माय मराठी

bhagwatblog's picture
bhagwatblog in जे न देखे रवी...
27 Feb 2020 - 11:17 pm

माय मराठीचा बोलण्यात गोडवा
शब्द जणू शीतल हवेचा गारवा

बोली भाषेची गोष्टच न्यारी
जणू तुळस आपल्या दारी

बारा कोसाला भाषा बदलते
माय मराठी सर्वांना जोडते

संतांनी गायिले मराठीचे रंग रूप
अलंकारांनी नटले सोज्वळ स्वरूप

प्राण मराठी जाण मराठी उल्हास मराठी
महाराष्ट्राचा ज्वाजल्य अभिमान मराठी

माय मराठी आम्हा सर्वांचीच आई
सगळ्या लेकरांना अलगद कवेत घेई

मराठी अस्मिता मराठी मान मराठी शान
मराठी म्हणजे शब्द अनं आभूषणाची खाण

मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

कविता माझीभाषा

प्रतिक्रिया

रंगीला रतन's picture

29 Apr 2021 - 4:33 pm | रंगीला रतन

छान!

धर्मराजमुटके's picture

17 May 2021 - 12:23 pm | धर्मराजमुटके

नुकताच लोकसत्तामधील हा लेख वाचनात आला.
इतकं वेळखाऊ का वाटतं आपल्याला आपल्याच लिपीत लिहिणं? हा विचारलेला प्रश्न विचार करण्याजोगा आहे.

आता पाळी अक्षरांची आली तर त्यात आश्चर्य ते काय ? असो जो पर्यंत आपण आपली लिपी सोडुन उर्दुत लिहु लागत नाही तो पर्यंत याबाबत जागरुकता होइल का अथवा त्यानंतरही होइल का हा एक प्रश्नच आहे.