[कविता' २०२०] - भेट

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
4 May 2020 - 8:54 pm

भेट

त्या शरीरी वीज अचपळ
कोंडिली होती जरी
स्पर्शिले दिव्यत्व तरिही
पाय त्याचे भूवरी

हिंडला दिक्काल सहजी
भासला तो स्थिर जरी
दृष्टी व्योमापार त्याची
नेत्र मिटलेले जरी

माहिती होते जरी की
काजवा मी, तो रवि
कोणत्या कैफात वेड्या
थुंकलो त्याच्यावरी

भेट घडता आमुची, मी
थिजुनी गेलो क्षणभरी
माझिया हातात शस्त्रे...

....कमलदल त्याच्या करी

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);

background-size: 4500px;
}

प्रतिक्रिया

पलाश's picture

4 May 2020 - 9:26 pm | पलाश

+१.
कविता वाचायला, म्हणायलाही सुरेख वाटली.
माझिया हातात शस्त्रे...
....कमलदल त्याच्या करी
ह्या ओळीपण खूप परिणामकारक वाटल्या.
सरळ अर्थ छानच आहे पण आणखी वेगळा अर्थ असेल तर तो काय असावा? हा विचार करते आहे.

मन्या ऽ's picture

4 May 2020 - 11:53 pm | मन्या ऽ

सुंदर!

OBAMA80's picture

5 May 2020 - 6:55 am | OBAMA80

+१

प्रचेतस's picture

5 May 2020 - 7:39 am | प्रचेतस

+१
सुरेख

तुषार काळभोर's picture

5 May 2020 - 8:07 am | तुषार काळभोर

सरळ, सुरेख.

चांदणे संदीप's picture

9 May 2020 - 8:47 am | चांदणे संदीप

वीज अचपळ

हे नाही कळले!

बाकी उत्तम.
+१

संदीप

सत्यजित...'s picture

2 Jun 2020 - 5:05 pm | सत्यजित...

वीजही अचपळ असावीशी त्या शरीरात कोंडली गेली,हे ते शरीरसामर्थ्य! असा अर्थ अपेक्षित असावासे वाटते!
कविता उत्तमच!

राघव's picture

14 May 2020 - 11:18 am | राघव

आवडली रचना.

मनस्विता's picture

23 May 2020 - 8:58 pm | मनस्विता

+१