मुंबई-पुणे-मुंबई (भाग २)

सौरभ नेवगी's picture
सौरभ नेवगी in भटकंती
2 Feb 2020 - 11:20 am

१ फेब्रुवारीला लग्न समारंभ उरकल्यानंतर आतील पुण्यातला गोंधळ पाहिला आणि २ तारखेला भावासोबत outskirts मधली शांतता अनुभवली. ३ तारखेला रविवारी परततीचा प्रवास करायचा होता. रात्री उशीरापर्यंत बॅग भरायचा प्रोग्रॅम सुरू होता. २-३ दिवसाचे माझे कपडे मी ३१ आधीच पुण्याला पाठवले होते, आता ते परत बदलापूरला मलाच आणायचे होते. त्यात किलोभर चितळे भाकरवडी होतीच. २-३ lit पाणी, १ रेडबूलचा कॅन, अंडी असा सगळा ६-७ किलोचा संसार पाठीवर येणार होता. भाकरवडीला चिक्कीची सोबत लोणवळ्याला होणार होती.
रविवारी ६:०० ला निघायच ठरवल आणि मी ६:३० नंतर भावाच घर सोडल. NH४८ वर येताना जे हाल झालेले ते परत होऊ नयेत अशी प्रार्थना करत हायवेला पोहोचलो, आता रोड पाठ झाला होता; २:७ चा gear combination ठेवून देहुरोड फाट्याला ८:०० वाजता आलो. या दिड तासाच्या प्रवासात काही सायकलस्वार दिसले परंतु जास्तीत जास्त अंतर कोवळ्या ऊन्हात पार करायच होत म्हणून त्यांना thumbs up करून मी अपेक्षित वेळेत देहुरोड फाट्याला आलेलो. एकंदरीत सुरूवात कडक झाली होती.
फोन करुन कोणी डिस्टर्ब करु नये म्हणून लोकेशन काही जणांसोबत शेयर केली आणि रस्त्यात १५-२० सेकंद थांबुन WhatsApp ला status-caption टाकायला सुरूवात केली.
का कोण जाणे आज दोन्ही लेन वर खूप सायकलिस्ट दिसत होते. सगळेच एकमेकांना प्रोत्साहन देत होते, हात आणि मानेचे इशारे सतत सुरू होते. या अगदीच छोट्या गोष्टी परंतु आत्मविश्वास कमालीचा वाढवत होत्या. कामशेतचा चढ सुरू होण्याआधी चहापान उरकले, इथे कळाले की आज कुठलीतरी सायकल रेस आहे. एक रोडबाईक जाताना दिसली तसा चहाचा हिशोब चुकता करुन मी त्याचा पाठलाग करु लागलो. चढ होता त्यामुळे आम्ही एक युनिट असल्यासारखे कमी अंतर ठेवून पेडलिंग करत होतो. Road bike पुढे MTB मागे असं करत चढ संपून उतार सुरू झाला तसा हा पठ्या बघता बघता बराच पुढे गेला. काही क्षणापुरता त्याच्या सायकलचा व वेगाचा मला हेवा वाटला. सायकल रेस साठीच्या मला माहित असलेल्या सगळ्या गोष्टी त्याने carry केल्या होत्या. माझ्याकडे असलेल्या ६-७ किलोच्या बॅगमुळे मी रेस मधला वाटतच नव्हतो. पण या रेसमुळे माझाही वेग थोडा वाढला होता.
लोणावळ्याला •||• किलोभर चिक्की बॅगेत कोंबली. ११:०० वाजता लोणावळा मधून निघालो. इथे एकच confusion होता, ते म्हणजे एक्सप्रेस हायवे ची entry मागे गेली की अजून येणार होती. लोकं सायकल बघून तूला 'allowed' नाही बोलत होते. येताना मात्र मी एक्सप्रेस वे पकडला होता. जसा फाट्यावर आलो, २-३ पोलिस उभेच होते, त्यांनी नकार दिल्यावर नाईलाजास्तव लेफ्ट टर्न मारून ओल्ड route पकडला. बाबांनी घाटात मस्त फोटो काढ असे सांगीतले होते, परंतु फोटोसाठी घाटात मिळालेला वेग ० वर आणणे ; म्हणजे जनशताब्दी ला siding ला लाऊन दिवा-सावंतवाडीला पुढे करण्यासारखे होते. जसा घाट सुरू झाला, माझा ब्रेकवरचा हात अधिक घट्ट झाला. अगदी १०-१५ मिनीट मधे घाट संपला होता. खोपोलीमधे अजून एका मावशीकडे visit द्यायचे ठरवले. भुक लागली नव्हती, ११:३० च्या आसपास तिच्याकडे पोहोचलो. बदलापूर ३-३:३० तास दूर होतं, मधे चौकला मित्र ५-१० मिनीट भेटायला येणार होता (८ km वाढले ). ही भेट चांगली तासभर रंगली. १३:०० वाजता चौकला आलेलो मी, १४:०० नंतर कर्जतची वाट पकडली होती.
या मोठ्या विश्रांतीमुळे मी कमालीचा सुस्तावलो होतो. बॅगेचं वजन जाणवत होता, भूक लागली होती, ऊन्हाची झळ बसत होती पण अजून थांबणं पटत नव्हतं. कर्जतला थोडं खाऊन मस्त १ lit लिंबू सरबत बनवलं. ४ स्टेशन उरली होती, दर स्टेशनला सरबत प्यायच ठरवल. पोटोबा समाधानी झाला नव्हता, याचा वाईट परिणाम मला भोगावा लागत होता. ३:३० ला कर्जत वरून निघालो. नेरळ येईस्तोवर मला थकवा जाणवत होता. कोणालातरी बदलापूर वरून कार घेऊन बोलवावे आणि पुढे AC तून जावे असे मनोमन वाटत होते. सरतेशेवटी माथेरानच्या पायथ्याशी सावलीत थांबलो, मन शांत केलं, सगळे निगेटिव thoughts बाजूला सारून; आपण ३ km पुढे गेलो की गाडी बोलावू असं ठरवल (अस दर ३ km नंतर मी म्हणत होतो). या जुगाडाचे श्रेय डोंगरी (माझा trekking चा ग्रूप) ला द्यायला हरकत नाही (कारण यात आम्ही ५ मिनीट अजून करत करत तासभर चाल्लो होतो). वांगणीला सरबत संपवून शेवटचा १० km चा टप्पा पूर्ण केला. १७:०० वाजता घरी आल्यावर आधी अर्ध कलिंगड फस्त केलं आणि झोपेच्या आधिन झालो.
२८०km+ च्या राइड मधे मी काही गोष्टी शिकलो.
१) थोडथोड का होइना पण खात रहाव.
२) इतरांचे efforts appreciate करावे यामुळे त्यांना चांगलं वाटेलच, सोबत आपणही उत्साहित होतो.
समाप्त.

