'मॅ क्वान ईम'

मायमराठी's picture
मायमराठी in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

मॅ क्वान ईम

images

नवरात्र महोत्सवात जगन्मायेने दिलेली ऊर्जा इतकी प्रचंड असावी की त्याने घराघरांत दिव्यांनी झगमगून उठावं आणि दीपावलीचा जन्म व्हावा. नऊ दिवस आईची अतिशय लोभसवाणी रूपं बघून मन हरखून जातं. एरवी विस्कटलेला, सगळ्यांबरोबर एकेकटाच जगत धावणारा समाज थोडा स्थिरावतो. हे वर्णन फक्त भारतासाठी नाहीये, बरं का. आपल्या आसपासचे देशही ह्याला अपवाद नाहीत. अन्नासाठी फिरवताना जगदीशाने दहादिशांपैकी आग्नेय दिशेला स्थित 'थाईलँड' देशातील 'बँकॉक' शहरात नियुक्ती केली होती. तेथील वास्तव्यात असताना हातात सापडलेले थोडे देवीभक्तीचे धागेदोरे मिपाकरांसाठी सादर करण्याकरता हा सर्व खटाटोप.

guan-yin-au-dragon

थाई समाज हा ९व्या-१०व्या शतकात आग्नेय चीन येथील युनान प्रदेशातून विस्थापित होऊन आलेला. नंतर मलय, कुंभोज (कंबोडिया), इंडोनेशिया अशा परदेशातून आलेल्या सर्वांचा 'थाई' देश झाला. माझ्या मतानुसार संस्कृत शब्द 'देय'चा डबा ऐसपैस होऊन हा शब्द आलाय. तर चायनीज मुळं असलेल्या देशात थाई व चिनी सणांची साथसंगत अनुभवायला मिळाली.

आपल्याकडे नवरात्र असते, त्याच दरम्यान थाईलंडलाही 'चे' उत्सव असतो. हा शब्द चायनीज आहे. हा एक अक्षरी सोहळा म्हणजे 'शाकाहारी उत्सव'. बरेच जण देवीकरता उपास करतात, म्हणजे शाकाहारी खातात. (एरव्ही काय काय खातात हे न विचारलेलं बरं.) त्यामुळे आमची त्या नऊ दिवसांत चंगळ वगैरेच असायची पिवळ्या झेंड्यात 'चे' खरडलेल्या खाद्यगृहांत जाऊन खादाडी व्हायची. त्यातही दोन प्रकार - १. चे - ज्यात दूध व अंडी वर्ज्य २. मांगसविरात มังสวิรัติ (मूळ शब्द मांसविरहीत) दूध व अंडी चालतात.

***

तिथे भारतात पूजल्या जाणाऱ्या देवीदेवतांचे खूप भक्तगण आहेत. ते त्यांच्या घरांत भारतीय देवांचे चित्र असलेली कोणतीही कॅसेट विकत घेऊन वाजवत असतात. त्यांना त्यातील एकही शब्द कळेल तर शपथ. त्याबाबद्दल विचारलं तर असं म्हणे, "तुमच्या देवांना तुमचीच भाषा कळणार ना, आमची थोडीच कळणार." आठ नव्हे, तर सोळा अंगांनी एक रोख नमन ठोकलं त्या सर्व प्रह्लादांना. तसे थाई भाषेत पुष्कळ शब्द संस्कृतमधून जसेच्या तसे आलेत. पण ते पाली भाषेच्या प्रदेशातून पायधूळ झाडून आलेत, म्हणून त्यांचं उच्चारण 'अशक्य' बदललं आहे. त्यावर नंतर कधीतरी प्रकाश टाकू.

A1luae-ERel-L-SY679

***

Hsuan-Tsang
७व्या शतकात चायनीज प्रवासी 'सुआन त्सांग' (ह्याचा खरा उच्चार प्रत्येकाचा वेगळा असू शकतो, किंबहुना असेलच. हा उच्चार माझ्याकरता मर्यादित.) भारतभ्रमणाला येऊन गेला. तो साधासुधा प्रवासी नसून उच्च कोटीतील बौद्ध भिक्षू होता. 'श्री अवलोकितेश्वरी' नावाच्या देवीने त्याला केलेल्या आज्ञेने धर्मकार्यासाठी आलेला होता. भारतातून काही स्तोत्रे - जी आधी चौथ्या शतकात फा-सेईन नावाचा प्रवासी घेऊन गेला होता, ती अपूर्ण होती व नीट आकलन न होणारी होती. त्यामुळे ती नीट समजण्यासाठी संस्कृत भाषेचे ज्ञान आवश्यक होते. त्याशिवाय आणखी नवीन स्तोत्रे घेऊन जाणे अशा दोन कामगिऱ्या सुआनवर होत्या. दुर्गम प्रवास व असुरी शक्तींचा त्रास यात मदत म्हणून देवीने त्याच्याबरोबर 'साय इऊ' म्हणजेच मंकी गॉड किंवा आपले बजरंगबली यांना पाचरण केले होते. आणखी दिमतीला एक वराह व अश्वही होता. यथावकाश सुआन भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगला देश असा भूभाग पायाखाली घालून सुखरूप पोहोचला. 'अ जर्नी टू द वेस्ट' या नावाने कार्टून्स फिल्म्स व चित्रपटही खूप प्रसिद्ध आहेत. त्यात हे कथानक रंगवून दाखवले आहे.

