.

सरमद कशानी

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
10 May 2019 - 10:30 am

कशानी हे मराठी क्रियापद नाही भारतात आलेल्या एका इराणी अवलीयाचे नाव आहे. 'सरमद कशानी' भारतात येऊन प्रेमळ आणि उदार भारतीय सम्राट औरंगजेबाने फाशीवर चढवलेला एक इराण मार्गे आलेला अर्मेनियन नग्न अवलिया होता.

मूळचा कदचित ज्यू असून मुस्लिम धर्म स्विकारून त्यागला अथवा सोबतच राम - लक्ष्मण स्विकारले, व्यापारासाठी भारतात आल्यावर त्याला अभयचंद नावाचा जिवश्च मित्र भेटला सर्वस्वाचा त्याग करून अभयचंदा सोबत त्याने भारत भ्रमंती केली. काव्य स्पिरिच्युआलीझम मध्ये त्याला रस असावा. पण धर्मांधतेला प्रखर आव्हान देण्याचा स्वभाव असावा. मुघल राजपूत्र दारा शिकोहला सोबत काही प्रमाणात तरी त्याची उठबस झाली असावी.

बादशहा औरंगजेबाने सत्तेवर आल्यावर या दिगंबर फकीराला अटक केली आणि शांततेच्या धर्माच्या ईश्वराच्या निंदेच्या आरोपावरून त्यास फाशी दिले.

त्याचे काही काव्य आणि अनुवादही असवेत. नास्तिक ईश्वर निंदेचे वेगवेगळे मार्ग शोधतात धर्मांध औरंगजेबाला त्वेष देणारी त्याची ईश्वर निंदेची त्याची तर्‍हाही निराळीच होती. शांततेच्या धर्माच्या ईश्वराची एकेरी एकाधिकारशाही असल्याचे पुन्हा पुन्हा उद्घोषित करताना ' जगात (दुसरा) ईश्वर नाही पण अमुकच ईश्वर आहे' अशा उद्घोषणेचे स्वरुप असावे. हा अवलिया सरमद त्या उद्घोषणेचा पहिला अर्धाभाग 'जगात ईश्वर नाही..' एवढाच म्हणत असे . जेव्हा बादशहाने उर्वरीत भाग म्हणण्याची सक्ती केली तेव्हा मी उद्घोषणेच्या पहिल्या भागानेच खूप भारावलो आहे त्यामुळे दुसर्‍या भागाकडे पोहोचण्यास अवकाश आहे असे गंमतीशीर उत्तर मोठ्या हिमती ने दिले.

आणि एका नागड्या नास्तिकाने आपल्या स्वातंत्र्यासाठी जिवाची बाजी लावली. शांततेच्या धर्माचे आणि प्रेमळ बादशहाचे औदार्य उजागर करून इतिहासाच्या पानांवर भाषणस्वातंत्र्यासाठी जिव गमावलेल्यांच्या यादीत सुवर्णाक्षरांनी नोंद करून ठेवली.

संदर्भ https://en.wikipedia.org/wiki/Sarmad_Kashani

धर्म

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

10 May 2019 - 10:29 pm | ज्योति अळवणी

विषय फारच जड आणि अवघड आहे

आपणास शांततेच्या धर्मातील प्रार्थनांची कल्पना नाही का ? प्रार्थना म्हणताना ते 'देवा तूच एकटा वाली आहेस; म्हणून थांबत नाहीत, त्यांना सोबत ;जगात दूसरा देव नाही' अशा स्वरुपाचे वाक्य म्हणावे लागते ( आणि बहुधा ;जगात दूसरा देव नाही' 'देवा तूच एकटा वाली आहेस' या क्रमाने चुभूदेघे)

आता हा अवलीया सर्मद प्रार्थनेतील सोईचे तेवढेच शब्द 'जगात देव नाही' हेच पून्हा पून्हा म्हणत असे आणि हे शब्द प्रार्थनेतलेच आहेत असा दावा करत असे. औरंगजेबाला त्याच्याकडे दुर्लक्ष करता आले असते किंवा काही कमी शिक्षा देऊन सोडून देता आले असते पण औरंगजेबाने यास फाशीच्या तखतावर चढवले. आणि बस्त्तुतः त्यांच्या पुस्तक क्रमांक २ नुसार ईश्वर निंदेसाठी आणि धर्मत्यागासाठी मृत्यूची शिक्षा आहे - जी पाकीस्तानसहीत डझनवारी शांततामय देशातून बजावली जाते . गेली काही वर्षे पाकीस्तानात बांग्लादेशात हिच कारणे देऊन अल्पसंख्यांकाच्या हत्या होतात . गेली काही वर्षे आशीया बीबी नावाच्या स्त्रीची केस विशेषत्वाने बातम्यात होती. ती ख्रिश्चन होती आणि तिला युरोमेरीक्ने कसे बसे वाचवून अलिकडे कॅनडात आश्रय दिला. त्या बातमीनेच मला या अवलियाची आठवण येऊन लेख लिहिला.

डावे आणि नास्तिकातही अलिकडे भारतात औरंगजेबाच्या आणि शांततेच्या धर्माच्या उदातीकरणाची टूम आली आहे. औरंगजेबाचे आणि शांततेच्या धर्माचे किती उदात्तीकरण केले तरी औरंगजेबाने सरमदला दाखवलेल्या अमानुषतेचे समर्थन रॅशनल लोकांसाठी अवघड गोष्ट ठरावी. असो

माहितगार's picture

11 May 2019 - 6:59 am | माहितगार

मला वाटते भाषिक अनुबादात घोळ झाल्यानेही समजणे अवघड होते असावे.

'ईश्वर नाही दुसरा कोणी ' मधील 'ईश्वर नाही ' एवधेच शब्द वापरायचे . जे शब्द पवित्र प्रार्थनेतील आहेत तातील बाकीचे शब्द म्हणयाचे राहिले म्हणून शिक्षा दिली जाऊ शकते का हा तांत्रिक पेचही औरंगजेबाच्या मौलानांपुढे असणार.

हा औरंग्या, तत्कालीन “डिवाइडर इन चीफ़’ होता ....

माहितगार's picture

11 May 2019 - 7:15 am | माहितगार

अलिकडे एक नवा डावा प्रवाह आहे. औरंगजेबाला सकारात्मक रंगवण्यासाठी औरंगजेबाची तत्कालीन प्रश्नांकीत कृत्ये सत्तेच्या राजकीय प्रतिस्पर्धेचा भाग होती असा दावा करतात. पण अवलीया सरमद कोणत्याही राजकीय प्रतिस्पर्धेचा भाग नव्हता आणि सरमदची छळवणूक आणि शिक्षा ना औरंगजेबाच्या ना शांततेच्या धर्माच्या सहिष्नूतेचे आदर्श उदाहरण असावे.

खास करुन दारा शुकोहशी तुलना करता औरंगजेब तत्कालीन डिव्हाईडर इन चीफ होता हे नक्कीच

अवलीया सरमद कोणत्याही राजकीय प्रतिस्पर्धेचा भाग नव्हता

सहमत...
सरमद हा सुद्धा तत्कालीन ‘अख़लाक़’ सारखा फ़ुका मारला गेला बिचारा.

