उडु - उडी उड्डाण ते पाणी आणि वनस्पती नाम

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
21 Dec 2019 - 2:30 pm

महाराष्ट्रीय गुढी परंपरेच्या अभ्यासाच्या निमीत्ताने प्राचीन काठीपुजांच्या दुव्यांचा अधून मधून धांडोळा घेत असतो. गुढी या शब्दाचा मुळ अर्थ काठी कसा आहे आणि कुडी शब्दाशी असलेला संबंध मी माझ्या मागील गुढी उभारनी या लेखाच्या माध्यमातून करुन दिला होता. कर्नाटक आणि ओडीशा या दोन्ही ठिकाणी मंदिर आणि देवालयांसाठी 'गुढी' शब्द बर्‍यापैकी प्रचलीत आहे. याचा अर्थ दगड वीटांच्या मंदिरांचा विकास होण्यापुर्वी उघड्यावर दिसणारे सर्व साधारण दगड , वृक्ष तसेच काठी यांची पुजा होत असणार. मराठीपेक्षा कन्नडात ऐतिहासिक शीलालेखांचे प्रमाण अधिक असल्याने हळेकन्नड म्हणजे प्राचीन कन्नड भाषेत याचे काही संदर्भ उपलब्ध व्हावे असा कयास आहे पण त्या दिशेने प्रत्यक्ष शोध घ्यावा असा अस्मादिकांचा संपर्क नाही.

काल कर्नाटकातील मंदिरे बद्दल शोध घेतला असता शोधगंगावर एका शीलालेखावर आधारीत पिएचडी शोधनिबंधात एका ग्रामदेवतेच्या मंदिराचा उल्लेख काठीच्या स्वरुपात असलेला शीलालेखाची माहिती वाचनात आली. ओडीशातही मंदिरांना गुढी शब्दवापर आदीवासीही करत असल्याचे पुन्हा एकदा वाचनात आले. ओडीशा शब्दाची व्युत्पत्ती नेमकी काय असेल शोधताना ते नीटसे सापडले नाही पण शोध योगा योगाने सोशल मिडियावरी 'उडु' शब्दचर्चेवर गेला .

भाषाविषयाचा अर्थाअर्थी संबंध नसलेल्या व्यक्तीने पंधराएक वर्षापुर्वी उदकबत्ते हे नाव उदबत्ती वरुन झाला असल्याच टाईमपास जोकवर हसलो होतो हे आठवले. पण पण उदक उद उडणे यांचा काही दुरान्वये संबंध असू शकेल असा विचार मला स्पर्षूनही गेला नाही. या शब्दांची ध्वनी साधर्म्य आणि प्राचीन उपयोगांची भाषातज्ञांना काहिशी कल्पना राहिली असेल पण मला तशी ती असण्याचे कारण नव्हते.

उडुराज (चंद्र) उडुगण (तारका) हे शब्द माझ्या वाचनात यापुर्वी आल्याचे स्मरत नाही. उदय हा शब्द सुर्याशी संबंधीत आहे तेव्हा आकाशातून उडणार्‍या पक्ष्यांना गरुड शब्द आहे तसेच उदय उडुराज उडुगण शब्द त्यात खुप नवल नाही. उडी मारणे ह्या क्रियेचेच उड्डाण उडुराज पर्यंत झाले तर समजण्यासारखे आहे पण उडु हे समकक्ष उच्चारण इंडोयुरोपीयन भाषातून पाण्यासंबंधी वापरले जातात यात काही भाषिक व्युत्पत्ती संबंध असेल का ?

माझ्या वाचनात आलेला दावा असा की उटु (उठणे) -to- उडी संबंधीत क्रीया आहे. उडी हा शब्द मुलतः एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे मग झाडावरून उडी मारणे -पक्ष्यांचे उड्डाण - (मराठीतील आपल्या नित्य उपयोगाच्या 'पुढे' शब्दाची व्युत्पत्ती मागेही प्+उडे ='पुढे'च नसेल ना?)

