कले, प्रिन्स्टन अशा आणि बराचशा मोठ्या विद्यापीठांचा समावेश आहे. उजवीकडे असलेल्या विद्यापीठांमध्ये शिकागो विद्यापीठ, रॉचेस्टर आणि मिन्नेसोटा हीच त्यातल्या त्यात नावाजलेली विद्यापीठे आहेत बाकी जॉर्ज मेसन, टेक्सस टेक वगैरे त्यामानाने विशेष न नावाजलेली विद्यापीठे आहेत. डाव्या बाजूच्या विद्यापीठांचा आकडा बराच जास्त आहे. इतकी वर्षे अमेरिकेने लढा दिला होता त्याविरूध्द तत्वे ही प्रोफेसर मंडळी शिकवतात असतात हा विरोधाभास.

असेच काहीसे, एक वाक्य ऐकलेले होते ....

रावणाला काय नव्हते ? सोन्याची लंका, सर्वांत सुंदर बायको, विद्वत्ता, पराक्रम, प्रेमळ भाऊ, महापराक्रमी पुत्र. पण शेण कुठे खाल्ले ? जंगलात राहणारी वल्कले धारण करणारी काळीकुट्ट सीता जिला रावणात काहीही रस नव्हता. आणि नेली तरी कशी ? तर भीक मागत.

आजी म्हणायची : रावणाला भिकेचे डोहाळे.

माता सीते चा काळीकुट्ट म्हणून उल्लेख केलेला आहे आणि तो पण ऐकेरी .
नक्की ह्यांचे आदर्श कोण आहेत.

जगांतील सर्व नैसर्गिक संसाधने हि अक्षय म्हणजे अनलिमिटेड आहेत. एकच असे संसाधन आहे जे अक्षय नाही आणि ते म्हणजे मानवी वेळ.हि संकल्पना बहुतेक इकॉनॉमिक्स च्या पुस्तकांत मंडळी गेलेली असते पण राजकीय कारणासाठी पाश्चात्य राष्ट्रांनी "लिमिटेड रिसोर्सिस" आणि "अनलिमिटेड रिसोर्सेस" किंवा "रिन्यूएबल ऊर्जा" आणि "नॉन रिन्यूएबल ऊर्जा" असल्या श्रेणी शाळांतून आम्हा मुलांच्या डोक्यांत घातल्या

.

हे विधान आजिबात पटले नाही.
इकॉनॉमिक्स च्या व्याख्येतसुद्धा मर्यादित साधने आणि अमर्यादित उद्दिष्टांचा उल्लेख आहे. (लायोनेल रॉबिन्स.) लिमिटेड रिसोर्स साठीचे सोप्पे उदाहरण म्हणजे जमीन. हा रिसोर्स लिमिटेड नाही का ?

माणसाला जगांत फक्त दोनच खर्च असतात. एक खर्च असतो ऊर्जेचा दुसरा खर्च असतो दुसऱ्या माणसाच्या वेळेचा. (आयफोन पासून कांदे बटाटे पर्यंत तुम्ही काहीही विकत घेतले तर तुम्ही फक्त ऊर्जा आणि दुसऱ्या लोकांचा वेळ ह्या दोनच गोष्टींचा मोबदला देत असता. समजा ह्या दोन गोष्टी अपरंपार आणि फुकट असत्या तर आयफोन आणि कांदे बटाटे ह्यांची किंमत सुद्धा शून्य असती.).

ऊर्जा पारंपरिक (नॉन-रेनयूएबल) आहे हे कसे ? इतर सर्व रिसोर्सेस मर्यादित असताना ऊर्जा कशी काय अमर्यादित ? कोळसा अमर्यादित, पण "ऊर्जा" मर्यादित ? का "ऊर्जा" सुद्धा माणसाच्या वेळेचेच एक अंग आहे ?

जर मानवी वेळ सोडुन इतर सर्व अमर्यादित आहे, तर रिसोर्स मॅनेजमेंटचे शास्त्र, अर्थात इकॉनॉमिक्स, अर्थहीन होते. अमर्यादित साधनांना एक्सचेंज व्हॅल्यू असण्याचे काहीच कारण नाही. आणि, अनडिस्कव्हर्ड रिसोर्सेस जे भविष्यात मिळणार आहेत, त्यांना गृहीत धरून आत्ताच साधनांना अमर्यादित म्हणणे हे पण पटले नाही.

लोकसंख्या आणि शोध ह्यांच्या संबंधाबद्दल सुद्धा साशंक आहे. जास्त लोकसंख्या असेल तर शोध आणि नवनवीन वस्तू लवकर लागतील/बनतील हे मानण्याचे कारण समजले नाही.

लोकसंख्या वाढ आणि क्लायमेट चेंज -
https://www.scientificamerican.com/article/population-growth-climate-cha...

इतर सर्व रिसोर्सेस मर्यादित असताना ऊर्जा कशी काय अमर्यादित ?

हे वाक्य-
इतर सर्व रिसोर्सेस अमर्यादित असताना ऊर्जा कशी काय मर्यादित ?

असे वाचावे.

तर मग, लोखंड कशापासून काढणार?

माती तून लोखंड काडले तर, माती कशी बनवणार?