देवा तूच एकटा वाली आहेस; म्हणून थांबत नाहीत, त्यांना सोबत ;जगात दूसरा देव नाही' अशा स्वरुपाचे वाक्य म्हणावे लागते ( आणि बहुधा ;जगात दूसरा देव नाही' 'देवा तूच एकटा वाली आहेस' या क्रमाने चुभूदेघे)

सहमत....
सद्यस्थितीतही, एक भक्तसम्प्रदाय, त्यांच्या एका मानवी आवतारतील देवा बाबत, ...
देवा तूच एकटा वाली आहेस; म्हणून थांबत नाहीत, त्यां सोबत ;
जगात, तत्सम दूसरा नाही/ कधी झाला नाहीं/होणारही नाहीं...अशा स्वरुपाचे वाक्य म्हणावे लागते ( आणि बहुधा ;जगात दूसरा वाली नाही' 'देवा तूच एकटा वाली आहेस' या क्रमाने चुभूदेघे)
आणि आपल्या या “सुप्रीम-लीडर” वर टीका म्हनजे ब्लासफ़ेमीच जणु, असे मानतात. (ऊ कोरियातील सुप्रीम-लीडर संकल्पना माणनारे हिच लोक, तुमचीं ड़ावी लोक आसावीत)

बादवे
दारा शुकोंह व औरंग्या एकाच धर्माचे...
पण
औरंग्याने स्वतःचे ‘बंच ऑफ थोट्स’ धर्माच्या नावाख़ाली राबवले...

हया औरंग्या ऐवजी ज़र
दारा शुकोंह दिल्लीत असता, तर चांगला “विकास” झाला असता कीं काय ? किंवा कसे ?

माहितगार's picture

11 May 2019 - 11:39 am | माहितगार

(*) ते 'बंच ऑफ थॉट्स' औरंगजेबापुरते मर्यादीत होते, तर तेच कायदे अनेक शांततामयी देशात कसे अस्तीत्वात असतात ? पाकीस्तान अल्पसंख्यांक तर बांग्लादेशात ब्लॉगर्सच्या हत्या आणि श्रीलंकन चर्च मधील घटना नेमक्या कोणत्या आकाशातून खाली पडतात ?

(*) १) डाव्यांचे आर्थीक विचार हा वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे. इथे साशंकीत आहे तो फक्त एका बाजूवर टिकाकरणे आणि दुसर्‍या बाजूवर पडती बाजू घेणे; एकाच्या चुकीने दुसर्‍याच्या चुकीचे समर्थन करणे यामुळे त्यांच्या धर्मनिरपेक्षतेला येणारा दिखाऊपणा; दिखाऊपणा असलेलीच धर्मनिरपेक्षता दारा शुकोहच्या शुद्ध धर्मनिरपेक्षतेचा गळा घोटत आली आहे.

२) माझ्या व्यक्तिगत वैचारीक भूमिकेबद्दल म्हणत असाल तर माझे मिपावरील मागचे बरेच लेखन पुरेसे साक्ष आहे मी कुणाचीही व्यक्ती आणि परिवार पूजा करत नाही, तुम्ही सध्याच्या ज्या नेतृत्वावर राजकीय टिका करू इच्छिता मी त्यांच्यावरही टिका केलेली आहे. मी व्यक्ती पुजा टाळताना ज्याने जेवढे केले त्याचे तेवढेच माप त्याच्या पदरात टाकण्याबद्दल सजग असतो अनाठायी द्वेषही करत नाही. अगदी औरंगजेबाचा औरंग्या सुद्धा करत नाही.

चामुंडराय's picture

11 May 2019 - 7:19 am | चामुंडराय

महाराजांना आणखी दहा वर्षे आणि थोरल्या बाजीरावाला वीस वर्षे मिळाली असती तर आज भारताचा इतिहास वेगळा दिसला असता.

चाळीस आणि पन्नास हि काय जायची वयं होती का?

इकडे हे लवकर मृत्यू पावले आणि तिकडे त्याला अन्याय, जुलूम आणि अत्याचार करायला उदंड आयुष्य मिळाले.
भारताचे दुर्दैव, दुसरे काय?

दावा बादशाह का करते, दुवा माँगते? हम तो फकीर है…
कहे निपट ये देल्ही का दरबार नहीं, फकीरी दरबार है..
चारो दिशा बाहर मार-काट किया कत्ले आम
एक बहादुर की शीश कटवाई है…
गुरु गोविन्द सिंह के बेटे को नाहक दिवार में चिनवाया है…
और फकीर की दुवा माँगने आया है ?

…मेरे को आजमाने को हाथी पे बैठ के आया…
कहे सव्वा मन जनेऊ जलाए, खाना तब खाए..
फिर दुवा मांगता है ?
सुनो सुल्तान… कौन है मुस्लमान?
जिस का मुसल्ले ईमान… यकीन पक्का हो वो ही मुसलमान होता है..

खुद की ना पहेचान , और जीकर खुदा का छेड़ा है..
कलाम कहे भारम्भार अन्दर मलबा भरा है…
अन्दर ऐसी बुध्दी है जिस में अहंकार और द्वेष का मलाबा भरा है…
100 चूहे खाके हुक्का हाज को दौड़ा है…
करे नमाज रोजाना रूह का खुदा खोजा ना …
कहे जगत है बखेड़ा, कहे आँगन टेढा …
नाचना तो आवे नहीं.. कहे आँगन टेढ़ा
ये साधना कठिन है..
हिन्दू को काफिर कहे नर आलमगीर
मुर्दा गाड़ा कहे उस को बोलते पीर?
सुन मून उम्र गवाया सब तुने 60 साल का हुआ….
अभी भी छल कपट कर के पटाने आया
धोबी का कुत्ता ना घर ना घाट का
खुद को नहीं खुद की खबर
कुछ ऐब ढूंढ़ खुद की नजर
अपनी बुराई को खोज दूसरों की भलाई कर
ऐश में ना खो हैवान कहेलायेगा,
सुन आलमगीर दिल से भी जाएगा, दुनिया से भी जाएगा!
सती भय सत नहीं यति भय मुनि गुनी भय
तापी जपी भय रागी भय जोगी बियोगी नहीं थिर
औलिया बतिया है …
दिल की देल्ही की सफाई करो..ये ही बादशाही है
......बाबा निपट निरंजन

माहितगार's picture

11 May 2019 - 1:19 pm | माहितगार

व्वा ह्या निपट निरंजन आणि त्यांच्या या काव्या बाबत कल्पना नव्हती. शोधगंगावर शोध घेतल्यावपिडिएफ दुवा डॉ. भालचंद्र तेलंग यांच्या 'औरंगाबाद की हिंदी संतवाणी' ग्रंथात निपट निरंजनाम्च्या काव्याचा समावेश असल्याचे वाचण्यात आले. अर्थात वर नमुद केलेले काव्यही तेलंगांच्या ग्रंथात उपलब्ध असण्याबद्दल कुणास ठाऊक आहे का ?

जालिम लोशन's picture

11 May 2019 - 12:40 pm | जालिम लोशन

त्याचे नाव वाचले कि उलगडा होईल. आणी त्याचे बोलविते धनी समजतील.

