दारू बनवणारे वाईट !

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in काथ्याकूट
25 Mar 2020 - 2:43 pm
गाभा: 

कोण म्हणत दारू बनवणारे वाईट !
दारू आणि करोना !
थांबा हि कुठली व्हाट्स अप वरची "पुढे सरकवा " बातमी नाहीये तर एक जरा गंमतशीर वाटली म्हणून उल्लेख
ऑस्ट्रेलियातील दारू उत्पादक (वाईन / रम ) यांनी आपल्या कारखान्यात hand-sanitiser बनवणे सुरे केले आहे!
आपातकालीन परिस्थितीत विविध उद्योगांना सरकार आपले नेहमीच उद्योग थांबवून इतर जीवनावश्यक उत्पादने बनवण्यासाठी भाग पडते हे ऐकले होते पण हे जरा वेगळेच वाटले
येथे बघा इथेनॉल पासून

https://archierose.com.au/
https://www.facebook.com/7NEWSsydney/videos/bundaberg-rum-makes-hand-san...

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

29 Mar 2020 - 5:38 pm | विजुभाऊ

दारू हे एक उत्पादन आहे.
ए के ४७ हे देखील एक उत्पादन आहे.
पॅरासिटामूल , अ‍ॅस्पिरीन , कोकाकोला , सिगारेट , गुटखा गांजा आणि चरस ही देखील उत्पादनेच आहेत
तुमचा प्रश्न नक्की काय आहे ते समजले नाही.
दारु उत्पादकांकडे मिथेनॉल तयार होऊ शकते , तसे ते साखर कारखान्यातही बनू शकते.
दारू उत्पादकांकडे असणारी डिस्टीलेशन मशिनरी वापरून लगेचच इंडस्ट्रियल अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझर बनवता येता. त्या मुळे ते बनवण्यासाठी पुढे आले इतकेच.
अर्थात त्यात त्यांचा फायदाही आहे. दारूची वाहतूक करता येणार नाही. आणि उत्पादनही थाम्बवावे लागेल त्या ऐवजी हँड सॅनिटायझर बनवले तर उत्पादन चालू राहील , उत्पन्न चालू राहील आणि समाजात नावही मिळेल.