आघाडी सरकार आणि सामान्य जनता

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
16 Jan 2021 - 7:20 am
गाभा: 

भरपूर राजकारण करून, आघाडी सरकार स्थापन केले, पण हे सरकार, सामान्य जनतेसाठी नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे.

1. सामान्य माणसाला, घरी बोलावून मारहाण.

2. एका माणसाला,जीवे मारण्याची धमकी देणारा आमदार.

3. साधु हत्याकांड

4. तांदूळ घोटाळा

5. अर्भक मृत्यू

6. शेतकरी वर्गाला दिलेली अपुरी मदत

7. वाढीव पेट्रोल दर.

8. ड्रगचा वाढता वापर...

9. मेट्रो रेल्वे बाबत केलेली चालढकल

10. CBI चौकशी होऊ नये, म्हणून उचललेली पाऊले

11. तक्रार केली तर, तक्रार करणारी व्यक्ती गायब होणे.

12. मराठा आरक्षणाचा सावळागोंधळ

एकूणच, हे सरकार, सामान्य माणसासाठी नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे....

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

21 Jan 2021 - 8:41 pm | अर्धवटराव

1) देशातील बेरोजगारी कमी झाली आहे का?
-- हो
2) देशेतील लोकांचे प्रती व्यक्ती उत्पादन वाढले आहे का?
-- हो
3) प्रशासन जलद आणि कर्तव्य दक्ष झाले आहे का?
-- डबल हो
4) लोकांची सरकारी काम कोणत्याही अडचणी न येता सहज होत आहेत का?
- बरीचशी हो
5) भारतात दर्जेदार वस्तू चे उत्पादन होवून जगभर भारताची निर्यात वाढली आहे का
-- बर्‍याचश्या हो
6) शेतीचे पाण्याखालील क्षेत्र वाढले आहे का
-- हो
7), मुंबई मधील रेल्वे चा प्रवास सुख कारक झाला आहे का
-- कल्पना नाहि
8) देशातील गुन्हेगारी कमी झाली आहे का
-- हो
9)कोर्टात न्याय कमी वेळेत मिळू लागला आहे का.
-- हो

शाम भागवत's picture

20 Jan 2021 - 3:21 pm | शाम भागवत

मस्त ध्रुविकरण चालू आहे.
संभाजीनगरचा मुद्दा घेऊन
हळू हळू मनसे पुढे यायला लागलीय.
मुंबई मनपा निवडणुकीत धमाल येणारेय हे नक्की.

इतिहासाची पुनरावृत्ती बाकी काही नाही.
😀

मुक्त विहारि's picture

20 Jan 2021 - 4:42 pm | मुक्त विहारि

कुठल्याही पक्षाला, स्पष्ट बहुमत मिळणार नाही.

पण, ही लढत, भाजप विरूद्ध इतर पक्ष अशी झाली तर, महापौराच्या खुर्चीची रस्सीखेच सुरू होणार.

नेहमी प्रमाणे, सामान्य माणसाला त्रास होणारच.

मुक्त विहारि's picture

20 Jan 2021 - 4:46 pm | मुक्त विहारि

आव-जाव, घर तुम्हारा,

अशी लोकलची अवस्था झाली आहे.

कुठेही चेकिंग नाही.

विक्रेते बिंधास्त, लोकल मध्ये फळे आणि इतर वस्तू विकत आहेत.

हा , ह्या सरकारचा लोकांच्या बाबतीतला दृष्टिकोण.

खरे तर राज्यातील सर्व रेल्वे सेवा पूर्णतः राज्य सरकार च्या नियंत्रणात च असली पाहिजे होती.
अगदी नोकर भरती पासून सर्व काही.
पण सर्व राज्याचे दुर्दैव आहे केंद्र सरकार नको तिथे नाक खुपसत आहे.
आणि रेल्वे ही केंद्राच्या अधिकारात विनाकारण ठेवली आहे.
त्या मुळे रेल्वे मध्ये जी काही फालतुगिरी चालू आहे त्याला राज्य नाही तर केंद्र जबाबदार आहे.
त्या मुळे सर्व प्रश्न मोदी ना विचारा.

सॅगी's picture

21 Jan 2021 - 9:30 pm | सॅगी

आम्ही आहोतच बाकी कामांसाठी समर्थ...

१. मुखपत्रातुन केंद्राच्या नावाने बिनकामाच्या बोंबा मारायला आणि शिमगा करायला.
२. मास्क लावा, गरम पाणी प्या हे सांगायला घरात बसुन सतरांदा फेसबुक लाईव्ह करून चमकोगिरी करायला.
३. शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर कोलांट्या मारायला.
४. वीज ग्राहकांना वाढीव बिले पाठवुन बिल भरण्यासाठी दम द्यायला.
५. बेळगावच्या प्रश्नावर ठोस काही पावले न उचलता फक्त "महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही" या सारख्या पोकळ गर्जना करायला.
६. मेट्रो कारशेडचा प्रश्न भिजत ठेवायला.

चौकस२१२'s picture

27 Jan 2021 - 10:06 am | चौकस२१२

७)कुबड्या घेऊन " पिताश्रींना DILELE वचन " पूर्ण केले अशी वाफ सोडायला ! ( अशी वचने स्वबळावर पूर्ण करणे किंवा गेलं बाजार "कमळी" ला दम देऊन २.५ वर्षे मिळवली तरी एकवेळ मान राहिला असता हे विसरायला " आम्ही आहोतच समर्थ!

सुबोध खरे's picture

22 Jan 2021 - 10:21 am | सुबोध खरे

रेल्वेच कशाला अणुऊर्जा, तिन्ही सेना, अवकाश संशोधन सुद्धा पूर्णतः राज्य सरकार च्या नियंत्रणात च असली पाहिजे होती.

अगदी नोकर भरती पासून सर्व काही.

पण सर्व राज्याचे दुर्दैव आहे केंद्र सरकार नको तिथे नाक खुपसत आहे.

राजेश याना महाराष्ट भूषण पुरस्कार सुद्धा द्यायला पाहिजे

जी काही फालतुगिरी चालू आहे त्याला राज्य नाही तर केंद्र जबाबदार आहे.

मोदींनी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त व्हायला पाहिजे

काय म्हणताय?

मुक्त विहारि's picture

27 Jan 2021 - 9:47 am | मुक्त विहारि

भारी आहे