कोणत्या ही धर्माच्या श्रद्धा स्थान वर टीका करणे करणे किंवा निंदा नालस्ती करणे हा गुन्हा मृत्यू दंडास पात्रच आहे त्यामुळे इथे ऑरेंगजब योग्य च वागला
हे माझे वैयतीक मत आहे

अभ्या..'s picture

11 May 2019 - 1:26 pm | अभ्या..

मिपाधर्माच्या श्रध्दास्थानावर टिका करुन आणि किंवा हा शब्द न वाचता निंदा नालस्तीही केल्याबद्दल ह्या आयडीला मृत्युदंड का देऊ नये. तो अवश्य द्यावा असे माझे वैयक्तिक मत आहे.
अभिरंगजेब

जालिम लोशन's picture

11 May 2019 - 2:42 pm | जालिम लोशन

त्याला जगात समानता, गरिबी आणयची आहे तुम्हालाव्हायचे आहे का वैचारिक, आर्थीक गरिब? तर त्याच्या नादी लागा.

=)) बहोत खूब मालिक बहोत खूब !! अकबराच्या सगळ्या जावयांना फाशी देण्याची गोष्ट माहिती आहे का ? सर्व जावयांना फाशी देण्याचा आदेश दिल्यावर बिरबलाने अकबरासाठी सोन्याचा फास मागवला होता !!

तसा सर्वच पण विशेषतः अब्राहमिक धर्माच्या बहुतेक सर्व प्रेषित आणि धर्म प्रसारकांचा धर्म प्रसार दुसर्‍यां धर्मांच्या श्रद्धा स्थान वर टीका करणे करणे किंवा निंदा नालस्ती वर उभा राहीला आहे यात शांततेच्या धर्माच्या प्रेषित आणि धर्मप्रसारकांचा जसा समावेश होतो तसा आपल्या नियमात औरंगजेबाचाही समावेश होतो. शांततेच्या धर्मातच ७३ पंथ आहेत जे एकमेकांची टिका आणि अगदी निंदा नालस्ती करत असतात. त्यामुळे प्रत्येक पंथानुसार इतर पंथीयांसाठी फासाचे दोर बनवावे लागतील.

तुम्ही कोणतीही एक श्रद्धा स्विकारताना इतर अनेक श्रद्धा आपसूक नाकारल्या जातात आणि त्या त्या इतर श्रद्धांचे स्थान तुम्ही नाकारत असताच या नियमाला धरून तसा प्रत्येक मनुष्यप्राणि फासावर चढवावा लागेल.

आणि हिंदू देवता बघायच्या गेल्या तर स्वतः कृष्णाने इंद्रपूजे विरोधात द्रोह केलेला तिथपासून असंख्य समाज सुधारकांनी टिका आणि निंदा नालस्तीही केलेल्या अगदी म्हणजे अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे संस्थापक काय नाव त्यांचे ते जिना ते गांधी ते नेहरू ते सावरकर ते आंबेडकर कोणतेही अल्पशी धार्मीक सुधारणा करणारेहि सुटणार नाहीत.

कट्टर धार्मीकांसाठी प्रत्येक वेगळे वर्तन त्यांच्या श्रद्धास्थानाची नालस्तीच असते. अगदी या भूतलावर कोणत्याच श्रद्धास्थानाचा नियम मोडला गेला नाही असा मानव प्राणी अजून जन्माला यायचा आहे. बिरबलाने सदर टिकाकारांना फाशी सुचवणार्‍यांसाठी कोणता दोर सुचवला असता हाच तो काय प्रश्न असावा !

Rajesh188's picture

11 May 2019 - 2:18 pm | Rajesh188

आपला धर्म चांगला आहे हे पटवून देणे आणि त्यात काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी दाखवून देने हे समाज सुधारक किंवा धर्म pramukhach
आद्यकर्तव्य आहे दुसऱ्या धर्मावर टीका करून आपल्या स्व धर्मातील त्रुटी झाकने ही वृत्ती वाईट आहे असे थोडक्यात मला सुचवायचे होते.
आणि अशा विचारांनी जे परधर्मावर टीका करतात ते शिक्षेस पात्र आहेत

दुसऱ्या धर्मावर टीका करून आपल्या स्व धर्मातील त्रुटी झाकने ही वृत्ती वाईट आहे

साहेब आपल्या या उच्च विचारातही बहुसंख्य धममार्तनंड आणि समाज सुधारक बसतात. शांततेच्या धर्माच्या प्रेषितानेही दुसर्‍या धर्मावर टिका करताना स्व धर्मातील त्रुटी झाकल्या, औरंगजेब आणि त्याचे मौलवी त्याला अपवाद नव्हते सावरकरांपासून आंबेडकरांपर्यंत कुणिही अपवाद नाही.

नास्तिक्य धर्मावर टिकाकरून स्व विचारातील त्रुटी झाकणे याला काय शासन असावे असे वाटते ?

अजून एक राजेशराव

हिंदूधर्माचा पायाच शंका आव्हाने आणि शास्त्रार्थाचा आहे. एवढेच नाही सटायर हा प्रकार खुद्द ऋग्वेदापासूनच दिसून येतो ऋग्वेद 7.103 आणि छांदोग्य उपनिषदात थट्टेचा (सटायर) चा समावेष असल्याचे आंतरजालीय माहिती वरुन दिसते आहे. चु.भू.दे.घे (. संदर्भ इंग्रजी विकिपीडिया लेख छांदोग्य उपनिषद (हा प्रतिसाद लिहिताना जसा दिसले)

भंकस बाबा's picture

11 May 2019 - 2:32 pm | भंकस बाबा

तुमचे विचार उच्च आहेत.
ओरंग्याचे समर्थन करताना एक गोष्ट तुम्ही विसरत आहात की त्याने जी धर्माच्या विस्तारासाठी हत्याकांडे केली ती दुसऱ्या धर्माच्या हक्काची मुल्य पायदळी तुडवून.
स्वतःच्या भावाला व बापाला मारताना तो कोणते धर्मरक्षण करत हौता?
तुमच्यासारखे उदारमतवादी आहेत म्हणून ही किड फोफावत आहे

माहितगार's picture

11 May 2019 - 3:37 pm | माहितगार

रोचक व्यक्ती आणि ग्रंथ परिचयाबद्दल अनेक आभार. मला वाटते या ग्रंथाचा मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत अनुवाद उपलब्ध होणे वाचक आणि अभ्यासकांसाठी ऊपयूक्त ठरावे.

गामा पैलवान's picture

12 May 2019 - 2:19 am | गामा पैलवान

माहितगार,

माहितीबद्दल धन्यवाद. सरमद कशानी वरनं हल्लज या सुफी संताची आठवण झाली. यालाही काहीतरी खुसपट काढून ठार मारण्यात आलं होतं.

अधिक माहिती : https://en.wikipedia.org/wiki/Mansur_Al-Hallaj

सुफी संत राजकारणात जरा जास्तंच लुडबुड करतात काय अशी शंका येते.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

14 May 2019 - 12:45 pm | माहितगार

शीख गुरु आणि काही सुफी संतांच्या मागे बर्‍या पैकी फालोअरशीप असू शकते त्यामुळे सत्ताधिशाला भिती वाटली आणि विरोध संपवण्यासाठी त्यांना मारले हि पण असहिष्णूताच आहे पण मागे फालोअर्स तरी आहेत सरमदच्या मागे फालोअरशीपही नाही, दारा शिकोहचा त्याच्या सामरीक समर्थकांसहीत काटा काढून झाला आहे. दारा शुकोह आध्यात्मिक आहे पण त्याची ना आध्यात्मिकता ना राजकीय डावपेच सरमदवर अवलंबून आहेत.