***

६२७ ते ६४३ या कालखंडात सुआन काही वर्षे नालंदा येथे होता. तिथे बौद्ध भिक्षूंबरोबर राहून संस्कृतशी झटापट केली, काही स्तोत्रे शिकून घेतली आणि स्वदेशी जाऊन सहकाऱ्यांना शिकवून ती म्हणण्याची व्यवस्था लावली. जवळपास ६०० ते ७०० स्तोत्रं तो शिकून घेऊन गेला, जी पुढे पूर्वेकडील सगळ्याच देशांमध्ये रुजली. त्यातील एक 'महा करुणा धारणी' सूत्र. चिनी नाव 'ताई पूय चीव'. इथे मूळ चिनी भाषेतील, इंग्लिश व संस्कृत भाषेतील स्तोत्र दिलं आहे.

'महा करुणा धारणी' सूत्र

हे स्तोत्र मी नवरात्रात एका चायनीज देवळात ऐकलं. कोण्या बोबड्या माणसाने काहीतरी म्हणावं असं काहीतरी वाटलं. एका धातूच्या वाटीवर रबरी गोळा आपटून कोरसमध्ये ऐकायला तसं बरं वाटलं. तरीही शब्दांची भूक काही भागेना. देवळातील सेवेकऱ्यांशी गट्टी जमवून (थाई भाषेत त्यांना लाडीगोडी लावून) एक चिनी भाषेतील प्रत मिळाली. त्या चित्रभाषेत काय ठो कळणार होतं? पुढे काही दिवसांनी थाई प्रत मिळाली, कॅसेट मिळाली. (२००३मध्ये पेन ड्राइव्ह नव्हते.) वाचून वाचून ऐकून ऐकून तोडकं मोडकं संस्कृत लावता आलं खरं.

images-31

'नमो रत्नत्रयाय आर्य अवलोकितेश्वराय...' सुरुवातीला अशी चतुर्थी विभक्तीतील नावं योजली आहेत. (ज्याला नमन करायचं, त्याची चतुर्थी) अव + लोक हा १०व्या गणातील उभयपदी धातू ज्याचा अर्थ अवलोकन करणं, पाहणं, लक्ष ठेवणं. आता देवी म्हणून 'अवलोकितेश्वरी' अशी काही भानगड नाहीए. ह्या देवीला 'goddess of compassion' असंही ओळखलं जातं. ही कधी कमळावर आसनस्थ दिसते, तर कधी ड्रॅगनवर आरूढ दिसते. तिने हातात बांबूची कोवळी पानं धरलेली असतात. आपण त्यालाच 'लकी' मानून गल्ल्यांवर स्थापन करतो नाही का, तोच तो. थाई भाषेत या देवीला 'मॅ फान् म' असं म्हणतात. मॅ - आई, फान् - हजार, म - हात. हजारो हात असलेली देवी. यावरून काही स्मरतंय का? आता जसे चिनी दिसतात, त्यांची देवी तशीच दिसणार. तर तिचेही डोळे (ती जागी असताना) आपल्या देवांना पेंग आल्यावर उघडे राहतील तेवढेच असणार ना?

D-esse-de-la-mis-ricorde-aux-mille-bras

'सहस्त्रशीर्षा पुरुष:सहस्राक्ष:सहस्रपात् |
स भूमि सर्वत: स्पृत्वाSत्यतिष्ठद्द्शाङ्गुलम् ।'
पुरुषसूक्तात हेच वर्णन आहे. हजारो मस्तकं, हजारो चक्षू, हजारो पाय असलेला विराट पुरुष.