प्रतिक्रिया

mayu4u's picture

2 Feb 2020 - 12:12 pm | mayu4u

राईड दरम्यान आहाराकडे लक्श देणं मस्ट आहे!

सौरभ नेवगी's picture

2 Feb 2020 - 9:37 pm | सौरभ नेवगी

पटल...

सौरभ नेवगी's picture

2 Feb 2020 - 9:41 pm | सौरभ नेवगी

सायकलवरचा हा पहिला मोठा प्रवास होता माझा अन् त्याला आज १ वर्ष पुर्ण झाल..तेव्हा या गोष्टी नविन होत्या.. पण एका वर्षांत सायकलिंगने बरेच चांगले धडे दिले आहेत ...

खरंच अशा प्रकारच्या व्यायाम / खेळ / यासाठी आपले देशी स्वस्त खाणे कोणते याची यादी हवी.
मला ट्रेकिंगसाठी -
१) वेलची केळी अधिक पोळी जमली आहेत. पाणीसुद्धा कमी पुरते.
२) चिरोटे. - चपट्या पुऱ्यांवर पिठीसाखर भुरभूरवायची. एक पुरी पूर्ण तोंडात टाकता येईल एवढाच आकार असावा.
३) अगदी अचानक निघावं लागलं तर युपी मिठाईवाल्यांकडचे साठं घेतो.
४) कितीही हुक्की आली तरी मिसळ जाताना खात नाही. येतानाच खातो. पोटात आड पडली तर सारखं पाणघ प्यावं लागतं.

-----------
सायकल राईड, केलेल्या चुकांसह मांडणे आवडलं.

सौरभ नेवगी's picture

2 Feb 2020 - 9:38 pm | सौरभ नेवगी

हे ही करायला हरकत नाही,
धन्यवाद

सुधीर कांदळकर's picture

2 Feb 2020 - 7:33 pm | सुधीर कांदळकर

जुन्यारस्त्यावर रस्त्यालगतच खोपोलीला हॉटेल रमाकांत होते. तिथला बटाटावडा प्रसिद्ध होता. थोडे आतल्या बाजूला हॉटेल मधुघट होते. एक्सप्रेसवे झाल्यावर कधी गेलो नाही. अजून ही हॉटेले आहेत की नाही ठाऊक नाही.

धन्यवाद.

सौरभ नेवगी's picture

2 Feb 2020 - 9:42 pm | सौरभ नेवगी

पुढच्यावेळी जाईन तेव्हा शोध घेईन.. :)

चौथा कोनाडा's picture

6 Feb 2020 - 5:34 pm | चौथा कोनाडा

वाह, क्या बात हैं ! हा भाग वाचतानाही अगदी रंगून गेलो. कमाल आहे बाबा एनर्जीची ! सलाम !

२) इतरांचे efforts appreciate करावे यामुळे त्यांना चांगलं वाटेलच, सोबत आपणही उत्साहित होतो.
- लाखमोलाची गोष्ट !