बर आजच्या काळाप्रमाणे कुठल्याही कोपर्‍यात काही बोलले की देशभर होते तसे सरमद एखाद्या गल्लीत काही बोलला तर अजून चार गल्ल्यांपलिकडे माहिती जाणार नाहीए. आणि औरंगजेबाचा भारतावर ताबा आहे. त्याला सरमदचे काही पडलेले असण्याचे कारण नाही. तथाकथित ग्रंथ , काजी , आणि औरंगजेब यांची असहिष्णूता या पलिकडे सरमदच्या शीर्च्छेदाचे अजून काही वर्णन कसे करता येते त्याची कल्पना नाही.

औरंगझेबावर चर्चा आली आहे, म्हणून.

सेतुमाधवराव पगडी यांनी 'मोगल दरबारची बातमीपत्रे' भाग १ मध्ये दिलेला किस्सा -

हमीदुद्दीनखान हा औरंगजेबाचा विश्वासू कारभारी. तोही शेवटपर्यंत औरंगजेबाबरोबर होता. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याने औरंगजेबासंबंधीच्या काही आठवणी लिहून काढल्या आहेत. अँनिक्डोट्स ऑफ औरगंजेब या नावाने यदुनाथ सरकार यांनी त्या ग्रंथाचे भाषांतर केले आहे. अखबारामधील ज्या घटनांचा उल्लेख मोघम आला आहे त्यापैकी काही घटनांवर तरी आठवणीमुळे झगझगीत प्रकाश पडतो.

साताऱ्याला काही युद्ध कैदी पकडले. त्यांना मारावे असा निर्णय काजींनी दिला. तो निर्णय अमलात आणला गेला. इतकाच उल्लेख अखबारा मध्ये आहे.

आता त्यावेळी छावणीत हजर असलेला हमीमुद्दीन वरील घटने संबंधी काय म्हणतो पहा : “काजी मुहंमद अकराम याने बादशहास असा सल्ला दिला की कुराणाच्या कायद्याप्रमाणे हिंदू कैद्यांनी मुसलमानी धर्म स्वीकारल्यास त्यांना सोडून देण्यास हरकत नाही. मुसलमान बंद्यांना तीन वर्षांची सजा देण्यात यावी."

या निवाड्याच्या कागदावर बादशहाने लिहिले “काजीने दिलेला हा निर्णय इस्लामी व्यवहार धर्मशास्त्राच्या हनफी परंपरेला अनुसरून आहे. पण इस्लामी व्यवहार धर्मशास्त्रात चार परंपरा (हनफी, शाफी, मलिकी, हंबाली) या सारख्याच महत्त्वाच्या मानल्या जातात. राज्यावरचा आमचा ताबा सैल होणार नाही. हे लक्षात घेऊन निर्णय द्या."

झाले. काजींनी आपले दुसरे मत पुढीलप्रमाणे दिले ते असे :-- फतवाई आलमगीरी (केस-लॉ, म्हणजे पुर्वीचे निर्णय एकत्र करून व संपादून, औरंगजेबाच्या आज्ञेने तयार केलेला ग्रंथ) च्या आधारावर असे मत आहे की, लोकांना जरब बसावी म्हणून हिंदू आणि मुसलमान अशा दोन्ही कैद्यांचा वध करण्यात यावा.

वरील निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आणि सूर्यास्तापूर्वी कैद्यांची डोकी बादशहासमोर आणण्यात आली. पण अखबारा मध्ये हा तपशील आढळत नाही. हमीदुद्दीनने हा प्रकार आपल्या डोळ्यांनी पाहिलेला. त्यान दिलेली वरील आठवण अधिकृत मानली पाहिजे. या प्रकरणांवरून औरंगजेबाच्या मनोवृत्तीवर जो प्रकाश पडतो त्यावर वेगळे भाष्य करण्याची आवश्यकता नाही.

दुसरे उदाहरण, त्याच ग्रंथातून.

काही मराठ्यांनी मन्सबीसाठी किंवा कैदेतून सुटण्यासाठी धर्मांतर केले. प्रतापराव गुजराच्या मुलांनी कैदेतून सुटण्यासाठी धर्मांतर केले (तेरा जुलै १७००). मावळातील देशमुख खंडाजी उर्फ दौलतमंदखान याला धर्मांतराचा मोबदला म्हणून तीन हजारी मन्सब मिळाली (तेवीस फेब्रुवारी १७००), बहिर्जी देशमुख वतनासाठी मुसलमान झालेला दिसतो (वीस जुलै १७००), तोच प्रकार मयाजी(सयाजी?) उर्फ शेख नेकनाम (चौदा डिसेंबर १६९९) व सूर्याजी पिसाळ - शेख फतेहुल्ला (सतरा नोव्हेंबर १७०२) यांच्या बाबतीत घडला असे म्हणता यईल. पण अशी उदाहरणे अगदी थोडी, हाताच्या बोटावर मोजण्या इतकी आहेत. दरबारच्या बातमीपत्रावरून धर्मांतर करणारी बरीच माणसे कारकून अगर सैन्याच्या खालच्या थरातील दिसतात. ही धर्मांतरे बढतीच्या आशेने झाली असावीत. क्लचित प्रसंगी अफरातफरीची शिक्षा चुकविण्यासाठी धर्मांतर झाले.

औरंगाबादच्या सुभ्याचा प्रमुख कारकून मिहिरचंद याच्यावर सरकारचे हजारो रुपयांचे देणे निघाले. तो कैदेत पडला. शिक्षा टाळण्यासाठी तो मुसलमान झाला. बादशहांनी त्याला स्वतः कलमा पढवून मुसलमान केला आणि त्याचे नाव शेख मिहरुल्ला ठेवले. त्याच्यावरचे सरकारी देणे तर माफ करण्यात आलेच उलट त्याला बक्षीस देण्यात येऊन चांगल्या जागेवर त्याला बढती देण्यात आली. यावरून औरंगजेबाच्या मनोवत्तीवर उत्कृष्ट प्रकाश पडतो. धर्मांतर घडवून आणण्याची तो संधी सोडीत नसे. पण तीहि एका मर्यादेत. मराठ्यांशी निकराचा लढा चाळू असताना धर्मप्रसाराचा आपला छंद फार महाग पडेल याची त्याला जाणीव असावी.

