सुखाच्या सीमेवर दुःखांची घरे वसतात
तुम्ही हसा प्रसन्नतेने ,मग बघा आजूबाजूला कश्या चीता पेटतात
तुमच्या हसण्याची किंमत , तुम्हालाच ठाऊक नाही
तुम्हाला हसताना बघून, त्यांचं स्वतःच कामच होत नाही
त्यांचं खिन्नपण जणू तुमच्याशीच निगडित असतं
वाया घालवत असतात वेळ , हळूहळू प्रारब्ध बदलत असतं
रोवूनीया झेंडे कैक , कैफ मिरविती एकमुखाने
एक हास्याची लकेर मात्र , सारं काही उधळत असतं
कोण कुणाच्या मनी वसला , तरीहि गवसत नाही कुणाला
फक्त एका हर्ष होता , सारे बैसती पुसत दुःखाला
षड्रिपूंच्या विळख्यात सारे ऎसेकाही गुरफटलेले
बघा इथे ओ पूर आला , जो तो संगे वाहत गेला
विचारले मी त्याला , हसण्याचे कारण ओ कैसे ?
तो उत्तरला उत्तर देउनी , वेड लागले मला जरासे
या वेडातच दुनिया सारी , दुःखीकष्टी झाली भारी
हासुनिया त्याने पेटवल्या , चीता सर्वदूर घरोघरी
{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}
मनातला दर्द कवितेत उतरला आहे.
गहन
अगदी खरे.
या कल्पनेचे श्रेय नक्कीच आमचे