पनीर उत्तपा

प्रशांत's picture
प्रशांत in पाककृती
7 May 2020 - 3:49 pm

भाजीसाठी काही नाही त्यामुळे मी काल डोस्याचे पीठ बनवले आहे, सोबत बटाट्याची भाजी करणार असे आईने चहा पिताना सांगितले. डोसा खायची इच्छा नव्हती आणि थोडा वेळही होता म्हटल चला कांदा/चीज उत्तपा बनवूया.

बघितलं तर दोनच छोटे कांदे होते, मग त्यात टोमॅटो टाकायचे म्हणुन फ्रिज उघडला तर पनीर दिसले. आणि म्हटल चला आजे "पनिर उत्तपा" बनवुन पाहू.

साहित्यः
- कांदे २ (तेवढेच होते)
- टोमॅटो २
- पनीर १०० ग्रॅम (अंदाजे)
- हिरव्या मिरच्या २
- चाट मसाला १ चमचा
- कोथिंबिर
- मिठ

कापाकापी नंतरचा फोटो
1

सर्व एका भांड्यात मिक्स केलं
2

तव्यावर दोन डाव पीठ टाकुन गोलाकारात पसरवण्याचा प्रयत्न केला व त्यावर थोड मिश्रण टाकलं आणि गॅस सुरु केला.
3

एक मिनिट गॅस मोठाच ठेवला व नंतर कमी गॅसवर दोन मिनिट ठेवलं. नंतर पलटुन दुसर्‍या बाजुने दोन मिनिट ठेवला.

4

तयार झाल्यानंतर त्यावर थोड तूप टाकलं आणि...
5

कांदा / पनीर / टोमॅटो असल्याने याला कुठला उत्तपा म्हणावा ?

प्रतिक्रिया

"कांदा पनीर टोमॅटो उत्तप्पा" म्हणावं.
बाकी पाकृ एकदम झक्कास. प्रशांतशेठ कधी पाकृ टाकतील असं वाटलं नव्हतं.

जव्हेरगंज's picture

7 May 2020 - 4:26 pm | जव्हेरगंज

हैला, एवढं सोपं असतं का हे!!
करून बघायला पायजे!!

प्रशांत's picture

7 May 2020 - 5:47 pm | प्रशांत

डोसा बनवणे सोप्प आहे, फक्त तयार पिठ मिळायला पाहिजे... (आयुष्य सुंदर आहे .... ).

रच्याकन पिठ घरी बनवायचे असल्यास दावणगिरी लोणी स्पंज डोसा हि पाकृ बघा

आणि हो बनवल्यावर फोटो शेअर करा

चांदणे संदीप's picture

7 May 2020 - 5:43 pm | चांदणे संदीप

उताप्पा झकासच! कांदे संपलेत, तेवढे आणून ठेवा. ;)

सं - दी - प

वामन देशमुख's picture

7 May 2020 - 5:47 pm | वामन देशमुख

अगदी अनपेक्षितपणे तुमच्याकडून रेसिपी!
बाकी सर्व काही मस्त जमून आलेलं दिसतंय.

पनीर (एक फस्टक्लास जमुन आलेला) उत्तपा.

जबरदस्त दिसतय

तुषार काळभोर's picture

7 May 2020 - 6:21 pm | तुषार काळभोर

१) पहिले दोन फोटो - चिरलेले पदार्थ - गणपा शेठ च्या जवळ जाणारे.
२) तयार उत्तपा फोटो - कडक
३) आयला, ही पण कला आहे वाटतं आपल्यात ;)
४) नाव देसी डिलक्स मार्गारिटा उत्तापा

सरपंच जोरात, मिपाकर कोमात!
गुड गोईंग!!

Prajakta२१'s picture

7 May 2020 - 8:04 pm | Prajakta२१

मला असाच करायचा होता पण पनीर धिरडे झाले
https://misalpav.com/node/46616

चाट मसाल्याची आयडिया try करायला पाहिजे
मी कांदा लसूण मसाला घातला होता

नुसते मिश्रण पण छान लागत असेल
फोटो छान आले आहेत

थोडी चिंचेची चटणी घातली तर चांगल लागेल अजून (मिश्रणावर)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 May 2020 - 8:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रशांतसेठ, भारी सुरुय. उत्तपा आवडलाय. फोटो पण जीवघेणे.

-दिलीप बिरुटे

उत्कृष्ट .. बाकी प्रशांत पाकृ विभागात शिरल्याचे पाहून अचंबा जाहला.. चालू द्या प्रगती.

(कोणी केली रे पाकृ?)

प्रशांत's picture

9 May 2020 - 6:08 pm | प्रशांत

तुम्हि पण टाका की लॉकडाऊन दरम्यान बनवलेल्या पाकृ फोटो आहेतच तुमच्याकडे

सस्नेह's picture

9 May 2020 - 6:09 pm | सस्नेह

हेच म्हणते !
डोळे चोळून दोनदा लेखकाचे नाव पाहिले.
बाकी, पाकृ झकासच !

मस्तच! सगळे टोमॅटोचे तुकडे तव्याला न चिकटता शेवटपर्यंत उत्तप्प्याबरोबर राहिले याबद्दल खास कौतुक :)

माहितगार's picture

8 May 2020 - 6:36 am | माहितगार

झकास, आवडली पाकृ आणि फोटो

अत्रुप्त आत्मा's picture

8 May 2020 - 7:55 pm | अत्रुप्त आत्मा

...पांडू मोड ऑन

छाण प्रयत्ण!

पांडू मोड ऑफ...

प्रशांत's picture

9 May 2020 - 5:57 pm | प्रशांत

प्रतिसाद दिल्या बद्दल धन्स लोक्स..

@ गणपा ने सांगितल्या मुळे नाव पनीर उत्तपा...