माहितगार's picture

12 May 2019 - 4:40 pm | माहितगार

@ मनो, मध्ययुगिन इतिहासाचा आपला अभ्यास नक्कीच अधिक सखोल आहे. आजही डोंगरी आणि जंगल प्रदेशातील गनिमी संघर्ष हाताळणे मैदानी फौजांना पुरेसे कठीण असते. साधनांच्या अभावाच्या काळात ते आणखीनच असावे. आजचा उत्तराखंड दिल्ली सुल्तान आणि मोघलांना कधीच घेता आला नाही. नेपाळ आणि आसाम हे प्रदेश तुरळक काही चढायांपलिकडे मोघलांना काही करता आले नाही. -त्याच वेळी मध्य आशियातील डोंगरी प्रदेशातील इस्लामी पादक्रमण बर्‍यापैकी सहजतेने झाल्यासारखे वाटते. कदाचित अफगाणीस्ताना ते मंगोलीया बौद्ध प्रभावाशी तोंड देणे त्यांना लिलया सोपे गेले असेल आणि डोंगरी युद्धांना सरावलेल्या मंगोलांना बाकीचा मध्य आशिया डोंगरी प्रदेश सर करणे सहज जमले असेल अशी शक्यता असू शकेल का ?

टर्मीनेटर's picture

12 May 2019 - 3:31 pm | टर्मीनेटर

तुमच्या लेखातील

व्यापारासाठी भारतात आल्यावर त्याला अभयचंद नावाचा जिवश्च मित्र भेटला सर्वस्वाचा त्याग करून अभयचंदा सोबत त्याने भारत भ्रमंती केली.

हे वाक्य वाचल्यावर थोडा संशय आला म्हणून 'was sarmad kashani homosexual' असा शोध घेतल्यावर खालील दुवे मिळाले...
https://scroll.in/article/810007/from-bulleh-shah-and-shah-hussain-to-am...
https://twitter.com/edourdoo/status/855347721753960448?lang=en
https://www.quora.com/Who-are-some-notable-homosexuals-in-Indian-history...
https://me.me/i/when-your-parents-are-about-to-visit-any-minute-and-1334078

औरंग्या नीच होता ह्याबद्दल दुमत नाही. पण केवळ अभी चंद बरोबर सरमद कशानीचे समलैंगिक संबंध नसून दारा शिकोह बरोबर पण असल्याचा संशय येण्यास जागा आहे... त्यामुळे आजकाल काही खुळ्यांचे समर्थन लाभले असले तरी समलैंगिक संबंध जगात प्रस्थापित कुठल्याही धर्माला अमान्य असल्याने त्याचा शिरच्छेद (फाशी नव्हे) औरंग्याने केला असल्यास नवल नाही!
त्यामुळे,

"आणि एका नागड्या नास्तिकाने आपल्या स्वातंत्र्यासाठी जिवाची बाजी लावली. शांततेच्या धर्माचे आणि प्रेमळ बादशहाचे औदार्य उजागर करून इतिहासाच्या पानांवर भाषणस्वातंत्र्यासाठी जिव गमावलेल्यांच्या यादीत सुवर्णाक्षरांनी नोंद करून ठेवली."

च्या धर्तीवर आणि एका नागड्या समलैंगिकाने आपल्या समलैंगिक स्वातंत्र्यासाठी जिवाची बाजी लावली. शांततेच्या धर्माचे आणि प्रेमळ बादशहाचे क्रौर्य उजागर करून इतिहासाच्या पानांवर समलैंगिक स्वातंत्र्यासाठी जिव गमावलेल्यांच्या यादीत सुवर्णाक्षरांनी नोंद करून ठेवली.
असे म्हणणे गैर ठरणार नाही.
असो, खरे खोटे देव जाणे!'पुराणातील वांगी (अर्थात वानगी) पुराणात'.

भंकस बाबा's picture

12 May 2019 - 5:07 pm | भंकस बाबा

समलैंगिक संबध फक्त कागदोपत्री निषिद्ध असतात. मुस्लिम बहुसंख्य असलेले लखनऊ गे लोंकासाठी प्रसिद्ध आहे.
पाकिस्तानमधे या गोष्टीला बच्चाबाजी म्हणून जबरदस्त प्रसिद्धि मिळालेली आहे. अरब लोक समलैंगिक संबंध बनवण्यासाठी जग पालथे घालतात, आणि ते त्यांच्या या शौकसाठी दुनियाभर ओळखले जातात.

माहितगार's picture

12 May 2019 - 5:13 pm | माहितगार

ईतिहासातील पूर्ण खरे खोटे शोधणे अवघडच . समाजाने दडपले तरी समलैंगिकांनी कोणत्या न कोणत्या प्रकारे त्यांचे मार्ग शोधले नसतीच असे नाही. पण सरमद ऑदरवाईज बर्‍या पैकी स्पष्टवक्ता दिसतो तो समलैंगिक असताच तर त्याने अभयचंदाच्या मैत्रिबाबत अधिकस्पष्टही नमुद करुन ठेवले नसतेच असे नाही.

प्रत्येक व्यक्तित ईश्वर बघणे हे हिंदू तत्वज्ञानाचा भाग आहे त्यामुळे एखाद्या व्यक्तीत ईश्वर आणि मग त्या ईश्वरावर प्रेम या प्रतिमातून समलैंगिक संबंध सिद्ध होतात की नाही हे सांगणे कठीण असावे. आपण दिलेले दुवे याच आधारावरून संशय घेतात पण कोणता स्पष्ट पुरावा दिसत नाही.

दुसरे समलैंगिकतेसाठीची इस्लामी शिक्षा उंचावरून खाली फेकण्याची आहे शिरच्छेदाची नव्हे. तर ईश्वर आणि प्रेषित निंदेची शिक्षा मारुन टाकण्याची आहे . आणि औरंगजेब शरिया कानूनचे पालन पहाता ईश्वर निंदेचे कारण अधिक सहज वाटते. (या शिक्षा हदिथ नुसार असाव्यात कुराणात नसाव्यात असे वाटते चुभूदेघे) केवळ तो धर्म ग्रंथातलेच शब्द वापरतोय तर नेमके काय करायचे याचा खल करण्यात सरमदला वेळ देऊन पहाण्यात औरंगजेबाने २-३ वर्षे घेतली असावीत.

इतिहासातील आपल्याला जेवढे हवे तेच निवडून त्यावर हीन टीका करणे योग्य नाही.
औरंगजेबाचे वर्तन काही बाबीत योग्य होते.
बापाने तजमहालासारखी वास्तू बांधून राज्याचा खजीना शून्यावर आणला , त्या नंतर बापाला आपण देव आहोत असा गम्ड चढला या कारणास्तव त्याने कैद केले आइ राज्य ताब्यात घेतले. ही गोष्ट योग्यच केली. रहाता राहिली धर्मप्रसाची गोष्ट . ती त्याच्या दृष्टीने योग्यच होती.
समाजात कर्मठपणा आणला हे अयोग्य झाले.
मात्र औरंगझेब काय किंवा त्याचे पूर्वासूरी काय ..... इथल्या हिंदू राजांचे / सरदारांचे सहाय्य असल्याशिवाय का ते हे पाऊल उचलू शकले.

….गम्ड चढला या कारणास्तव त्याने कैद केले आइ राज्य ताब्यात घेतले. ही गोष्ट योग्यच केली. रहाता राहिली धर्मप्रसाची गोष्ट . ती त्याच्या दृष्टीने योग्यच होती.
समाजात कर्मठपणा आणला हे अयोग्य झाले.
मात्र औरंगझेब काय किंवा त्याचे पूर्वासूरी काय ..... इथल्या हिंदू राजांचे / सरदारांचे सहाय्य असल्याशिवाय का ते हे पाऊल उचलू शकले….

