शाकाहारी मेक्सिकन एन्चिलाडा

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in पाककृती
7 Mar 2020 - 3:07 pm

शाकाहारी मेक्सिकन एन्चिलाडा

साहित्य:
सारणासाठी: तांबडी ढब्बू मिरची बारीक चिरलेली/ कांदा बारीक चिरलेला / ३-४ प्रकारची कडधान्ये भिजवून उकडलेली ( मेक्सिकन बिन मिल्यालास उत्तम नाहीतर छोले राजमा इत्यादी पण त्यास भारतीय मसाला लावू नये ) काळे kalmatta ऑलिव्ह ( हे व्हिनेगर किंवा ऑलिव्ह तेलात मुरवलेले मऊ असावेत, कोरडे सब्वे च्या सँडविच मध्ये घालतात ते नको , मश्रुम बारीक कापलेले, लसूण
- पोळी: मक्याची असेल तर उत्तम नाही तर मैदा जास्त आणि थोडी कणिक ( नुसती पोळीची कणिक वली शक्यतो नको) अशी
- चिपोटले मिरची चा स्वाद असलेले चीज किंवा एखादे थोडे धुरी दिलेले ( स्मोकड ) चीज + टेस्टी चीज ( अमूल बनवते ते बहुतेक टेस्टी जातीचे असावे )
- धुरी दिलेली पाप्रिका पूड ( तांबड्या मिरची ची अत्ते बहीण म्हणजे पाप्रिका)
- अवाकाडो पिकलेलं,
- काळी मिरी ताजी दळलेली
- हालिपिन्यो मिरची चे काप ( ताजे किंवा व्हिनेगर मध्ये मुरवलेले )

कृती
तेलावर कांदा लसूण परतून त्यात मग ४ बिया / कडधान्ये चांगले परुतून घयावे , तांबडी ढब्बू मिरची मग परतावी ती थोडी कच्ची राहिली तरी चालेल
नंतर मश्रुम आणि सर्वात शेवटी ऑलिव्ह चे तुकडे घालावे
भाजी कोमट होऊन दयावी

-एन्चिलाडा पोळ्यांना थोडेसे लोणी लावून त्यात मध्ये चित्रात दाखवल्याप्रमाणे वरील भाजी घालावी + हालिपिन्यो मिरची चे काप व त्याची गुंडाळी करावी
- वरून चीज पसरावे
- ओव्हन मध्ये त्यातील वरच्या म्हणजे ग्रिल भागात वरील एन्चिलाडा साधारण चीज वितळून ते खरपूस आणि पोळीच्या कांदा थोड्या खरपूस / तांबूस होऊ लागलाय पर्यंत ठेवावे

यात सोबत , उरलेला अवाकाडो मी खळगी मध्ये लिंबू रस. काळी मिरी , आणि चीज घालून पण ठेवला आहे , त्यात पह्जजे तर एखादा झिंगा घातलं तर पण चांगला लागेल
मांडणी
सोबत रॉकेट सारखे थोडे तुरट सलाड आणि पालकाची पाने ( बेबी स्पिनॅच ) (थोडे व्हिनेगर आणि ऑलिव्ह तेलाचे मिश्रण शिंपडले )

पेय:
गाजर आणि आल्याचा रस + मिरची चा मोहितो + लिंबू घातलेले ( जरा झिंगाट चव यावी म्हणून )
यातील शेवटचे छायाचित्र निरखून पहा! मेक इन इंडिया ,, भारत काय काय निर्यात करत आणि करू शकते त्याचे एक मस्त उदाहरण !
DZBR9090[1]
VLMB3449[1]
VLMB3449[1]
HAEJ5579[1]
SVJH0902[1]
SERF9883[1]
QXLR2099[1]
MXGV5336[1]
मिर्चि !

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

7 Mar 2020 - 3:09 pm | अत्रुप्त आत्मा

पांडु मोड ऑन...
हुच्च पाककृती!
पांडु मोड ऑफ...

चौकस२१२'s picture

7 Mar 2020 - 4:26 pm | चौकस२१२

मामू तुम क्या बोला मेरेको कूच समज्च्यच नाही .. ये पांडू कोण? अन त्यो आन आफ क्यो हुतंय? काय टकुर्यात शिरणं बगा! टपली मारताय कि कवतिक करताय ? "हुच्च मंग्या " असा शब्द ऐकलं हुता मऱ्हाठी कर्नाटकी भागात पण हिथं काय त्याच?

क्षमा करा मंडळी, पाककृती तील एक गोष्ट विसरलो... ती म्हणजे या भाजीत शिजलेला फडफडीत भात पण घातला आहे आणि काळ्या बिया ( ब्लॅक बीन्स )

विनटूविन's picture

8 Mar 2020 - 3:33 pm | विनटूविन

अवाकाडो अवाच्या सवा महाग असतात हो!

चौकस२१२'s picture

8 Mar 2020 - 6:04 pm | चौकस२१२

अवाकाडो नाहि वापरला तरि चालेल !
त्याला पर्याय मात्र माहीत नाही मला

यश राज's picture

10 Mar 2020 - 12:42 am | यश राज

पाककृती आवडली