मिपा कथालेखन आणि स्टिरीओटायपींगची आव्हाने

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
11 Jul 2019 - 9:15 am
गाभा: 

कथालेखन माझा प्रांत नाही. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सर्व समाजांना आदरपुर्वक वागणूक हे माझ्या चर्चांचे प्रांत असू शकतात.

एका बाजूला साहित्यिकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करतानाच दुसर्‍या बाजूला त्याच्या सहित्यातून उभ्या रहाणार्‍या नरेटीव्हजचे स्वरूप काय आहे तसेच या चर्चा लेखाचा विषय एखाद्या समुहाचे कळत न कळत स्टिरीओटाईपींग म्हणजे एखाद्या मानवी समुहाबद्दलच्या रुढीबद्ध धारणांना खतपाणी घातले जात नाहीएना

स्टिरीओटाईपची शब्दकोशीय व्याख्या

stereotype. A stereotype is a preconceived notion, especially about a group of people. ... Those are stereotypes: commonly held ideas about specific groups. You most often hear about negative stereotypes, but some are positive. For example, there's a stereotype that Asian people do better in school.

'आशियायी मुले शालेय शिक्षणात चांगले यश संपादन करतात' अशा स्वरुपाची सहज बोलण्यात येणारी वाक्ये सामाजिक धारणेच्या स्वरूपात परावर्तीत होत जातात. सुरवातीला न खुपणार्‍या सामाजिक धारणा व्यक्ती आणि समाजांच्या अहंगंड अथवा न्युनगंडात रूपांतरीत होताना दिसतात.

'आशियायी मुले शालेय शिक्षणात चांगले यश संपादन करतात' हे वाक्य खुपसे खुपणार नाही. 'ब्राह्मण मुले अभ्यासात पुढे असतात' ह्या वाक्याने भुवया वर होतील तर त्याच वाक्याला अहंगंडाचा प्रादुर्भाव झाला सामाजिक दुष्परीणाम समोर येऊ लागतात. तरी हे जरासे सकारात्म्क स्टिरीओटाईप झाले . नकारात्मक स्टिरीओटाईपही समाजधारणेत आकारात घेत असतात. अमुक एक समुह देशप्रेमात मागे रहातो हे नकारात्मक सरसकटीकरण आहे.

१) एखाद्या सामाजिक वस्तुस्थितीचा निर्देश आणि सरकटीकरण करणारा कायम स्वरूपी बिरुद अथवा शिक्क्यात नेमका काय फरक असतो ? या बाबत मला इतर मिपाकरांकडून त्यांची मते जाणून घेणे आवडेल.

आपल्या स्वतःच्या समुदायाशी संबंधीत नसलेली स्टिरीओटाईप्स तेवढी खुपत नाहीत. पण स्वतःच्या समुदायाशी संबंधीत असलेली स्टिरिओटाईप्स चटकन खुपतात हिंदी चित्रपटातून मराठी महिलांचे मुख्यत्वे कामवाली बाई स्वरूपाचे चित्रीकरण कदाचित उर्वरीत भारतीयांना तेवढे खुपणार नाही पण अशा स्वरुपाचे नकळत बांधले जाणारे स्टिरीओटाईप मराठी माणसांना खुपणारे असू शकते.

पण कथा - कादंबरी - नाटक लेखन करणार्‍या ललित साहित्यिकांच्य लेखनात व्यक्तीपात्रांचे सकारात्मक, नकारात्मक विनोदी अशा विवीध पद्धतीने चित्रण होत असते. कथेतील पात्रांची नावे कथा लेखक कशी स्विकारतात याची कल्पना नाही पण हि प्रक्रीया खूप जाणीव पुर्वक होत असेल असे वाटत नाही. स्वतःच्या अनुभवात आलेल्या व्यक्तींची नावे काही अंशी वापरून बदलणे असे काही तरी कथा लेखक करत असावेत असा माझा समज आहे तो कितपत बरोबर आहे ते कथा लेखकच सांगू शकतील.

कथेतील पात्राची सकारात्मक प्रतिमा रेखाटताना पात्राचे नाव काय आहे याने खुपसा फरक पडत नाही. कथा लेखकाला सहसा स्वतःस आणि वाचकास झेपू शकतील अशी पात्र नावे वापरावी लागतात त्याच वेळी जेव्हा एखादे पात्र नकारात्मक रंगवले जाते तेव्हा त्या पात्रनाव आणि सोबत त्या पात्रनावाचे जर समुदायाशी नाव जोडले जात असेल तर जाणीवपूर्वक नसेल तरीही नकळत सामाजिक अवधारणा तयार होण्याचा धोका असतो का ?? या धोक्याचे स्वरूप काय असते? पात्र नावे परिचित वाटणारी ठेवतानाच स्टिरीओटाईप्स ना कारणीभूत होणार नाहीत यासाठी लेखक काय करू शकतात ??

* व्यक्तिगत टिका अनुषंगिका पलिकडची अवांतरे आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

11 Jul 2019 - 12:38 pm | प्रकाश घाटपांडे

कोन म्हनत ट्क्का दिला हे नाटक पहा

माहितगार's picture

11 Jul 2019 - 7:44 pm | माहितगार

घाटपांडे साहेब , मी नाटक पाहिलेले नाही - मराठी विकिपीडियावरील 'कोण म्हणतो टक्का दिला? (नाटक)' लेखातून सक्षेपात कथानकाचा अंदाजा आला.