विजुभाऊ आपल्याच वाक्यात खालील परिवर्तनावर आपली प्रतिक्रीया काय असेल ?

….हिंदूत्वेतरांना गम्ड चढला या कारणास्तव त्याने कैद केले आणि राज्य ताब्यात घेतले. ही गोष्ट योग्यच केली. रहाता राहिली धर्मप्रसाची गोष्ट . ती त्याच्या दृष्टीने योग्यच होती.
समाजात कर्मठपणा आणला हे अयोग्य झाले.
मात्र अबकड हिंदूत्ववाद्याचे काय किंवा त्याचे पूर्वासूरी काय ..... इथल्या हिंदूत्वेतर राजकारण्यांचे सहाय्य असल्याशिवाय का ते हे पाऊल उचलू शकले….

औरंगजेब असेल किंवा कोण्ही एतद्देशीय मुस्लिम बादशाह त्याच्या दरबारी खूप सारे हिंदू सरदार होते त्या प्रमाणेच हिंदू राज्य कर्त्यांच्या पदरी मुस्लिम लोक होति त्या मुळे तेव्हा ज्या लढाया झाल्या त्या धार्मिक होत्या असे म्हणता येत नाही
पण विदेशी मुस्लिम शासक तैमुर असेल किंवा खिलजी हे मात्र हिंदू चे दुष्मणच होतें त्यात शंका नाही

सेक्युलर या व्याख्येत कोण मोडते ? औरंगजेब की शिवाजी आणि दारा शुकोह ?

सरमद प्रसंगात सहिष्णू कोण औरंगजेब की दारा शुकोह?

माहितीगारजी तुमचं बरोबर आहे,
या दुत्त दुत्त औरंग्याच्या कारनाम्याच्या पुराव्याचे, त्याकाळात काही डिजिटल फोटो काढले गेले होते, आणि भारत स्वतंत्र झाल्यावर लगेचच त्यांनी ते इथल्या
सांस्कृतिक संघटनेला ई-मेल ने पाठवले होते, (सांस्कृतिक कामात मदत करण्यासाठी). लवकरच ते कायप्पावर लोकांकडे येतील . थोडं थांबा.

समकालीन निपट निरंजनाने तर १०० उंदीर खाऊन हाजला निघालेल्या तुमच्या पवित्र महापुरुषाची तसबीर वर्णनातून रेखाटलीच आहे. कायप्पावर आज नाही उद्या कोणीतरी टाकेलच.

थेंबानी गेलेले हौदाने येत नाही, पवित्र करण्यासाठी हवा तेवढा चुना ओतून घ्या

जिथे फुलं वाहीली जातात त्या जागा लगेच नाही काळाच्या ओघात तपासल्या जातात. आणि जखमेवर मीठ चोळल्यावर कोबंडे किती झाकले तरी आरवतेच.

* घरी आप्त स्वकीयांवर करून पहाण्यासाठी प्रात्यक्षिक: घरी कुणास जखम झाली तर औषध पाणि फुंकर न करता , त्यांच्या जखमेवर मीठ टाकून औरंगजेबाचे कोड कौतुक करणारी पोथी वाचणे.

Rajesh188's picture

14 May 2019 - 1:36 pm | Rajesh188

बांगलादेश,पाकिस्तान,अफगाणिस्तान,आणि भारत ह्या सर्व देशातील मुस्लिम लोकसंखे पेक्षा हिंदू ची लोकसंख्या जास्त आहे
किती तरी वर्ष मुस्लिम बादशहनी इथे राज्य केले धर्मांतर जबरदस्तीने केलेच असणार तरी सुद्धा हिंदू संख्येने जास्तच ह्याच काय कारण असावे
मला तर वाटत हिंदू नि अतिशय कडवा प्रतिकार केल्या मुळे

सूफी लोकांशी शिया सुन्नी वाले जमवून घेत नाहीत,पटत नाही.
कारण आहे त्यांचे अनल हक म्हणणे.
आणि सरमद अनल हक म्हणत होता .
शिय्या सुनी वाले मोहमद च्या वर जात नाहीत
त्यामुळे त्याला मारले

खुद ही खुदा है तो पाना कहाँ है?

http://khudhikhudahai.blogspot.com/
http://khudhikhudahai.blogspot.com/p/v-behaviorurldefaultvmlo.html

माहितगार's picture

14 May 2019 - 5:45 pm | माहितगार

खरे म्हणजे शांततेच्या धर्माचा जो काही थोडा फार प्रसार खर्‍या शांततेत पार पडला तो उदार सुफींमुळे पण एका अर्थाने काही अपवाद वगळता सर्व शांतता मय धर्म प्रसारक सहसा उदार असतात म्हणूनच लोक आकर्षित होतात. अर्थात संघर्षाच्या वेळा येतात तेव्हा शांततामयी उदार लोकांची स्थिती अवघड असते लोक सावकाश कर्मठतेच्या मार्गाने प्रवास करु लागतात. त्यामुळे धार्मिकतेचे बाह्यांग उदार असले तरी पुढचा मध्याकडचा प्रवास कर्मठता आतंक याची टोकेही असू शकतो.

जाता जाता सुफी धार्मिक आचरणा बद्दल अंशतः उदार असले तरी अंशतःच उदार होते. त्यांची उदारता जिवनाच्या सर्व अंगाना स्पर्ष करणारी होती अथवा आहे असे म्हणणे धर्ष्ट्याचे व्हावे असे वाटते.

मुक्त ज्ञानकोष विकिपीडिया से
अनलहक सूफियों की एक इत्तला (सूचना) है जिसके द्वारा वे आत्मा को परमात्मा की स्थिति में लय कर देते है। सूफियों के यहाँ खुदा तक पहुँचने के चार दर्जे है। जो व्यक्ति सूफियों के विचार को मानता है उसे पहले दर्जे क्रमश: चलना पड़ता है - शरीयत, तरीकत मारफत और हकीकत। पहले सोपान में नमाज, रोजा और दूसरे कामों पर अमल करना होता है। दूसरे सोपान में उसे एक पीर की जरूरत पड़ती है-पीर से प्यार करने की और पीर का कहा मानने की। फिर तरीकत की राह में उसका मस्तिष्क आलोकित हो जाता है और उसका ज्ञान बढ़ जाता है; मनुष्य ज्ञानी हो जाता है (मारफत) । अंतिम सोपान पर वह सत्य की प्राप्ति कर लेता है और खुद को खुदा में फना कर देता हैं। फिर 'दुई' का का भाव मिट जाता है,'मैं' और 'तुम' में अंतर नहीं रह जाता। जो अपने को नहीं सँभाल पाते वें 'अनलहक' अर्थात्‌ 'मैं खुदा हूँ' पुकार उठते हैं। इस प्रकार का पहला व्यक्ति जिसने 'अनलहक' का नारा दिया वह मंसूर-बिन-हल्लाज था। इस अधीरता का परिणाम प्राणदंड हुआ। मुल्लाओं ने उसे खुदाई का दावेदार समझा और सूली पर लटका दिया।

अनल हक कहने का मंसूर का आशय यह था कि जीव और परमात्मा में अभेद है। यह विचार हमारे उपनिषदों का एक सूत्र- अहं ब्रह्मास्मि के समान है।

‘अनल हक‘, अर्थात, मैं सत्य हूं.