या स्तोत्रात कधी शंकराचा नीलकंठाय, कधी विष्णूचा वराहाननाय, सिंहशिरमुखाय असा दशावतारातील रूपांचा उल्लेख होतो. पुढे चक्रहस्ताय, पद्महस्ताय अशी नावं येतात. ह्यात काही बीजमंत्र आहेत - उदा., दत्तमाला मंत्र (ह्यात महासिद्धाय स्वाहा असा उल्लेख आहे, जो वरील स्तोत्रातही आहे), वडवानल स्तोत्र. उपास्य देवतेचं स्मरण करून, आवाहन करून तिच्याकडून शीघ्रतेने कृपा व्हावी व संकटांचा नाश व्हावा, अशी या स्तोत्रांची रचना असते. बीजमंत्रांबद्दल बोलायचं म्हणजे विषयविस्तार होईल. तूर्तास या स्तोत्राबद्दल बोलायचं तर 'स्वाहा' हा शब्द खूप वेळेला आलाय. अर्थात यज्ञात आहुती देताना स्वाहा म्हणूनच देतात. 'स्वाहा' अग्नीची पत्नी, जिच्यामार्फत तो त्या त्या देवतेपर्यंत आहुती पोहोचवतो. म्हणजे त्या काळात भारतात हे स्तोत्र कोण्या यज्ञात गायलं जात असावं. बरेचसे साधक उपसनेसाठी हे स्तोत्र दररोज १०८ वेळेला म्हणतात. असंच एक 'प्रज्ञापरिमित स्तोत्र' आहे, ज्यात ब्रह्माच्या निर्गुण अवस्थेचं वर्णन येतं. सलग चरणांचे तुकडे तुकडे करून म्हणतात. मूळ रचना आणि कानांना येणारा अनुभव यांत कमालीची तफावत आहे.

प्रज्ञापरिमित स्तोत्र

काही दिवसांनी मी त्या देवळात पुन्हा गेलो, तेव्हा तेथील काही मंडळींना त्याचा अर्थ सांगितला, त्यातील नावं सांगितली, ती भारतात कोणत्या देवांची आहेत, त्यांचे अर्थ असा काय काय ऊहापोह पार पाडला. त्या सगळ्यांचे डोळे सुखावलेले बघून मनात विचार चमकून गेला की उच्चारांचा आग्रह का मनातील भाव? कोणतं पारडं जड म्हणायचं? कोण कुठचा तो सुआन त्या काळात कसा चीनमधून इथे आला असेल, हिंडला असेल ज्ञान घ्यायला काय काय केलं नसेल. हे काहीतरी आक्रीत नव्हे का? त्यांनी जिवापाड जपून तिथे नेलेलं, वर्षानुवर्षं भक्तांनी सांभाळलेलं, क्वचित अर्थ न कळताच सुखात व दुःखात आळवलेलं. त्या मोडक्यातोडक्या बोलण्यातल्या मंत्रातही समाजाची घडी बांधून ठेवण्याची शक्ती असावी. यदि भावं विशुद्धं तर्ही शब्दानाम् किं करणीयम्? शिव व शक्ती यांचं यिंग व यांग होतं. ना रूप ना लिंग, ना धर्म ना कर्म. फक्त ऊर्जा तत्त्व, सगळ्यांत मिसळलेलं तरीही विभिन्न राहून स्वतःच्याच सगुणांचे अवलोकन करणारं. या ज्ञानाचा 'बिग बँग' एकदाच मनात झाला की स्तोत्र म्हणणारा कोण आणि ऐकणारा एकच होणार.

माझ्या देशात कोणी शेजारून येऊन भाषेची रोपटी घेऊन जावी आणि तिथे त्यांचे संस्कृतीचे वृक्ष व्हावेत. कदाचित ह्याचं उतराई होण्याकरता म्हणून तर चीन आपल्याला स्वस्त आणि 'मस्त' वस्तू आपल्या घरात पोहोचवत नाहीये ना? जाता जाता त्यांचा लाल ड्रॅगन म्हणजे आपली पृथ्वी डोक्यावर घेऊन सांभाळणारा 'शेष'च की हो. त्याला काय एवढं घाबरायचं? आपण 'आपल्या' भाषेतून खणखणीत आवाजात स्तोत्रं म्हटली की तो आपलंच ऐकेल की!

images-34

सर्व मिपाकरांना दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. येणारी दिवाळी शब्दांचं, भाषेचं आणि पर्यायाने ज्ञानाचं तेज समेटून येवो व आपल्या सर्वांचं जीवन अंतर्बाह्य उजळून निघो, हीच प्रार्थना.

इति अलम्।

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

26 Oct 2019 - 7:31 am | जेम्स वांड

तुम्ही अतिशय चिकाटीने ह्या रिसर्चच्या तळाला पोचलात हे कौतुकास्पद आहे! अन हा लेख अतिशय ज्ञानवर्धक झाला आहे. एरवी थायलंडच्या जुन्या राजधानीचे नाव आयुथया (अयोध्या) होते आणि तिथे रामलीला "रामकियान" नावानं होते ह्या (ऐकीव) माहिती शिवाय काहीच कल्पना नसे.