संस्कृतात 'उडुप' हा शब्द चंद्र सोबतच पाण्यावर तरंगणार्‍या 'राफ्ट' साठीसुद्धा वापरला जातो म्हणजे मुलतः उडु हा शब्द नदी तलाव इत्यादी पाणि साठे पार करण्यासाठी वापरला जाताना पाण्यासाठी उदक हा शब्दही वापरला गेला असणार

तर एकुण उडी उड्डाण उडुराज उडुगण उदय उदक यांचे असे दुरान्वयेचे नाते असू शकेल. मुलतः झाडाचा क्षणोक्षणी आसरा घ्याव्या लागणार्‍या मानवाला झाड आणि एका झाडावरुन दुसर्‍या झाडावर जाणे ही महत्वाची क्रिया असणार आणि प्राथमिक शब्द संपत्ती कमी असलेल्या काळात एकच शब्द अनेक संबंधीत वस्तु आणि क्रियांना वापरला जाणे सहाजिक असावे.

तर त्याच मुळे कदाचित उडु ह्या शब्दास वुड वड या शब्दांचे साधर्म्य आहेच पण उदबत्तीचा उदही वनस्पती पासून मिळवला जातो अगदी उद आणि उड हे शब्दोच्चार इतर वनस्पती नामातही येताना दिसतात यांची उदाहरणे जसा वेळ मिळेल तसे शोधून जोडेन.

तर एकुण गुडी-कुडी या शब्दापाठी असलेल्या काठी या शब्दामागे असलेला वनस्पती अर्थ दुरान्वये संबंधीत असल्याची खात्री होताना दिसते.

संबंधीत मिपालेख जाहीरात

* महिने आणि नक्षत्रांच्या नावांच्या व्युत्पत्ती काय आहेत ?

* गुढी उभारनी

* मंदिर शब्दाच्या व्युत्पत्तीची चर्चा

* मध्य आणि दक्षीण आशिया खंडातील गावांची नावे

* अनुषंगिकाव्यतरीक्त अवांतरे व्यक्तिगत टिका इत्यादी टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी अनेक आभार.

भाषा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

21 Dec 2019 - 9:47 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

माहितगार's picture

24 Dec 2019 - 2:52 pm | माहितगार

__/\__ अनेक आभार

काही उल्लेख लेख लिहिताना वेळ कमी पडल्याने राहुन गेले. हिंदी भाषेतील 'कुदी' हा 'उडी' शब्दाशी संबंधीत आहे हे चटकन लक्षात येत नाही पण 'कुदी' शब्दातील 'उदी' हे उच्चारण लक्षात घेता यावे. मराठीत उदो बोला उदो बोला ....उदोकारें गर्जती हा जयजयकार स्वरुप 'उद्घोष' उच्चारण मुळात आदीवास कालीन समुह मोहीमांचे सुतोवाचक राहीले असू शकेल का? सोबत देवता पुजेसोबतचा संबंधतर स्पष्टच अधोरेखित होतो अनेक देवतांचे पुजन वनस्पती स्वरुपातही होत आले हेही लक्षात घेता येते.

हिन्दीत उदो/उदौ म्हणजे उदय आणि त्याशी संबंधीत उदोत, उदित, उदोती, उदोतकर हे प्रकाशाशी संबंधीत शब्द योजना येते. हिन्दी उदुआ : पुं० [?] एक तरह का मोटा जड़हन धान। हा वनस्पती संबंधीत शब्द मिळतो हिन्दी उदुंबर मराठी औदुंबर संस्कृत उडुम्बर हे आपल्या परिचयात आहेच. आणि मग दाळीतील 'उडीद' - (हिन्दीत अन्न) शब्दाच्या व्युत्पत्तीचा आणि वनस्पतींच्या प्राचीनतेचा अंदाज येतो. उदंड या शब्दाच्या व्युत्पत्तीचाही अंदाज यावा.