गड्डा झब्बू's picture

14 May 2019 - 5:21 pm | गड्डा झब्बू

कोण हयो सरमद कशानी? का उगीच डोके खाऊन राहिले भाऊ त्यावरून?
वर लीव्ह्ल्या प्रमाणे कोणा होमो बद्दल लिव्हायचा असंल तर करण जोहर वग्रे आजच्या लोकांबद्दल काही लिव्हा की.
कला उगाच शे पाचशे वर्ष पूर्वीच्या भाडखौंबद्दल लिहीताव?

माहितगार's picture

14 May 2019 - 5:38 pm | माहितगार

आपण सुद्धा दुसर्‍या व्यक्तित ईश्वर पहाण्याच्या भावनेला होमोंच्या पंक्तीत बसवण्याच्या आग्रह करणार्‍यांच्या पंक्तीत बसून केवळ आपल्या संशयावरुन कुणाच्या तरी व्यक्तिगत लैंगिक व्यवहाराला 'भाडखौ' वगैरे दुषणे देण्यात वेळ का घालवत आहात?

समलैंगिकांवर लेख लिहायचा असता अथवा तसे म्हणायचे असते तर स्पष्ट लिहिले असते. पण लेख त्या संदर्भात नाही. सरमदला शीरच्छेदाला सामोरे जावे लागले ते केवळ त्याच्या धार्मिक चिकित्से बाबतच्या भाषणस्वातंत्र्या बाबत बाळगल्या गेलेल्या असहिष्णूते मुळे आणि आजही हि परिस्थिती पूर्ण बदललेली आहे का ?

याच धाग्यावर एक जण नास्तिकांना देहदंडाची शिक्षा योग्य असल्याची भूमिका मांडतो आहे.

त्या बद्दल या धाग्यात चर्चा करता आली सहिष्णूता विषय आजही तेवढाच महत्वाचा आहे त्या बद्दल चर्चा करता आली यातच या धागा लेखनाचे औचित्य आणि उद्दीष्ट सफल होते आहे

आपण आणि आपल्या आधीचे एक जण आडून होमोंची हेटाळणी करत आहात तो विषय धागा लेखकाच्या डोक्यात नव्हता पण ह्या हेटाळणीसही सहिष्णूता संबोधले जाऊ शकते का य बद्दल साशंक आहे.

भंकस बाबा's picture

14 May 2019 - 7:44 pm | भंकस बाबा

जर आपला रोख माझ्या लिखाणावर असेल तर एक स्पष्ट करू इच्छितो. आपण शांतिप्रिय धर्माचे दाखले देऊन सरमद एक होमो होता म्हणून त्याला मारण्यात आले ऐसे लिहिले आहे. मी फक्त इतकेच दाखले दिले की होमोसेक्सुअलिटी शान्तिप्रिय धर्मात निषिद्ध असली तरी या धर्माच्या बाशिंद्यातच तिला जास्त लोकप्रियता मिळाली आहे, पण आम्ही सच्चे धर्मपालक म्हणून हे लपवायला लागते. होमोसेक्सुअलिटी एक नैसर्गिक प्रवृत्ति मानली तर हरकत नाही, पण आमचे शांतिप्रिय धर्माचे लोक तिचे बाजारीकरण करत आहेत, तसेच ती एक विकृति बनत आहे. त्यामुळे माझ्या लिहिलेले पोस्टमधील आशय बघा.

माहितगार's picture

14 May 2019 - 7:55 pm | माहितगार

रोख तुमच्या प्रतिसादावर नव्हता, उगीच ओढून नका घेऊ.

भंकस बाबा's picture

14 May 2019 - 8:00 pm | भंकस बाबा

तुमच्याकडून अशाच माहितिपर लेखाची अपेक्षा आहे.
विरोधाची तमा न बाळगता लिहित रहा , ही विनंती.

गड्डा झब्बू's picture

14 May 2019 - 6:11 pm | गड्डा झब्बू

>>>आपण आणि आपल्या आधीचे एक जण आडून होमोंची हेटाळणी करत आहात तो विषय धागा लेखकाच्या डोक्यात नव्हता पण ह्या हेटाळणीसही सहिष्णूता संबोधले जाऊ शकते का य बद्दल साशंक आहे. >>>
कसली सहिष्णुता घेऊन बसले राव?
परत विचारतो, कोण हा सरमद कशानी? काय योगदान आहे त्याचे समाजासाठी? काय प्रयोजन आहे त्याच्या उदात्तीकराणासाठी धागा काढयचे? आणि असेल तुम्हाला तो प्रिय पन त्याच्या बद्दलच्या नकारात्मक बाजू का नाही लिहिल्यात लेखामधे? कि तुमचाही काही अजेंडा आहे असल्या फटीचर लोकांना हुतात्मा वग्रे बनवण्यामधे?

गड्डा झब्बू आपला मिपावरील अधिकृत काळ 6 days 4 hours एवढा दिसला ( डू आयडी असल्यास क्षमस्व .)

कि तुमचाही काही अजेंडा आहे असल्या फटीचर लोकांना हुतात्मा वग्रे बनवण्यामधे?

फटीचर लोक हुतात्मा होत नसतात हा आपला जावई शोध आवडला. आपले फटीचर पणाचे क्रायटेरीया आणि आपल्या लेखी फटीचर नसलेल्या हुतात्म्याम्ची यादी दिल्यास आता पर्यंतच्या बाकी हुतात्म्यांनाही लावून पहाता येईल.

माझ्या व्यक्तिगत अजेंडावर भाष्य करण्यासाठी तुम्हाला माझे आता पर्यंतचे सगळे लेखन वाचावे लागेल. औरंगजेबाला फटीचर वगैरे म्हणावे की नाही माहित नाही मी उणिवा दाखवताना द्वेषही करत नाही. व्यक्ति पूजाही करत नाही म्हणून उणिवा दाखवताना तो भेदही उरत नाही. औरंगजेबाच्या उणिवा आपणा एवढ्या पोळण्याचे कारण काय बरे ? की औरंगजेबाला हुतात्मा समजणार्‍यांच्या पंक्तित बसून आपण बोलत आहात ?

परत विचारतो, कोण हा सरमद कशानी? काय योगदान आहे त्याचे समाजासाठी?

असे प्रत्येक व्यक्तिचे समाजासाठी योगदान असतेच का ? समाजासाठी योगदान नसलेल्यांना असहिष्णूतेने वागवणे हि आदर्श गोष्ट कशी ठरते ?

आपल्या सहा दिवस ४ तास मिपा प्रवासातून तरी आपल्या उण्यापुर्‍या आयुष्यातील समाजासाठीचे योगदान मोजणे अवघड आहे समजा असेलही, पण तुमच्या घरातील मित्र परीवाराईल तुमच्यासारखाच स्पष्टपणा असलेली व्यक्तिस स्पष्टपणासाठी कुणि औरंगजेबाने सरमदला वागवले तसे वागवले तर समर्थनीय ठरते का ? त्यास सहिष्णूता म्हणता येईल का ?

उद्या तुमच्या पुढच्या पिढ्यांना कुणि सहिष्णूतेने वागवले नाही तर तुम्हाला चालणारे आहे का ?