साहना's picture

10 Feb 2021 - 12:28 pm | साहना

> जगांतील सर्व नैसर्गिक संसाधने हि अक्षय म्हणजे अनलिमिटेड आहेत. एकच असे संसाधन आहे जे अक्षय नाही आणि ते म्हणजे मानवी वेळ

माझे पूर्ण वाक्य आहे : सर्व रिसोर्सेस अक्षय आहेत आणि एकाच रिसोर्स लिमिटेड आहे तो म्हणजे मानवी वेळ. जे काही रिसोर्स लिमिटेड वाटत आहेत ते शेवटी मानवी वेळेच्या लिमिटेड असण्याने लिमिटेड आहेत. पर्यायाने आपण जेंव्हा पृथ्वीवर अमुक इतकेच सोने आहे असे म्हणतो तेंव्हा, सध्या उपलब्ध असलेले मानवी बळ आणि बाजारभाव ह्यांच्या आवाक्यांत असणारे सोने अमुक आहे असे म्हणतो. म्हणूनच अर्थशास्त्र हे शेवटी "scarcity" ह्या विषयाचा अभ्यास आहे. अर्थशास्त्रांत डिमांड आणि सप्लाय वगैरे गोष्टी आणि लिमिटेड रिसोर्सस वगैरेचा अभ्यास असतो त्यांत हि सर्व लिमिट्स शेवटी मानवी वेळ ह्यावर येऊन अडकतात. ऊर्जा लिमिटेड आहे कारण ऊर्जा शोधणे, नवीन ऊर्जास्रोत निर्माण करणे ह्यावर जो वेळ विविध मानव व्यतीत करत आहेत तो लिमिटेड आहे. इथे अक्षय ह्या शब्दाचा प्रयोग मी प्रॅक्टिकल पर्पस साठी अक्षय अश्या अर्थाने केला आहे.

माझे वाक्य जुलिअन सायमन ह्यांच्या पुस्तकातून आहे https://en.wikipedia.org/wiki/The_Ultimate_Resource . https://www.youtube.com/watch?v=mV_38mQ1iG4

निव्वळ मनोरंजन म्हणून खालील उदाहरण घ्या. समजा मानवी वेळ अक्षय आहे. हे कसे शक्य आहे तर आपण एक अतिवेगवान संगणक बनवला आहे जो कोट्यवधी माणसांच्या मेंदूचे काम करू शकतो अगदी मानवाप्रमाणे पण अत्यंत वेगाने. ह्याचा अर्थ अब्जावधी मानव एखाद्या विषयावर विचार करू शकतील आणि ४ वर्षे लागून जी व्यक्ती phd करते तो हे संगणक क्षणार्धांत करू शकेल. मग ह्या कृत्रिम मेंदूने आपण काय करू ? तर बहुतेक शोध जे १० वर्षानंतर लागणारे होते ते आजच निर्माण होतील. जास्त खनिज तेल कसे शोधून काढावे, संपुन पृथ्वीवर सोने कसे शोधावे, समुद्राच्या तळाशी मायनिंग कसे करावे इत्यादी इत्यादी आणि ते सुद्धा सर्व फुकट. प्रत्येक शोधगणिक पृथ्वीवर आपल्याला जे काही रिसोर्सस पाहिजेत त्याची उपलब्धता वाढत जाईल. पण इतकेच नाही जे काही आम्हाला साध्य करायचे आहे ते कमी रिसोर्सस वापरून निर्माण होईल. (अत्याधुनिक गाडीत आज कल सुमारे २००% कमी मेटल लागतो). इतकेच नाही तर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून अवकाशांत विविध रिसोर्सस सुद्धा पृथ्वीवर आणता येईल.

अर्थांत हे झाले स्वप्नरंजन पण कधी कधी अत्यंत अतिशोयोक्तीने भरलेली उदाहरणे घेऊन आपण आपला मुद्दा स्पष्ट करू शकतो म्हणून हा लेखन प्रपंच.

सडलेल्या तांब्याच्या पाइप मधून, तितकेच तांबे पण मिळत नाही ...

काळे मांजर's picture

10 Feb 2021 - 12:58 pm | काळे मांजर

200 टक्के कमी म्हणजे किती ?
उदाहरण द्या

पूर्वी 10 किलो लागत होते , आता 0 जरी झाले तरी जास्तीत जास्त 100 % कमी होईल ना ?

200 % कमी कसे होते म्हणे

Rajesh188's picture

10 Feb 2021 - 1:11 pm | Rajesh188

मधले गणित आहे ते तुम्हाला नाही समजणार.

काळे मांजर's picture

10 Feb 2021 - 1:15 pm | काळे मांजर

वैदिक गणित असेल

मुक्त विहारि's picture

10 Feb 2021 - 1:44 pm | मुक्त विहारि

भरपूर डुआयडी काढणे..

भाजप आणि मोदी द्वेष ..

आणि कुणी विरोध केला की, वैयक्तिक पातळीवर उतरणे ..

काळे मांजर's picture

10 Feb 2021 - 2:01 pm | काळे मांजर

200 टक्के कमी कसे होते, ते सांगा

मुक्त विहारि's picture

10 Feb 2021 - 2:05 pm | मुक्त विहारि

चंपाबाई काय म्हणतात?

सचिन उद्दाम पोटे, कसे आहेत?

ह्या प्रश्र्नांत जास्त रस आहे...

जागो मोहन प्यारे