१) प्रांजळपणे; आपल्याला नेमके काय म्हणायचे ते उमगले नाही; आपली टिपणी आणि कथानक पाहून, हो ना हो, माझ्याकडून धागा लेखात काही उणीव नाही ना अशी जराशी शंकेची पाल चुकचुकली. तसे काही असल्यास मोकळेपणाने सांगावे हि नम्र विनंती.

२) चर्चा आरक्षणाच्या मुद्यावर न घसरता, धागा लेखातील स्टिरीओ टाईपींगच्या मुद्द्यास अनुलक्षुन नाटकातली कोणती बाब आपणास महत्वाची वाटली ते इस्कटून सांगू शकल्यास आपला आभारी राहीन .

जॉनविक्क's picture

11 Jul 2019 - 4:24 pm | जॉनविक्क

यासाठीच आकुज स्वीट्स, गँभिरपणे घ्यायचे नसतात अन्यथा... अजून स्वीट्स पचवणे प्रारब्धी येते

सध्या अकुंच्या कथांची मालिका चालू आहे, अकुंनी वापरलेली पात्र नावे काहींना खुपणारे काही प्रतिसाद मी पाहिले हे खरेच. पण मला वाटते ह्या वेळी मी धागा काढण्यात निमीत्त किंवा योगा योग म्हणता येईल. स्टिरीओटाईपींग समकक्ष उदाहरणे इतरही लेखकांच्या लेखनातून वेळोवेळी बघण्यात आली होती. इतरांच्याही बघण्यात येत असतील.

एकतर मुद्दा आपल्याशी संबंधीत नसतो शिवाय कुठे छिद्रान्वेषण करायचे म्हणून अशा विषयावर सहसा चर्चा होत नाहीत. त्यामुळे केवळ अकुंच्या किंवा इतर कुणाच्याही लेखनाला वेगळे पाडून टार्गेट करणे असा उद्देश्य नाहीए तर,

पात्र नावे परिचित वाटणारी ठेवतानाच स्टिरीओटाईप्स ना कारणीभूत होणार नाहीत यासाठी लेखक काही करू शकतात का?

मला वाटते प्रश्नाकडे वेगवेगळ्या दिशांनी पहाता यावे.

आणि काही करू शकत असतील तर नेमके काय ? आणि काही करू शकत नसतील तर लेखकांना दोष देणे योग्य ठरते का ?

अथांग आकाश's picture

11 Jul 2019 - 4:43 pm | अथांग आकाश

मला वाटत...

?

जाऊदे बहुतेक मला विषय नीट समजला नाहीये

उदाहरणे दिली की विषय स्पष्ट होणे सोपे होत असले तरी १) अनेकदा चर्चा विषय फार वेगाने भरकटतात ते मला नको असते. २) ज्यांना विषयात मूळात जाऊन निष्पक्ष विचार करणे आवडते ते लोक वेगवेगळी उदाहरणे विचारात घेऊन प्रतिसादात मांडणी करू शकतात. असे लोक कमी असतात . चर्चेत सर्वबाजूंची उदाहरणे लक्षात न घेतली जाण्यापेक्षा किंवा चर्चेची निष्पक्षता धोक्यात येण्यापेक्षा चर्चा कमी होणे अथवा न होणे मला चालणारे असते.

मनमोकळ्या प्रतिसादासाठी धन्यवाद

कंजूस's picture

11 Jul 2019 - 6:17 pm | कंजूस

१)

आशियायी मुले शालेय शिक्षणात चांगले यश संपादन करतात'

इतर देशांत असं म्हणतात का? - हो.
अभ्यास एके अभ्यास मुलांचे पालकही करवून घेतात. गुण चांगले मिळवून पुढे जातात. त्यामुळे अभ्यासाबाहेरचे छंद,खेळ,संगीत वगैरे करणे आशियायी मुलांना आवश्यक केलय.
२) अमुक एक समाजाच्या तरुणास नायक केल्याने गल्ला पेटी भरते/भरत नाही या गोष्टीकडे निर्माते लक्ष ठेवतातच.
३) फक्त शैक्षणिक चर्चेवर मार्केट चालत नाही.
बाकी चालू द्या.

माहितगार's picture

11 Jul 2019 - 8:09 pm | माहितगार

चर्चेचामुख्य विषय खालील प्रमाणे आहे.

पात्र नावे परिचित वाटणारी ठेवतानाच स्टिरीओटाईप्स ना कारणीभूत होणार नाहीत यासाठी लेखक काही करू शकतात का?

मला वाटते प्रश्नाकडे वेगवेगळ्या दिशांनी पहाता यावे.

आणि काही करू शकत असतील तर नेमके काय ? आणि काही करू शकत नसतील तर लेखकांना दोष देणे योग्य ठरते का ?

मुख्य चर्चा विषयास अनुलक्षून प्रतिसाद देण्यात सहकार्यासाठी आभार

जालिम लोशन's picture

11 Jul 2019 - 8:16 pm | जालिम लोशन

काळी आणी पांढरी बाजु पुर्णपणे कोणालाच नसते. ग्रे पण छटा असते. मुद्दाम केलेले आणी कथेची गरज म्हणुन आलेली नावे सुज्ञ वाचकांना कळतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणुन तुम्ही रात्री बारा वाजता मोठ्या आवाजात गाणी लावुन वाढदिवस साजरे करत असाल तेंव्हा शेजार्‍याच्या शांत झोपण्याच्या अधिकारावर गदा आणत असतात. आणी हे समजण्याचे तारतम्य जर संबधितास नसेल तर तडीपार करणे उत्तम.