परत विचारतो, कोण हा सरमद कशानी?

आपल्या एक्सटेंडेड मित्र परिवार ते पुढील सात पिढ्यांचे नावे अथवा क्रमांक लिहून काढा आणि पुढे फटीचर नसलेला हे सुद्धा आठवणीने लिहा.

गड्डा झब्बू's picture

14 May 2019 - 7:11 pm | गड्डा झब्बू

दुसरे भेटलात काल पासून मला किती दिवस झाले इथे येऊन ते मोजणारे :-)) एखाद्याचा सदस्यकाल ठरवतो का त्याची आकलन क्षमता?
>>>औरंगजेबाला फटीचर वगैरे म्हणावे की नाही माहित नाही मी उणिवा दाखवताना द्वेषही करत नाही. व्यक्ति पूजाही करत नाही म्हणून उणिवा दाखवताना तो भेदही उरत नाही. औरंगजेबाच्या उणिवा आपणा एवढ्या पोळण्याचे कारण काय बरे ? की औरंगजेबाला हुतात्मा समजणार्‍यांच्या पंक्तित बसून आपण बोलत आहात ?>>>
हा तुमचा जावईशोधही आवडला :-)) कोण हा सरमद कशानी? काय योगदान आहे त्याचे समाजासाठी? त्याला उद्देशून फटीचर हा शब्द वापरला होता. तुम्ही तो सोयीस्करपणे औरंग्जेबासाठी घेतलात. चालुदे तुमचे फटीचर प्रतिमा संवर्धन. मि माझी मते मांडत राहीन तुम्हाला किंवा आणि कोणाला पटो का ना पटो.

भंकस बाबा's picture

14 May 2019 - 7:55 pm | भंकस बाबा

सरमद हा कुणी टिकोजीराव नसला तरी त्याची हत्या हा चर्चेचा विषय असू शकतो, अशा वेळी जेव्हा हिंदू आंतकवाद हा शब्द अल्पसंख्यक समुहाला चुचकारण्यासाठी प्रसवला जातो. हा शब्द वापरणारे सेक्युलर हिरवा दहशतवाद हा शब्द उच्चारायला कमालीचे घाबरतात. जर असे अत्याचार जगाच्या समोर येतील तर या शब्दाला जोर येईल. कारण मला तर आतापर्यंत सरमद कशानी कोण हे माहित नव्हते, या लेखामुळे ते माहित झाले.
त्यामुळे असे लेख येणे ही काळाची गरज आहे

भंकस बाबा's picture

14 May 2019 - 7:56 pm | भंकस बाबा

सरमद हा कुणी टिकोजीराव नसला तरी त्याची हत्या हा चर्चेचा विषय असू शकतो, अशा वेळी जेव्हा हिंदू आंतकवाद हा शब्द अल्पसंख्यक समुहाला चुचकारण्यासाठी प्रसवला जातो. हा शब्द वापरणारे सेक्युलर हिरवा दहशतवाद हा शब्द उच्चारायला कमालीचे घाबरतात. जर असे अत्याचार जगाच्या समोर येतील तर या शब्दाला जोर येईल. कारण मला तर आतापर्यंत सरमद कशानी कोण हे माहित नव्हते, या लेखामुळे ते माहित झाले.
त्यामुळे असे लेख येणे ही काळाची गरज आहे

गड्डा झब्बू's picture

14 May 2019 - 8:50 pm | गड्डा झब्बू

सहमत पण त्याचे चरित्र एकांगी लिहू नये. सकारात्मक आणि नकारात्मक बाजू उलगडल्या तर व्यक्तिरेखेस न्याय देणे सोपे जाते. हिंदू आंतकवादाचा विषय आलाच आहे तर करकरेंच्या बाबतीत साध्वी प्रज्ञासिंग यांचे उद्गार मला 100% पटतात. २६/११ च्या घटनेत माझ्या मते खरे खुरे शहीद एकच तुकाराम ओंबाळे. कामटे,करकरे आणी साळस्करांकडे अत्याधुनिक शस्त्रे असूनही त्यांचा वापर न करता त्या तिघांचा झालेला मृत्यू आणि इतर १५४ सामान्य माणसांचे मृत्यू हे सर्व त्या घटनेतले बळी आहेत शहीद नाही.

माहितगार's picture

14 May 2019 - 10:01 pm | माहितगार

सहमत पण त्याचे चरित्र एकांगी लिहू नये. सकारात्मक आणि नकारात्मक बाजू उलगडल्या तर व्यक्तिरेखेस न्याय देणे सोपे जाते.

१) लेखक म्हणून अगदी एकांगीही लिहिण्याचा माझा अधिकार आहे. अगदी एकांगी टिका करण्याचाही. माझा समतोल लिहिण्याचा स्वभाव असूनही चुकीचे आक्षेप घेतल्याने केवळ लेखन स्वातंत्र्य सिद्ध करण्यासाठी मी दोन लेखांचा मथळा बदलून एकांगी केला तसा आपणास भेट म्हणून जेवढ्या वेळा चुकीचा आक्षेप घ्याल त्याच्या चार पट एकांगी लेखांचे लेखन करण्याचे आश्वासन देतो.

२) स्वतःबद्दल दहा नकारात्मक बाजू आधी लिहून दाखवाव्यात - इतरांचे सामाजिक योगदान मोजण्यापुर्वी स्वतःचे काही सामाजिक योगदान असेलही ते आधी मोजून दाखवावे - स्वतःच्या टिका आणि लेखन स्वातंत्र्याच्या गप्पा करणार्‍यांना सरमदचे संभाषण स्वातंत्र्य केवळ सामाजिक योगदान नाही या निकषावर शीरच्छेद करण्या लायक वाटावे यात आपल्या योगदानाची ज्ञानाची उदात्ततेची सर्व महती आली. मी व्यक्तिगत टिका करत नाही पण आपण अजेंडा मोजणे चालू केले अगदी अजेंड्यासहीत लेखन करण्याचा आधिकार किमान चारवेळा लक्षवेधून करून देईन फक्त आपल्याला नको असलेला अजेंडा कोणता ते कळवावे.

३) सरमद असो वा २६/११ मधील मृत्यूमुखी त्यांना शहीद म्हणा अथवा बळी म्हणा ना औरंगजेबाची ना अतिरेक्यांची ना त्यांच्या तत्वज्ञानामागे असलेल्या शांततेच्या धर्माची सहिष्णूता त्यातून सिद्ध शकते. (आपल्या आनंदा खातर वाक्य एकांगी ठेवतो आहे.)

४) सरमद समलिंगी असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. पण तो तुमचा एक चांगला समलिंगी मित्र सिद्ध होऊ शकला असता असे एकांगी वाक्य लिहितो आहे. समलिंगी व्यक्ती चांगल्या मित्र असू शकतात हे. वे. सा. न. ल.

भारतीय भाषांसाठी शहिद शब्दाच्या नव्या व्याख्या लिहिणे चालू आहे ह्याची व्यवस्थित कल्पना असलेला माहितगार

जालिम लोशन's picture

14 May 2019 - 9:03 pm | जालिम लोशन

ओ कशाला त्याच्या नादी लागतायत, दगडबिगड मारायचा, ऊतारा मिळालेला दिसत नाही आहे दोन दिवस.