मायमराठी's picture

26 Oct 2019 - 11:05 am | मायमराठी

मजा म्हणजे थाई भाषेत रामकीयन हा शब्द รามเกียรติ์ असा लिहिला आहे; ज्याचा खरा उच्चार 'रामकीर्ती' असा होतो. अयोध्या असंच लिहिलंय पण उच्चार 'अयुथया' असा करतात.

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 2:45 pm | यशोधरा

फार सुरेख लिहिलाय लेख.

टर्मीनेटर's picture

27 Oct 2019 - 2:19 pm | टर्मीनेटर

|| नमो मॅ फान् म || 🙏

खूप छान लिहिलंय. अगदी संग्रहणीय लेख, वाचनखुण साठवली आहे!

७व्या शतकात चायनीज प्रवासी 'सुआन त्सांग' (ह्याचा खरा उच्चार प्रत्येकाचा वेगळा असू शकतो, किंबहुना असेलच. हा उच्चार माझ्याकरता मर्यादित.)

हे मात्र अगदी पटलं! शालेय पाठ्यपुस्तकांतून आपल्याला ओळख करून देण्यात आलेल्या परदेशी व्यक्तींच्या नावांचे उच्चार आणि प्रत्यक्षात त्या देशांमध्ये गेल्यावर त्या नावांचे स्थानिक उच्चार ह्यात प्रचंड तफावत जाणवते. आपण आपापल्या परीने, आपल्या बुद्धीला पटेल असा त्यांचा उच्चार करावा 👍

अनिंद्य's picture

29 Oct 2019 - 12:00 pm | अनिंद्य

सुंदर लेखन.

आशियात जवळपास सगळीकडे लपलेला बृहदभारत असा अचानक समोर येतो आणि फार छान फीलिंग येते.

.....'युनान' प्रदेशातून ... तुम्हाला युआन म्हणायचे असावे बहुतेक.

चाणक्य's picture

29 Oct 2019 - 4:03 pm | चाणक्य

तुमच्या चिकाटीला सलाम.

पद्मावति's picture

29 Oct 2019 - 4:34 pm | पद्मावति

अप्रतिम लेख.

सुधीर कांदळकर's picture

30 Oct 2019 - 5:52 pm | सुधीर कांदळकर

चलो आयुथया न म्हणता तिथे फिरवून आणलेत. शाळेत असतांना ह्युएन त्सॅन्ग आणि फाहिएन असे इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेले होते.

भाषेबरोबर उच्चारांशी सामना करून एवढे शोधायचे म्हणजे कमालच आहे. छान ओघवत्या लेखाबद्दल धन्यवाद.

श्वेता२४'s picture

4 Nov 2019 - 8:10 pm | श्वेता२४

हे असं काही असेल याची कल्पनाच नव्हती. बाकी आपल्याला इतिहासामध्ये शिकवला जाणारा यूआन त्संग तो हाच का? अत्यंत अभ्यासपूर्ण व माहितीपूर्ण लेख. अर्थातच वाचनखुण साठवली आहे

मायमराठी's picture

4 Nov 2019 - 10:01 pm | मायमराठी

आपण ह्याच्याबद्दलंच इतिहासात शिकलेलो. भाषेच्या उच्चारांच्या आभाळभर गोंधळामुळे सगळंच उलटपलट होते.

मुक्त विहारि's picture

19 Nov 2019 - 2:47 pm | मुक्त विहारि

छान लेख आहे.

खरे तर ही एक लेखमाला हवी होती _/\_.

कोण कुठचा तो सुआन त्या काळात कसा चीनमधून इथे आला असेल, हिंडला असेल ज्ञान घ्यायला काय काय केलं नसेल. हे काहीतरी आक्रीत नव्हे का ?

:) तेंव्हा सगळे जसे फिरत तसेच हा फिरला यात आश्चर्य काय ? हां आता गाडी घोड्यांची सोय असता बिचारा हिंडत हिंडत आला असेल तर आक्रीत घडणार हे नक्की. पण तरीही ही लालसा समजून घ्यावीच लागेल :)

मायमराठी's picture

28 Nov 2019 - 11:01 pm | मायमराठी

आधी तोच विचार होता पण वेळेच्या गणितांची जुळवाजुळव करण्यात लेख जन्माला आला . बघू या अजून 2 -3 भागांची पुंजी आहे. लवकरच कामाला लागेन.

अलकनंदा's picture

29 Nov 2019 - 5:58 pm | अलकनंदा

भन्नाट लेख. खरेच ह्या लेखाचे अजून काही भाग असतील तर येऊद्यात. किती काय माहिती मिळत असते!